8thClass History Itihasachi Sadhane Iyatta aathavi swadhyay

इतिहासाची साधने इयत्ता आठवी

सर्व प्रकारच्या ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या

www.learningwithsmartness.in

.1)ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक ——-  म्हणूनही काम करत होती.

2 points

  1. लढा
  2. मतांची
  3. प्रबोधनाची
  4. यापैकी नाही

2)चुकीचा पर्याय निवडा.

2 points

  1. लोकमान्य टिळक- अमृतबझार पत्रिका
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक बहिष्कृत भारत
  3. गोपाळ हरी देशमुख – प्रभाकर
  4. विष्णुशास्त्री चिपळूणकर – निबंधमाला

3)———- यांनी इ स 1913 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली

2 points

  1. राज कपूर
  2. दादासाहेब फाळके
  3. पृथ्वीराज कपूर
  4. यापैकी नाही

4)ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या——- या स्वतंत्र विभागाने भारताचे भारताच्या विविध प्रांताचे नकाशे तयार केले आहेत

2 points

  1. मॅप मशीन
  2. मॅप ऑफ इंडिया
  3. सर्व्हे ऑफ इंडिया
  4. यापैकी नाही

5)चुकीचा पर्याय निवडा.

2 points

  1. दृक साधने – ध्वनिमुद्रिते
  2. भौतिक साधने- वास्तू ,वस्तू, पुतळे , पदके
  3. लिखित साधने- चरित्रे, वृत्तपत्रे, पुस्तके, नियतकालिके
  4. मौखिक साधने – पोवाडे ,लोककथा, लोकगीते

6)——— येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीजींच्या वापरातील अनेक वस्तू कागदपत्रे पहावयास मिळतात.

2 points

  1. लाल महल
  2. यापैकी नाही
  3. दिल्लीचा किल्ला
  4. आगाखान पॅलेस

7)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जानेवारी 1920 मध्ये ——– हे पाक्षिक सुरु केले.

2 points

  1. केसरी
  2. दीन बंधू
  3. मूक नायक
  4. यापैकी नाही

8)———– जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्या कडे सोपवता येईल

2 points

  1. पैसे
  2. शेती
  3. ऐतिहासिक साधनांचे
  4. यापैकी नाही

9)चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मांडली जातात कारण-

2 points

  1. त्या जास्त प्रमाणात उपलब्ध असतात.
  2. चित्रफिती मुळे घडलेली घटना जशीच्या तशी पहायला मिळते.
  3. माहिती मिळते.
  4. यापैकी नाही.

10)प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत ———- भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत.

2 points

  1. आधुनिक
  2. प्राचीन
  3. पुरातन
  4. अर्वाचीन

प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्यासाधनांचा अभ्यास आपण केलेला आहे. यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारितदृक्, श्राव्य आणि दृक्-श्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो.
भौतिक साधने : इतिहासाच्या भौतिक साधनांमध्येविविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल.
इमारती व वास्तू : आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यांसारख्या वास्तू बांधल्या गेल्या. या इमारतींमध्येप्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची
निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यांसारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज सुस्थितीत पाहावयास मिळतात. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली. उदा., अंदमान येथील सेल्युलर जेल. या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणांस तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्या वेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते.जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी,
मुंबईतील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम
आश्रमास भेट दिल्यावर गांधीयुगाच्या इतिहासाविषयी
माहिती मिळते.

One thought on “8thClass History Itihasachi Sadhane Iyatta aathavi swadhyay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!