Marathi Grammar Prayog

Marathi Grammar Prayog | मराठी व्याकरण प्रयोग

प्रयोग: वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्‍्याती कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला प्रयोग असे म्हणतात. ‘प्रयोग’ हा शब्द संस्कृत ‘प्र+युज’ (यश) यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ ‘जुळणी’ किंवा ‘रचना’ असा आहे. प्रत्येक वाक्यात जे क्रियापद अ त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते की, ते क्रियापद कधी कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग, वचन किं पुरुष याप्रमाणे बदलते, तर कधी ते क्रियापद मुळीच बदलत नाही.मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार आहेत

१) कर्तरी प्रयोग२)कर्मणी प्रयोग३) भावे प्रयोग

कर्तरी प्रयोग: जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असते तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा.निलेश गाणे गातो.(कर्ता) (कर्म) (क्रियापद)आता यात कर्ता बदलला तर, प्रियंका गाणे गाते. (कर्ता बदलला की क्रियापद बदलेल.)

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.1. सकर्मक कर्तरी प्रयोग2. अकर्मक कर्तरी प्रयोग1.

सकर्मक कर्तरी प्रयोग: ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असेम्हणतात. उदा. माधव बैल बांधतो.2. अकर्मक कर्तरी प्रयोग: ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा. सारे पक्षी उडाले.

कर्मणी प्रयोग : क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदा. माधवने बैल बांधला.कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग

2. नवीन कर्मणी प्रयोग

3. समापन कर्मणी प्रयोग

4. शक्य कर्मणी प्रयोग

5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग

प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग: प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ‘ज’ प्रत्यय जोडून तयार केलेल्या वाक्यांचा यात समावेश होतो. उदा. नळे इंद्रासी असे बोलिजेले.

नवीन कर्मणी प्रयोग: ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्याकडून प्रत्यय लागतात. उदा. साप सुरेशकडून मारला गेला.

समापन कर्मणी प्रयोग: ज्या कर्मणी प्रयोगातून कृती पूर्ण झाल्याचे सूचित केले जाते. क्रियापद शक्यतो ऊन/हून झाला / झाली या प्रकारचे असते. उदा. त्याचा गृहपाठ करून झाला.

शक्‍य कर्मणी प्रयोग: जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदा. मुलाच्याने धावले जाते.

प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग: कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदा. त्याने पत्र लिहीले.

भावे प्रयोग: जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात. उदा. रामने बैलाला बांधले.

भावे प्रयोगाचे दोन उपप्रकर पडतात.

1. सकर्मक भावे प्रयोग2. अकर्मक भावे प्रयोग

सकर्मक भावे प्रयोग: ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.उदा. रामाने रावणास मारले.

अकर्मक भावे प्रयोग: ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.उदा. विद्यार्थ्यांनी खेळावे.

भावकर्तरी प्रयोग: भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात. उदा.आता सांजावले. (सायंकाळ झाली.)

मिश्र किंवा संकर प्रयोग: एकाच वाक्यात दोन प्रयोगांचे मिश्रण असल्यास त्याला संकर प्रयोग म्हणतात.कर्त-कर्मसंकर: ज्या वाक्यातील क्रियापद कर्ता व कर्म अशा दोन्हींनुसार बदलते, त्यास कर्त-कर्मसंकर असे म्हणतात.कर्म भाव संकर: कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. क्रियापद कर्माच्या लिंग, वचनानुसार बदलते.कर्तु- भावसंकर:या प्रयोगात भावे प्रयोगाची छटा असून कर्त्यांच्या वचनानुसार क्रियापद बदलते.

सरावासाठी प्रश्न

१)ज्यावेळेस कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते त्यास ———— म्हणतात.

  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग
  • वरीलपैकी नाही

२) जर कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत असेल तर त्यास———- असे म्हणतात.

  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग
  • यापैकी नाही

३) सुलभाने चिंच खाल्ली. (या वाक्याचा प्रयोग ओळखा.)

  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग
  • यापैकी नाही

४) जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी नपुसकलिंगी एक वचनी असून स्वतंत्र असते अशा प्रकारच्या वाक्यरचनेस ———— असे म्हणतात.

  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग
  • यापैकी नाही

५) आईने बाळास जेऊ घातले. ( प्रयोग ओळखा)

  • अकर्मक कर्तरी प्रयोग
  • अकर्मक भावे प्रयोग
  • सकर्मक कर्तरी प्रयोग
  • सकर्मक भावे प्रयोग

६) पुढील पैकी सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

  • त्याने चोराला पकडले.
  • उंदीर जोरात पळाला.
  • मुलांनी खरे बोलावे.
  • तुषार आंबा खातो.

७) गांधीजींच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले. ( प्रयोग ओळखा.)

  • सकर्मक कर्तरी प्रयोग
  • सकर्मक भावे
  • अकर्मक कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग

८) रावण रामाकडून मारला जातो. ( या वाक्याचा प्रयोग ओळखा.)

  • कर्तरी प्रयोग
  • कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग
  • यापैकी नाही

९) कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

  • विद्यार्थ्यांनी खाऊ खाल्ला.
  • त्याला घरी जाववते.
  • ताईने बाळात भरवले.
  • नयना पाणी पिते.

१०) वेल मांडवावर विस्तारली.   ( या वाक्याचा प्रयोग ओळखा.)

  • अकर्मक कर्तरी प्रयोग
  • सकर्मक भावे प्रयोग
  • सकर्मक कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग

११) चुकीचे विधान ओळखा.

  • कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या पुरुष, लिंग, वचनानुसार क्रियापद बदलते.
  • कर्तरी प्रयोगात कर्त्याची विभक्ती प्रथमा असते.
  • कर्मा शिवाय कर्मणी प्रयोग होत नाही
  • कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो.

१२) सानिया चहा पिते. ( प्रयोग ओळखा.)

  • सकर्मक भावे प्रयोग
  • अकर्मक कर्तरी प्रयोग
  • अकर्मक भावे प्रयोग
  • सकर्मक कर्तरी प्रयोग

१३)कर्तरी प्रयोगात कर्त्याची विभक्ती ——- असावी लागते

  • द्वितीया
  • चतुर्थी
  • प्रथमा
  • तृतीया

१४) ती आपल्या आजोळी गेली.( प्रयोग ओळखा)

  • अकर्मक भावे
  • सकर्मक कर्तरी
  • कर्मणी
  • अकर्मक कर्तरी

१५) सिंहाकडून कोल्हा मारला गेला.

  • कर्मणी प्रयोग
  • कर्तरी प्रयोग
  • भावे प्रयोग
  • यापैकी नाही

१६) आईने कमलला साडी आणली. (या वाक्यातील प्रयोग ओळखा.)

  • कर्मणी प्रयोग
  • कर्तरी प्रयोग
  • भावे प्रयोग
  • यापैकी नाही

१७) मुलींनी कथांचे प्रकटवाचन केले. (या वाक्यातील प्रयोग ओळखा.)

  • सकर्मक भावे
  • सकर्मक कर्तरी
  • कर्मणी
  • अकर्मक भावे

१८) आजीने बाळास झोपविले. (या वाक्यातील प्रयोग ओळखा.)

  • अकर्मक कर्मणी प्रयोग
  • अकर्मक कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • सकर्मक भावे प्रयोग

१९) साधना भाजीपाला आणते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • सकर्मक कर्मणी
  • सकर्मक कर्तरी
  • अकर्मक कर्तरी
  • अकर्मक कर्मणी प्रयोग

२०) तिला आज मळमळते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • अकर्मक भावे
  • अकर्मक कर्तरी
  • अकर्मक कर्मणी
  • सकर्मक कर्तरी

२१) ती हसते. या वाक्यात प्रयोग ओळखा.

  • अकर्मक भावे
  • अकर्मक कर्मणी
  • सकर्मक भावे
  • अकर्मक कर्तरी

२२) खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते?

  • श्यामने पेरू खाल्ला.
  • श्याम पेरू खातो.
  • श्यामने पेरूस खाल्ले.

२३) श्रेयाने आता मैदानात उतरावे.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

  • कर्मणी
  • सकर्मक भावे
  • अकर्मक भावे
  • अकर्मक कर्तरी

२४)राजाने चोराला फटकारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • भावे प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • कर्तरी प्रयोग
  • यापैकी नाही

२५) खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.________

‘सागरने सफरचंद खाल्ले.’

  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग
  • यापैकी नाही

२६) संजयने बैलाला बांधले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • कर्मणी प्रयोग
  • कर्तरी प्रयोग
  • भावे प्रयोग
  • यापैकी नाही

अशाच प्रकारच्या अभ्यासासाठी https://learningwithsmartness.in/

या वेबसाईटला नियमित भेट द्या.

तसेच Learning With Smartness या यूट्यूब चैनल ला नियमित भेट द्या.

मराठी व्याकरण शब्दांच्या जाती

नाम व नामाचे प्रकार व्हिडिओ सराव पेपर

मराठी व्याकरणाच्या पुढील घटकाचा अभ्यास लवकरच अपलोड होईल.

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!