नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात.
सर्वनाम
1) पुरुषवाचक सर्वनाम
2) दर्शक सर्वनाम
3) संबंधी सर्वनाम
4) प्रश्नार्थक सर्वनाम
5) अनिश्चित सर्वनाम
6) आत्मवाचक सर्वनाम
1) पुरुषवाचक सर्वनामे :
1) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः
2) ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे उदा. तू, तुम्ही, आपण, स्वतः
3) ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे उदा. तो, ती, ते, त्या.
2) दर्शक सर्वनामे :
जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.
3) संबंधी सर्वनामे : वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. उदा. जो, जी, जे, ज्या.
4) प्रश्नार्थक सर्वनामे : ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इ.
5) सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात.
उदा. 1) त्या पेटीत काय आहे ते सांग.
2) कोणी कोणास हसू नये.
6) आत्मवाचक सर्वनामे उदा.
1) मी स्वतः त्याला पाहिले.
2) तू स्वतः मोटार हाकशील का?
3) तो आपण होऊन माझ्याकडे आला.