How to Crack MAHATET in First Attempt | Complete Guide

MAHATET Exam

MAHATET परीक्षा अभ्यासक्रम

Mahatet Application form

 काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परीक्षेसाठी

https://mahatet.in

या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल वाचून परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी.
टिप :
1)परीक्षार्थ्यांनी सर्व जसे अर्ज भरायचा प्रकार, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यांकन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासननिर्णय परीक्षेसाठी संकेतस्थळ https://mahatet.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा.
2)अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी इ. १० वी, इ. १२ वी शैक्षणिक/व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गास लागू असणारी जात इत्यादी संबंधित माहिती मूळ प्रमाणपत्रानुसार भरावी. स्कॅन केलेला नवीन पासपोर्ट फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करावयाची असणार असून सोबत ठेवावी.
3)सदर परीक्षेत प्रवेश होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क Email, SMS सुविधांद्वारे साधला जाऊ शकतो. त्यामध्ये उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा. पेपर I (प्राथमिक स्तर) व पेपर II (उच्च प्राथमिक स्तर) दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये प्रवेश होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरातील (प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर) स्वतंत्र निवड करावी, जेणेकरून परीक्षा बँक व्यवस्था एकाच वेळी करता येईल. दोन्ही स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
4)सदर जाहिरातीप्रमाणे उमेदवारांनी केवळ Online अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही ही उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. परीक्षा शुल्क ऑनलाईन, बँक, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही.) परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्जामध्ये माहिती अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नंतर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारे चुकीची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
5)अर्ज स्वीकारल्यानंतर अंतिम निश्चयानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईनमार्फत स्वीकारले जाईल. इतर पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्यानंतर सदर अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
6)ऑनलाईन अर्जासंबंधी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच, अर्जासंबंधी / कार्यालयीन (प्रमाणपत्र) पत्रव्यवहार/शिफारसी यांचा कुठल्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.
7)मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेत तात्पुरत्या प्रवेश दिला जाईल व निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची मूळ प्रमाणपत्रे पडताळणीस सादर करावी लागतील. प्रमाणपत्र पडताळणीनंतर दोषी ठरलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल व त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही केली जाईल. जनजागृतीमधून दिलेल्या माहितीमध्ये व मूळ प्रमाणपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारास पात्र ठरविण्यात येणार नाही.
8)एका पेक्षा जास्त अर्जामध्ये भरल्यास अंतिम निश्चयानंतर अर्जामध्ये प्राप्त झालेल्या व आधी सादर केलेल्या अर्जामधील शुल्क परत केले जाणार नाही.
9)शिक्षक पात्रता परीक्षा सत्र २०१७ व २०१८ या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे गु.नं. ५६/२०१७ व ५८/२०१७ अन्वये सातारा पोलिस स्टेशन, पुणे शहर, पुणे यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे. गैरप्रकारामध्ये सहभागी उमेदवारांविरुद्ध झालेल्या गुन्ह्यांमुळे संबंधित उमेदवारांस संपर्कातून संपुष्टात करून या पुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये कायमस्वरूपी प्रतिबंधित अशी शिस्तीची शिक्षा करण्यात आलेली असून आदेश क्र. मराया/पविप्र/२०१२/३८४ क्र. ०३/०५/२०१२ व आदेश क्र. मराया/पविप्र/२०१२/३८९ क्र. १४/०५/२०१२ अन्वये गैरप्रकारामध्ये सहभागी परीक्षार्थी/उमेदवार यांचे निष्कासन शिस्तीचे निश्चित केलेले आहे. सदर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सबंध सत्र २०१७ व २०१८ गैरप्रकारातील संबंधित उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२५ परीक्षेच्या ऑनलाईन अर्जामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सत्र २०१७ व २०१८ गैरप्रकाराच्या यादीनुसार वरील नमूद केलेल्या उमेदवारांनी सदर परीक्षा अर्जामध्ये प्रवेश झाल्यास संबंधित नियमांप्रमाणे कार्यालयीन कारवाई करण्यात येईल व परीक्षार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी.
सदर परीक्षेसंबंधी सर्व माहिती वाचून दिलेल्या संकेतस्थळावरुन अर्ज भरावा. त्यामध्ये उमेदवारांनी नियमावलीचे परिपूर्णपणे www.mscepune.in व http://mahatet.in संकेतस्थळावरून वाचून नोंद घ्यावी.
परीक्षेचे ऑनलाईन अर्जामध्ये भरताना फक्त इंग्रजी भाषेत भरावा.

पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)
१) भाषा-१ व २) भाषा-२

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.


इ. १ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील

‘भाषा-१ मराठी इंग्रजी

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.

४) गणित :-
गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

५) परिसर अभ्यास :-
परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
पुनर्रचित प्राथमिक शिक्षण  अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. पहिली व दुसरीला परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिकशिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ९ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

 
पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)

१) भाषा-१ व २) भाषा-२
पाठ्यक्रमाची  व्याप्ती :-

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.


इ.६वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-
गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या
संबधीचे असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६वीते८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.

४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-

सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६वी ते ८ वी व पाठ्यक्रम प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलितड. १ ली ते १२ वी
ची पाठ्यपुस्तके

खालील अभ्यासक्रमापैकी एकाची निवड करून आपण पेपर देऊ शकता.

पेपरचे स्वरूप

अ. क्र.घटकप्रश्न संख्यागुण
1मराठी3030
2इंग्रजी3030
3बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र3030
4परिसर अभ्यास6060

पेपर चे स्वरूप

अ.क्र.घटक प्रश्न संख्या गुण
1मराठी 3030
2इंग्रजी 3030
3बालमानस शास्त्र व अध्यापन शास्त्र3030
4गणित विज्ञान 6060
150150

पुढील घटक लवकरच अपलोड होईल.

याच ठिकाणी नियमिय सराव पेपर व मार्गदर्शक व्हिडिओ, मागील पेपर अपडेट केले जातील.

One thought on “How to Crack MAHATET in First Attempt | Complete Guide

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!