Scholarship Exam Test Series|Even, odd, prime ,twin prime, composite, triangular and square numbers

Even, odd, prime ,twin prime, composite, triangular and square numbers

समसंख्या – ज्या संख्येला दोन ने नि:शेष भाग जातो. त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. समसंख्येच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 यापैकी कोणताही एक अंक असतो. 

विषम संख्या : ज्या संख्येच्या एकक स्थानी 1,3,5,7,9 यापैकी कोणताही एक अंक असतो. त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात.

लगतच्या दोन समसंख्येतील फरक 2 चा असतो.

लगतच्या दोन विषमसंख्येतील फरक 2 चा असतो.

मूळ संख्या: एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 किंवा फक्त त्याच संख्येने निशेष भाग जातो. त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. 

2,3,5,7,11,13,17,19,23,29,31,37,41,43,47,53,59,61,67,71,73,79,83,89,97

एक ते शंभर पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. 

संयुक्त संख्या : ज्या संख्येला 1 व ती संख्या याशिवाय इतर संख्यांनी निशेष भाग जात असेल तर ती संख्या संयुक्त संख्या असते. 

उदा. 4,6,8,10,12,14,15,16,18,20,21,22,24,26,27,28,30……….

एक ते शंभर पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. 

1 ही मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही.

जोड मूळ संख्या : ज्या दोन मूळ संख्या मध्ये दोन चा फरक असतो. अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात. 

उदा. 3,5

5,7

11,13

17,19

29,31

41,43

59,61

71,73

सहमूळ संख्या – ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक विभाजक असतो. त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणतात. 

कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते.

त्रिकोणी संख्या –

ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात. त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. या मांडणीतील त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. उदाहरणार्थ 1,3,6,10,15,21,28,36,45,55,66………… या त्रिकोणी संख्या आहेत.

त्रिकोणी संख्या पुढील सूत्राने काढतात.

त्रिकोणी संख्या = लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार ÷ 2

त्रिकोणी संख्येचा पाया काढणे.

दिलेली संख्या × 2 करून तो गुणाकार लगतच्या कोणत्या दोन संख्यांचा आहे हे शोधावे. त्यातील लहान संख्या पाया असते. उदाहरणार्थ 28 या त्रिकोणी संख्येचा पाया = 28× 2= 567× 8लहान संख्या म्हणजे पाया 7

चौरस संख्या

एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या चौरस संख्या असते. 1,4,9,16,25,36,49,64या संख्या चौरस संख्या आहेत. चौरस संख्या म्हणजेच पूर्ण वर्ग संख्या होय.

Scholarship Exam Test Series | सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या

स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट सिरीज

मूळ संख्या ओळखा

  1. 4
  2. 6
  3. 9
  4. 7

मूळ संख्या ओळखा

  1. 12
  2. 16
  3. 14
  4. 11

संयुक्त संख्या ओळखा.

  1. 13
  2. 17
  3. 19
  4. 21

 71 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ?

  1. 4
  2. 5
  3. 6
  4. 7

 खालील माहिती वाचून योग्य पर्याय लिहा.

अ )1ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.        

   ब)1 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे.

  1. अ व ब बरोबर
  2. अ व ब चूक
  3. अ चूक ब बरोबर
  4. अ  बरोबर ब चूक

1 ते 100 पर्यंत ची सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान मूळ संख्या यांचा फरक किती आहे?

  1. 96
  2. 95
  3. 98
  4. 97

1 ते 20 या नैसर्गिक संख्या मध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे?

  1. 24%
  2. 25%
  3. 36%
  4. 40%

70 ते  80 या मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे?

  1. 227
  2. 231
  3. 221
  4. 223

23 नंतर येणारी 15 वी समसंख्या कोणती असेल?

  1. 54
  2. 52
  3. 56
  4. 58

1 ते 10 पर्यंत च्या मूळ संख्यांची सरासरी किती आहे?

  1. 4.25
  2. 4.15
  3. 4.35
  4. 4.20

21 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी किती आहे?

  1. 41
  2. 40
  3. 45
  4. 50

97 या संख्यांचे सम, विषम, मूळ, संयुक्त संख्या असे वर्गीकरण करा

  1. सम व मूळ
  2. विषम व मूळ
  3. संयुक्त
  4. यापैकी नाही

 45 नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आहे?

  1. 171
  2. 210
  3. 110
  4. 105

 गटात न बसणारी संख्या शोधा.

  1. 441
  2. 125
  3. 361
  4. 625

 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल?                                   11, 19, 31, 43, ?

  1. 47
  2. 53
  3. 59
  4. 61

 1 ते 100 च्या दरम्यान जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ?

  1. 5
  2. 6
  3. 7
  4. 8

 सर्वात मोठी पाच अंकी  विषम संख्या आणि सर्वात लहान चार अंकी समसंख्या यांचा फरक किती येईल ?

  1. 98999
  2. 99899
  3. 89999
  4. 99989

 पुढील संख्या समूहातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहे ?           

       1,3,6 ,10 ,15 ,21, 28…….

  1. चौरस संख्या
  2. जोडमूळ संख्या
  3. मूळ संख्या
  4. त्रिकोणी संख्या

 जोडमूळ संख्यांची जोडी कोणती आहे ?

*

  1. 2, व. 3
  2. 5 ,    व         7
  3. 11  व         17
  4. 53 व 59

एक ते पन्नास पर्यंत असलेल्या संख्यांपैकी किती संख्या पूर्ण वर्गसंख्या आहेत?

  1. 7
  2. 6
  3. 5
  4. 4

81 ते 100 पर्यंत किती जोड मूळ संख्याच्या जोड्या आहेत 

  1. शून्य
  2. एक
  3. दोन
  4. तीन

खालीलपैकी कोणती जोड मूळ संख्याची जोडी नाही?

  1. 7 व 13
  2. 17 व 19
  3. 5 व 7
  4. 29 व 31

खालीलपैकी कोणती जोड मूळ संख्याची जोडी नाही?

  1. 41 व 43
  2. 59 व 61
  3. 57 व 59
  4. 71 व 73

जोड मूळ संख्या म्हणजे काय?

  1. सर्व मूळ संख्याना
  2. 2 चा फरक असणाऱ्या विषम संख्यांच्या जोडीला
  3. 2 चा फरक असणाऱ्या समसंख्याच्या जोडीला
  4. 2 चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला

खालीलपैकी कोणती जोड मूळ संख्याची जोडी आहे?

*

  1. 15 व 17
  2. 59 व 61
  3. 7 व 9
  4. 19 व 21

17,19,21,23,29,30,31,37,61,23 वरील संख्या मालिकेत जोडमुळ संख्यांच्या जोड्या किती आहेत

  1. दोन
  2. तीन
  3. चार
  4. यापैकी नाही

त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  1. दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते.
  2. 1 ही त्रिकोणी आणि चौरस संख्या आहे.
  3. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या असते.
  4. दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते.

3,     2,      5,      0,      8. हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून सहा अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक व शतक स्थानच्या अंकांचा गुणाकार किती ?

  1. 24
  2. 40
  3. 16
  4. 15

खालीलपैकी चौरस संख्या कोणती?

  1. 63
  2. 125
  3. 625
  4. 82

ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामाईक विभाजक असतो, त्या संख्यांना काय म्हणतात?

  1. सहमूळ संख्या
  2. सापेक्ष मूळ संख्या
  3. वरील दोन्ही
  4. यापैकी नाही

https://learningwithsmartness.in/5th-scholarship-maths/

15 thoughts on “Scholarship Exam Test Series|Even, odd, prime ,twin prime, composite, triangular and square numbers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!