Mahatet Previous Year Question Paper 6th to 8th 2021 free

Maha tet Exam सामाजिक शास्त्रे (प्रश्न क्रमांक 91 ते 150) इतिहास, नागरिकशास्त्र व भूगोल

इयत्ता सहावी ते आठवीसाठी

  1. ‘मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरळित चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य व्यवस्था निर्माण करते. ती ईश्वरदत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते.’ हा सिद्धान्त यांनी मांडला.
    (1) व्हॉल्टेअर
    (2) माँटेस्क्यू
    (3) रूसो
    (4) थॉमस जेफरसन
  2. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत कारण…..
    अ) इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता
    ब) भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता.
    क) कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल नव्हते.
    (1) फक्त विधाने ‘अ’ व ‘ब’ योग्य
    (2) फक्त विधाने ‘अ’ व ‘क’ योग्य
    (3) फक्त विधाने ‘ब’ व ‘क’ योग्य
    (4) तीनही विधाने योग्य
  3. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी … येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली.
    (1) पुणे
    (2) मुंबई
    (3) सातारा
    (4) कोल्हापूर
  4. अहमदनगरजवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली ?
    (1) मुघल व आदिलशाहा
    (2) मुघल व निजामशाहा
    (3) निजामशाहा व आदिलशाहा
    (4) मुघल व मराठे
  5. सररत्नाकार : रसायने व धातू पंचसिद्धांतिका : ?
    (1) गणित
    (2) आयुर्वेद
    (3) खगोलशास्त्र
    (4) संस्कृत व्याकरण
  6. योग्य जोड्या जुळवा
    गट अ.                 गट – ब

अ) जॉन मार्शल.  i) कार्बन 14 पद्धतीचा शोध
ब) डॉ. दयाराम सहानी ii) हडप्पा येथे उत्खनन कार्य
क) राखालदास बॅनर्जी iii) ब्रिटीश काळात पुरातत्व खात्याचे
ड) एफ. उब्ल्यू. लिबी ii) मोहेनजोदडो येथे उत्खनन कार्य
(1) अ, ब ii, iii, डiv
(2) अ iv, ब iii, क ii, डi
(3) अ iii, बii, कi, डiv
(4) अ iii, बii, क iv, ड – i

  1. अरेबियन नाईटस् कथेतील नायक म्हणून. …..यांना प्रसिद्धि मिळाली
    (1) हरून अल रशिद
    (2) अबू बक्र
    (3) उस्मान
    (4) अली
  2. गटात न बसणारा शब्द ओळखा
    डान्टे, पेट्रार्क, मॅकियाव्हेली, थॉमसमूर
    (1) डान्टे
    (3) मॅकियाव्हेली
    (2) पेट्रार्क
    (4) थॉमस मूर
  3. जपानमधील उद्योगसमूहांना ……. म्हणतात.
    (1) मेईजी
    (2) जेन्रो
    (3) झैबेत्सू
    (4) शोगून
  4. माऊ माऊ चळवळ …… येथे झाली.
    (1) केनिया
    (2) झिम्बाब्वे
    (3) घाना
    (4) दक्षिण आफ्रिका
  5. याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला ?
    (1) अमेरिका
    (2) रशिया
    (3) इंग्लंड
    (4) जपान
  6. विक्रमांकदेवचरित, मिताक्षर, पंपरामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले ?
    (1) शिलाहार
    (3) राष्ट्रकुट
    (2) चालुक्य
    (4) वाकाटक
  7. ‘व्हाईस ऑफ इंडिया’ हे नियतकालिक ……. यांनी सुरू केले.
    (1) दादाभाई नौरोजी
    (2) फिरोजशाह मेहता
    (3) बहरामजी मलबारी
    (4) सर दिनशा पेटिट
  8. विजयभूमी : लालबहादूर शास्री :: वीरभूमी : ?
    (1) महात्मा गांधी
    (3) इंदिरा गांधी
    (2) राजीव गांधी
    (4) पंडित जवाहरलाल नेहरू
  9. गुजरातमधील विजयाप्रीत्यर्थ अकबराने ……… याचे बांधकाम केले.
    (1) बुलंद दरवाजा
    (3) ताजमहाल
    (2) कुतुबमिनार
    (4) लाल किल्ला
  10. योग्य जोड्या जुळवा
    गट – अ.  गट – ब
    अ) चरक.  i) बिंबिसार
    ब) कालिदास. ii) कनिष्क
    क) जीवक. iii) प्रवरसेल
    (1) अ, ब ii, क – iii
    (2) अ iii, ब ii, कi
    (3) अ ii, ब iii, कi
    (4) अ ii, ब, क iii
  11. अवंती : माळवा (मध्यप्रदेश) अश्मक : ?
    (1) बिहार
    (2) उत्तरप्रदेश
    (3) महाराष्ट्र
    (4) गुजरात
  12. चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास यांनी ……. महत्त्व सांगितले.
    (1) कृष्णभक्तीचे
    (2) रामभक्तीचे
    (3) शिवभक्तीचे
    (4) विठ्ठलभक्तीचे
  13. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना “त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये,” असे सांगितले हे या गुणाचे उदाहरण आहे.
    (1) रयतेची काळजी
    (2) संघटन चातुर्य
    (3) सहिष्णू धोरण
    (4) स्वातंत्र्याची प्रेरणा 
  14. ⅰ) याने जसवंतसिंहाचा अल्पवयीन मुलगा अजितसिंह याला गादीवर बसवले.
    ii) याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. वरील वर्णन कोणाचे आहे?
    (1) दुर्गादास राठोड
    (2) अलीवर्दी खान
    (3) बंदा बैरागी
    (4) अहमदशाह अब्दाली
  15. जनतेला निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो. ……यास म्हणतात.
    (1) जनउपक्रम
    (2) सार्वमत
    (3) जनपृच्छा
    (4) प्रत्यावहान
  16. बहुजन समाजपक्ष ……. यांनी स्थापन केला.
    (1) जॉर्ज फर्नांडिस
    (2) शरद पवार
    (3) कांशीराम
    (4) बाळासाहेब ठाकरे
  17. संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात लोकशाहीचे तत्त्व पूर्णपणे पाळले जात नाही. हे
    (1) निःपक्षपाती निवडणुका
    (2) सार्वत्रिक प्रौढमताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य
    (3) धर्मनिरपेक्षता

(4) लोकप्रतिनिधींना निर्णयाचा अधिकार

  1. आपला देश प्रजासत्ताक आहे कारण……..
    (1) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या लोकांकडून निवडल्या जातात.
    (2) स्वतःचा व समाजाचा विकास करण्याची संधी नागरिकांना प्राप्त होते.
    (3) देशाच्या राज्यकारभारात कोणताही धर्म, संप्रदाय यांचा हस्तक्षेप नसतो.
    (4) भारतीय संविधान सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे.
  2. समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात यास …….. ,म्हणतात.
    (1) व्यवसाय स्वातंत्र्य
    (2) वास्तव्य स्वातंत्र्य
    (3) संघटना स्वातंत्र्य
    (4) सभा स्वातंत्र्य
  3. राज्यसभेचे कामकाज ……. यांच्या नियंत्रणाखाली चालते.
    (1) सभापती
    (2) सरन्यायाधीश
    (3) राष्ट्रपती
    (4) घटकराज्ये प्रशासन
  4. भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये……. विषयी मार्गदर्शन आहे.
    (1) शाश्वत मूल्ये
    (2) नागरी सेवा
    (3) परराष्ट्र धोरण
    (4) पंतप्रधान
  5. महाराष्ट्रात सध्या ……. जिल्हा परिषदा आहेत.
    (1) 33
    (2) 34
    (3) 35
    (4) 36
  6. छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार होतो : अमेरिका :: राज्याचे विभाजन होऊन दोन वा अधिक राज्ये तयार होतात : ?
    (1) इंग्लंड
    (2) श्रीलंका
    (3) बांग्लादेश
    (4) चीन
  7. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी …….. नमूद केले नव्हते.
    (1) हक्क
    (3) जबाबदाऱ्या
    (2) कर्तव्ये
    (4) बंधने
  8. भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण ……. येथून सोडला.
    (1) बंगळुरू
    (2) श्रीहरीकोटा
    (3) थुंबा
    (4) हैदराबाद
  9. नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा……..  असतो.
    (1) सम उतार
    (2) मंद उतार
    (3) बहिर्वक्र उतार
    (4) तीव्र उतार
  10. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने ……. व …….. खनिजे आढळतात.
    (1) सिलीका व मॅग्नेशिअम
    (2) निकेल व लोह
    (3) सिलीका व अॅल्युमिनिअम
     (4) लोह व मॅग्नेशिअम
  11. खालील पर्वतांपैकी गट पर्वत कोणता आहे ?
    (1) हिमालय पर्वत
    (2) आल्प्स पर्वत
    (3) युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत
    (4) रॉकी पर्वत
  12. भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक …..
    (1) रिश्टर
    (2) मिलीबार
    (3) मिलीमीटर
    (4) सेंटीमीटर
  13. ………हा रूपांतरित खडक आहे.
    (1) शेल
    (2) बेसाल्ट
    (3) संगमरवर
    (4) ग्रॅनाइट
  14. भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठे राज्य ……..
    (1) मध्यप्रदेश
    (2) छत्तीसगढ
    (3) झारखंड
    (4) राजस्थान
  15. खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वांत उंच शिखर …….
    (1) गुरूशिखर
    (2) धूपगड
    (3) पंचमढी
    (4) कळसूबाई
  16. भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण अंदमान द्वीपसमूहापैकी ……..bआहे.
    (1) मिनिकॉय बेट
    (2) बॅरन बेट
    (3) कॅनेनोर बेट
    (4) अमिनदीवी बेट
  17. कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा ……
    (1) झेनिथ धबधबा
    (2) धुवांधार धबधबा
    (3) जोग धबधबा
    (4) शिवसमुद्रम धबधबा
  18. भारतातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर ……
    (1) सांभर सरोवर
    (2) पगाँग सरोवर
    (3) लोणार सरोवर
    (4) वुलर सरोवर
  19. केरळ, कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना ………  म्हणतात.
    (1) कॉफी बहार सरी
    (2) आम्रसरी
    (3) वळवाचा पाऊस
    (4) कालबैसाखी
  20. उडिसा राज्यात्न संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प …….
    (1) जायकवाडी प्रकल्प
    (2) हिराकूड प्रकल्प
    (3) भाक्रा-नांगल प्रकल्प
    (4) दामोदर खोरे प्रकल्प
  21. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस ……. म्हणतात.
    (1) मळ्याची शेती
    (2) सधन शेती
    (3) कोरडवाहू / जिरायत शेती
    (4) निर्वाह शेती
  22. भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक …… उत्पादनात आहे.
    (1) दूध
    (2) लोकर
    (3) मत्स्योत्पादन
    (4) रेशीम
  23. भारतातील पहिला लोह-पोलाद कारखाना ……..  राज्यात कुल्टी येथे सुरू झाला. 
    (1) पश्चिम बंगाल
    (2) मध्यप्रदेश
    (3) ओरिसा
    (4) उत्तर प्रदेश
  24. पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वांत खोल गर्ता …. होय.
    (1) पोर्टो रिको गर्ता
    (2) मरियाना गर्ता
    (3) सुंदा गर्ता
    (4) साऊथ सँडविच गर्ता
    138……… वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो.
    (1) चेस्टनट
    (2) साग
    (3) महोगनी
    (4) पाईन
  25. जपानमधील जागृत ज्वालामुखी …….
    (1) काटमाई
    (2) माऊंट किलीमांजरो
    (3) व्हिस्यूव्हियस
    (4) फुजियामा
  26. शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे ……… घटक आहेत.
    (1) आर्थिक
    (2) सामाजिक
    (3) प्राकृतिक
    (4) राजकीय
  27. व्हॅटीकनसिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे.
    (1) 0.5%
    (2) 40%
    (3) 70%
    (4) 100%
  28. सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात ……..  हा केंद्रबिंदू असतो.
    (1) प्रदेश
    (2) मानव
    (3) निसर्ग
    (4) वाहतूक
  29. पनामा कालव्यास ‘….. ..’ प्रवेशद्वार असे म्हणतात.

(1) अटलांटिकचे
(2) हिंदी महासागराचे
(3) पॅसिफिकचे
(4) आर्क्टिकचे

  1. आकृतीतील उपकरणामधून निर्द्रव वायुदाबमापकाचा योग्य पर्याय निवडा.
    (1)
    (2)
    (3)
    (4)
    145……..जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. 
    (1) विषुववृत्ता
    (2) अक्षवृत्ता
    (3) कर्कवृत्ता
    (4) मकरवृत्ता
  2. पृथ्वीपृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर ……
    (1) स्थितांबर
    (2) तपांबर
    (3) मध्यांबर
    (4) आयनांबर
  3. आकाशात सर्वांत तेजस्वी दिसणारा ग्रह. ……..
    (1) बुध
    (2) मंगळ
    (3) शुक्र
    (4) गुरू
  4. युरोप व आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र ……
    (1) अरबी समुद्र
    (2) बंगालचा उपसागर
    (3) तांबडा समुद्र
    (4) भूमध्य समुद्र
  5. प्राध्यापक / शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होणार ?
    (1) प्राथमिक व्यवसाय
    (2) द्वितीयक व्यवसाय
    (3) तृतीयक व्यवसाय
    (4) चतुर्थक व्यवसाय
  6. अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव सांगा.
    (1) पाल्क सामुद्रधुनी
    (2) मलाक्का सामुद्रधुनी
    (3) मॅगलेन सामुद्रधुनी
    (4) जिब्राल्टर सामुद्रधुनी

Maha tet Exam Previous Year Question Paper Online

One thought on “Mahatet Previous Year Question Paper 6th to 8th 2021 free

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!