Scholarship Exam | कार्यात्मक व्याकरण| Scholarship Exam| Class 5th

शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा कार्यात्मक व्याकरण

लवकरच शिष्यवृत्ती परीक्षेचे Live Class घेतले जातील.
त्यासाठी यूट्यूब चैनल ला 1000 सबस्क्राईब ची आवश्यकता आहे. तरी सर्वांनी Learning With Smartness हे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा.

कार्यात्मक व्याकरण या घटकाच्या परिपूर्ण तयारीसाठी वरील व्हिडिओ पहा.

सूचना

आपणांस मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा

निकाल पाहण्यासाठी रोल नंबरची आवश्यकता आहे.

निकाल लिंक याच ठिकाणी दिली जाईल.

सामान्य नाम ओळखा.

  1. कमळ
  2. जाई
  3. फूल
  4. चाफा

नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना ——— असे म्हणतात.

  1. क्रियापद
  2. यापैकी नाही
  3. विशेषण
  4. सर्वनाम

त्याने त्याची वही शाळेत आणली.  (या वाक्यातील सर्वनाम ओळखा.)

  1. शाळेत
  2. त्याची
  3. वही
  4. त्याने

तुला आणखी पैसे हवे आहे का? ( सर्वनाम ओळखा )

  1. तुला
  2. आणखी
  3. हवे
  4. आहे

मी आणि त्याने खूप अभ्यास केला. (या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत ?)

  1. एक
  2. चार
  3. दोन
  4. तीन

खालील पर्यायातील सर्वनाम नसलेला शब्द ओळखा.

  1. आपण
  2. खातो
  3. तुम्ही
  4. स्वतः

आम्ही उद्या त्याच्या घरी जाऊ. (या वाक्यातील सर्वनाम ओळखा.)

  1. त्याच्या
  2. आम्ही
  3. घरी
  4. जाऊ

आपण सागरच्या घरी अभ्यासाला जाऊ.( सर्वनाम ओळखा.)

  1. आपण
  2. घरी
  3. जाऊ
  4. सागर

विशेष नाम नसणारा पर्याय ओळखा.

  1. भारत
  2. कॅनडा
  3. अमेरिका
  4. देश

सामान्य नाम नसणारा पर्याय ओळखा.

  1. हिमालय
  2. गाव
  3. नदी
  4. पर्वत

गटात न बसणारा शब्द ओळखा.

  1. महिना
  2. भाद्रपद
  3. आषाढ
  4. श्रावण

भाववाचक नसणारा पर्याय ओळखा

  1. छान
  2. सौंदर्य
  3. आपुलकी
  4. श्रीमंती

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ——— असे म्हणतात.

  1. क्रियापद
  2. विशेषण
  3. सर्वनाम
  4. नाम

सागर हुशार मुलगा आहे. (विशेषण ओळखा)

  1. सागर
  2. मुलगा
  3. हुशार
  4. आहे

दिवाळीच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले. (विशेषण ओळखा.)

  1. सर्वांनी
  2. कपडे
  3. छान छान
  4. घातले

विशेषण नसणारा पर्याय निवडा.

  1. सुरेख
  2. गरीब
  3. हिरवी
  4. श्रीमंती

विशेषण नसणारा पर्याय निवडा.

  1. उंच
  2. दिवस
  3. चांगला
  4. लहान

भित्रा ससा जोरात पळत होता. (विशेषण ओळखा.)

  1. जोरात
  2. भित्रा
  3. होता
  4. ससा

वाक्यात क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला ——— असे म्हणतात.

  1. सर्वनाम
  2. काळ
  3. विशेषण
  4. वचन

शब्दाच्या कोणत्या जाती वरून काळ ओळखतात?

  1. नाम
  2. विशेषण
  3. क्रियापद
  4. सर्वनाम

तेजस आता जाईल. (काळ ओळखा)

  1. भविष्यकाळ
  2. भूतकाळ
  3. साधा काळ
  4. वर्तमान काळ

आई स्वयंपाक करत आहे. (काळ ओळखा)

  1. भविष्यकाळ
  2. भूतकाळ
  3. साधा काळ
  4. वर्तमान काळ

आपण सर्वजण शाळेत जाऊ. (काळ ओळखा.)

  1. साधा काळ
  2. भूतकाळ
  3. भविष्यकाळ
  4. वर्तमान काळ

महेश खूप छान खेळतो. ( या वाक्याचे भविष्यकाळ वाक्य निवडा.)

  1. महेश खूप छान खेळला.
  2. महेश खूप छान खेळत आहे.
  3. महेश खूप छान खेळला होता.
  4. महेश खूप छान खेळेल.

सचिन ही स्पर्धा जिंकणारच! ( या वाक्याचा काळ ओळखा.)

  1. साधा काळ
  2. भविष्य काळ
  3. भूतकाळ
  4. वर्तमान काळ

मी अभ्यास करीन. (काळ ओळखा.)

  1. रीती भविष्यकाळ
  2. साधा भूतकाळ
  3. साधा भविष्यकाळ
  4. साधा वर्तमान काळ
  5. गटात न बसणारा शब्द ओळखा.

*

नाम व सर्वनाम यावरून वेगळा शब्द ओळखणे.

  1. मी
  2. आपण
  3. त्यांचे
  4. रत्ना

त्याने त्याची वही शाळेत आणली. (या वाक्यातील सर्वनाम ओळखा.)

  1. त्याने
  2. वही
  3. त्याची
  4. शाळेत
  5. गटात न बसणारा शब्द ओळखा.

क्रियापद आणि सर्वनाम यावरून वेगळा शब्द ओळखा.

  1. वाचतो
  2. आम्ही
  3. राहतो
  4. खातो

गटात न बसणारा शब्द ओळखा.

सर्वनाम आणि विशेषण यावरून वेगळा शब्द ओळखा.

  1. हा
  2. तो
  3. आपण
  4. सुंदर

गटात न बसणारा शब्द ओळखा.

विशेषण आणि क्रियापद यावरून वेगळा शब्द ओळखा.

2 points

  1. करणे
  2. भव्य
  3. सुंदर
  4. विलोभनीय

विशेषण नसणारा पर्याय निवडा.

  1. पिवळी
  2. सौंदर्य
  3. धीट
  4. छान

विशेषण नसणारा पर्याय निवडा.

  1. चांगला
  2. उंच
  3. दिवस
  4. लहान

भित्रा ससा जोरात पळत होता. (विशेषण ओळखा)

  1. भित्रा
  2. होता
  3. जोरात
  4. ससा

पुढील पैकी नाम ओळखा.

  1. शूर
  2. गोडी
  3. धूर्त
  4. सुंदर

गटात न बसणारा शब्द ओळखा.

  1. दयाळूपणा
  2. औदार्य
  3. स्वच्छता
  4. नम्र

गटात न बसणारा शब्द ओळखा.

  1. अमरावती
  2. अहमदनगर
  3. जिल्हा
  4. पुणे

गटात न बसणारा शब्द ओळखा.

  1. पृथ्वी
  2. शनी
  3. शुक्र
  4. ग्रह

गातो छान वैष्णव. (या वाक्यातील क्रियापद ओळखा.)

  1. गातो
  2. छान
  3. वैष्णव

सार्थक दररोज शाळेत येतो आणि पुस्तक वाचतो.

(या वाक्यात नामांची संख्या किती आहे?)

  1. एक
  2. दोन
  3. तीन
  4. चार

10 thoughts on “Scholarship Exam | कार्यात्मक व्याकरण| Scholarship Exam| Class 5th

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!