शिक्षा सप्ताह दिवस दुसरा
मंगळवार दि.२३ जुलै २०२४
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान :
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे.सदर धोरणातील महत्वपूर्ण कार्थनिती पुढीलप्रमाणे:
१ोपूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण (ECCE)याला प्राधान्यक्रम
२) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी(शासननिर्णय २७ ऑक्टोबर २०२१)
३ उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अघ्ययन व अध्यापन साहित्याचे विकसन
४) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित. मूल्यांकन
6) बालकांच्या घरातील अध्ययनाकरिता पालकांचा व समुदायाचा सक्रीय सहभाग
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे महत्व
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता २ री च्या अखेरीस आकलनासह वाचन व मुलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे होय.संबंधित कौशल्ये ही पुढील बाबीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतात.
बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचे विकसन
अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास निर्मिती .
समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन अंतर कमी करणे
शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे.
सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.
* उदिष्टे:
* पायाभूत साक्षरता व रांख्याज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे.
* पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रम यांचे प्रदर्शन करणे.
* पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाण- घेवाण करणे.
* पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षण तज्ञ पालक व समुदाय यांचा सक्रीय सहभाग घेणे .
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरीता आयोजित करावयाचे उपक्रम :
कार्यशाळा व परिसंवाद आयोजन : पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा /परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्राचे आयोजन करावे .
बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन
1. शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी.
२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरीत करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका (मराठी,इंग्रजी,उर्दू व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जावू शकतात.शाळेच्या सकाळच्या सत्रातील ३० मिनिटेभाषेचे तसेच ३० मिनिटे गणिताचे खेळ घेतले जावू शकतात
३. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ञाच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संख्याज्ञानाची आवड निर्माण करण्याकरिता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल.
४. जादुई पिटारा/PSE कीट :शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले PSE कीट / महाराष्ट्र शासनाचा जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व ‘गणनपूर्व कृती करून घेण्यात याव्यात.
५. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील संपर्क अधिकारी (नोडल अधिकारी) हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र घेवू शकतात.
६. विद्यार्थ्यांना वर्गात, शाळेमध्ये समुदायाद्वारे.बिविध गोष्टीचे ऐकवाव्यात तसेच त्याचे वाचन करावयास लावावे व विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित.:विविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देता येईल.
७. राज्याद्वारे पुरविण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून (जादुई पिटारा.पीएसइसंच) खेळाधारित अध्ययन /उपक्रम घेण्यात यावे तसेच बाहुलीनाट्याचे सत्र आयोजित करता येईल.
८. शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय,नृत्याचे कार्यक्रम तसेच मुळाक्षराची व अंकांची गाणी ,विविध मुळाक्षराच्या व भौमितिक आकृत्याच्या रांगोळ्या,भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग सजावटी,पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौझडल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरविण्यात यावे व याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कला व हस्तकौशल्याचा समावेश का करण्यात आला आहे.या संदर्भाने जाणीव जागृती करता येवू शकते .
९. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याची उदिष्टे ,महत्व व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आघारित खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या चित्रफितीचे प्रक्षेपण करण्यात यावे.
१०.शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत व शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी एक तास वाचन तासिका घेण्यात यावी .
११.पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तदनुषंगिक बाबीच्यासाह्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.
१२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोस्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र यामधील उपक्रमांचा देखील समावेश करता येईल .
समुदायाचा सहभाग :
- शाळांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले माता पालक गटांचा शाळेतील सदर उपक्रमात
सक्रीय सहभाग घेण्यात यावा . - उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक ८,११ यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमाचे आयोजन करून पालक व
समुदायाचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा .
शब्द पट्ट्या वाचन.