NAS Question Paper Class 6th

भाग १ खालील उतारा वाच.
मित्रांचे आपल्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. आई, वडील, भाऊ, बहीण वगैरे नाती जन्माने सिद्ध होतात. मित्रत्त्वाचे तसे नाही. ही ऐच्छिक गोष्ट आहे. म्हणून नातेवाईकांपेक्षा मित्रांमध्ये जिव्हाळा असतो. मित्र हे दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देणारे, सुखाच्या प्रसंगी आनंद देणारे असल्यामुळे त्यांचा ओढा आपणांस फार वाटतो. तोंडपूजेपणा करणारे, निव्वळ स्तुती करणारे मित्र आपणांस विकत घेता येतात, पण ते खरे मित्र नव्हेतच ! मित्र आरशाप्रमाणे आपले खरे प्रतिबिंब दाखवून आपल्या गुणदोषाचे दर्शन घडवितो, म्हणून मित्राला जीवनप्रवाहाला वळण लावणाऱ्या तटाची उपमा देण्यात आली आहे.
योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल कर
प्रश्न १) उताऱ्यावरुन पुढीलपैकी सत्य विधान कोणते ?
१) खरे मित्र विकत घ्यावे लागतात.
२) मित्रत्त्वाचे नाते जन्मापासून असते.
३) मित्रांचे जीवनात महत्त्वाचे स्थान असते.
४) मित्रांमध्ये जिव्हाळा नसतो.
प्रश्न २) खोटी स्तुती करणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उताऱ्यात आला आहे ?
१) ओढा वाटणे
२) तोंडपूजेपणा करणे
३) धीर देणे
४) जिव्हाळा असणे
प्रश्न ३) खरा मित्र कसा असावा ?
१) निव्वळ स्तुती करणारा
२) आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा
३) दुःखात लांब जाणारा
४) सुखात जवळ येणारा.
प्रश्न ४) वरील उताऱ्यास खालीलपैकी योग्य शीर्षक सुचव.
१) नात्यांचे महत्त्व
२) आनंदी मित्र
३) आरशातील प्रतिबिंब
४) मित्रत्त्व
प्रश्न ५) खरे प्रतिबिंब दाखवणारा
१) खरा मित्र
२) आरसा
३) १ व २ दोन्ही बरोबर
४) यापैकी नाही.
भाग – २ खालील चित्राचे निरीक्षण कर.
आपला कान काचेचा असता,
तर केव्हाच फुटला असता
योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल कर
प्रश्न १) ध्वनिप्रदूषण करणारे किती घटक चित्रात दाखवले आहेत?
१) चार
२) पाच ३) दोन
४) यांपैकी नाही
प्रश्न २) ‘कान फुटणे’ या शब्दसमूहाचा उताऱ्यात आलेला अर्थ कोणता?
१) काच फुटणे
२) प्रदूषण होणे
३) बहिरेपण येणे
४) त्रास होणे
प्रश्न ३) खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख चित्रात दिसत नाही? १) प्रत्येकाने ‘हळू आवाजात बोलावे.
२) घरातील रेडिओ, दूरदर्शन संच यांचा आवाज लहान ठेवावा. ३) वाहन चालवताना अकारण हॉर्न वाजवू नये.
४) ध्वनिप्रदूषणामुळे कानांना त्रास होतो.
प्रश्न ४) कान हे
. ज्ञानेंद्रियांपैकी एक ज्ञानेंद्रिय आहे.
१) सहा
२) पाच ३) दोन
४) दहा
प्रश्न ५) वरील चित्रातून कोणता संदेश दिला आहे ?
१) कान नेहमी बंद ठेवा.
२) ध्वनिप्रदूषणाला आळा घाला.
३) वाहन हळू चालवा.
४) यापैकी नाही.
भाग ३) खालील कविता वाच. डोंगरगावी वळणवाट ही दुडक्या चालीत चढे टेकडी
नसे एकटी ती पहाडी
तिच्या सोबती जंगलझाडी
निथळून जाई मृगासरींनी
हिरवे लेणे तिला श्रावणी
पिवळ्या माला आश्विन आणी
डोंगर चढते ही सजूनी
संध्यासमयी प्रभा निळसर
तियेच्या मनी दाट हुरहुर
लपेटते ती धुक्याचा पदर
काळोखामध्ये बुडतो डोंगर
योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल कर.
प्रश्न १) दुडक्या चालीमध्ये
१) पहाड
२) श्वावणी
३) आश्विन
४) वळणवाट
प्रश्न २) निळसर प्रभा केव्हा उमटते?
१) सकाळी
२) दुपारी
३) सायंकाळी
४) उषःकाली
टेकडी चढत आहे.
प्रश्न ३) कवितेत कोणत्या नैसर्गिक घटकाच वर्णन आले नाही?
१) जंगलझाडी
२) पळणवाट
३) धुके ४) नदी
प्रश्न ४) पावसाच्या धारा’ या अर्थाचा कवितेत आलेला शब्द कोणता?
१) मृगसरी
२) श्रावणी
३) प्रभा
४) पिवळ्या माळा
प्रश्न ५) ‘काळोखामध्ये डोंगर बुडाला’ म्हणजे कोणती घटना घडली?
१) सूर्योदय झाला
२) सूर्यास्त झाला
३) डोंगरावर हिरवे गवत उगवले
४) यापैकी नाही.
भाग ४) खालील प्रसंग वाच.
दीपा घाबरीघुबरी होऊन धावतपळतच घरात शिरली. तिने आईला घट्ट मिठी मारली अन् म्हणाली, “आई शेजारच्या गल्लीतल्या एका काकूंच्या घरात गॅसच्या टाकीतून गॅस गळती झाली. सगळे लोक त्यांच्या घराच्या दिशेने धावत होते. अग्निशमन यंत्रणेच्या गाड्यापण आल्या होत्या. लोक पाण्याच्या बादल्या, मातीची घमेली नेत होते. एका काकांनी गाडी काढली अन् काकूला दवाखान्यात नेले. आई, त्या काकू बऱ्या होतील ना गं”, एका दमात दीपाने पाहिलेले दृश्य आईला सांगितले. हे सगळे पाहून ती खूप घाबरली होती.आई तिला म्हणाली, “बाळ, त्या काकू नक्कीच बऱ्या होतील. त्यांना नेलंय ना दवाखान्यात. अगं, आता वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. नवनवीन औषधं, नवनव्या तंत्रज्ञानांचा वापर सुरु झाला आहे. तू घाबरून जाऊ नकोस.” तरीही दिपाच्या मनात अनेक प्रश्न होते.
योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल कर.
प्रश्न १) वरील प्रसंगात कोणत्या आपत्तीचा उल्लेख आला आहे?
१) आग
२) गॅस गळती
३) गॅसच्या टाकीचा स्फोट
४) शॉर्ट सर्किट
प्रश्न २) दिपाने आईला घट्ट मिठी मारली. कारण
१) तिला अग्निशमन दलातील लोकांची भीती वाटली.
२) गॅसगळतीचा प्रसंग पाहून ती घावरली होती.
३) काकूंच्या घरात आग लागली होती.
४) परिसरातील वीजप्रवाह बंद होऊन वीज गेली होती.
प्रश्न ३) अग्निशमन दलास पाचारण करण्यासाठी कोणत्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात?
१) १००
२) १०२
३) १०३
४) १०४
प्रश्न ४) वरील प्रसंगास कोणते नाव सुचवता येईल ?
१) सुरक्षा आणि उपाय
२) अग्निशमन यंत्रणा
३) संशोधन
४) यांपैकी नाही
प्रश्न ५ प्रसंगातून आपण कोणता बोध घ्यावा?
१) गॅस गळती झाल्यावर पाणी ओतावे.
२) घरातील गॅसचा वापर सुरक्षितपणे करावा
३) गॅस गळतीच्या ठिकाणी माती टाकावी.
४) गॅसगळती झाल्यावर खिडक्या बंद कराव्यात.
भाग ५ खालील बातमी वाच.
आमच्या वार्ताहराकडून जनलहरी दिनांक – १५ जुलै
गावकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाचं पाणी
रेणापूर, दि. १४ जुलै
काल रात्री झालेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे येथील तलाव काठोकाठ भरुन वाहत आहेत. गेले दोन दिवस पाऊस पडत असल्यामुळे तलावांनी पाण्याची कमाल पातळी गाठली आहे. गावातल्या लोकांसाठी ही समाधानाची गोष्ट आहे. यावर्षी जून महिना पावसाविना कोरडाच गेल्याने तमाम गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. गावात दुष्काळाची भीती वाटू लागली होती. मात्र जुलै महिन्याचा पंधरवडा गावकऱ्यांसाठी आनंदाचा ठरला आहे. तशाच गेले २ दिवस पडत असलेल्या पावसामुळे तलाव ओसंडून वाहत आहेत. गावकऱ्यांची पाण्याची चिंता संपली असून त्यांच्या डोळ्यांत आनंदाचे पाणी आहे.
योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल कर
प्रश्न १) पंधरवडा म्हणजे किती दिवस ?
१) आठ दिवस
२) एक महिना
३) पंधरा दिवस
४) एकतीस दिवस
प्रश्न २) गावकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाचे पाणी आले.
१) तलाव ओसंडून वाहू लागले.
२) गावात दुष्काळाची भीती होती.
३) जून महिना कोरडा गेला.
४) पाऊस सतत दोन दिवस पडत होता.
कारण –
प्रश्न ३) खालीलपैकी कोणते विशेषण पावसासाठी योग्य नाही?
१) मुसळधार
२) संततधार
३) धुवाँधार
४) धारदार
प्रश्न ४) वरील बातमी कोणत्या वृत्तपत्रातील आहे?
१) जनसागर
२) जनलहरी
३) जनवार्ता
४) जनविवेक
प्रश्न ५) दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
१) अवकाळ
२) सर्वकाळ
३) सुकाळ ४) यापैकी नाही
उतारा १
मोराचा केकारव वर्षा ऋतूचे आगमन सुचवणारा आहे. ग्रीष्म ऋतू संपता संपता उष्णता असह्य होते. त्यावेळी येणारा वर्षासूचक केकारव शेतकऱ्यांमध्ये नवीन आशेचा संचार करतो. ती लवकरच येणाऱ्या पावसाची पूर्वसूचना असते. वर्षा ऋतू हा आनंदाचा काळ आहे. तळ्याची पाळ, हिरवीगार कुरणे, देवालयाची उंच शिखरे, नदी-नाले, ओहोळाचे काठ ही यावेळी मोराच्या स्वैर विहाराची स्थाने असतात. मोर नेहमी आपल्या निवासस्थानापासून अर्धा ते दोन किलोमीटरच्या परिसरात वावरतो. चारा सापडेल त्याप्रमाणे तो फिरतो. तो आपला चारा दिवसाचं शोधतो. काळोख पडण्यापूर्वी तो आपल्या जागेवर येऊन पोहोचतो.
प्रश्न १) मोराच्या ओरडण्याला म्हणतात
१) आरवणे
२) केकारव
३) कलकलाट
४) गुंजारव
प्रश्न २) खालीलपैकी कोणत्या स्थानी मोर स्वैर विहार करत नाही?
१) तळ्याची पाळं
२) हिरवीगार कुरणे
३) मनुष्यवस्ती
४) नदी – नाले
प्रश्न ३) प्राणी किंवा पक्षांना चारा मिळवण्यासाठी आवडणारी जागा खालीलपैकी
कोणती?
१) जंगल
२) अंगण
३) उघडे बोडके डोंगर
४) हिरवेकर पुरण
प्रश्न ४) वरील उताऱ्यात किती ऋतूंचा उल्लेख आला आहे?
१) वसंत ऋतु
२) ग्रीष्म ऋतू
३) पावसाळा ऋतू
४) शरद ऋतु
उतारा २
लावू रोपटे होईल झाड
पक्षी गातील पानाआड ! येथील फळे बहरतील फुले झाडाखाली मग खेळतील मुले !
ताजी शुद्ध मिळायला हवा सुगंध फुलांचा घेऊ नवा !
वाहील वारा असेल आभाळ
झाडाफुलांचा करू सांभाळ !
ढग देतील पाणीच पाणी
पक्षी गातील सुरेल गाणी
प्रश्न १) या कवितेत कोणाचे महत्त्व विशद केले आहे?
१) पक्ष्यांचे
२) झाडांचे
३) मुलांचे
४) ढगांचे
प्रश्न २) या कवितेत सुवास या शब्दाला कोणता समानार्थी शब्द आला आहे?
१) सुगंध
२) सांभाळ
३) सुरेल
४) शुद्ध
प्रश्न ३) पानाआड कोण गातात?
१) मुले २) पक्षी
३) फुले
४)वारा
प्रश्न ४) मुले कोठे खेळतात?
१) अंगणात
२) मैदानावर
३) झाडाखाली
४) बागेत
प्रश्न ५) या कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो?
१) मुलांनी झाडाखाली खेळावे.
२) शुद्ध आणि ताजी हवा घ्यावी.
३) झाडे लावावी आणि त्यांची निगा राखावी.
४) पाणी जपून वापरावे.
भाग – ३ खालील गोष्ट वाच.
उन्हाळ्यात एके दिवशी जंगलातील वाघाला खूप भूक लागली. म्हणून तो इकडे तिकडे आपले भक्ष्य शोधू लागला. काही वेळाने शोध घेतल्यावर त्याला एक ससा सापडला पण त्याला खाण्याऐवजी त्याने ससा सोडून दिला. कारण तो खूप लहान होता. मग काही वेळ भक्ष्यासाठी पुन्हा जंगलात भटकल्यानंतर त्याला एक हरिण दिसले. तो त्याच्या मागे गेला. वाघाला पाहिल्यावर हरिण सुसाट पळत सुटले. वाघ त्याचा पाठलाग करु लागला. मात्र तो बराच वेळ भक्ष्य शोधण्यासाठी जंगलात फिरत असल्याने थकला होता, त्यामुळे सुसाट पळणाऱ्या हरणाचा त्याला पाठलाग करता आला नाही.
आता जेव्हा त्याला काहीच खायला मिळाले नाही, तेव्हा तो सशाला परत पकडण्याचा विचार करु लागला, तो परत त्याच ठिकाणी आला. तेव्हा त्याला तिथे कुणीच दिसले नाही. आता वाघ खूप दुःखी झाला होता. त्याच्याकडे उपाशी राहण्यावाचून कुठलाही पर्याय नव्हता.
योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाला गोल कर
प्रश्न १) वाघाने सशाला सोडून दिले. कारण
१) ससा वाघाचा मित्र होता.
२) ससा भित्रा होता-
३) वाद्याला सशापेक्षा मोठा प्राणी भक्ष्य म्हणून हवा होता.
४) ससा आजारी होता.
प्रश्न २) वाघ हरणाचा पाठलाग करु शकला नाही. कारण –
१) हरीण लपून बसले होते.
२) वाघ दुःखी होता.
३) हरीण सुसाट पळत होते.
४) वाघ खूप थकलेला होता
प्रश्न ३) सुसाट या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?
१) अफाट
२) अतिशय वेगाने
३) मोकाट
४) मंद
प्रश्न ४) गोष्टीच्या शेवटी काय घडले?
१) हरीण वाघाच्या लावडीतून निसटले.
२) वाघाने सशाला पकडले.
३) वाघ जंगलात भटकू लागला.
४) वाघाला उपाशी राहावे लागल
प्रश्न ५) गोष्टीला कोणते शीर्षक योग्य ठरेल?
१) लोभी वाघ
२) खाई त्याला खवखवे
३) शेरास सव्वाशेर
४) भुकेला कोंडा निजेला धोंडा
भाग – ४ खाली दिलेली माहिती वाच.
‘परमवीर चक्र’ पदक दिसायला अगदी साधेसुधे आहे. कांस्य धातूपासून बनवलेले, छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे गडद जांभळी कापडी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. पदकाच्या मागील बाजूस परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत. त्यांच्यामध्ये दोन कमलपुष्प आहेत.
‘परमवीर चक्र’ हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. जमिनीवर, समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस, शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना ती प्रदान केला जातो. ‘परमवीर चक्र’ हा फार दुर्लभ सन्मान आहे.
योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल कर.
प्रश्न १) ‘परमवीर चक्राचे वैशिष्ट्य म्हणजे –
१) छोटी आडवी दांडी
२) गडद जांभळी कापडी पट्टी
३) राष्ट्रीय बोधचिन्ह
४) कमलपुष्प
प्रश्न २) ‘शत्रू’ या शब्दासाठी समानार्थी शब्द खालीलपैकी नाही.
१) अरि
२) पैरी
३) मित्र
४) रिपू
प्रश्न ३) ‘बक्षीस देणे’ यासाठी वरील माहितीमध्ये कोणता वाक्प्रचार आला आहे?
१) शौर्य दाखवणे
२) आत्मसमर्पण करणे
३) सन्मान करणे
४) प्रदान करणे
प्रश्न ४) पुढीलपैकी असत्य विधान कोणते?
१) परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे.
२) परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे.
३) परमवीर चक्राच्या मागील बाजूस तीन कमलपुष्पे आहेत.
४) परमवीर चक्र कांस्य धातूपासून बनलेले आहे.
प्रश्न ५) ‘दुर्लभ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?
१) दुर्गम
२) सुलभ
३) सुगम
४) दुर्बोध
भाग ५ खालील संवाद वाच.
आपल्या आजारी मुलाच्या उशाशी वसलेल्या तिने डॉक्टरांना बहिर पडताना पाहिले व धावत जाऊन तिने त्यांना रुग्णालयाच्या दारातच अडविले. “डॉक्टरसाहेब, माझ्या लेकराला लवकर बरे करा हो.” “अहो मावशी, तुम्ही काहीच चिंता करु नका, मी आहे ना!” “ते खरचं, पण- पण काय • या डॉक्टरसाहेबांवर तुमचा विश्वास नाही”
“तसं नाही हो. त्याचं विव्हळणं ऐकून जीव कासावीस होतो. शेवटी आईचं काळीज ना ते!” बाई, या धन्वंतरी रुग्णालयात क्षय, कॅन्सर, एड्ससारखे दुर्धर रोगी बरे होतात; तर या साध्या हिवतापाचे काय!” परिचारिका समोरुन पुटपुटत गेली.
योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल कर.
प्रश्न १) हा संवाद कोठे घडला असावा ?
१) रुग्णालयात
२) वॉर्डमध्ये
३) रुग्णालयाच्या दारात
४) दवाखान्यात
प्रश्न २) दिलेल्या संवादात प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला आहे ?
१) चार
२) तीन
३) दोन
४) सांगता येत नाही.
प्रश्न ३) आईच्या बोलण्यातून मुलाविषयी कोणती भावना व्यक्त होते ?
१) प्रेमळपणा
२) वात्सल्य
३) दयाळूपणा
४) नम्रपणा
प्रश्न ४) माझ्या लेकराला बरे करा असे सांगणारी स्त्री डॉक्टरची कोण?
१) मावशी
२) आई
३) पेशंट
४) कुणीही नाही.
प्रश्न ५) मुलगा कोणत्या रोगाने आजारी आहे?
१) कॅन्सर
२) क्षय
३) हिवताप
४) एड्स
भाग ६ खालील जाहिरात वाच.
चला करुया भ्रमंती
काजवे चित्र
जाऊ काजव्यांच्या जगात
नावनोंदणी आवश्यक
जंगल चित्र
त्त्वरा करा ! त्त्वरा करा ! त्त्वरा करा !
मोजक्याच जागा शिल्लक
माळशेज घाटातील जंगलभ्रमंती
घनदाट अरण्यातील काजव्यांच्या विश्वाचा
रोमहर्षक अनुभव
लुकलुकणाऱ्या प्रकाशाचा उत्सव
वयोगट – १५ ते ३५ वर्षे
कालावधी – दि. १६ ऑगस्ट ते दि.
२६ ऑगस्ट
संपर्क : गिरीविहार भ्रमंती संस्था www.giriviharbhramanti@gmail.com
योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल कर .
प्रश्न १) जाहिरातीचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते ?
१) मोजक्या जागा
२) प्रकाशाचा उत्सव
३) सर्व वयोगट
४) नावनोंदणी
प्रश्न २) काजवा हा…….. आहे.
१) प्राणी
२) पक्षी
३) किटक
४) जलचर
प्रश्न ३) जंगल शब्दासाठी जाहिरातीत आलेला समानार्थी शब्द.
१) भ्रमंती
२) घनदाट
३) घाट
४) अरण्य
प्रश्न ४) जंगलभ्रमंतीचा कालावधी किती दिवस आहे?
१) एक आठवडा
२) भेदला दिवस
३) पंधरा दिवस
४) यांपैकी नाही
प्रश्न ५) काजव्यांचा प्रकाश दिसण्याची वेळ कोणती ?
१) सकाळ
२) संध्याकाळ
३) रात्र
४) माध्यान्ह
उतारा
विज्ञानाची ज्ञानाची मैत्री करायची तर विज्ञानाची सुरुवात कशी झाली हे माहीत करून घ्यायला हवे. तुम्हांला माहीत आहे की फार प्राचीन काळात मनुष्य रानटी अवस्थेत राहत होता. त्या काळी शेतीचा शोध लागला नव्हता. अन्न आणि पाणी मिळवण्यासाठी त्याला भटकावे लागे. त्यात हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण करण्यात त्याचा वेळ जात असे. तो निसर्गात बदल होताना पाहत होता. सूर्या-चंद्राचे उगवणे – मावळणे, बदलणारे ऋतू, इंद्रधनुष्य, सूर्य आणि चंद्राची होणारी ग्रहणे. वादळ आणि पाऊस, कडाक्याची थंडी आणि कडक ऊन असे अनेक बदल तो अनुभवत होता. या सर्व घटना त्याला नक्कीच अचंबित करीत असणार. या घटनांबद्दल त्याच्या मनात कुतूहलही निर्माण होत असणार. परंतु या सर्व घटनांवर विचार करायला त्याला सवडच नव्हती. मानवाने शेतीचा शोध लावला. त्यामुळे त्याला वसाहती स्थापन करणे शक्य झाले. संरक्षणाचा प्रश्न काही प्रमाणात सुटला. धान्याची साठवण केल्यामुळे दररोज अन्न गोळा करण्याची गरज उरली नाही. अशा प्रकारे मोकळा वेळ काढणे शक्य झाले. सर्व जण रिकाम्या वेळेचा चांगला उपयोग करतातच असे नाही.
प्रश्न १) अन्न आणि पाणी मिळवण्यासाठी पूर्वी मनुष्याला काय करावे लागत असे? १) जंगलात भटकावे लागे
२) धान्याची साठवण करावी लागे
३) रानटी अवस्थेत राहावे लागे.
४) वसाहती स्थापन कराव्या लागे
प्रश्न २) कडाक्याची थंडी म्हणजे कोणता ऋतू ?
१) उन्हाळा
२) हिवाळा
३) पावसाळा
४) यापैकी नाही
प्रश्न ३) मानवाला कुणापासून संरक्षण करण्यात त्याचा वेळ जात असे?
१) हिंस्र प्राणी
२) वादळ आणि पाऊस,
३) कडाक्याची थंडी
४) कडक ऊन
प्रश्न ४) दररोज अन्न गोळा करण्याची गरज का उरली नाही?
१) शेतीचा शोध लावला
२) धान्याची साठवण केली
३) वसाहती स्थापन केल्या
४) संरक्षणाचा प्रश्न सुटला
प्रश्न ५) उगवणे-मावळणे यांच्याशी साधर्म्य साधणारी जोडी पुढीलपैकी कोणती?
१) दिवस-रात्र
२) सूर्योदय-सूर्यास्त
३) पहाटे– दुपार
४) यापैकी नाही
उतारा
प्रत्येक सजीवाच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवलेले असते. अवयवांच्या वाढीसाठी लागणारी पोषणद्रव्ये पाण्यात / रक्तात विरघळून त्या अवयवापर्यंत पोहोचवली जातात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की, मेंदूला त्याची सूचना मिळते. आणि मेंदू तहानेद्वारे त्याची जाणीव करून देतो. उत्क्रांतीमध्ये माणूस इतर प्राण्यांहून वेगळा झाला. चार भिंतीच्या आत आपल्या सोयीप्रमाणे अन्न शिजवून खायला लागला. त्यामुळे जेवता-खाताना असो वा इतर वेळीही आपल्या सोयीनुसार पाणी पिऊ लागला. ज्या काळात त्याच्याकडे भांडी नव्हती. त्या काळात तो नदी, ओढ्या तलावातील पाणी हाताच्या ओंजळीत भरून पिऊ लागला. आजही रानात सहलीला गेल्यावर ओंजळीने पाणी प्यायले जाते. नळावाटे पडणाऱ्या पाण्याखाली ओंजळ धरूनच पाणी प्यायला लागते. घरात पाणी पिण्यासाठी पेला/ ग्लास असतो. अशा वेळी आपण भांडे तोंडाला लावूनच पाणी पितो. जर काही कारणाने पिण्यासाठी एकच भांडे असेल, तर भांड्याला तोंड न लावता उंचावरून धार धरून पाणी प्यायले जाते. इतर पशूपक्ष्यांकडे अशी पाणी साठवण्यासाठी भांडी नसतात. त्यामुळे त्यांना पाण्याच्या साठ्याकडे जाऊनच पाणी प्यावे लागते. ते खाताना पाणी पीत नाहीत. त्यांच्या तोंडाच्या आकारमानानुसार त्यांच्या पाणी पिण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत.
प्रश्न १) प्रत्येक सजीवाच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर
१) अन्न साठवलेले असते.
२) पाणी
३) पोषणद्रव्ये
४) हरितद्रव्ये
प्रश्न २) मनुष्य पूर्वी पाणी कसे पीत असत?
१) कपाने
२) ओंजळीने
३) ग्लासाने
४) वाटीने
प्रश्न ३) माणूस इतर प्राण्यांहून वेगळा कशामुळे झाला?
१) आकार
२) निर्जीव
३) सजीव
४) उत्क्रांती
प्रश्न ४) पशूपक्ष्यांच्या पाणी पिण्याच्या पद्धती वेगवेगळ्या कशामुळे आहेत?
१) चेहऱ्याचे आकारमान
२) तोंडाचे आकारमान
३) नाकाचे आकारमान
४) डोक्याचे आकारमान
प्रश्न ५) सदरचा उतारा कोणत्या विषयावर आधारित आहे?
१) उत्क्रांतीवाद
२) सजीवांचे शरीर
३) पाणी पिण्याच्या पद्धती
४) पाणी साठविण्याच्या पद्धती
उतारा
आमचं शहर इतर शहरांसारखंच गजबजलेलं आहे. उंच इमारती, रस्ते, बाजार इथे सारं काही आहे आणि त्यात सतत भरच पडते आहे. पण आमच्या शहरात रस्त्याच्या कडेनं, बागांमधून, इमारतींभोवती, घरांसमोर, सोसायट्यांच्या आवारात झाडंही आहेत. एखाद्या इमारतीच्या गच्चीवरून शहराकडे पाहिलं तर वाटेल, केवढी हिरवाई आहे! पण हिरवाई म्हणजे काय ? झाडं? झाडं तर आहेतच. पण त्यांच्या जोडीला काय काय असतं! झुडपं, वेली, गवतं आणि असं बरंच काही. आपण गाडीतून किंवा गाडीवरून भर्रकन जाताना आपल्याला काय दिसणार! कधी सिग्नलला एखादा फुललेला शोभिवंत वृक्ष नजर वेधून घेतो, पण तेवढाच. कधी गाडीवर कसलीशी फळं पडून गाडी ‘घाण’ होऊन जाते आणि आपण करवादतो, कुठलं हे झाड ! कदंब ! कुणीतरी सांगतं. असेना का कुठलंही, त्याचा जरा वैतागच आहे! आणि नारळाच्या झाडाखाली तर पाटीच असते, ‘येथे गाडी उभी करू नये, नारळ पडण्याचा धोका!’ गेली जागा ! शहरात झाडं म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा !
प्रश्न १) सदर उताऱ्यात कशाचे वर्णन आलेले आहे?
१) गाव
२) शहर
३) शेती
४) बाजार
प्रश्न २) शहर कशाने गजबजलेलं आहे?
१) रस्ते
२) झाडे
३) वेली
४) पशुपक्षी
प्रश्न ३) सिग्नलला एखादा फुललेला शोभिवंत…… नजर वेधून घेतो,
१) झुडूप
२) वेली
३) वृक्ष
४) गवत
प्रश्न ४) शहरात झाडे कुठे कुठे आढळतात?
१) उंच इमारती
२) रस्ते
३) बाजार
४) घरांसमोर
प्रश्न ५) सदर उताऱ्यात त्रागा या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे?
१)
वैताग
२) धोका
३) अडचण
४) खोळंबा
ज्ञानज्योत
उघडूनी ज्ञानाची कवाडे
केला श्रीगणेशा शिक्षणाचा स्मरू त्या क्रांतीज्योतीला
दाखविला मार्ग जीवनाचा ||
सोसल्या अनंत अवहेलना
परि न सोडीला विचार
मोडून साऱ्या परंपरा
ध्येयपूर्ती एकच निर्धार ||
लाविली ज्योतीने ज्ञानज्योत
करुनी दूर अंधःकार
तिमिरातून तेजोमय
जाहला उषःकाल ||
स्त्रियांचा तू अभिमान
वाढविला तयांचा सन्मान
पचवूनी नाना अपमान
साऊ सोबत ज्योतिबा महान ||
लावू ज्योतीसम ज्ञानदीप
स्मरू अंतरंगी इतिहास
_जपू तव पाऊलखुणा
हाच अमुचा राहील ध्यास ||
प्रश्न १) कवितेत कोणाचे वर्णन आलेले आहे?
१) सावित्रीबाई फुले
२) आनंदीबाई जोशी
३) झाशीची राणी लक्ष्मीबाई
४) मदर टेरेसा
प्रश्न २) शिक्षणाचा श्रीगणेशा केला म्हणजे काय?
१) खूप शिक्षण घेतले
२) शिक्षणावर भर दिला
३) शिक्षणाची सुरुवात केली
४) शिक्षण बंद केले
प्रश्न ३) पुढीलपैकी कोणती जोडी यमक अलंकार नाही?
१) अभिमान-अपमान
२) विचार-निर्धार
३) शिक्षणाचा-जीवनाचा
४) अंध:कार-उष:काल
प्रश्न ४) जाहला उषःकाल यामध्ये कोणती वेळ सांगितलेली आहे.
१) सकाळ
२) संध्याकाळ
३) दुपार
४) रात्र
प्रश्न ५) सावित्रीबाई फुले यांचे नाव दर्शविण्यासाठी कवितेत आलेला शब्द कोणता?
१) साऊ
२) ज्योती
३) ज्ञानदिप
४) उष:काल
किती नाजूक हे फुलपाखरू हे
उडतेय कसे ते फुलांफुलांवर रंग तयाचा सुंदर मनमोहक पांढरे ठिपके काळ्यावर
शोषून घेई मधुरस फुलांतून उडते भिरभिर सर्व रानभर
धावती पोरे पकडण्यासाठी
उडते पटकन फुलांपानांवर
हुंदडताना पोरे माळावरती
नाही लागत कुणाच्या हाती मुलांच्या खेळात असते मग चिमुकल्यांचे ते खेळसोबती
नानारंगी सुंदर नाजूकसे पंख देवाने दिले छान रूप त्याला लांबून पाहू कोमल जीवाला
नका देऊ त्रास त्या मुक्याला
आवडते पहाया फुलपाखरू
फुलांवर मजेत तेच उडताना फुलांपानांआड लपून बसते
फसगत होतेय ओळखताना
प्रश्न १) नानारंगी सुंदर ….पंख
१) कोमल
२) नाजूकसे
३) मनमोहक
४) छान
प्रश्न २) फुलपाखरू मधुरस कुठून शोषून घेत आहे?
१) पाने
२) फुले
३) फळे
४) झाडे
प्रश्न ३) कवयित्रीला काय आवडते?
१) फुलपाखरू पकडायला
२) फुलपाखरू उडताना पाहायला
३) फुलपाखरूला त्रास द्यायला
४) फुलपाखरू सोबत खेळायला
प्रश्न ४) कोमल जीव कुणाला म्हटले आहे?
१) चिमुकले
२) फुलपाखरे
३) पोरे
४) लहान मुले
प्रश्न ५) फुलपाखरांना ओळखताना केव्हा फसगत होते?
१) फुलांवर मजेत तेच उडताना
२) फुलांपानांआड लपून बसताना
३) धावती पोरे पकडण्यासाठी
४) हुंदडताना पोरे माळावरती
स्वच्छतेचा मंत्र । जगी सिद्ध केला । उपदेश केला। साऱ्या जना ॥ संवेदनशील। मनाचा प्रेमळ ।
अंतरी निर्मळ । डेबू असे || खराटा नि झाडू। घमेले घेऊन ।
काढसी
झाडून । गावोगावी ॥
नको अंधश्रद्धा । नको अहंकार ।
करावा विचार | विवेकाने ॥
मुक्या या जीवास | कधी मारू नये ।
लोभ ठेऊ नये । मनामध्ये ॥
किर्तनी रंगले | प्रबोधन केले ।
ज्ञानदान केले । भजनात ॥
गोपाळा गोपाळा । नामघोष होता ।
किर्तनी रंगता। दंग होई ॥
निरोगी आरोग्य | भविष्याचा वेध |
समाज सावध । करुनिया ॥ विवेक बुद्धीने । विचार करावा ।
मार्ग हा धरावा । सत्यधर्मी ॥
प्रश्न १) सर्व लोकांना कशाचा उपदेश केला आहे?
१) भविष्याचा
२) स्वच्छतेचा
३) विवेकाचा
४) भजनाचा
प्रश्न २) सदरच्या कवितेत कोणत्या संताचे वर्णन आलेले आहे?
१) संत नामदेव
२) तुकडोजी
३) गाडगेबाबा
४) संत तुकाराम
प्रश्न ३) गाडगेबाबा यांना कवितेत कोणते नाव आलेले आहे?
१) डेबू
२) निर्मळ
३) गोपाळ
४) सत्यधर्मी
प्रश्न ४) गाडगेबाबा कीर्तनात कोणता नामघोष करीत असत ?
१) गोपाळा गोपाळा
२) हरे कृष्णा
३) जय हरी
४) राम राम
प्रश्न ५) मार्गदर्शन या शब्दासाठी कवितेत कोणता शब्द आलेला आहे?
१) सिद्ध केला
२) अंधश्रद्धा
३) अहंकार
४) प्रबोधन
उतारा
असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याचा आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूडफाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिंपिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे, कविता राऊत आणि त्या पाद्याचे नाव आहे, सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे.
प्रश्न १) ‘अनवाणी’ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता?
१) जेवण न जेवता
२) पाणी न पिता
३) पायात वहाण न घालता
४) वरील सर्व बरोबर
प्रश्न २) भटकंती करणे या वाक्प्रचारचा अचूक अर्थ कोणता?
१) फिरणे
२) वाटचाल
३) गाडी चालविणे
४) वरील सर्व बरोबर
प्रश्न ३) वरील उताऱ्यातून आदिवासी पाड्यामधील कोणती समस्या दिसून येते?
१) पाणी प्रदूषण
२) पाणी टंचाई
३) ओला दुष्काळ
४) वरील सर्व बरोबर
प्रश्न ४) खालील पैकी कोणता जोडशब्द नाही?
१) लाकुडफाटा
२) भाजीभाकरी
३) सगेसोयरे
४) गैरहजर
प्रश्न ५) चित्रातील प्राण्याबाबत कोणते विशेषण लावले जाते?
१) कष्टाळू
२) उद्योगी
३) लाल
४) सर्व बरोबर
प्रश्न ६) खालील पैकी अशुद्ध शब्द ओळखा.
१) जमीन
२) कुंठीत
३) गरीब
४) विहीर
उतारा –
शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आहे. शाळेत आपल्याला फक्त पुस्तकातील ज्ञान मिळत नाही, तर आपल्याला शिस्त, सभ्यता, मैत्री आणि एकमेकांची मदत कशी करावी हे शिकवले जाते. शाळा आपल्याला विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देते. शिक्षक आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवतात आणि आपल्या मनात सकारात्मक विचार रुजवतात. शाळेतील खेळ, स्नेहसंमेलन, नाटकं आणि इतर स्पर्धा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करतात. शाळेतून मिळालेलं शिक्षण आपल्याला भविष्यातील आव्हानं पेलायला सक्षम बनवते. त्यामुळे शाळेतील प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवावा आणि शिकण्याचा प्रयत्न करावा.
प्रश्न १) कोणती गोष्ट आपल्याला शाळेत शिकायला मिळत नाही?
१) पुस्तकातील ज्ञान
२) नकारात्मक विचार
३) व्यक्तिमत्व विकास
४) निर्णय क्षमता
प्रश्न २) ‘शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आहे’ या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत?
१) एक
२) दोन ३) तीन
४) चार
उतारा
आजच्या युगात संगणक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संगणकाचा उपयोग शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो. विद्यार्थ्यांसाठी संगणक म्हणजे माहिती मिळवण्याचे एक उत्तम साधन आहे. इंटरनेटच्या साहाय्याने आपण कोणत्याही विषयाची माहिती मिळवू शकतो. संगणकामुळे काम करणे सोपे झाले आहे; याचा उपयोग गणना करणे, नोंदी ठेवणे आणि डिझाईन तयार करण्यासाठीही होतो.
परंतु संगणकाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. लहान मुलांनी खेळांमध्ये जास्त वेळ घालवू नये आणि शिक्षणासाठी त्याचा वापर करावा. संगणकामुळे आपले जीवन सुलभ झाले आहे, परंतु त्याचा अतिरेक होऊ नये, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
प्रश्न १) संगणकाचा वापर खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी होतो?
१) फक्त खेळण्यासाठी
२) फक्त गप्पा मारण्यासाठी
३) माहिती मिळवण्यासाठी आणि काम करण्यासाठी
४) फक्त चित्र काढण्यासाठी
प्रश्न २) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१) संगणकाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.
२) संगणकामुळे आपले जीवन सुलभ झाले आहे.
३) संगणकाचा उपयोग गणिती क्रिया करण्यासाठी होतो.
४) वरील सर्व बरोबर
प्रश्न ३) उताऱ्यात इंग्लिश भाषेतील किती शब्द आले आहेत?
१) एक
२) दोन
३) तीन
४) चार
शिक्षक:
संवाद –
मुलांनो, तुम्हाला माहित आहे का की आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास
थांबवण्यासाठी काय करावे लागेल?
विद्यार्थी १: हो सर, आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत.
शिक्षक: अगदी बरोबर. झाडे लावल्याने आपल्या परिसरात ऑक्सिजनची पातळी वाढते. आणखी काय करू शकतो?
विद्यार्थी २: प्लास्टिकचा वापर कमी करावा, आणि कचरा नीट वेगळा करून टाकावा. शिक्षकः होय, प्लास्टिकचे योग्य पुनर्वापर आणि कचऱ्याचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही अजून काही उपाय सुचवू शकता का?
विद्यार्थी ३: पाण्याचा अपव्यय टाळावा आणि त्याचा बचत करावा.
शिक्षकः अगदी बरोबर, पाण्याची बचत करणे हे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. प्रत्येक लहान कृती पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी मोठी मदत ठरू शकते.
प्रश्न १) पर्यावरणाचा ऱ्हास थाबावण्यासाठी कोणती कृती अयोग्य आहे? १) वृक्षारोपण
२) कचरा व्यवस्थापन
३) पाणी बचत
४) प्लास्टिक वापर
प्रश्न २) रामने मैदानावरील प्लास्टिक कचरा गोळा करून पेटून दिला, शामने आपल्या बाटलीत शिल्लक राहिलेले पाणी झाडांना घातले. तुला कोणाची कृती योग्य वाटते?
१) रामची कृती योग्य आहे.
२) शामची कृती योग्य आहे.
३) दोघांचीही अयोग्य आहे.
४) दोघांचीही योग्य आहे.
प्रश्न ३) चित्रातील परिस्थितीमुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढेल?
१) ध्वनी प्रदूषण
२) वायू प्रदूषण
३) दोन्ही अचूक
४) दोन्ही चूक
प्रश्न १) वरील जाहिरात कशाविषयी आहे?
१) साहित्य संमेलन
२) सोनवडी क्रीडांगण
३) पुस्तक प्रदर्शन
४) मोफत पुस्तक वाटप
प्रश्न २) राधाने ६०० रुपयांची पुस्तके खरेदी केल्यास तिला-
१) रु. ५० चे पुस्तक मोफत मिळेल.
२) रु. ५० चे पुस्तक मोफत मिळणार नाही.
३) रु. ५० परत मिळतील.
४) रु. ५०० परत मिळतील.
प्रश्न ३) प्रदर्शनाचा कालावधी किती दिवस आहे?
१) चार दिवस
२) तीन दिवस
३) दोन दिवस
४) यापैकी नाही
प्रश्न ४) ती त्याला म्हणाली, “ मी तुला त्या घराजवळून येताना पहिले, थांबलो.” वरील वाक्यात किती सर्वनामे आली आहेत?
१) चार
२) पाच
३) सहा
४) सात
कविता –
हमरस्ता
कोणी म्हणेल का हो.. हाच तो रस्ता हमरस्ता होता गडद हिरवाईची भरजरी शाल पांघरून उभा होता एक मार्गीच, कोणाच्या अध्यात ना मध्यात होता खाच खळग्यांचा, पण प्रत्येक खळगा आठवणीचा होता. कुठे उतरणीचा,कुठे चढणीचा नागमोडी वळणाचा होता रात्रीच्या प्रवासात,वास रातरानीच्या सुगंधाचा होता असा होता रस्ता माझा कित्येक मित्र होते त्याचे हिरवेगार दुतर्फा जमले होते शिस्तीत सगेसोयरे त्याचे.
प्रगतीची झुल घालून सग्या सोयऱ्यांच्या पोटात्नी कुऱ्हाडी घुसल्या दिवसा ढवळ्या अनेकांच्या साक्षीने कितीतरी कत्तली झाल्या
एस. टी. च्या खिडकीतून बहरलेले रोज त्यांना पाहत होतो
म्हणून
आम्ही
आज मात्र त्यांची एका क्षणात खंडोळी होताना बघत होतो.
तुझ्या कडेला तुझ्या वर्षानुवर्षांच्या सोबत्यांची प्रेते पडलेली अश्रू ढाळून तू वाट पाहत होतास प्रेताने प्रेत जाळण्याची असा वटलेला,निस्तेज, निराधार पडलेला कसा पाहू तुला पूर्वीचा तू सावलीत बुडलेला, वाळवंटात कसा भिजवू तुला.
तुझ्या छातीत भाले घसवून नवीन इमले बांधले जातील जगण्याच्या धावपळीत तुला मात्र हळूहळू विसरून जातील.
प्रश्न १) कवीने सगे सोयरे कोणाला संबोधले आहे?
१) पाहुण्यांना
२) मित्रांना
३) रस्त्याला
४) झाडांना
प्रश्न २) कवितेत आलेल्या प्रेत या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता ?
१) शव
२) कलेवर
३) पार्थिव
४) सर्व बरोबर
प्रश्न ३) कवितेतून कवीने कोणता संदेश दिला आहे ?
१) वृक्षारोपण केले पाहिजे.
२) वृक्षतोड रोखली पाहिजे.
३) रस्ते बांधले पाहिजेत.
४) एस.ती. तून प्रवास केला पाहिजे.
प्रश्न ४) गुरुजींनी पप्पूला देण्यासाठी दोन रोपे आणली. या वाक्यातील काळ ओळखा.
१) भूतकाळ
२) वर्तमानकाळ
३) भविष्यकाळ
४) पूर्ण वर्तमानकाळ
प्रश्न ५) नीना आणि…….बहीण भाऊ आहोत.घरी मांजर आहे.तिला मनी म्हणतो. वरील रिकाम्या जागी खालीलपैकी सर्वनामांची क्रमाने येणारी
कोणती जोडी योग्य ठरेल?
१) आमच्या, मी, मला
२) मी, आम्ही, तुम्ही
३) मी, आमच्या, आम्ही
४) मी, आम्ही, आमच्या
प्रश्न ६) किती वाजले मला पाच वाजता मित्राकडे जायचे आहे या वाक्यात खालीलपैकी कोणती विरामचिन्हे क्रमाने येतील ?
१)
२) !
३) ?
४) ?
बातमी –
बाजारातील वाहनांच्या रहदारीमुळे लोक हैराण ..
करवीर
उचगाव ता. करवीर दि. २५ मे (आमच्या बातमीदाराकडून) तालुक्यातील उचगाव या गावी दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. या गावाच्या आजूबाजूचे लोक या आठवडी बाजाराला येतात. शिवाजी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटी दुकाने असल्याने बाजारात खूप दाटी असते. त्यातच रस्त्याने सायकली, दुचाकी व चारचाकी वाहने जात असल्याने त्या दाटीत अजूनच भर पडते. ही दाटी कमी करण्यासाठी बाजाराच्या दिवशी दुचाकी आणि चारचाकी वाहने लक्ष्मीबाई टिळक रोडने न्यावीत असे आवाहन उचगावच्या ग्रामपंचायतीने केले आहे. तसेच पुढील महिन्यापासून हा बाजार गावाबाहेरील तळ्याजवळच्या मोकळ्या जागी भरविण्यात येणार असल्याचे बातमीदाराने स्पष्ट केले आहे.
प्रश्न १) वरील बातमी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
१) ग्रामपंचायत
२) बाजार
३) वाहतूक कोंडी
४) वाहने
प्रश्न २) बाजार केव्हा भरतो?
१) दररोज
२) आठवड्यातून एक वेळा
३) आठवड्यातून दोन वेळा
(४) महिन्यातून एक वेळा
प्रश्न ३) वृत्तपत्रात बातमी देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात?
१) निवेदक
२) पत्रकार
३) सूत्रसंचालन
४) फोटोग्राफर
प्रश्न ४) महापुरामुळे लोक त्रासले आहेत या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अर्थाचा
कोणता शब्द बातमीत आला आहे?
१) दाटी असणे
२ ) भर पडणे
३) हैराण होणे
४) वैतागून जाणे
प्रश्न ५) आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणते वाहन वापरता येईल?
१) सायकल
२) एस.टी
३) कार
४) ट्रक
उतारा
अहमदाबाद ही गुजरातची राजधानी. कपड्यांची नगरी. खूप मोठे मोठे उद्योगधंदे तेथे आहेत. तेथे विविध प्रकारचे कपडे तयार होतात. त्यांना जगभर मागणी आहे. या उद्योगनगरीत एक मोठे उद्योगपती होते. त्यांचा कारखाना सर्वांत मोठा होता. अर्थातच कपड्यांचा. ते खूप श्रीमंत होते. मनानेही श्रीमंत होते. गरिबांचे वाली. हजारो कामगार त्यांच्याकडे काम करत. त्यांना समाधानकारक दाम मिळे. मालक सुखी. कामगारही सुखी. कोणाची कधी तक्रार नव्हती. त्यांचे नाव होते अंबालाल साराभाई. सगळ्या गुजरातमध्ये ते प्रसिद्ध होते. अंबालाल साराभाई हे विक्रम साराभाई यांचे वडील. १२ ऑगस्ट, १९१९ रोजी विक्रम साराभाई यांचा जन्म झाला. विक्रम साराभाई खूप बुद्धिमान होते. तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी अणुशक्तीच्या क्षेत्रात महत्त्वाचे संशोधन केले. या थोर संशोधकाचे मन दुसऱ्याविषयीच्या आपुलकीने ओथंबलेले होते.
प्रश्न १) विक्रम साराभाई यांचा जन्म कधी झाला?
१) २१ ऑगस्ट, १९१९
२) १२ ऑगस्ट, १९९१
३) २१ ऑगस्ट, १९९१
४) १२ ऑगस्ट, १९१९
प्रश्न २) अहमदाबाद कोणत्या राज्याची राजधानी आहे?
१) राजस्थान
२) उत्तराखंड
३) गुजरात
४) महाराष्ट्र
प्रश्न ३) जो संशोधन करतो तो
१) शोधक
२) उद्योगपती ३) संशोधक
४) व्यावसायिक
प्रश्न ४) त्यांचा कारखाना सर्वांत मोठा होता. या वाक्यातील सर्वनाम कोणते.
१) सर्वांत
२) मोठा
३) त्यांचा ४) होता
प्रश्न ५) त्यांना समाधानकारक दाम मिळे. या वाक्यातील दाम या शब्दाचा अर्थ काय होतो?
१) काम
२) दान
३) पैसे
४) शाबासकी
प्रश्न ६) पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
१) गरीब X श्रीमंत
२) सुखी X आनंदी
३) मालक X सेवक
४) जन्म X मृत्यू
उतारा
दिनू नावाचा एक मुलगा होता. शाळेत तो सर्वांचाच लाडका होता. गणित विषय त्याच्या आवडीचा. कठिणातलं कठीण गणितदेखील तो सहज आकडेमोड करून सोडवत असे. दिनूचे वडील बँकेत अधिकारी होते. कामाच्या व्यापामुळे त्यांना दिनूसाठी फारसा वेळ देता येत नसे. तरीदेखील वेळ मिळेल तसा ते दिनूच्या आवडीनिवडींकडे लक्ष दयायचे. अभ्यासाविषयी, शाळेविषयी गप्पा मारायचे. दिनूदेखील मग आई-बाबांशी शाळेच्या, मित्रांच्या रंगतदार विनोदी गोष्टी सांगायचा. सारे घर हसायचे.
प्रश्न १) खालीलपैकी कोणती गोष्ट दिनूला आवडत न्हवती?
१) गणिते सोडविणे
२) अभ्यासाविषयी, शाळेविषयी गप्पा मारणे
३) कठीणातलं कठीण गणित न सोडविणे
४) शाळेच्या, मित्रांच्या रंगतदार गोष्टी सांगणे
प्रश्न २) अयोग्य जोडी ओळखा.
१) लाडका – लाडकी
२) आई – वडील
३) कठीण – सोपे
४) अधिकारी – अधिकारीण
प्रश्न ३) खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
फारसा वेळ देता न येणे –
१) थोडा वेळ देणे
२) जास्त वेळ देणे.
३) वेळ काढणे
४) अजिबात वेळ नसणे
प्रश्न ४) दिनूचे वडील बँकेत अधिकारी होते. या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत?
१) दोन
२) पाच
३) तीन
४) चार
प्रश्न ५) कठिणातलं कठीण म्हणजे –
१) खूप
सोपे
२) खूप अवघड
३) खूप जास्त ४) खूप कमी
प्रश्न ६) खालील विरामचिन्हांतील अर्धविराम चिन्हाचा पर्याय ओळखा.
9),
२) .
३) :
४) ;
कविता –
जिकडेतिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे।
नवी लकाकी झाडांवरती सुखात पाने-फुले नाहती, पाऊसवारा झेलित जाती भिरभिरती पाखरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे ।
हासत भिजती निळसर डोंगर उड्या त्यांतुनी घेती निर्झर,
कडेकपारी रांनोरानी नाद नाचरा भरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे ।
मधेच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुटे साखळी, हिरव्या रानी ऊन बागडे हरिणापरि गोजिरे, जिकडेतिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे ।
प्रश्न १) या कवितेते कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे ?
१) शिशिर
२) हिवाळा
३) वसंत
४) पावसाळा
प्रश्न २) खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
१) झाडांवरती नवी लकाकी आहे.
२) पाखरे पाऊस वारा झेलत आहेत.
३) जिकडेतिकडे ऊनच ऊन आहे.
४) हिरव्या रानी ऊन बागडत आहे.
प्रश्न ३) कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती ?
१) झुळझुळणारे झरे
२) किलबिलती – पाखरे
३) निळसर – डोंगर
४) हिरवे. गवत
प्रश्न ४) गोजिरे या शब्दाचा अर्थ काय ?
१) सुंदर
२) सुबक
३) सुवासिक .
४) सुवाच्च
प्रश्न ५) गटात न बसणारा शब्द ओळखा.
ढग, मेघ, नभ, जलद
१) जलद
२) नभ
३) मेघ
४) ढग
प्रश्न ६) खालीलपैकी अचूक शब्द ओळखा.
१) कवयत्री
२) कवयित्री
३) कवयित्रि
४) कवयात्री
कविता –
भारतभूच्या वेदीवरती दिले जयांनी बलिदान । त्या शूरांचे, त्या वीरांचे गाऊ गौरवगान ।
देहावरती झेलित गोळी रक्तासंगे खेळली होळी हासत हासत भूमीवरती ज्यांनी अर्पिला प्राण
त्या शूरांचे, त्या वीरांचे गाऊ गौरवगान ।
शाहीर आणि डफ, तुणतुणी सारे गाती त्यांचीच गाणी निसर्ग, मंजूळ वाऱ्यामधुनी नित्य करी गुणगान
त्या शूरांचे त्या वीरांचे गाऊ गौरवगान ।
थोर तिरंगा उंच फडकू दे साऱ्या जगती तेज तळपू दे एक दिलाने, एकपणाने राखू त्याची शान
त्या शूरांचे त्या वीरांचे गाऊ गौरवगान ।
प्रश्न १) आपल्याला कशाची शान राखायची आहे ?
१) देशाची
२) तिरंग्याची
३) शुरांची
४) वीरांची
प्रश्न २) वीरवृत्तीची कविता करणारा –
१) कवी
२) देशभक्त
३) शाहीर
४) डफ
प्रश्न ३) कवितेत कोणत्या तंतुवाद्याचा उल्लेख केला आहे ?
१) डफ
२) वारा
३) बासरी
४) तुणतुण
प्रश्न ४) कवितेतील यमक जुळणारी जोडी कोणती आहे ?
१) गोळी- होळी
२) गाणी – पाणी
३) वार्या – साऱ्या
४) सारे – वारे
प्रश्न ५) गटात न बसणारा शब्द ओळखा.
शरीर, देह, काया, मन, तन
१) शरीर
२) देह
३) काया
४) मन
प्रश्न ६) बलिदान या शब्दाचा अर्थ कोणता?
१) दान करणे
२) बळी देणे
३) बलाचा त्याग करणे
४) त्याग करणे
कविता –
ओढाळ वासरू रानी आले फिरू, कळपाचा घेरू सोडूनिया. कानामध्ये वारे भरूनिया न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. विसरूनी भान, भूक नि तहान, पायांखाली रान घाली सारे. थकूनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तयालागी.
फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत. पडता अंधारू लागले हंबरू, माय ! तू लेकरू शोधू येई.
प्रश्न १) शब्दसमूहाबद्दल एक शब्द पर्यायामधून निवडा. गुरांचा – १) थवा
२) समूह
३) कळप
४) काळोघ
प्रश्न २) पुढीलपैकी कोणती जोडी कवितेतील वर्णनानुसार बरोबर आहे?
१) शेळी – करडू
२) कोकरू – मेंढी
३) हरिण – पाडस
४) गाय – वासरू
प्रश्न ३) कवितेतील वर्णनावरून कोण हंबरत आहे?
१) गाय
२) वासरू
३) लेकरू
४) माय
प्रश्न ४) चुकीची जोडी ओळखा. १) मागे – लागे
२) भान – रान
३) सुसाट – अफाट
४) खूप – हुरूप
प्रश्न ५) कवितेत कोणत्या अवयवाचा उल्लेख आहे ?
१) मान
२) कान
३) भान
४) भूक

जाहिरात
विजेता स्पोर्ट्स
संजय नगर, सांगली.
खेळाचे साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण
२९ ऑगस्ट
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने
खेळाडूंसाठी आकर्षक
शैक्षणिक संस्थांसाठी सूट
खास सवलत
प्रश्न १) २९ ऑगस्ट तारीख कशाशी संबंधित आहे?
१) आकर्षक सूट
२) राष्ट्रीय क्रीडा दिन
३) विजेता स्पोर्ट्स
४) खेळाचे साहित्य
प्रश्न २) कमी केलेली रक्कम या अर्थाचा कोणता शब्द जाहिरातीत आला आहे?
१) सवलत
२) आकर्षक
३) खास
४) सूट
प्रश्न ३) विजेता स्पोर्ट्स हे दुकान कोणत्या जिल्ह्यात आहे? १) सांगली
२) संजयनगर
३) सातारा
४) यापैकी नाही
बातमी –
वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
पुणे, तारीख २ जुलै:
महाराष्ट्र राज्य वनीकरण विभागातर्फे तळजाई टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. प्रसिद्ध सिने अभिनेते सुबोध भावे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. वृक्ष लागवडीचे व संगोपनाचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. विभागातर्फे पाच हजार झाडांची लागवड केली गेली. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनच आपल्याला जागतिक तापमान वाढी पासून वाचू शकते. आपल्या पर्यावरणाची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे असे विचार प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. पानाने व उपस्थित प्रत्येकाला तुळशीचे रोपटे देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रश्न १) ही बातमी कशासंबंधी आहे ?
१) वनीकरण विभाग
२) वृक्षारोपण कार्यक्रम
३) वृक्ष लागवड
४) तुळशीचे रोपटे वाटप
प्रश्न २) विभागातर्फे किती झाडांची लागवड करण्यात आली ?
१) पाचशे
२) पाच लाख
३) पाच हजार
४) पाच
चहा
प्रश्न ३) नष्ट होणे या अर्थाने कोणता शब्द वरील बातमीत आला आहे?
१) तापमान वाढ
२) काळजी घेणे
३) ऱ्हास होणे
४) सांगता होणे
उतारा
पावटा न घाट्यांची चव लज्जतदार
बोरं न् गाजरं लाल चटकदार उसाचे गरे गोड रसदार
गव्हाच्या ओव्या हिरव्या हिरव्यागार
बाजरीच्या भाकरीची चवच न्यारी
जवसाची चटणी आरोग्याला भारी
लोण्याचा गोळा शुभ्र मऊ मऊ
राळ्याचा भात दह्यासंगे खाऊ
तीळ आणि गूळ चवीला मस्त
गोड गोड लाडू करूया फस्त
संक्रांतीचा सण हा आला आला
पतंग उडवू चला चला
प्रश्न १ (कवितेत कोणत्या सणाचे वर्णन केले आहे ?
१(दिवाळी
२ (होळी
३ (संक्रांत
४ (गुढीपाडवा
प्रश्न २ (चवीला मस्त लागणार लाडूतील पदार्थ कोणते ?
१ (भाकरी आणि गुळ.
२ (तीळ आणि गुळ.
३ (गाजर आणि जवस .
४ (तीळ आणि भाकरी.
प्रश्न ३ (कवितेत वर्णन केलेल्या सर्व घटकातील विशेष बाब कोणती ?
१ (कवितेत आलेले सर्व घटक पदार्थ पालेभाज्या आहे.
२ (कवितेत आलेले सर्व घटक पदार्थ कडधान्य आहेत. ३ (कवितेत आलेले सर्व घटक पदार्थ स्निग्ध (तेलकट)आहेत.
४ (कवितेत आलेले सर्व घटक पदार्थ तेलबिया आहेत.
प्रश्न ४ (कवितेतील आशया वरून भाकरी किंवा पोळी केली जाते अशी धान्य कोणती ?
१ (ऊस आणि बाजरी.
२ (गहू आणि गाजर.
३ (पावटा आणि गाजर.
४ (गहू आणि बाजरी.
प्रश्न ५ (खालील पर्याया मधून कवितेला अगदी समर्पक शीर्षक (नाव) निवडा.
१ (चला पतंग उडवू या.
२ (भाज्यांची पंगत .
३ (संक्रांतीचा सण
४ (होळीचा सण
उतारा
जंगलातील एका सिंहाने असे फर्मान काढले की, उद्यापासून रोज एका प्राण्याने त्याच्याकडे यायचे. सर्व प्राणी भयभीत झाले. सिंहाकडे कुणीच जायला तयार नव्हते. तेवढ्यात एक ससा सिंहाकडे जायला तयार झाला. आरशाप्रमाणे पाण्यात प्रतिबिंब दिसते हे सशाला माहीत होते. त्यादिवशी ससा मुद्दामच उशिरा सिंहाकडे गेला. “कायरे, इतक्या उशिराका आलास?”, सिंहाने रागाने विचारले. ससा म्हणाला मी येत असताना दुसऱ्या सिंहाने मला अडवले. तो म्हणाला, “मीच जंगलाचा राजा आहे.” हे ऐकल्यानंतर सिंहाचा पारा आणखीनच चढला. तो रागाने म्हणाला, “चल, दाखव मला कुठे आहे तो सिंह?” ससा सिंहाला घेऊन एका विहिरीपाशी आला. दुसरा सिंह तुम्हांला घावरून विहिरीत लपला आहे असे सांगितले. सिंहाने विहिरीच्या काठावर चढून आत डोकावले, तर त्याला दुसरा सिंह दिसला. त्याने रागाने डरकाळी फोडली. पाण्यातील सिंहाने त्याचे अनुकरण केले. आपला प्रतिस्पर्धी आव्हान देतआहे असे समजून सिंहाने त्याच्यावर झेप घेतली आणि तो विहिरीत पडला.
प्रश्न १ (फर्मान काढणे म्हणजे काय ?
१ (बोलावून आणणे.
२ (आदेश काढणे.
१३ (निरोप देणे.
४ (वाट पहाणे.
प्रश्न २ (सिहाने सर्व प्राण्यांना काय फर्मान काढले?
१ (सर्व प्राण्यांनी सिंहाला दररोज एक शिकार आणून देणे.
२ (रोज एका प्राण्याने रात्री जंगलाचे संरक्षण करणे.
३ (सर्व प्राण्यांनी सिंहाची काळजी घ्यावी.
४ (रोज एका प्राण्याने सिंहाकडे यायचे.
प्रश्न ३ (सर्व प्राण्यात लहान असूनही ससा सिंहाकडे जायला तयार का झाला?
१ (सशाला कसे पराभूत करायचे याची युक्ती सशाकडे होती.
२ (सशाला आपल्या शक्तीचा गर्व होता.
३ (सशाला इतर प्राण्यांना वाचवायचे होते.
४ (तसा आदेश सिंहाने काढला होता.
प्रश्न ४ (सिंहाला विहिरीत काय दिसले?
१ (दुसरा सिंह दिसला.
२ (ससा दिसला.
३ (जंगलातले सर्व प्राणी दिसले.
४ ( सिंहाचे प्रतिबिंब दिसले.
प्रश्न ५ (कथेच्या आशयातून कोणती म्हण समजते ते ओळखा ?
१ (आपण मागतो एक डोळा देव देतो दोन.
२ (शेरास सव्वाशेर.
३ (शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
४ (करावे तसे भरावे.
प्रश्न १ (मजकुरातील आशयाच्या आधारे प्रदर्शन कशाचे आहे ते सांगा ?
१ (गावातील भाजीपाल्याचे.
२ (चौथीच्या मुलांनी बनविलेल्या विविध घटकांचे.
३ (विज्ञान प्रदर्शन.
४ (बचत गटाने बनविलेल्या वस्तूंचे.
प्रश्न २ (प्रदर्शनाला विशेष उपस्थिती कोणाची असणार आहे? १( इयत्ता चौथीतील विद्यार्थी.
२( पाळंदूर गावातील ग्रामस्थ.
३( श्री.बालसु नागोटीआणि श्रीम. सुवर्णाताई गजभिये . ४( श्रीम.सुवर्णाताई नागोटी आणि श्री. बालसु गजभिये.
प्रश्न ३( निमंत्रण पत्रिकेत कोणती त्रुटी दिसून येते? १( प्रदर्शनाची वेळ दिली नाही.
२( प्रदर्शन कोणी आयोजित केले आहे ते दिलेले नाही.
३( प्रदर्शनाचे ठिकाण दिलेले नाही.
४( प्रदर्शनाचा दिनांक दिलेला नाही .
प्रश्न ४( इयत्ता पाचवीतील शांभवी संध्याकाळी सहा वाजता प्रदर्शन पाह्यला गेली पण तिला प्रदर्शन पाहता आले नाही ?
१( प्रदर्शन फक्त चौथीच्या मुलांसाठी होते.
२( प्रदर्शनाचा कालावधी ११ ते ५ होता.
३( शांभवी दुसऱ्या शाळेतील होती.
४( शांभवीने परवानगी घेतली नव्हती.
प्रश्न ५( मजकुरातील आशयाचा आधारे योग्य विधान निवडा ?
१( श्री.बालसु नागोटी आणि श्रीम. सुवर्णाताई गजभिये यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार होते.
२( प्रदर्शनात शाळेच्या भिंतीवर सुंदर चित्रे दिसत होती.
३( श्री.बालसु नागोटी आणि श्रीम. सुवर्णाताई गजभिये हे कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत.
४( श्री.बालसु नागोटी आणि श्रीम. सुवर्णाताई गजभिये यांनी प्रदर्शन आयोजित केले होते.
प्रश्न १) सूप बनवताना कोणता घटक जोडला जातो?
१) साखर
२) पालेभाजी
३) लाल मिरची
४) लोणी
प्रश्न २) रेसिपीमध्ये कोणत्या घटकाचे अचूक मोजमाप नमूद केलेले नाही?
१) टोमॅटो
२) मीठ
३) हळद
४) वरीलपैकी एकही नाही.
प्रश्न ३) पॅनमध्ये पिठ कधी ओतावे ?
१) पॅन गरम करण्यापूर्वी
२) गरम तव्याला ग्रीस केल्यानंतर बी
३) पॅन गरम केल्यानंतर
४) गरम तवा धुतल्यानंतर डी
प्रश्न ४) शाकाहारी सूपमधील मधील मुख्य घटक ओळखा.
१) मीठ आणि हळद
२) पालेभाजी, मिरची, मीठ आणि पाणी.
३) लसून आणि पाणी
४) कांदा आणि टोमॅटो
प्रश्न ५) पालेभाजीचे सूप चांगले उकळून का घ्यावे ?
१) ते दोन्ही चांगले शिजले आहे हे समजते.
२) ते दोन्ही जाळले गेले आहे हे समजते.
३) त्यातील सर्व घटक झालेले आहे ते समजते.
४) त्यात पुरेसे मीठ टाकले आहे हे समजते.
उतारा
आपले काम
समीरच्या घरात समीरसह तीन भावंडे आणि आई बाबा असे राहतात. भावडांमध्ये समीर सर्वात मोठा आहे.रेणू समीरपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. रजनी रेणूपेक्षा दोन वर्षांनी लहान आणि ती इयत्ता पाचवीत आहे. रोज सकाळी सर्व भावंडे उठल्यावर त्यांची कामे
प्रश्न १) कामाची विभागणी किती मुलांमध्ये केली आहे.
१) १
२) २
३) ३
४) ४
प्रश्न २) रविवारी घर कोण स्वच्छ करणार आहे ?
१) रजनी आणि रेणू
२) समीर आणि रजनी
३) समीर,रेणू आणि रजनी
४) कोणीही नाही.
प्रश्न ३) नाश्ता कोण आणि कधी करणार आहे ?
१) रजनी / शनिवारी
२) समीर आणि रेणू/रविवारी
३) रेणू/ शुक्रवारी
४) रेणू/रविवारी
प्रश्न ४) शनिवारी कपडे वाळत घालण्याचे काम कोण करणार आहे?
१) समीर
२) समीर आणि रजनी
३) रेणू आणि रजनी
(४) रेणू
प्रश्न ५) शुक्रवारी समीर कोणते काम करणार आहे?
१) पिण्याचे पाणी घेऊन येणे
२) कपडे वाळत घालणे.
३) घराच्या आवारातील कुंड्यांतील झाडांना पाणी घालणे.
४) संपूर्ण घर स्वच्छ करणे.
उतारा –
यश
यश मिळवणे जितके महत्त्वाचे असते, त्यापेक्षा मिळवलेले यश टिकवणे अधिक महत्त्वाचे असते. स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवण्यासाठी आपल्याला रोज नवे नवे शिकावे लागते. हे शिकत असताना चुका होणे काहीच गैर नाही; पण एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करणे मात्र आपल्या प्रगतीतील धोंड आहे. तुमची खरी स्पर्धा इतरांशी नसते. ती स्वतःशीच असते. दुर्दैवाने याचाच आपल्याला विसर पडतो. मग आपले सगळे आयुष्य आपण इतरांशी स्पर्धा करण्यात, त्यांच्याशी तुलना करण्यात घालवतो.
प्रश्न ३) नाश्ता कोण आणि कधी करणार आहे ?
१) रजनी / शनिवारी
२) समीर आणि रेणू/रविवारी
३) रेणू/ शुक्रवारी
४) रेणू/रविवारी
प्रश्न ४) शनिवारी कपडे वाळत घालण्याचे काम कोण करणार आहे?
१) समीर
२) समीर आणि रजनी
३) रेणू आणि रजनी
(४) रेणू
प्रश्न ५) शुक्रवारी समीर कोणते काम करणार आहे?
१) पिण्याचे पाणी घेऊन येणे
२) कपडे वाळत घालणे.
३) घराच्या आवारातील कुंड्यांतील झाडांना पाणी घालणे.
४) संपूर्ण घर स्वच्छ करणे.
उतारा
फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ
१४ डिसेंबर १९७१ रोजी शत्रूची सहा सेबरजेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली. तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ सावध होतेच; पण धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुराळ्यामुळे त्यांना उड्डाण करता येईना. धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर, अगदी खालून घोंगावू लागली होती, गोळ्यांच्या फैरी झाडत होती. तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाईंग ऑफिसर सेखाँचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली.
प्रश्न १) शत्रूने किती साली हवाई हल्ला केला होता
१) १४ डिसेंबर १९६१
२) १४ डिसेंबर १९७१
३) १६डिसेंबर १९८१ ४) वरील सर्व पर्याय बरोबर
प्रश्न २) शत्रूवर हल्ला करण्यात मुख्य अडथळा कोणता येत होता. ?.
१) विमानात इंधन नसल्याने.
२) अंधार असल्याने विमानाचे उड्डाण करणे शक्य नव्हते .
३) शत्रूची विमाने अधिक शक्तिशाली होती..
४) धावपट्टीवर अचानक धुराळा उठल्याने.
प्रश्न ३) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ यांनी शत्रूची किती विमाने नष्ट केली?
१) सहा
२) दोन
३) आठ
४) चार
प्रश्न ४) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ हे चालवत असलेले विमान –
१) फ्लेमिंगो
२) सेबर जेट
३) सुखोई
४) नॅट
प्रश्न ५) प्राणाची पर्वा न करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
१) स्वत:चा विचार करणे.
२) स्वत:च्या जीवाचा विचार न करणे.
३) काळजी घेणे.
४) संकटात सापडणे.

One thought on “NAS Question Paper Class 6th

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!