Profit / नफा → विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त असल्यास मिळणारा फायदा.
Loss / तोटा → विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी असल्यास होणारा तोटा.
Cost Price (C.P.) / खरेदी किंमत → वस्तू खरेदी करण्यासाठी लागलेली मूळ किंमत होय.
Selling Price (S.P.) / विक्री किंमत → वस्तू विकल्यावर मिळालेली किंमत होय.
1. सुधाने एक सायकल 4700 रुपयांना खरेदी केली. काही दिवसांनी तिने ती 3400 रुपयांना विकली तर सुधाला नफा झाला की तोटा? किती?
(1) तोटा ₹1300
(2) नफा ₹1200
(3) तोटा ₹1400
(4) यापैकी नाही
2. सुधाकरने 700 किलो तांदूळ ₹31500 रुपयांना खरेदी करून ₹55 प्रति किलोने विकला तर सुधाकरला किती नफा झाला?
(1) ₹6000
(2) ₹4000
(3) ₹7000
(4) ₹9000
3. सखारामने पिठाची गिरणी ₹27500 रुपयांना खरेदी केली. कर ₹600, वाहतूक ₹1000 आणि हमाली ₹100 असा खर्च झाला. गिरणी ₹32000 रुपयांना विकल्यास त्याला किती नफा झाला?
(1) ₹2000
(2) ₹5000
(3) ₹4500
(4) ₹3800
4. समीरने 700 अंडी ₹2100 रुपयांना आणली. वाहतूक खर्च ₹200 आला. 30 अंडी फुटली. उरलेली अंडी ₹6 प्रति अंडे याप्रमाणे विकली तर त्याला किती नफा झाला?
(1) नफा ₹2000
(2) नफा ₹3700
(3) नफा ₹1720
(4) यापैकी नाही
5. सुलाबाईंनी ₹7900 रुपयांचे बियाणे पेरले. मशागतीसाठी ₹3000 व खते-फवारणीसाठी ₹3300 खर्च झाला. शेतातील उत्पन्न ₹18000 रुपयांना विकले तर नफा/तोटा किती?
(1) नफा ₹2000
(2) तोटा ₹1000
(3) नफा ₹3800
(4) यापैकी नाही
6. सुषमाने ₹850 प्रति पंखा दराने 15 पंखे खरेदी करून एकूण ₹25000 रुपयांना विकले. नफा/तोटा किती टक्के?
(1) नफा 12%
(2) नफा 20.4%
(3) तोटा 8%
(4) तोटा 12%
7. वामने ₹3200 रुपयांची फळे खरेदी केली. वाहतुकीसाठी ₹200 खर्च झाला. विक्रीतून ₹4300 मिळाले. नफा किती टक्के?
(1) 24%
(2) 17%
(3) 25%
(4) 32%
8. राहुलने खरेदी केलेले घड्याळ 25% नफ्याने विकल्यावर विक्री किंमत ₹5600 झाली. घड्याळाची खरेदी किंमत किती?
(1) ₹4000
(2) ₹4480
(3) ₹4200
(4) ₹4300
9. रामने 20 पुस्तके ₹4400 रुपयांना खरेदी केली. त्याने प्रत्येक पुस्तक ₹240 ला विकले. खरेदी किमतीवर किती टक्के नफा झाला?
(1) 8%
(2) 7%
(3) 9%
(4) यापैकी नाही
10 सुदामाने दोन वस्तू ₹1560 रुपयांना विकल्या. त्याला 5% नफा झाला. खरेदी किंमत किती?
(1) ₹1482
(2) ₹1400
(3) ₹1200
(4) ₹1300
11. संतोषने 400 अंडी ₹1500 रुपयांना खरेदी केली. वाहतूक ₹300 आली. 50 अंडी फुटली. उरलेली अंडी प्रत्येकी ₹5 ला विकली. नफा/तोटा किती?
(1) नफा ₹50
(2) नफा ₹60
(3) तोटा ₹50
(4) तोटा ₹60
12. अब्राहम यांनी ₹50000 रुपयांचा माल खरेदी केला. कर व वाहतूक खर्च ₹7000 झाला. माल ₹65000 रुपयांना विकल्यास नफा किती?
(1) ₹7000
(2) ₹6000
(3) ₹8000
(4) ₹9000
13. अजित कौर यांनी 50 किग्रॅ साखर ₹1750 ला खरेदी केली. प्रति किग्रॅ ₹32 ला विकल्यास त्यांना किती तोटा झाला?
(1) नफा ₹150
(2) नफा ₹170
(3) तोटा ₹160
(4) तोटा ₹150
14. कुसुमताईंनी 80 कुकर प्रत्येकी ₹700 ला खरेदी केले. वाहतूक खर्च ₹1280 झाला. एकूण ₹18000 नफा हवा असल्यास प्रत्येक कुकर किती रुपयांना विकावा?
(1) ₹914
(2) ₹941
(3) ₹916
(4) ₹920
15. इंद्रजीत यांनी 10 फ्रीज प्रत्येकी ₹12000 ला खरेदी केले. वाहतूक खर्च ₹5000 झाला. ₹20000 नफा मिळविण्यासाठी प्रत्येक फ्रीज किती रुपयांना विकावा?
(1) ₹14500
(2) ₹14600
(3) ₹15400
(4) ₹14400
16. ललिताबाईंनी ₹13700 चे बियाणे पेरले. खते व फवारणी ₹5300 आणि मजुरी ₹7160 खर्च झाला. धान्य विकून ₹35400 मिळाले. नफा/तोटा किती?
(1) नफा ₹9240
(2) तोटा ₹9240
(3) नफा ₹9420
(4) तोटा ₹4920