Scholarship Exam Test Series म्हणी व त्यांचे अर्थ
‘Marathi Mhani
मनात मांडे खायला धोंडे’ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखून त्याचा पर्याय निवडा.
- खूप आशा वाटणाऱ्या माणसाच्या बाबतीत निराशा वाट्याला येणे
- केवळ मोठ मोठी मनोराज्य करायची परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती
- भाग्यवान माणसाला कशाचीही उणीव पडत नाही
- यापैकी नाही
Correct answer
केवळ मोठ मोठी मनोराज्य करायची परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती
पुढील अपूर्ण म्हण योग्य शब्द वापरून पूर्ण करा. डोळ्यात…… आणि कानात फुंकर.
- चष्मा
- केर
- आरसा
- प्रतिमा
Correct answer
केर
पुढील आकृतीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील सातवे अक्षर ओळखा. .
ता ची. भा शि ता व री रू प न क्षा
- ता
- भा
- प
- क्षा
Correct answer
ता
‘सगळे मुसळ केरात’ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखून पर्याय निवडा.
- कचरा गोळा करणे
- स्पष्ट असलेल्या गोष्टींना पुरावा नको
- मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्व श्रम व्यर्थ जाणे
- यापैकी नाही
Correct answer
मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्व श्रम व्यर्थ जाणे
‘कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तेवढा फायदा घेऊ नये ‘हा अर्थ असणारी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
- रात्र थोडी सोंगे फार
- लेकी बोले सुने लागे
- मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये
- रोज मरे त्याला कोण रडे
Correct answer
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये
पुढील आकृतीत लपलेल्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता.? त्र र प रा शी व तु घ ळ च्या या वा ह ल
- स्पष्ट असणाऱ्या गोष्टीला पुरावा नको
- परस्पर दुसर्याची वस्तू तिसऱ्याला देणे स्वतःला झीज लागू न देणे
- कामे भरपूर पण वेळ थोडा
- वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार
Correct answer
परस्पर दुसर्याची वस्तू तिसऱ्याला देणे स्वतःला झीज लागू न देणे
‘शहाण्याला…….. मार’ योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा.
- पट्ट्याचा
- मुसळ
- शब्दांचा
- यापैकी नाही
Correct answer
शब्दांचा
‘चोर सोडून …….फाशी’ .रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून म्हणून पूर्ण करा .
- पोलीस
- डाकू
- सेनापती
- संन्याशाला
Correct answer
संन्याशाला
‘मोठ्यांच्या आश्रयाने लहान्यांचाही फायदा होणे ‘ या अर्थाची खालील पैकी म्हण निवडा.
- घर ना दार देवळी बि-हाड
- गाड्याबरोबर नळ्याची यात्रा
- गर्जेल तो पडेल काय
Correct answer
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा
चुकीचा अर्थ असणारी म्हण ओळखा.
- अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ -दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो.
- अंथरूण पाहून पाय पसरावे -आपली आवक जेव्हढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे
- अंगाचा तीळ पापड होणे -खूप संतापणे
- अक्कल खाती जमा -फायदा होणे
Correct answer
अक्कल खाती जमा -फायदा होणे
चुकीची जोडी ओळखा.
- अचाट खाणे मसणात जाणे ____ कमी प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते
- अठरा विश्वे दारिद्र असणे ____ अति दुर्बळ असणे
- अडला नारायण गाढवाचे पाय धरी ____ बलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही व्यक्तीकडे मदतीची याचना करू शकतो
- अडली गाय अन फटके खाय ____ अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे
Correct answer
अचाट खाणे मसणात जाणे ____ कमी प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते
चुकीची जोडी ओळखा.
- अप्पा मारी गप्पा ____ काही रिकामटेकडे उगाच चर्चेचे पाल्हाळ लावतात
- असतील शिते तर नाचतील भुते ____ संपत्ती नसलेल्या व्यक्तीकडे सर्वजण येतात
- अंगाची लाही लाही होणे ____ खूप संतापणे
- अंगाची तलखी होणे ____ खूप संतापणे
Correct answer
असतील शिते तर नाचतील भुते ____ संपत्ती नसलेल्या व्यक्तीकडे सर्वजण येतात
चुकीची आहे ओळखा.
- अडली गाय खाते काय ____ गरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारून काम करतो
- अति शहाणा त्याचा बैल रिकामा ____ शिष्ट माणसाशी व्यवहार करताना लोक जपून वागतात त्यामुळे त्यांना काम करणे जड जाते
- अति तेथे माती ____ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास काम चांगले होते.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी ____ अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
Correct answer
अति तेथे माती ____ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास काम चांगले होते.
चुकीची जोडी ओळखा.
- अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये ____ अपरिचित माणसाशी अधिक सलगी करू नये
- अती झालं अऩ हसू आलं ____ एखाद्या गोष्टीचा जास्त उहापोह केला तर ती गोष्ट हास्यास्पद ठरते
- अपयश ही यशाची पहिली पायरी आहे ____ कोणत्याही यश मिळवताना सुरवातीलाच यश येते.
- असंगाशी संग प्राणाशी गाठ ____ अयोग्य माणसाची संगत धरल्यास प्राणही जाऊ शकतो
Correct answer
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे ____ कोणत्याही यश मिळवताना सुरवातीलाच यश येते.
चुकीची जोडी ओळखा.
- असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा ____ भरपूर द्रव्य असल्यावर चैन करायची नाहीतर गप्प बसायचे
- आंधळी पाण्याला गेली अन घागर फोडून घरी आली ____ अक्षम व्यक्तीस काम दिल्यास ते तडीस जाणे कठीण असते
- आंधळे दळते अन कुत्रे पीठ खाते ____ स्वतः ने कष्ट करायचे अन स्वतःनेच लाभ घ्यायचा
- आंधळ्याची बहिऱ्याशी गाठ ____ एकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे
Correct answer
आंधळे दळते अन कुत्रे पीठ खाते ____ स्वतः ने कष्ट करायचे अन स्वतःनेच लाभ घ्यायचा
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
- एखादी बाब अगदीच वाईट स्वीकारण्यापेक्षा थोडी दोष असलेली गोष्ट स्वीकार करणे कधीही चांगले
- असहाय्य गरीब लोकांमध्ये एखादा चुकीचे निर्णय घेऊन राज्य करतो
- अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे
- वरील पैकी नाही
Correct answer
अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे
आयत्या बिळात ——–
दिलेली म्हण पूर्ण करा.
- नागोबा
- उंदीर
- मुंगी
- यापैकी नाही
Correct answer
नागोबा
पाण्यात राहून ——— वैर करू नये.
दिलेली म्हण पूर्ण करा.
- बैलाशी
- माकडाची
- घोड्याशी
- माशाशी
Correct answer
माशाशी
——– गेला आणि झोपा केला.
दिलेली म्हण पूर्ण करा.
- बैल
- गाय
- गाढव
- माकड
Correct answer
बैल
——– शेपूट नळीत घातले, तरी वाकडे ते वाकडेच
दिलेली म्हण पूर्ण करा.
- कुत्र्याचे
- माकडाचे
- गाढवाचे
- घोड्याचे
Correct answer
कुत्र्याचे
——- गुळाची चव काय.
दिलेली म्हण पूर्ण करा.
- कुत्र्याला
- माकडाला
- गाढवाला
- घोड्याला
Correct answer
गाढवाला
——– जाऊन भांडं लपवू नये.
दिलेली म्हण पूर्ण करा.
- गावाला
- दुधाला
- ताकाला
- यापैकी नाही
Correct answer
ताकाला
पळसाला पाने ——
दिलेली म्हण पूर्ण करा.
- तीनच
- चारच
- पाचच
- सहाच
Correct answer
तीनच
——– धाव कुंपणापर्यंत.
दिलेली म्हण पूर्ण करा.
- सापाची
- माकडाची
- सरड्याची
- घोड्याची
Correct answer
सरड्याची
‘ उठता लाथ बसता बुक्की ‘या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ सांगता येईल.
- मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही
- ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रू पेक्षा भयंकर असतो
- प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे
- यापैकी नाही
Correct answer
प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे
पुढीला पूर्ण म्हणून योग्य शब्द वापरून पूर्ण करा.. ‘नाव सोनुबाई हाती……. वाळा’.
- सोन्याचा
- चांदीचा
- काचेचा
- कथलाचा
Correct answer
कथलाचा
‘बापाच्या अंगचे गुणच मुलात उतरणे’ या अर्थाची खालीलपैकी म्हणून ओळखा.
- बळी तो कान पिळी
- बाळाचे पाय पाळण्यात दिसतात
- बावळी मुद्रा देवळी निद्रा
- बाप तसा बेटा
Correct answer
बाप तसा बेटा
‘तळे राखील तो ….. चाखील’ रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा.
- पाणी
- दूध
- तेल
- यापैकी नाही
Correct answer
पाणी
‘टाकीचे घाव सोसल्या वाचून देवपण येत नाही’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
- सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे
- बाह्य देखावा आकर्षक पण कृतीच्या नावाने मात्र शून्य
- कष्ट सोसल्याशिवाय मोठेपण प्राप्त होत नाही
- मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे
Correct answer
कष्ट सोसल्याशिवाय मोठेपण प्राप्त होत नाही
‘घोर संकटाच्या प्रसंगी मिळाली थोडीशी मदत देखील महत्त्वाची वाटते’हा अर्थ असणारी खालील पैकी म्हण ओळखा.
- आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी
- भरवशाच्या म्हशीला टोणगा
- बुडत्याला काठीचा आधार
- सगळे मुसळ केरात
Correct answer
बुडत्याला काठीचा आधार
‘मुलाचे पाय . ..…दिसतात’ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
- छान
- छोटे
- वाड्यात
- पाळण्यात
Correct answer
पाळण्यात
भरपूर द्रव्य असल्यावर चैन करायची नाहीतर गप्प बसायचे
हा अर्थ असणारी म्हण ओळखा.
- आंधळे दळते अन कुत्रे पीठ खाते
- असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा
- आंधळी पाण्याला गेली अन घागर फोडून घरी आली
- आंधळ्याची बहिऱ्याशी गाठ
Correct answer
असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा
आपल्या माणसांनी आपल्याच माणसाना त्रास देणे
हा अर्थ असणारी म्हण ओळखा
- आयत्या पिठावर रेखोट्या मारणे
- आपलेच दात अन आपलेच ओठ
- आपल्या गल्लितच कुत्रे शिरजोर
- आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळ कसे लावायचे
Correct answer
आपलेच दात अन आपलेच ओठ
गरजू माणसाला मदत न करता, गरज नसलेल्या माणसाला मदत करणे.
हा अर्थ असणारी म्हण ओळखा.
- आग सोमेश्वरी नि बंब रामेश्वरी
- आचार तेथे विचार
- आठ हात लाकुड, नऊ हात धलपी
- आज अंबरी उद्या झोळी धरी
Correct answer
आग सोमेश्वरी नि बंब रामेश्वरी
कार्य तडीस गेल्याशिवाय त्याबद्दल उगाच बोलू नये.
हा अर्थ असणारी म्हण ओळखा.
- आधी करावे मग सांगावे
- आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
- आधी पोटोबा मग विठोबा
- आपण सुखी तर जग सुखी
Correct answer
आधी करावे मग सांगावे
इतरांचा विचार न करता स्वार्थ साधणे.
हा अर्थ असणारी म्हण ओळखा.
- आलिया भोगासी असावे सादर
- आयत्या बिळावर नागोबा
- आपल्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचे
- आमचे गहू आम्हालाच देऊ
Correct answer
आपल्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचे
अल्प आमिष दाखवून मोठे काम करून घेणे
हा अर्थ असणारी म्हण ओळखा.
- आवळा देऊन कोहळा काढणे
- इकडे आड तिकडे विहीर
- इच्छिलेले घडते तर भिक्षुकही राजे होते
- यापैकी नाही
Correct answer
आवळा देऊन कोहळा काढणे
चुकीची जोडी ओळखा
- इच्छा तसे फळ ____ मनात चांगले विचार ठेऊन केलेले कार्य यशस्वी होतेच
- इजा बिजा तीजा ____ एकसारख्या होणाऱ्या घटना टाळता येत नाही
- उंटावरचा शहाणा ____ चांगला सल्ला देणारा
- उंटावरून शेळ्या हाकणे ____ आळस, हलगर्जीपणा करणे
Correct answer
उंटावरचा शहाणा ____ चांगला सल्ला देणारा
चुकीची जोडी ओळखा.
- उंदराला मांजर साक्ष ____ वाईट माणसाने दुसर्या वाईट माणसाविषयी चांगले सांगणे
- उकराल माती तर पिकतील मोती ____ शेतीची चांगली मशागत तर पिके चांगली येतात
- उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला ____ एखादे मोठे , कठीण काम हातात घेतल्यानंतर श्रमांचा विचार करायचा नसतो
- उचलली जीभ लावली टाळुला ____ विचार करून बोलणे
Correct answer
उचलली जीभ लावली टाळुला ____ विचार करून बोलणे
.
Very nice
Sir aamche online lecture ghya na please