Easy Explanation of Samas in Marathi Grammar with Examples

मराठी व्याकरण समास

स्कॉलरशिप परीक्षा सातवी व आठवी , शिक्षक पात्रता परीक्षा, तसेच इयत्ता दहावी पर्यंत अभ्यासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण घटक.

Easy Explanation of Samas in Marathi Grammar with Examples

 समास
दोन शब्दांच्या एकत्रीकरणास ‘समास’ असे म्हणतात. समासात एक जोडशब्द तयार करताना त्या शब्दांतील परस्परसंबंध दाखविताना त्यातील विभक्ती प्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो. समास ही देखील भाषेतील काटकसर आहे.
उदा. वनातील भोजन वनभोजन
शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो. त्याला ‘सामासिक शब्द’ असे म्हणतात. हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे. हे स्पष्ट करण्यासाठी आपण फोड करून सांगतो. फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला ‘विग्रह’ असे म्हणतात.
समासाचे प्रकार
1) अव्ययीभाव समास :
जेव्हा समासातील पहिले पद महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा अव्ययीभाव समास होतो.
उदा. प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला.

2) तत्पुरुष समास :
ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. त्यास ‘तत्पुरुष समास’ असे म्हणतात.
उदा. तोंडपाठ-तोंडाने पाठ.

3) द्वंद्व समास :
ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात. त्यास ‘द्वंद्व समास’ असे म्हणतात. ‘आणि, व, किंवा, अथवा’ या सारख्या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात.
उदा. पापपुण्य-पाप किंवा पुण्य.
4) बहुव्रीही समास :

जेव्हा सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते.
उदा. लंबोदर-लंब (मोठे) आहे उदर ज्याचे तो.

समास या घटकावर आधारित महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न

1) शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोडशब्द तयार होतो त्याला म्हणतात.
1) प्रयोग
2)विभक्ती
3) सामासिक शब्द
4) अलंकारिक शब्द
2) खालीलपैकी कोणत्या समासात प्रामुख्याने विग्रह करताना शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावा लागतो ?
1) अव्ययीभाव
2)तत्पुरुष
3) द्वंद्व
4) बहुव्रीही
3) ‘घरजावई’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
1) अव्ययीभाव
2) तत्पुरुष
3)द्वंद्व
4) बहुव्रीही
4) खालीलपैकी समास प्रकारानुसार विसंगत पर्याय निवडा.
1) गैरहजर
2) पावलोपावली
3) सहकुटुंब
4) आजन्म
5) खालीलपैकी द्वंद्व समास असलेला पर्याय निवडा.
1) प्राप्तधन
2)घरदा
3) पानपत्रावळ
4) भीमार्जुन
6) ‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे ?
1) द्वित 
2)अग्रज
3) अनुज
4) द्विज
1) द्वंद्व व तत्पुरुष समास असलेले शब्द ……. किंवा असतात. (दोन उत्तरे नोंदवा)
1) क्रियापद
2) नाम
3)विशेषण
4) क्रियाविशेषण
8) बहुव्रीही समास असलेला शब्द असतो.
1) विशेषण
2) नाम
3)क्रियाविशेषण
4) क्रियापद
9) खालीलपैकी समास प्रकारानुसार विसंगत पर्याय निवडा.
1) पीतांबर
2) घननीळ
3) लालभडक
4)रात्रंदिवस
10) ‘यथाशक्ती’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?
1) शक्तीप्रमाणे
2) शक्तीसाठी
3) शक्तीकरिता
4 शक्ती आहे ज्याला असा तो.
11) खालीलपैकी तत्पुरुष समास असलेले दोन पर्याय निवडा.
1) आमरण
2) न्यायान्याय
3)नवरात्र
4) क्रीडांगण
12) खालीलपैकी तत्पुरुष समासाचे कोणते उदाहरण नाही?
1) गायरान
2) घरधंदा
3)गावदेव
4) गतवैभव
13) सुखद, मनुज, कृतघ्न ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?
1)अव्ययीभाव
2) तत्पुरुष
3) द्वंद्व
4) बहुव्रीही
14) ‘पुरणपोळी’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह निवडा.
1) पुरण आणि पोळी
2) पोळीतील पुरण
3)पुरण घालून तयार केलेली पोळी
4) पुरणासाठी पोळी
15) समास प्रकारानुसार विसंगत पर्याय ओळखा.
1) राजपुत्र
2) ऋणमुक्त
3) राजवाडा
4) चारपाच
16) खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण नाही?
1)कमलनयन
2) बापलेक
3) विटीदांडू
4) बरेवाईट
17) निर्गत (गेलेले) आहे धन ज्याच्यापासून तो-
1) धनवान
2)निरामय
3) निर्धन
4) निराधार
18) खालीलपैकी बहुव्रीही समासाचे कोणते उदाहरण नाही?
1) दशमुख
2) जितेंद्रिय
3)गरुडध्वज
4) कपडालत्ता
19) दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्याशिवाय निराळ्याच पदाचा बोध होतो असे लक्षण कोणत्या समासात पाहायला मिळते ?
1) अव्ययीभाव
2) तत्पुरुष
3) द्वंद्व
4)बहुव्रीही
20) ‘पद्म आहे नाभीवर ज्याच्या तो’ असा विग्रह असणारा सामासिक शब्द व समास ओळखा. (दोन पर्याय निवडा.)
1) भालचंद्र
2)पद्मनाभ
3) बहुव्रीही
4) तत्पुरुष

वरील प्रश्नांची उत्तरे

1)सामासिक शब्द
2)तत्पुरुष
3)तत्पुरुष
4)सहकुटुंब
5)भीमार्जुन
6)द्विज
7)(2) नाम, (3) विशेषण
8)विशेषण
9)रात्रंदिवस
10)शक्तीप्रमाणे
 11)(3) नवरात्र, (4) क्रीडांगण
12)गतवैभव
13)तत्पुरुष
14)पुरण घालून तयार केलेली पोळी
15)चारपाच
16)कमलनयन
17)निर्धन
18)कपडालत्ता
19)बहुव्रीही
20)(2) पद्मनाभ, (3) बहुव्रीही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!