Perimeter and Area Important Questions for Navodaya Entrance Exam

नवोदय परीक्षा गणित परिमिती व क्षेत्रफळ


गणित – परिमिती व क्षेत्रफळ

1. एका आयताकृती क्रिडांगणाची लांबी 70 मीटर व रुंदी 35 मीटर आहे. त्या क्रीडांगनालगत बाहेरून चारही बाजूंना 2 मीटर रुंदीचा रस्ता आहे. त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती?
   1) 234 चौ. मी
   2) 236 चौ. मी
   3) 240 चौ. मी
   4) 300 चौ. मी
2. एका आयताचे क्षेत्रफळ 2450 चौ. मी असून रुंदी 35 मीटर आहे. त्या आयताची लांबी किती? व परिमिती किती?
   1) लांबी 70 मीटर, परिमिती 210 मीटर
   2) लांबी 70 मीटर, परिमिती 280 मीटर
   3) लांबी 70 मीटर, परिमिती 140 मीटर
   4) यापैकी नाही
3. एका चौरसाची बाजू चौपट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट असेल?
   1) दुप्पट
   2) तिप्पट
   3) चौपट
   4) निम्मी
4. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.6 सेमी व 4.8 सेमी आहेत. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
   1) 8.64 चौ. सेमी
   2) 864 चौ. सेमी
   3) 86.4 चौ. सेमी
   4) यापैकी नाही
5. एका चित्रकलेच्या पानाची लांबी 42 सेमी व रुंदी 18 सेमी आहे. त्या पानाचे क्षेत्रफळ किती?
   1) 756 चौ. सेमी
   2) 576 चौ. सेमी
   3) 675 चौ. सेमी
   4) यापैकी नाही
6. एका आयताकृती सभागृहाची लांबी 18 मीटर व रुंदी 9 मीटर आहे. 25 सें.मी. बाजूच्या चौरस फरश्या बसवायच्या असल्यास एकूण किती फरश्या लागतील?
   1) 529
   2) 2592
   3) 1740
   4) 4220
7. एका आगपेटीची लांबी 5 सेमी, रुंदी 3 सेमी व उंची 1.5 सेमी आहे. तिला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिकटवण्यासाठी एकूण किती कागद लागेल?
   1) 45 चौ. सेमी
   2) 54 चौ. सेमी
   3) 64 चौ. सेमी
   4) 40 चौ. सेमी
8. चुकीचा पर्याय निवडा.
   1) इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ = 2(लांबी × रुंदी + रुंदी × उंची + लांबी × उंची)
   2) घनाचे एकूण पृष्ठफळ = 6 × बाजू × बाजू
   3) काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1/2 × काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार
   4) चौरसाचे क्षेत्रफळ = 2 × बाजू
9. एका घनाची बाजू 9 सेमी आहे. त्याचे एकूण पृष्ठफळ किती?
   1) 486 चौ. सेमी
   2) 81 चौ. सेमी
   3) 54 चौ. सेमी
   4) यापैकी नाही
10. एका घनाकृती पेटीची बाजू 70 सेमी आहे. त्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी दर चौ. मीटरला 25 रुपये प्रमाणे किती खर्च येईल?
   1) 70 रुपये
   2) 73.50 रुपये
   3) 2.25 रुपये
   4) 9.45 रुपये
11. लांबी 11 सेमी व रुंदी 7 सेमी असलेला आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल?
   1) 29 सेमी
   2) 36 सेमी
   3) 18 सेमी
   4) 25 सेमी
12. एका आयताची लांबी 25 मी व रुंदी 18 मी आहे. त्याची परिमिती किती?
   1) 66 मी
   2) 86 मी
   3) 68 मी
   4) 43 मी
13. एका चौरसाची प्रत्येक बाजू 7 मी आहे. त्याची परिमिती किती?
   1) 14 मी
   2) 35 मी
   3) 21 मी
   4) 28 मी
14. 160 मी लांब व 90 मी रुंद मैदानाभोवती 4 फेऱ्या घातल्यास एकूण किती किलोमीटर अंतर चालले जाईल?
   1) 900 मी
   2) 1.5 कि.मी
   3) 1 कि.मी
   4) 1100 मी
15. हेमंत दररोज 120 मी बाजूच्या चौरस बागेभोवती 6 फेऱ्या पूर्ण करतो. तो एकूण किती अंतर चालतो?
   1) 2 कि.मी 980 मी
   2) 2 कि.मी 800 मी
   3) 480 मी
   4) 2 कि.मी 880 मी
16. एका आयताकृती भूखंडाची लांबी 80 मी व रुंदी 20 मी आहे. त्याच्या कडेने तारेचे तीनपदरी कुंपण घालायचे असल्यास तारेचा दर 90 रुपये प्रति मीटर असल्यास एकूण खर्च किती?
   1) 50,000 रुपये
   2) 45,000 रुपये
   3) 36,000 रुपये
   4) 54,000 रुपये
17. एका खेळाडूने 35 मी बाजूच्या चौरस क्रीडांगणाभोवती 5 फेऱ्या घातल्या. तो एकूण किती मीटर अंतर धावला?
   1) 800 मी
   2) 700 मी
   3) 900 मी
   4) 600 मी
18. 90 मी लांब व 60 मी रुंद शेताभोवती चारपदरी कुंपणासाठी किती मीटर तार लागेल?
   1) 1200 मी
   2) 1000 मी
   3) 600 मी
   4) 900 मी
19. एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 34.7 सेमी, 25.4 सेमी व 20.5 सेमी आहेत. त्याची परिमिती किती?
   1) 79.6 सेमी
   2) 81.6 सेमी
   3) 82.6 सेमी
   4) 80.6 सेमी
20. खालील आकृतीची परिमिती किती?
   1) 56
   2) 64
   3) 62
   4) 48
21. एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती?
   1) 2000 चौ. सेमी
   2) 2464 चौ. सेमी
   3) 2100 चौ. सेमी
   4) 2500 चौ. सेमी
22. एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 5544 चौ. सेमी आहे. त्या मैदानाची त्रिज्या किती?
   1) 24 सेमी
   2) 44 सेमी
   3) 34 सेमी
   4) 42 सेमी
23. एका चौरसाची परिमिती 32 सेमी आहे. त्याचे क्षेत्रफळ किती?
   1) 64 चौ. सेमी
   2) 32 चौ. सेमी

   3) 16 चौ. सेमी
   4) 8 चौ. सेमी
24. एका वर्गखोलीत 800 चौरस फरश्या बसवल्या आहेत. जर प्रत्येक फरशीची बाजू निम्मी केली तर किती फरश्या लागतील?
   1) 300 फरश्या
   2) 3200 फरश्या
   3) 400 फरश्या
   4) 2400 फरश्या
25. एका चौरस मैदानाचे क्षेत्रफळ 576 चौ. मी आहे. मैदानाभोवती दोन पदरी कुंपण घालायचे असल्यास एकूण किती मीटर तार लागेल?
   1) 192 मी
   2) 576 मी
   3) 48 मी
   4) 24 मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!