प्रकरणाचे नाव | स्वाध्याय लिंक |
1.सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण | CLICK HERE |
2. आरोग्य व रोग | CLICK HERE |
3. बल व दाब | CLICK HERE |
4. धाराविद्युत आणि चुंबकत्व | CLICK HERE |
5. अणूचे अंतरंग | CLICKn HERE |
6. द्रव्याचे संघटन. | |
7. धातू-अधातू | |
8. प्रदूषण | |
9. आपत्ती व्यवस्थापन | |
10. पेशी व पेशीअंगके. | |
11. मानवी शरीर व इंद्रिय संस्था | |
12. आम्ल, आम्लारी ओळख | |
13. रासायनिक बदल व रासायनिक बंध | |
14. उष्णतेचे मापन व परिणाम | |
15. ध्वनी. | |
16. प्रकाशाचे परावर्तन. | |
17. मानवनिर्मित पदार्थ | |
18. परिसंस्था | |
19. ताऱ्यांची जीवनयात्रा | |
सर्वसमावेशक कृती करण्यास संधी प्रदान करणे आणि
खालील बाबींसाठी प्रोत्सहित करणे.
• परिसर, नैसर्गिक प्रक्रिया, घटना यांचा पाहणे, स्पर्श
करणे, चव घेणे, वास घेणे, ऐकणे या ज्ञानेंद्रियांनी
शोध घेणे.
• प्रश्न उपस्थित करणे व मनन, चर्चा, रचना, सुयोग्य
कृती, भूमिका, नाटक, वादविवाद, माहिती संप्रेषण
तंत्रज्ञान इत्यादींच्या साहाय्याने उत्तर शोधणे.
• कृती, प्रयोग, सर्वेक्षण, क्षेत्रभेट, इत्यादी दरम्यानच्या
निरीक्षणांच्या नोंदी घेणे.
• नोंद केलेल्या माहितीचे {díbofU करणे, परिणामांचा
अर्थ लावणे आणि अनुमान काढणे. सामान्यीकरण
करणे, मित्र आणि प्रौढांबरोबर निष्कर्ष सामायिक
करणे.
• नवकल्पना सादर करणे, नवीन रचना/नमुने,
आयत्या वेळी विस्तार करणे इत्यादींद्वारे
सर्जनशीलता प्रदर्शित करणे.
• सहकार्य, सहयोग, प्रामाणिक अहवाल देणे,
संसाधनांचा वाजवी वापर, इत्यादी मूल्ये आत्मसात
करणे, स्वीकारणे आणि त्यांची प्रशंसा करणे.
• परिसरात ओढवणाऱ्या विविध आपत्तींप्रती,
संकटांप्रती जागरूक राहणे व कृती करणे.
• खगोलशास्त्रीय संकल्पना जाणून घेऊन त्या संदर्भात
मानवाने केलेली प्रगती जाणून घेणे.
• शास्त्रीय शोधांच्या गोष्टींवर चर्चा करणे व त्यांचे
महत्त्व जाणून घेणे.
• पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे. उदा.
खते, कीटकनाशके यांचा वापर, पर्यावरण
संवर्धनासाठी प्रयत्न करणे इत्यादी.
• उपलब्ध साधनसाहित्याचा वापर, रचना व नियोजन
योग्य पद्धतीने दर्शविणे.
• नैसर्गिक संसाधनांच्या अतिवापराच्या
परिणामांविषयी इतरांना संवेदनक्षम करणे.
अध्ययनार्थी –
08.72.01 गुणधर्म, संरचना व कार्य यांच्या आधारे पदार्थ
आणि सजीव यांच्यातील फरक स्पष्ट करतात.
जसे की नैसर्गिक व मानवनिर्मित धागे, संपर्क
आणि असंपर्क बल, विद्युत वाहक आणि
विद्युत रोधक द्रव, वनस्पती आणि प्राणी पेशी,
अंडज व जरायुज प्राणी.
08.72.02 गुणधर्म/वैशिष्ट्येयांच्या आधारे पदार्थ व सजीव
यांचे वर्गीकरण करतात. उदा. धातू आणि
अधातू, उपयुक्त आणि हानिकारक सूक्ष्मजीव,
लैंगिक आणि अलैंगिक पुनरुत्पादन, खगोलीय
वस्तू, नवीकरणीय आणि अनवीकरणीय नैसर्गिक
स्रोत, इत्यादी.
08.72.03 जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्र्नांची उत्तरे
शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात. उदा.
ज्वलनासाठी आवश्यक अटी काय आहेत?
लोणची आणि मुरंबा यांमध्येमीठ व साखर का
वापरतात? एकसमान खोलीवर द्रव समान दाब
प्रयुक्त करतो का?
08.72.04 प्रक्रिया आणि घटना यांचा कारणांशी संबंध
जोडतात उदा. धुक्याची निर्मिती आणि हवेतील
प्रदूषकांचे प्रमाण, स्मारकांचा होणारा ऱ्हास
आणि आम्ल वर्षा इत्यादी.
08.72.05 प्रक्रिया आणि घटना स्पष्ट करतात. उदा. मानव
आणि प्राणी यांच्यातील विविध क्रिया, ध्वनी
निर्मिती आणि प्रसारण, विद्युत प्रवाहाचे
रासायनिक गुणधर्म, इत्यादी.
08.72.06 रासायनिक अभिक्रियांकरिता शाब्दिक समीकरण
लिहितात, उदा. धातू आणि अधातू यांची हवा,
पाणी आणि आम्ल इत्यादींबरोबर अभिक्रिया.
08.72.07 आपतन कोन आणि परावर्तन कोन मोजतात.
08.72.08 सूक्ष्मजीव, कांद्याचा पापुद्रा, मानवी गाल पेशी,
इत्यादींच्या स्लाईड्स तयार करतात व त्यांची
सूक्ष्मदर्शकीय वैशिष्ट्ये सांगतात.
08.72.09 नामनिर्देशित आकृती/प्रवाह तक्ते काढतात.
उदा. पेशींची रचना, हृदयाची रचना, श्वसन
संस्था, प्रायोगिक मांडणी, इत्यादी.
08.72.10 सभोवताली उपलब्ध असलेले साहित्य वापरून प्रतिकृती तयार करतात व त्यांचे कार्य स्पष्ट करतात. उदा.
एकतारी विद्युतदर्शक, अग्निशामक, तंतूवाद्य, पेरिस्कोप, इत्यादी.
08.72.11 रचना, नियोजन, उपलब्ध स्रोतांचा वापर इत्यादी बाबींमध्ये सर्जनशीलता प्रदर्शित करतात.
08.72.12 शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनात वापर करतात, उदा. पाण्याचे शुद्धीकरण, जैविक
विघटनशील आणि अजैविक विघटनशील कचरा वेगळा करणे, पीक उत्पादन वाढविणे, योग्य धातू व
अधातूंचा विविध कारणांसाठी वापर, घर्षण वाढविणे/कमी करणे, पौगंडावस्थेसंबधी असलेल्या दंतकथा व
नकारात्मक रूढींना आव्हान देणे, इत्यादी.
08.72.13 वैज्ञानिक शोधांबद्दल चर्चा आणि त्यांचे महत्त्व समजून घेतात.
08.72.14 पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करतात. उदा. संसाधन स्रोताचा विवेकाने वापर करणे, खते आणि
कीटकनाशकांचा नियंत्रित वापर करणे, पर्यावरण आपत्तींना सामोरे जाण्याचे मार्ग सुचविणे, इत्यादी.
08.72.15 नैसर्गिक संसाधनांच्या अतिवापराच्या परिणामांविषयी इतरांना संवेदनक्षम करतात.
08.72.16 प्रामाणिकपणा, वस्तुनिष्ठता, सहकार्य, भय आणि पूर्वग्रह यांच्यापासून मुक्ती ही मूल्येप्रदर्शित करतात.
08.72.17 विश्वाची निर्मिती व अवकाश तंत्रज्ञानातील मानवाची प्रगती स्पष्ट करतात.
08.72.18 माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या विविध साधनांचा संकल्पना समजून घेण्यासाठी वापर करतात.