Important Geometry Questions for Class 4 | Scholarship Exam

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी भौमितिक आकृत्या

1)काटकोना पेक्षा मोठ्या कोनाला……. म्हणतात. 
A) लघुकोन B) कोटीकोन C) विशालकोन D) यापैकी नाही
2)काटकोना पेक्षा लहान कोनाला……. म्हणतात.
A) लघुकोन B) विशालकोन C) काटकोन D) कोटीकोन
3)वर्तुळाचा मध्य व वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास …..म्हणतात.
 A) वर्तुळाची जीवा B) वर्तुळाची त्रिज्या C) वर्तुळाचा परीघ D) वर्तुळ मध्य
4)वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणार्‍या रेषाखंडाला….. म्हणतात.
 A) वर्तुळाची त्रिज्या B) वर्तुळाचा परीघ C) वर्तुळाची जीवा D) यापैकी नाही
5)वर्तुळावरील दोन बिंदुना जोडणार्‍या व वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या रेषाखंडाला ……..म्हणतात.
 A) वर्तुळाची त्रिज्या B) वर्तुळाचा परीघ C) वर्तुळाचा व्यास D) यापैकी नाही

6)आकृती चे निरीक्षण करून — वर्तुळ केंद्र …..हा बिंदू आहे.
A) बिंदु र B) बिंदू य C) बिंदू म D) बिंदू क
7)आकृती चे निरीक्षण करून — वर्तुळाची त्रिज्या….. आहे.
A) रेख मप B) रेख कख C) रेख यर D) यापैकी नाही
8)आकृती चे निरीक्षण करून — वर्तुळाची जीवा…… आहे.
A) रेख मप B) रेख कख C) रेख मर D) यापैकी नाही
9)आकृती चे निरीक्षण करून — वर्तुळाचा व्यास …….आहे. 
A) रेख कख B) रेख यर C) रेख मप D) रेख यम

10)खालील आकृती चे निरीक्षण करून — आकृतीतील बाजूंची नावे लिहा. 
A) बाजू पफ, बाजू फब, बाजू पब B) बाजू ब, बाजू प, बाजू फ C) किरण पब, किरण पफ D) यापैकी नाही
11)आकृती चे निरीक्षण करून — आकृतीतील बाजूंची नावे लिहा. 
A) बाजू यल, बाजू वर B) बाजू यव, बाजू वल, बाजू रल, बाजू यर C) बाजू रव, बाजू लय D) यापैकी नाही

त्रिकोणाला….. शिरोबिंदू व ……बाजू असतात. 
A) तीन, तीन B) दोन, तीन C) तीन, चार D) तीन, दोन
चौरसाच्या सर्व बाजू ……..असतात व सर्व कोन.,….. ..असतात.
 A) असमान, कोटीकोन B) समान , काटकोन C) समान, पूरककोन D) यापैकी नाही
आयताच्या ……..बाजू समान लांबीच्या असतात. 
A) सर्व B) तीन C) समोरासमोरील D) यापैकी नाही
आयताला……… असेही म्हणतात. 
A) त्रिकोण B) वर्तुळ C) अर्धवर्तुळ D) काटकोन चौकोन
खिडकीच्या कडांमधील कोन कोणता असतो? A) लघुकोन B) काटकोन C) विशालकोन D) सरळ कोन
३ वाजता घड्याळातील काट्यांमधील कोन कोणता असतो? 
A) लघुकोन B) विशालकोन C) काटकोन D) सरळ कोन
९ वाजता घड्याळातील काट्यांमधील कोन कोणता असतो? 
A) लघुकोन B) विशालकोन C) काटकोन D) सरळ कोन
भिंतीच्या कोपऱ्यातील कोन कोणता असतो? A) लघुकोन B) विशालकोन C) काटकोन D) सरळ कोन
जमिनीशी केलेला विजेच्या खांबाचा कोन कोणता असतो?
 A) लघुकोन B) काटकोन C) विशालकोन D) सरळ कोन
वर्तुळाच्या मधोमध असलेल्या बिंदूला काय म्हणतात? 
A) त्रिज्या B) जीव C) केंद्र D) व्यास
वर्तुळावरचा कोणताही बिंदू आणि केंद्र यांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? 
A) जीवा B) त्रिज्या C) व्यास D) स्पर्शरेषा
वर्तुळाच्या दोन त्रिज्या मिळून तयार होणारी रेषा कोणती? 
A) व्यास B) जीव C) केंद्र D) त्रिज्या
वर्तुळ काढण्यासाठी कोणते साधन वापरतात? A) पट्टी B) कंपास C) स्केल D) गणक
वर्तुळाचा व्यास नेहमी कोणाच्या दुप्पट असतो? 
A) केंद्र B) त्रिज्या C) जीवा D) वर्तुळ
वर्तुळाच्या परिघावरील बिंदूंपासून केंद्रापर्यंतचा अंतर समान असतो, त्याला काय म्हणतात? A) व्यास B) त्रिज्या C) केंद्र D) जीव
वर्तुळात व्यास आणि त्रिज्या यांचा संबंध कसा आहे?
 A) व्यास = 2 × त्रिज्या B) व्यास = ½ × त्रिज्या C) व्यास = त्रिज्या D) व्यास = 3 × त्रिज्या
वर्तुळ काढताना कंपासाचे टोक कुठे ठेवतात? A) परिघावर B) केंद्रावर C) व्यासावर D) कोणत्याही ठिकाणी
चौरसाबद्दल अयोग्य विधान निवडा. 
A) चौरसाच्या सर्व बाजू समान असतात.
B) चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो C) चौरसाला चार शिरोबिंदू आहे. 
D) प्रत्येक आयताकृती आकार चौरसाकृती असते.
वर्तुळाबद्दल गटात न बसणारा शब्द ओळखा. A) जीवा B) कर्ण C) त्रिज्या D) व्यास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!