Passage Reading | Navoday Exam| Scholarship Exam

नवोदय स्कॉलरशिप व राज्यस्तरीय मंथन परीक्षा उतारा वाचन

नवोदय स्कॉलरशिप व राज्यस्तरीय मंथन परीक्षा उतारा वाचन
उतारा क्रमांक 1

उतारा काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा :
कृष्णेचे कुटुंब भलेमोठे आहे. कितीतरी लहानमोठ्या नद्या तिला येऊन मिळतात.गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्रमाता म्हणता येईल.नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती. ते कृष्णेचे दुसरे दर्शन. एका बाजूला उंच दरड आणि दुस-या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबूजे यांचे अमृतमळे. कृष्णाकाठाची ती वांगी ज्याने एकदा चाखरनी, की त्याना वारंवार खावीशी वाटतील. सतत एक-दोन महिने सारखी वांगीच खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही. मग वीट येणे दरच राहिले.
1.’महाराष्ट्रमाता’ कोणत्या नदीला म्हणतात ?
(1) कृष्णा
2)वेण्णा
(3)कोयना
4)गोदावरी
2.कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात ?(अ) काकड्या (ब) टरबूजे (क) कलिंगडे
1)(अ), (ब) आणि (क)
(2)फक्त (अ) आणि (ब)
(3)फक्त (ब) आणि (क)
(4)फक्त (अ)
3.पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उता यामध्ये आलेला नाही ?
1)मन न भरणे
(2) पूर्ण करणे
(3)कंटाळा येणे
(4)चव घेणे
4) कृष्णाकाठचा कोणता पदार्थ सारखा खावासा वाटतो?
2 points
1) वांगी
2) बटाटे
3) मेथी
4) वरील सर्व
उताऱ्यात कोणकोणत्या नद्यांचा उल्लेख आला आहे ?
गोदावरी
कृष्णा
वरील दोन्ही
यापैकी नाही

उतारा क्रमांक 2
उतारा काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
तुम्ही कधी रस्सी-खेच हा खेळ खेळला आहात? हा एक रंजक खेळ आहे. रस्सी-खेच हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा, एक लांब आणि मजबूत रस्सी आणि दोन गटांची आवश्यकता असते. खेळ तेव्हाच रंगतो जेव्हा दोन्ही गट एक सारख्या ताकदीचे असतील. दोन्ही गटांच्या मधोमध एक रेष आखली जाते. जो गट रस्सीसोबत ओढला जाऊन रेषेच्या पलिकडे खेचला जातो तो गट पराजित होतो.गटातील सर्वात ताकदीच्या खेळाडूने रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे गरजेचे असते.खेळण्याच्या जागेवरील दगड-धोंडे बाजूला काढून टाकले पाहिजेत नाहीतर दुखापत होऊ शकते.


रस्सी-खेच _आहे.

(A) एक युद्ध
(B) एक रस्सी
C)एक खेळ
(D) एक भांडण
‘रस्सी-खेच’ यात आपण __

(A) गुद्दे मारतो
(B) लपंडाव खेळतो
C)रस्सी ओढतो
(D) फलंदाजी व गोलंदाजी करतो
रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील _ खेळाडू असतो.
(A)सगळ्यात उंच
C)सगळ्यात ताकदीचा
(D) सर्वात तरुण
(B) सगळ्यात ठेंगणा
जो गट मध्यरेषेच्या पलिकडे ओढला जातो तो गट _

(A) यशस्वी होतो
(B) पराजित होतो
(C) विजयी होतो
(D) पुन्हा संधी मिळते
‘संघटित’ शब्दाचा आशय आहे __

A)एकत्र राहणे
(B) भांडणे
C)ओढणे
(D) विजयी होणे

उतारा क्रमांक 3

उतारा काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा.
डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे. त्याची लांबी सुमारे दहा फूट असते.त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी तीस मैलअसतो. काही वेळा तर ते ताशी ४० ते ६० मैल वेगाने पोहतात.
डॉल्फिन मासा इतर माशांसारखा अंडी घालत नाही, तर तो सस्तन प्राणी आहे.माशांप्रमाणे त्याला कल्लेही नसतात. श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते.
डॉल्फिन विभिन्न प्रकारचे बत्तीस आवाज काढतो. डॉल्फिन माणसासारखा मोठमोठ्यानेहसू शकतो; ओरडूही शकतो. शिकारीचा पाठलाग करताना तो गुरगुरतो आणि शिकार पकडल्याच्या आनंदाच्या भरात तो ‘म्याऊ’ असा आवाज काढतो. शत्रूला घाबरवण्यासाठी तो उच्च स्वरात ओरडतो.
डॉल्फिन माशाचे श्रवणेंद्रिय फारच तीक्ष्ण असते. आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनिलहरींनी संपर्क साधतात.
डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा.
1) डॉल्फिन मासा अंडी घालतो.
(2) डॉल्फिन मासा अनेक आवाज काढतो.
(3) डॉल्फिनचे श्रवणयंत्र तीक्ष्ण नसते.
(4) डॉल्फिनचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते.
पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द उताऱ्यात आला नाही?
1) मीन
(2) पारध
(3) उथळ
(4) विहग
डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर का यावे लागते ?
शत्रूला घाबरवण्यासाठी
एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी
श्वास घेण्यासाठी
माणसांना भेटण्यासाठी
डॉल्फिनचा पोहण्याचा वेग ताशी किती असतो ?
ताशी सरासरी तीस मैल
ताशी सरासरी पन्नास मैल
ताशी सरासरी वीस मैल
ताशी सरासरी दहा मैल
डॉल्फिन कोठे राहणारा मासा आहे ?
खोल समुद्रात
नदीत
विहिरीत
तलावात

उतारा क्रमांक 4
उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.
चघळायचा डिंक (च्यूइंग गम) हजार वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला होता. त्यांना सॅपोडिलाच्या झाडातून पाझरणारा एक द्राव मिळाला. तो द्राव पाझरून बाहेर आल्याबरोबर लगेच घट्ट झाला. त्याला ते चिकल म्हणू लागले. तो चघळायला छान लागत असे. आजही चिकलेरो नावाचे लोक चिकल गोळा करतात. पाणी काढून टाकण्यासाठी चिकल उकळतात. त्यानंतर त्याचे साधारणपणे 30 पौंडाचे किंवा 14 किलोचे तुकडे बनवतात. हे तुकडे डिंकाच्या कारखान्यात पाठवतात. तिथे त्याच्यात गोडीसाठी आणखी कितीतरी घटक मिसळतात. त्यामुळे ते मऊ, चविष्ट आणि रंगीत बनतात.
…………_नी चघळण्याच्या डिंकाचा शोध लावला.
मायन
सॅपोडिला
चिकलेरो
डिंकाचे कारखाने
—————- म्हणजे चिकल गोळा करणारे मजूर.

सॅपोडिला
मायन
चिकलेरो
गमर
चिकल तुकडे पाठवण्यात येतात _
पुनर्चक्र केंद्रांमध्ये
डिंकाच्या कारखान्यात
मेक्सिकोच्या जंगलात
कँडी स्टोअरमध्ये.
_ ______खेरीज बाकी सगळ्यांसाठी चिकलमध्ये अनेक घटक मिसळले जातात.
मऊ करण्या
स्वादा
गोड करण्या
दाट करण्या
या उताऱ्यासाठी उचित शीर्षक होईल.
डिंक
चिकलेरो
चिकलेरोची कहाणी
चघळण्याच्या डिंकाची कहाणी

उतारा क्रमांक 5
उतारा काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामधील शेतकरी पीक चांगले येण्यासाठी संगीताचा वापर करतात. ते त्याला ‘ सूर उपचार’ म्हणतात. शेतकरी एवढेच करतात पिकाच्या वर एका लांब बांबूवर टेपरेकार्डर लटकवायचा आणि दिवसातून दोन वेळा अर्धा तास पिकाला संगीत ऐकवायचे. या ‘सूर उपचारानंतर’ उसाचे पीक एकरी 6 ते 8 टनांनी वाढले आहे. परिणामतः शेतकऱ्यांची मिळकत ₹5,400 वरून ₹7,200 अशी जास्त झाली आहे. संगीताच्या विविध प्रकारांशी प्रयोग करून पाहिल्यावर असा शोध लागला की, वादयसंगीत उसाच्या कमाल वाढीला बढावा देते. साखर उद्योगांनी शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट वाटण्यास सुरुवात केली आणि त्याचे लाभदायक परिणाम झाले.

सूर उपचार’चा प्रयोग केला होता.
1.बांबूवर
2.सर्व पिकांवर
3.शेतकऱ्यांवर
4.उसावर

सूर उपचार’ म्हणजे संगीताचा उपयोग करणे.
शेतकऱ्यांच्या करमणुकीसाठी
शेतकऱ्यांच्या उपचारासाठी.
शेतकऱ्यांची प्राप्ती वाढवण्यासाठी.
उदयोगधंदयातील बरकतीसाठी.
सूर उपचार’ पिकांवर केला गेला –
आठवड्यातून दोनदा
रोज एकदा
दिवसातून दोनदा
आठवड्यातून एकदा.
सूर उपचारा ‘मध्ये सर्वांत परिणामकारक ठरलेला संगीताचा प्रकार होता.
चित्रपट संगीत
शास्त्रीय संगीत
गायन
वादय संगीत.
साखर उद्योगाने ‘सूर उपचारा’ला उत्तेजनदिले –
संगीताच्या विविध प्रकारांचे प्रयोग करून.
बांबूच्या काठीवर टेपरेकॉर्डर लटकवून.
शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट मोफत भेट देऊन.
वेगवेगळी खते वापरून.

10 thoughts on “Passage Reading | Navoday Exam| Scholarship Exam

  1. मला प्रश्न खूप आवडले

  2. मला हे प्रश्न खूप आवडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!