Celebration Education week in Maharashtra

दिवस पहिला

सोमवार दि. 22 जुलै, 2024.

प्रस्तुत दिन साजरा करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने वर्गनिहाय उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना/तत्त्वे:

3.1 माध्यमिक स्तर (इयत्ता 11 वी मणि 12 वी):

1. घोषवाक्ये असलेले पोस्टर्स: “पाणी कसे वाचवायचे” आणि “इतरांना कशी मदत करावी”यासारख्या विषयावर आधारित पोस्टर्स बनविणे.

2. कोडी: विज्ञान आणि गणित या विषयांवर अधिक केंद्रित असणारी कोडी तयार करायला सांगणे.

3. खेळ (मैदानी/शारीरिक आणि डिजिटल स्वरूपाचे): सामाजिक शास्त, विज्ञान, गणितआणि भाषा इत्यादी विषयांशी संबंधित खेळांचे आयोजन करणे.

4. त्रिमितीय प्रतिकृती (मॉडेल्स): ऐतिहासिक वास्तू, शारीरिक रचना किंवा भौमितिक आकारांचे त्रिमितीय मॉडेल तयार करण्यासाठी माती किंवा पेपर-मॅच (कागदी लगदा)

यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करणे.

5. बोर्ड गेम्स (पटावरील खेळ): अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टीने फॅब्रिक किंवाbकार्डबोर्डवर (कापड किंवा पुठूठ्यावर) खेळ विकसित करून शिकण्याच्या उद्देशांसह पटावरील खेळ तयार करणे.

6. भिंतीवरील तक्ते: महत्वाच्या संकल्पना किंवा ऐतिहासिक कालखंड/सनावळ्या सारांशित करणारे तक्ते तयार करण्यासाठी जुनी वर्तमानपत्रे किंवा कापड वापरणे.

7. वाचन कट्टा (क्लब):वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे.

3.2 पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर (इयत्ता 6 बी आणि 10 वी):

1. कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे.

2. खेळ: ल्युडो सारखे इतर खेळ तयार करणे.

3. खेळणी: कागद आणि वांबूच्या कांड्या यासारख्या किंवा तत्सम प्रकारच्या स्थानिक साहित्यापासून खेळणी बनविणे.

4. कठपुतळी/बाहुलीनाट्य: कपडे आणि टाकाऊ वस्तूंनी कठपुतळी किंवा बाहुली बनविणे.

5. गोष्टीचे कार्डस Story  card: पाच ते सहा स्व-स्पष्टीकरणात्मक गोष्टींचे कार्डस तयार करणे,

6. तक्ते बनविणे: “अन्न आणि भाजीपाला”, “स्थानिक  बाजारपेठ”, “माझे कुटुंब” इत्यादी विषयावर आधारित तक्ते बनविणे.

7. वाचन कट्टा (क्लब): वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे.

3.3 पूर्वतयारी स्तर (दयत्ता 3 री ते 5 वी):

1. तक्ते बनविणे: “अन्न आणि भाजीपाला”, “स्थानिक बाजारपेठ”, “माझे कुटुंब” इत्यादी विषयाचे तक्ते बनविणे.

2. रंगीत पेटी – घन आणि आयताकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिकटवून मुले अशा पेट्या तयार करू शकतात,

3. फळे, भाज्या, प्राणी इत्यादींचे कार्ड बनवणे.

4. मुखवटे: प्राणी, पक्षी इत्यादींचे मुखवटे बनवणे.

. वाचन वट्टा आणि कथाकथन सत्र यांचे आयोजन करणे,

3.4 पायाभूत स्तर (अंगणवाडी / बालवाडी (वय वर्ष 3 ते 6) आणि इयत्ता 1 ली व 2 री):

1. आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्य पेट्या -उदा. PSE Kit, महाराष्ट्राचा

जादुई पिटारा, भाषा व गणित पेटी, इंग्रजी साहित्य पेटी (ELCRLM) तसेच डतर साहित्याच्या माध्यमातून कृती घ्याव्यात.

2. पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्याच्या छोट्या नाटिकांचे वैयक्तिक अथवा गटामध्ये

सादरीकरण घ्यावे.

3. विविध माध्यमांच्या सहाय्याने ठसेकाम करून घ्यावे. उदा. पाणी, फुले, भाज्या, बोटांचे व हातांचे ठसे याप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्याचे ठसे घेता येतील.

4. पालक/शिक्षक/विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते, लोकनृत्य, लोकसंगीत यांचे सादरीकरण घ्यावे.

5. गोष्टींचा कट्टा बालकांना स्थानिक व वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे.

प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM DAY) साजरा करणे विषयी मार्गदर्शक सूचना

शाळेत वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवावे. या प्रदर्शनामध्ये पुढील प्रमाणे स्टॉल्स मांडावेत.

1. वैशिप्ट्यपूर्ण स्टॉल्स – वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शविणारे स्वतंत्र स्टॉल्स मांडण्यात यावेत.

प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत. उदा. विविध भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला “चला शिकूया

भित्तिपत्रकातून” तर गोष्टीच्या स्टॉलला, “चला गोष्टी ऐकूया”, कठपुतळी किंवा पपेटच्या स्टॉलला “जर खेळणी बोलू लागली तर” अशी वैविध्यपूर्ण नावे द्यावीत.

2. शायरी वनेवलेले शैक्षणिक साहित्य – आशय शिकण्यासाठी व शिकविण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी वनवलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरवावे.

3. संगीतमय शैक्षणिक साहित्य- या स्टॉलवर शिक्षक व विद्यार्थी यांनी गाणी व संगीत वाद्ये यांचा अध्ययन

-अध्यापनात प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने दिग्दर्शन करावे.

4. हस्तलिखितांचे प्रदर्शन – विद्यार्थ्यानी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित कराव्यात.

5. शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन- विविध विषयाच्या अनुपंगाने प्रतिकृती, चार्ट्स, फ्लॅश कार्ड,

तरंगचित्र, बाहुल्या अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून प्रदर्शनात मांडावे.

6. दिग्दर्शन वर्ग – जवळची अध्यापक विद्यालये अथवा अध्यापक महाविद्यालये येथील छात्राध्यापकांच्या मदतीने नाविन्यपूर्ण अशा शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने असे वर्ग घ्यावेत अथवा त्यांना तसे स्टॉल लावण्याची संधी द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!