सूट, कमिशन व रिबेट
छापील किंमत : विक्रिसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची विक्री किंमत छापलेली असते. तिला त्या वस्तूची छापील किंमत म्हणतात. छापील किंमतीलाच दर्शनी किंमत असेही म्हणतात.
सूट : दुकानदार काही कारणांनी एखादी वस्तू तिच्या छापील किंमतीपेक्षा कमी किंमतीस विकतो. तो छापील किंमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो तिला सूट म्हणतात.
उदा.
सूट = छापील किंमत – विक्री किंमत
सूट नेहमी शेकडा स्वरूपात सांगितली जाते.
सूट = छापील किंमत x शेकडा सूट
500 रुपयांच्या साडीवर 10% सूट तर विक्री किंमत किती ?
साडीवर मिळणारी सूट = छा. किं. x शे.
= 500 × 10%
सूट = 50 रुपये
वि. किं. = छा. किं – सूट
दलाली, कमिशन, अडत :
= 500 – 50 = 450 रुपये
विविध वस्तू, यंत्रे, धान्ये विकून देण्याचे काम एखादी व्यक्ती किंवा संस्था करते. त्याबद्दल त्या व्यक्तीला किंवा संस्थेला मोबदला म्हणून जी रक्कम मिळते त्या रकमेस कमिशन म्हणतात. कमिशनचा दरसुद्धा शेकडेवारीत सांगितला जातो.
जेव्हा धान्य व्यापाऱ्याकडून विकले जाते तेव्हा शेतकऱ्याकडून किंवा उत्पादकाकडून जी रक्कम व्यापारी कमिशन म्हणून स्वीकारतो त्या रकमेला अडत म्हणतात. तसेच घरे, पाळीव प्राणी, वाहन, फ्लॅट, भूखंड, इत्यादींची विक्री करताना गिऱ्हाईक मिळवणे अवघड असते. अशावेळी विकत घेणाऱ्यांना व विकणाऱ्यांना संबंधित व्यक्ती व्यवहार घडविण्यासाठी काम करते तिला दलाल किंवा कमिशन एजंट म्हणतात. या कामासाठी ती व्यक्ती जो मोबदला घेते त्याला दलाली किंवा कमिशन म्हणतात.
दलाली गिऱ्हाइकाकडून, मालकाकडून किंवा दोघांकडून घेतली जाते.
रिबेट : खादी ग्रामोद्योग मंडळ. हातमाग मंडळ किंवा विविध संख्या यांचेकडून मालाचा उठाव होणेसाठी सूट जाहीर केली जाते. प्रत्यक्षात दुकानदार गिऱ्हाईकाला सूट म्हणून जी रक्कम कमी घेतो त्याची भरपाई सरकार, मंडळ किंवा संस्था यांचेकडून केली जाते. या भरपाई रकमेस रिबेट असे संबोधतात.
रिबेट रक्कम व सूट रक्कम एकच असते; परंतु सूट गिऱ्हाईकाला मिळते तर रिबेटची रक्कम व्यापाऱ्याला भरपाई म्हणून मिळते.
रिबेटसुद्धा शतमानात व्यक्त करतात.
Mathematics Discounts, Commissions and rebates
Mathematics Discounts, Commissions and rebates
1) मगनलालने एका वस्तूची छापील किंमत 32,500 रुपये सांगितली छापील किंमतीवर त्याने शे. 10 सूट दिली. तर त्याने गिऱ्हाईकाला किती रुपये सूट मिळाली ?
1) 90 रुपये
2) 110 रुपये
3) 3,250 रुपये
4) 3,500 रुपये
2) आशिषला दुकानदाराने शे. 5 सूट दिल्याने दुचाकी गाडी घेताना 2,376 रुपयांची सूट मिळाली. तर गाडीची दर्शनी किंमत किती असेल ?
1) 45,620
2) 47,520
3) 46,620
4) 47,620
3) रोहनला वस्तूंच्या विक्रीकरिता मासिक 12,500 रुपये पगार व एकूण विक्रीच्या 4% प्रोत्साहन भत्ता मिळतो. जून महिन्यात रोहनने 4,20,000 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली तर रोहनला जून महिन्याचे एकूण किती रुपये मिळतील ?
1) 16,800
2) 12,500
3) 29,300
4) 28,300
4) मधुमतीने दलालामार्फत 2 म्हशी विकल्या. एका म्हशीची विक्री किंमत 63,700 तर दुसऱ्या म्हशीची किंमत 37,300 रुपये ठरली. दलालाची दलाली 21 % ठरली तर म्हशी विकून मधुमतीला विक्री किंमतीपेक्षा किती रुपये कमी मिळाले ?
1) 3,535
2) 2,500
3) 2,525
4) 2,625
5) निशांतने गुलाबाचे 200 गुच्छ प्रत्येकी 65 रुपयांस याप्रमाणे विकले. विक्रीतून शे. 5% दराने निशांतला अडत मिळाली. तर निशांतला किती रुपये अडत मिळाली ?
1)550
2) 650
3) 6.5 x 1000
4) 6.5 x 10
6) समान किंमत असलेल्या दोन वस्तूंवर अनुक्रमे 10% व 12% सूट दिल्यानंतर त्या दोन्हीमधील फरक
34 रुपये असेल तर वस्तूची छापील किंमत किती ?
1) 1,500
2) 1,700
3) 1,600
4) 1,550
7) राजाभाऊने 42,700 रुपयांचा फ्रीज 39,711 रुपयांस विकला तर किती टक्के सूट दिली ?
1) 7%
2) 8%
3) 4%
4) 5%
8) व्यापाऱ्याने एका दूरदर्शन संचाची किंमत 36,750 रुपये सांगितली. परंतू दिपावली निमित्त त्याने टी. व्ही. संचावर शेकडा काही सूट दिल्याने लक्ष्मणला तो दूरदर्शन संच 31,2371⁄2 रुपयांना विकला तर त्याने शेकडा किती सूट दिली ?
1) 10%
2) 15%
3) 20%
4) 8%
१) एका दुकानदाराने 18 वस्तूंच्या खरेदीवर 9 वस्तू मोफत दिल्या तर शेकडा किती सूट दिली?
1) 25%
2) 15%
3) 50 %
4) 40%
10) रमणलालने 10 पेनच्या खरेदीवर 4 पेन मोफत दिले तर किती टक्के सूट दिली?
1) 40%
2) 10%
3) 4%
4) 14%
11) एका शेतकऱ्याने 72 क्विंटल तांदूळ प्रति क्विंटल 4,200 दराने व्यापाऱ्यामार्फत विकला. व्यापाऱ्याला शे. 4 अडत दयावी लागली तर शेतकऱ्याला किती रुपये मिळाले?
1) 1,296
2) 12,096
3) 12,906
4) 12,609
12) देवगड आंब्यांची एक पेटी 1,250 रुपयांस विकली. व्यापाऱ्याने अशा 25 पेट्या विकल्या. प्रत्येक पेटीसाठी शे. 1.5 दराने कमिशन घेतले. तर व्यापाऱ्याला किती कमिशन मिळाले ?
1) 468.75 रुपये
2) 468 रुपये
3) 467 3/4 रुपये
4) 468 1/2 रुपये
13) खादी ग्रामोद्योग मंडळाने 25,300 रुपयांच्या मालाची विक्री केली. मालाच्या विक्रीवर 5% रिबेट मिळत असेल तर किती रुपये रिबेट मिळेल ?
1) 1,250
2) 1,265
3) 1,275
4) 1,300
14) एका वायुप्रदुषण कमी करण्याचा इलेक्ट्रीक गाडीसाठी सरकारकडून शे. 20% रिबेट कंपनीला देण्यात येते. एका गाडीची किंमत 24,500 रुपये आहे. अशा एकूण 6 गाड्यांची विक्री केली असेल तर (व्यापाऱ्याला) कंपनीला किती रुपये रिबेट मिळेल ?
1) 29,500
2) 29,700
3) 29,400
4) 29,450
15) एक दुकानदार खरेदीच्या 2 पट सूट देतो म्हणजे तो शेकडा किती सूट देतो ?
1) 30%
2) 20%
3) 25%
4) 40%
16) एका नाट्यगृहावर 12 तिकिटांवर 2 तिकिटे मोफत दिली जातात तर त्यांनी शे. किती सूट दिली आहे?
50/3
2) 10/3
3) 20/23
4) 25/3
17) सोरे (पॅनेल) घटाच्या विक्रीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांतर्गत सरकारने शे. 30% (सबसिडी) रिबेट जाहीर केले. रामदेवने आपल्या दुकानातून 2,400 रुपये किमतीचे 27 सोरे घट विक्री केले. तर रामदेवला किती रुपये रिबेट मिळेल ?
4) 1,944
1) 7,200
2) 19,440
3) 19,540
18) हातमाग मंडळाने सूती कापड विक्रीवर 12.5•% रिबेट जाहीर केले. सोमनाथला 12187.50 रुपये रिबेट
मिळाले असेल तर किती रुपयांची कापड विक्री सोमनाथने केली ?
1) 1,05,000
2) 95,000
3) 97,500
4) 92,500
19) 16 वस्तूंच्या विक्रीमधून 18 वस्तू प्रत्यक्ष दद्याव्या लागत असतील तर शे. किती सूट दुकानदाराने दिली ?
1) 12%
2) 12.5%
3) 13%
4) 14%
20) 24 रुपयांस 2 डझन केळी असा भाव व्यापाऱ्याने सांगितला. परंतु प्रत्यक्षात 24 रुपयांस 30 केळी व्यापाऱ्याने ग्राहकाला दिली, तर ग्राहकाला किती रुपये सूट मिळाली ?
1) 20%
2) 25 %
3) 30 %
4) 6%
Mathematics Discounts, Commissions and rebates