शिष्यवृत्ती सराव पेपर भाषा व गणित
इयत्ता पाचवी
उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या
तुम्ही कधी रस्सी-खेच हा खेळ खेळला आहात? हा एक रंजक खेळ आहे. रस्सी-खेच हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा, एक लांब आणि मजबूत रस्सी आणि दोन गटांची आवश्यकता असते. खेळ तेव्हाच रंगतो जेव्हा दोन्ही गट एक सारख्या ताकदीचे असतील. दोन्ही गटांच्या मधोमध एक रेष आखली जाते. जो गट रस्सीसोबत ओढला जाऊन रेषेच्या पलिकडे खेचला जातो तो गट पराजित होतो.गटातील सर्वात ताकदीच्या खेळाडूने रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे गरजेचे असते.खेळण्याच्या जागेवरील दगड-धोंडे बाजूला काढून टाकले पाहिजेत नाहीतर दुखापत होऊ शकते.
रस्सी-खेच _आहे.
(A) एक युद्ध
(B) एक रस्सी
C)एक खेळ
(D) एक भांडण
‘रस्सी-खेच’ यात आपण __
(A) गुद्दे मारतो (B) लपंडाव खेळतो C)रस्सी ओढतो (D) फलंदाजी व गोलंदाजी करतो
रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील __ खेळाडू असतो.
(D) सर्वात तरुण (A)सगळ्यात उंच C)सगळ्यात ताकदीचा (B) सगळ्यात ठेंगणा
कविता वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
रंग जादुचे पेटीमधले इंद्रधनूचे असती,
पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती. ॥धृ।।
आकाशाला रंग निळा दया,
छटा रुपेरी वरति असू दया,
निळ्या अभाळी हिरवे राघू, किती पाखरे उडती. ॥१॥
अवतीभवती काढा डोंगर,
त्यावर तांबुस रंग काळसर,
डोंगरातुनी खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती. ॥२॥ ॥
चार नेमक्या काढा रेषा)
विटाविटांच्या भिंती सरशा,
लहान-मोठ्या चौकोनांची खिडक्यादारे होती. ॥३॥
लाल लाल कौलारू छप्पर,
अलगत ठेवा वरती नंतर,
गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती. ॥४॥
सजले आता तुमचे घरकुल,
पुढति त्याच्या पसरा हिरवळ,
(पाऊलवाटेवरून तांबड्या सखेसोबती येती.१।५।।
रंग जादुचे पेटीमधले इंद्रधनूचे असती,
आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती.
-पद्मिनी बिनीवाले
हिरवे राघू कोठे उडत आहे?
झाडावर
डोंगरावर
निळ्या आभाळात
यापैकी नाही
इंद्रधनुष्याचे सात रंग कोणत्या रंगातून निर्माण होतात?
पांढरा
निळा
तांबडा
हिरवा
3)पाऊलवाटेवरून कोण येते?
यापैकी नाही
पक्षी
तांबड्या सखे-सोबती
प्राणी
बातमीवर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या.
माळीण हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
पुणे
नाशिक
मुंबई
सोलापूर
माळीण या गावात दुर्घटना कोणत्या वर्षी घडली!
2016
2015
2014
2018
एकवचनी पर्याय निवडा.
लांडगे
जळवा
मळा
पिले
आकृतीत लपलेली म्हण ओळखून त्यातील पाचव्या क्रमांकाचे अक्षर ओळखा.
ळा
ची
गा
गु
वेगळा अर्थ असणारा शब्द ओळखा.
संग्राम
नरेश
भूपेंद्र
भूपती
सज्जन विरुद्ध अर्थी शब्द निवडा.
निर्जीव
स्वार्थी
दुर्जन
निरक्षर
नपुसकलिंगी शब्द निवडा
मुलगा
मुलगी
मूल
पोरगा
त्याने त्याची वही शाळेत आणली. (या वाक्यातील सर्वनाम ओळखा.)
वही
त्याने
शाळेत
त्याची
सागर हुशार मुलगा आहे. (विशेषण ओळखा)
मुलगा
आहे
हुशार
सागर
शब्दाच्या कोणत्या जाती वरून काळ ओळखतात?
क्रियापद
सर्वनाम
विशेषण
नाम
आपण सर्वजण शाळेत जाऊ. (काळ ओळखा.)
साधा काळ
भूतकाळ
वर्तमान काळ
भविष्यकाळ
सचिन ही स्पर्धा जिंकणारच! ( या वाक्याचा काळ ओळखा.)
वर्तमान काळ
साधा काळ
भूतकाळ
भविष्य काळ
गातो छान वैष्णव. (या वाक्यातील क्रियापद ओळखा.)
वैष्णव
छान
गातो
माझ्या ताईने मला नवीन खेळणी आणली. ( विधेय भाग ओळखा.)
माझ्या
माझ्या ताईने
आणली
मला नवीन खेळणी आणली
अपूर्ण जोडशब्द पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
आगत…..
पंगत
स्वागत
प्रगत
यापैकी नाही
खालीलपैकी कोणत्या पर्यायात जोडशब्द आहे?
गोरगरीब
गोरपांढरे
गाडीमागे
गडसर
मिल्खासिंग कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे?
नेमबाज
बॅडमिंटन
मुष्टियुद्ध
धावपटू
स्त्री शिक्षणाचा पाया कोणी घातला?
महात्मा गांधी
महात्मा फुले
लोकमान्य टिळक
रवींद्रनाथ टागोर
खालील समूहदर्शक शब्दांच्या जोड्या मधून चुकीची जोडी ओळखा
पालेभाजीची जोडी
काजूची गंजी
फुलांचा गुच्छ
सैनिकांची तुकडी
Scholarship Exam Question Paper 5th Class
शिष्यवृत्ती सराव पेपर भाषा व गणित
गणित प्रश्न क्रमांक 26ते75
0, 4, 6 आणि 8 (अंक पुनरावृत्त होऊशकतात) हे अंक वापरून बनणाऱ्या कमालआणि किमान 6 अंकी संख्यातील फरक आहे ?
488572
398640
420640
396000
कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचाकोणता गट आहे ?
81427, 16378, 82341, 63178
16378, 63178, 82341, 81427
81427, 82341, 63178, 16378
82341, 81427, 63178, 16378
70 आणि 80 यांमधील सर्व मूळ संख्यांची बेरीज __आहे .
221
223
227
231
एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गांत ठेवायचेआहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल, तर प्रत्येकवर्गात किती डेस्क ठेवले जातील?
32
34
42
44
दशांश समकक्ष ओळखा.
13.125
0.58125
0.91875
1.3125
पुढील आविष्काराला सरळ रूप दया :
1/3
2/3
1
1/3
सरळ रूप दया व उत्तर टक्केवारीत लिहा :
816.0
0.816
8.16
81.6
दोन संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. जर एकसंख्या दुसरीच्या दुप्पट असेल, तर मोठीसंख्या कोणती आहे?
1.4
2.8
4.2
5.6
8, 10 आणि 12 यांनी पूर्ण भाग जाणारी 3 अंकी कमाल संख्या आहे ?
900
960
975
990
सोडवा
10.1
1.10
1.01
10.01
(169390 ÷ 13) ला सरळ रूप दिल्यावर येतात ?
1303
13300
10033
13030
येथे दाखवलेल्या आयताकार ठोकळ्याचे घनफळ किती आहे?
10 घन सेमी
25 घन सेमी
30 घन सेमी
62 घन सेमी
दोन मोठ्या माणसांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 770 (वर्षे) आहे. त्यांच्या वयांचीबेरीज किती (वर्षे) आहे?
87
81
57
75
हरणाने भाज्या खाऊन टाकू नयेत म्हणून राजू शेतकऱ्याने आपल्या बागायतीभोवती चौरसाकृती कुंपण घातले. जर एक बाजू 10 मी लांबीची असेल आणि 2 मी अंतरावर खांब रोवले असतील, तर त्याने किती खांब वापरले?
10
15
16
20
एक घनाकृती टाकीची क्षमता 12 लीटर आहे.जर टाकीच्या तळाचे क्षेत्रफळ 750 चौसेमी असेल, तर टाकीची उंची किती?
10 सेमी
16 सेमी
60 सेमी
12 सेमी
20 सेमी
20 सेमी X 10 सेमी x 30 सेमी अशी परिमाणेअसलेल्या घनाकृती भांड्यात साठवता येणाऱ्या दुधाचे घनफळ असेल ?
60 लीटर
6 लीटर
0.6 लीटर
60 सेमी
एका वाहनतळावर दर 8 मोटारींपैकी 1 निळ्यारंगाची आहे. या वाहनतळावर किती टक्केगाड्या निळ्या रंगाच्या आहेत?
1.25%
7%
9%
12.5%
एक दुकानदार नगाला ₹ 15 किंवा 5 च्यागठ्याला ₹ 65 या दराने वया विकतो. जरविनोदने 12 वह्या खरेदी केल्या, तर त्याला किती पैसे दयावे लागतील?
₹ 156
₹160
₹ 166
₹172
या संरचनेकडे पाहा आणि गायब असलेला अंकशोधून काढा.
2
4
6
8
पुढील चित्रालेख एका व्यापाऱ्यानेआठवड्याच्या पहिल्या पाच दिवसांत विकलेल्या संत्र्यांच्या टोपल्यांची संख्या दर्शवतो. जर त्याच्याकडे अजून 270 टोपल्या शिल्लकअसतील, तर त्याच्याकडे सुरुवातीला कितीटोपल्या होत्या आणि त्याने किती टक्के टोपल्या विकल्या?
400, 46%
500, 50%
500, 48%
500, 46%
पुढील गणितामध्ये गायब असलेले अंक शोधून काढा
Option 1
Option 2
Option 3
Option 4
जर 278.10 ÷ 13.5 = 20.6, तर 27810 ÷ 1.35 म्हणजे
206.0
2060.0
2.06
20600
एक आगगाडी दुपारी 1: 45 वाजता एका स्टेशनवरून ताशी 96 किमी प्रति तास वेगाने निघते. 168 किमी दूर असलेल्या दुसऱ्या स्टेशनवर ती किती वाजता पोहोचेल?
दुपारी 3.00 वाजता
दुपारी 3.30 वाजता
दुपारी 3.45 वाजता
दुपारी 4.00 वाजता
शुक्रवारी 1,250 लोक सर्कस बघायला गेले.शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी बघायला गेले. सगळे मिळून या दोन दिवसांत किती लोकसर्कस बघायला गेले? .
3750
5000
2450
6200
नऊ हजार शंभर रुपयाचे द.सा.द.शे .पाच दराने किती वर्षात सरळव्याज 1823 रुपये होईल?
4%
2%
9%
3%
पुढील आलेखात एका विद्यार्थ्याने वेगवेगळ्या विषयात मिळवलेले गुण दाखवले आहेत. त्याला सर्व विषयात मिळून एकूण किती गुण मिळाले ?
150
170
190
200
पुढीलपैकी कोणता समतोल आहे ?
Option 1
Option 2
Option 3
Option 4
एका दुकानदाराने आठवड्यातील पहिल्या पाचदिवसांत विकलेल्या सफरचंदांच्या करंड्यांचीसंख्या चित्रालेखात दिलेली आहे
210
410
260
350
9 रीम = किती कागद ?
4320
108
216
1296
4 मीटर = ——— डेसी मीटर
40000
4000
400
40
25 किमी 850मी +17 किमी 50 मी =?
39 किमी 900 मीटर
39 किमी 800 मी
40 किमी 900मी
40 किमी 350मी
एका दुकानदाराने 580 किलोग्रॅम500 ग्रॅम साखर पैकी 395 किलो 850 ग्रॅम साखर विकली तर त्याच्याकडे किती साखर शिल्लक राहिली?
184 किग्रॅ 350 ग्रॅम
183 किग्रॅ 550 ग्रॅम
184 किग्रॅ 650 ग्रॅम
183 किग्रॅ 750 ग्रॅम
ज्या कोनाचे माप 0° पेक्षा जास्त व 90° पेक्षा कमी असते,त्यास ————- म्हणतात.
विशालकोन
काटकोन
यापैकी नाही
लघुकोन
96030 + 66897 = ?
594241
178299
729267
162927
96870 + 83616 = ?
180486
281526
180966
597526
वजाबाकी करा.
L – XX =?
XV
XL
LX
XXX
रोमन संख्याचिन्ह पद्धतीत कोणत्या संख्येसाठी संख्याचिन्ह वापरले जात नाही?
दोनशे
शंभर
शून्य
पन्नास
योग्य पर्याय निवडा.
>
<
8542 – 6214 = ?
7115
2328
6794
5628
3645 – 1155 = ?
2470
3285
7013
2490
अंशाधिक अपूर्णांकात रुपांतर करा.
पर्याय एक
पर्याय दोन
पर्याय तीन
पर्याय चार
सोडवा 2820 ÷ 12 =?
215
245
225
235
पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही.
11 व 13
71 व 73
41 व 43
67 व 71
74या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 594 असल्यास तो अंक ओळखा.
5
6
7
3
932या संख्येत फुल्यांच्या ठिकाणी समान अंक आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 4995 आहे तर फुलीच्या जागी कोणता अंक असेल ?
2 points
5
6
3
4
2,4,8,3 हे चार अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी समसंख्या कोणती?
8432
8342
8234
यापैकी नाही
एक पंचमांशचा सममूल्य अपूर्णांक ——— आहे.
2 points
2/5
4/20
5/20
7/28
एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 5544 चौ. सेमी आहे. तर त्या मैदानाची त्रिज्या काढा?
4 points
24 सेमी
44 सेमी
42 सेमी
34 सेमी
सार्थककडे 7/8 पिझ्झा शिल्लक असल्यास, सार्थकने किती भाग पिझ्झा खाल्ला आहे?
A) 1/8
B) 1/4
C) 3/4
D) 7/8
Test was good
I like to solve questions in it
Good
Marathi&ganet
Test was good
At post Mozari Ta Tivosa Dis Amaravati
Sanskruti Sachin Nirbhavane
At Post Mozari Ta Tivosa Dis Amaravati
My favorite subject is scholarship
Mala he test sidawayache
Jila prathmik Sha
Test was good