Class 10th|Geography|Chapter 6 | Population

इयत्ता दहावी भूगोल प्रकरण 6 लोकसंख्या

भारताची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२१ कोटी होती. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील क्रमांक दोनचा देश आहे. भारत जगाच्या एकूणक्षेत्रापैकी फक्त २.४१% भूक्षेत्र व्यापतो, परंतु जगाच्याएकूण लोकसंख्येपैकी १७.५% लोकसंख्या भारतात आहे. जनगणना २०११ नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरीघनता ३८२ व्यक्ती प्रति चौकिमी होती.भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे. प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची सुलभता या बाबींचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना दिसतो. सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असलेल्याभागात अनेक शतकांपासून मानवी वस्ती स्थापित झालेलीआढळते. शेती व उद्योगधंदे यांमुळे काही भागांमध्येलाेकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या भागात लोकसंख्येचेवितरण दाट आहे. उदा., उत्तरेकडील मैदानी प्रदेश, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, बंगळूरू इत्यादी. याउलट पर्वतीय, डोंगराळ, शुष्क वाळवंटी प्रदेश तसेच घनदाट वनक्षेत्र जेथे सुविधांचा अभाव असतो. अशा प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ प्रमाणात आढळते.

ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत जास्तलोकसंख्या असलेला देश आहे. जनगणना २०१० नुसार सुमारे १९ कोटी लोकसंख्येसह ब्राझीलचा जगात पाचवाक्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही हा देश जगात पाचव्या क्रमांकावर आहे. पृथ्वीच्या भूभागापैकी ५.६% भाग ब्राझीलने व्यापला आहे, मात्र जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त २.७८% लोकसंख्या या देशात आहे. त्यामुळे या देशात लोकसंख्येची सरासरी घनता २३ व्यक्ती प्रतिचौकिमी एवढी आहे.ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे. बहुतांश लोकसंख्या पूर्व किनारपट्टीच्या ३०० किमी रुंदीच्या पट्ट्यात आढळते. हा दाट लोकसंख्येचाप्रदेश ब्राझीलच्या किनारपट्टीजवळील सखल भाग आहे. त्यातही आग्नेय किनारपट्टीचा भाग हा अनुकूल हवामानामुळे वस्त्यांसाठी सुयोग्य बनला आहे. सुपीक जमीन व संसाधनांच्या उपलब्धतेमुळे कृषी व उद्योग यांची या भागात भरभराट झालेली दिसते. परिणामी याभागात लोकसंख्येची घनता जास्त आहे. याउलट ॲमेझॉन खोऱ्यातील प्रतिकूल हवामान, जास्त पर्जन्यमान, दुर्गमताआणि दाट वने यांमुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादापडतात. त्यामुळे येथे लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.ब्राझीलचा मध्य व पश्चिमी भाग हा कमी लोकसंख्येचा आहे. ब्राझीलमधील उच्चभूमींच्या याप्रदेशात लोकसंख्येची घनता मध्यम स्वरूपाची आढळते.

भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर दहा वर्षांनी जनगणना होते. त्याचप्रमाणे ब्राझीलमध्येIBGE म्हणजे Brazilian Institute of Geography and Statistics या संस्थेकडून दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येते. या दोन्हीदेशांतील पहिले जनगणना सर्वेक्षण १८७२ साली झाले.भारताची जनगणना दशकारंभी होते (१९६१, १९७१ …..)ब्राझीलची जनगणना दशकांती होते (१९६०, १९७० …..)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!