Marathi phrases मराठी  वाक्प्रचार 

स्कॉलरशिप परीक्षा, स्पर्धा परीक्षा व पाचवी ते दहावीच्या अभ्यासासाठी उपयुक्त प्रश्नमंजुषा Phrases in Marathi

कान टवकारणे_

  1. कान हलविणे
  2. लक्षपूर्वक ऐकणे
  3. दुर्लक्ष करणे
  4. लक्ष न देणे

मात करणे

  1. विजय मिळविणे
  2. पराजित होणे
  3. हारणे
  4. कर्ज मिळणे

पोटात कावळे ओरडणे

  1. भांडण करणे
  2. आरडाओरडा करणे
  3. खूप भूक लागणे
  4. यापैकी नाही

कावराबावरा होणे

  1. आनंद होणे
  2. विजय मिळविणे
  3. गोंधळून जाणे
  4. लक्षपूर्वक ऐकणे

धुडकावून लावणे

  1. नामंजूर करणे
  2. गुणगान गाणे
  3. मनापासून आवडली
  4. यापैकी नाही

टवाळकी करणे

  1. चेष्टा करणे
  2. शिस्त पाळणे
  3. विजय मिळविणे
  4. यापैकी नाही

मुंगीच्या पावलाने जाणे

  1. जोरजोरात गाणे
  2. सावकाश जाणे
  3. पळत पळत जाणे
  4. यापैकी नाही

हाता पाया पडणे

  1. विनवणी करणे
  2. नाराज होणे
  3. आनंदी होणे
  4. दुःखी होणे

कानाडोळा करणे

  1. दुर्लक्ष करणे
  2. लक्षपूर्वक पाहणे
  3. पाठ फिरवणे
  4. यापैकी नाही

पोबारा करणे

  1. दुर्लक्ष करणे
  2. पळून जाणे
  3. लपून बसणे
  4. यापैकी नाही

हात देणे

  1. मदत करणे
  2. नामानिराळा होणे.
  3. ताव मारणे
  4. नाईलाजाने शरण जाणे

हात टेकणे

  1. मदत करणे
  2. ताव मारणे
  3. नामानिराळा होणे.
  4. नाईलाजाने शरण जाणे

हात मारणे

  1. मदत करणे
  2. नाईलाजाने शरण जाणे
  3. नामानिराळा होणे.
  4. ताव मारणे

हात झटकणे

  1. नाईलाजाने शरण जाणे
  2. नामानिराळा होणे.
  3. मदत करणे
  4. ताव मारणे

डोळे पांढरे होणे.

  1. दुर्लक्ष करणे
  2. मरण पावणे
  3. झोप येणे
  4. खूप धक्कादायक प्रसंग निर्माण होणे.

डोळा लागणे

  1. झोप येणे
  2. दुर्लक्ष करणे
  3. मरण पावणे
  4. खूप धक्कादायक प्रसंग निर्माण होणे.

डोळे मिटणे

  1. झोप येणे
  2. खूप धक्कादायक प्रसंग निर्माण होणे.
  3. मरण पावणे
  4. दुर्लक्ष करणे

डोळेझाक करणे

  1. दुर्लक्ष करणे
  2. मरण पावणे
  3. खूप धक्कादायक प्रसंग निर्माण होणे.
  4. झोप येणे

तोंड देणे

  1. जपून बोलणे
  2. नाराजी व्यक्त करणे.
  3. सामना करणे
  4. कायमचे निघून जाणे

तोंड काळे करणे.

  1. नाराजी व्यक्त करणे.
  2. जपून बोलणे
  3. कायमचे निघून जाणे
  4. सामना करणे

तोंड फिरवणे.

  1. जपून बोलणे
  2. नाराजी व्यक्त करणे.
  3. कायमचे निघून जाणे
  4. सामना करणे

तोंड सांभाळून बोलणे.

  1. नाराजी व्यक्त करणे.
  2. जपून बोलणे
  3. कायमचे निघून जाणे
  4. सामना करणे

बाजी मारणे

  1. पळून जाणे
  2. निघून जाणे
  3. बेभान होणे.
  4. विजय होणे

पुढे दिलेला अर्थ असणारा वाक्प्रचार निवडून योग्य पर्याय निवडा.

दुसऱ्याच्या उठाठेवी करणे

  1. हाय खाणे
  2. लष्कराच्या भाकर्‍या भाजणे
  3. स्वप्न भंगणे
  4. हात सोडणे

दोष न येता सुटका होणे

  1. सळो की पळो करणे
  2. हाताचा मळ असणे
  3. सहीसलामत सुटणे
  4. वकील पत्र घेणे

आशा दाखवणे

  1. मधाचे बोट लावणे
  2. हात मारणे
  3. वणवण भटकणे
  4. विडा उचलणे

मनातील विचार कृतीत न येणे

  1. राम नसणे
  2. मन मोकळे करणे
  3. हात जोडणे
  4. स्वप्न भंगणे

थोडीफार बचत करणे

  1. डोळ्याचे पारणे फिटणे
  2. डांगोरा पिटणे
  3. जीवावर उदार होणे
  4. चार पैसे गाठीला बांधणे

विघ्न निर्माण करणे

  1. खो घालणे
  2. कंबर कसणे
  3. उराशी बाळगणे
  4. उखळ पांढरे होणे

स्वरूप पूर्णपणे बदलणे

  1. काखा वर करणे
  2. उचलबांगडी करणे
  3. आच लागणे
  4. कायापालट होणे

काहीतरी रहस्य असणे

  1. अन्नास लावणे
  2. गळ्यात पडणे
  3. गौडबंगाल असणे
  4. खडे चारणे

दुर्दैव ओढावणे

  1. कपाळ फुटणे
  2. उंटावरून शेळ्या हाकणे
  3. गंगेत घोडे न्हाणे
  4. खडा टाकून पाहणे

उत्तर न देता गप्प राहणे

  1. मधाचे बोट लावणे
  2. हात जोडणे
  3. हट्टाला पेटणे
  4. संधान बांधणे

‘ताव मारणे’ हा अर्थ असलेला खालीलपैकी एक वाक्प्रचार ओळखा.

  1. हात देणे
  2. हात मारणे
  3. हात टेकणे
  4. हात तोडणे

‘कानमंत्र देणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

  1. गुप्त सूचना देणे
  2. मंत्र सांगणे
  3. काहीतरी प्रश्न विचारणे
  4. यापैकी नाही

‘एखाद्याच्या नावाने ओरड करणे’ हा अर्थ असणारा खालीलपैकी योग्य वाक्प्रचार निवडा.

  1. श्रीमुखात देणे
  2. स्वर्ग दोन बोटे उरणे
  3. शंख करणे
  4. यापैकी नाही

खाली वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या दिलेले आहेत. चुकीचा पर्याय निवडा.

  1. शोभा होणे _फजिती होणे
  2. वेध घेणे_ चौकस नजरेने पाहणे
  3. सर्द होणे_ वरमणे
  4. वेसन घालणे _आरंभ होणे

‘अर्धचंद्र देणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

  1. हकालपट्टी करणे
  2. चढाओढ लावणे
  3. उपोषण करणे
  4. काहीही खाणे

‘मोठा पराक्रम गाजविणे’ हा अर्थ असणारा खालीलपैकी योग्य वाक्प्रचार निवडा.

  1. अट घालणे
  2. अवदसा आठवणे
  3. जीव टाकणे
  4. अटकेवर झेंडा लावणे.

‘कैवार घेणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा

  1. पक्ष घेणे
  2. भांडणे उकरून काढणे
  3. मोठा गोंगाट होणे
  4. यापैकी नाही

सुमनने परिस्थितीचा अंदाज घेऊन…..

  1. कोड पुरविणे
  2. काढता पाय घेणे
  3. स्वर्ग दोन बोटे उरणे
  4. यापैकी नाही

पुढील आकृतीत लपलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा……. 

त्रा न ल णे खा हा कु

  1. कुणीही न विचारणे
  2. पक्ष घेणे
  3. कामावर निघणे
  4. खोटा आरोप करणे

पुढील आकृतीत लपलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

न ता दो हा चे र चा त हा णे हो

  1. बुद्धी नसणे
  2. विचका होणे
  3. विवाह होणे
  4. दोष देणे

पुढील आकृतीत लपलेल्या वाक्प्रचाराचा  अर्थाचा योग्य पर्याय निवडा. 

णे णा हो दा र उ व र प्रा

  1. हसणे
  2. गोंधळून जाणे
  3. दोष देणे
  4. जिवाची पर्वा न करणे

बोटावर नाचवणे

  1. दोष देणे
  2. बुद्धिहीन असणे
  3. आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे
  4. यापैकी नाही

पोटात घालणे

  1. उपमर्द करणे
  2. पोटाला न खाता राहणे
  3. क्षमा करणे
  4. हसणे

नाकाने कांदे सोलणे

  1. स्वतः मध्ये दोष असूनही उगाच बढाया मारणे
  2. जीवाची पर्वा न करणे
  3. एक सारखे प्रश्न विचारणे
  4. बुद्धिहीन असणे

पाठ दाखवणे

  1. आशा सोडणे
  2. गोंधळून जाणे
  3. पळून जाणे
  4. संरक्षण देणे

दाताच्या कण्या करणे

  1. ओढून ताणून लावलेला संबंध असणे
  2. अनेक वेळा विनंती करून सांगणे
  3. बोभाटा करणे
  4. सामर्थ्य दाखवणे

तोंड टाकणे

  1. फसवणे
  2. अद्वातद्वा बोलणे
  3. तोंडात मारणे
  4. टपून बसणे

Phrases in Marathi

error: Content is protected !!