Singular and Plural in Marathi

नामावरून जसे आपल्याला लिंग समजते तसे त्याच नामाने निर्देशित केलेली वस्तू एक आहे की एका पेक्षा जास्त आहे हे ही समजते.

नामाच्या ठिकाणी संख्या सचविण्याचा जो एक धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. वचन या शब्दाचा अर्थ बोलणे होय.

मराठी भाषेत वचने 2 प्रकारची आहेत.

1) एकवचन

2) अनेकवचन

वचनभेदामुळे नामांच्या रूपात होणारा फरक

नामाचे जे मृूळ रूप असते तेच त्याचे एकबचन असते, नामांची अनेकवचनांची रूपे बनविताना काही नामांना प्रत्यय लागतात. तर काहींची खूपे एकवचनासारखीच राहतात.

1) पुल्लिंगी नामांची अनेकवचने :

राजा-राजे, फळा-फळे, कुत्रा-कुत्रे, आंबा-आंबे

(अ कारांत पुल्लिंगी शब्दाचे रूपांतर ‘ए ‘कारांत होते.)

आंबा-आंबे

कुत्रा-कुत्रे

ससा-ससे

मासा-मासे

कावळा-कावळे

बगळा-बगळे

मळा-मळे

कोल्हा-कोल्हे

माळा-माळे

घोडा-घोडे

रस्ता-रस्ते

2) ‘अ कार्रांत खेरीज इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात :

उदा. देव-देव, उंदीर -उंदीर, फोटो-फोटो, गहू-गहू

दिवस-दिवस

वार-वार

वीर-वीर  

तीर-तीर

पथक-पथक 

मार्ग-मार्ग

तरुण-तरुण

मित्र-मित्र  

पुत्र-पुत्र  

सैनिक-सैनिक

उमेदवार-उमेदवार

पक्ष-पक्ष

गुन्हेगार-गुन्हेगार

पोलीस-पोलीस

चोर-चोर

3) स्त्रीलिंगी शब्दांचे नामांचे अनेकवचन

  • भिंत – भिंती
  • वेळ – वेळा 
  • म्हैस – म्हशी
  • धार-धारा
  • वाट-वाटा
  • खाट-खाटा
  • लाट-लाटा
  • माळ-माळा
  • घागर-घागरी
  • भिंत-भिंती
  • सहल-सहली
  • पंगत-पंगती
  • वरात-वराती
  • सर-सरी
  • नथ-नथी
  • भुवई-भुवया
  • लढाई-लढाया
  • रजई-रजया
  • बाई-बाया
  • सुई-सुया
  • चटई -चटया
  • होडी-होड्या
  • पोरगी-पोरी
  • मुलगी-मुली
  • सोय-सोयी
  • सासु-सासवा
  • जाऊ-जावा
  • गाय-गाई
  • ऊ-ऊवा
  • नदी-नद्या
  • चांदणी-चांदण्या
  • वाडी-वाड्या
  • भाकरी -भाकऱ्या
  • खाडी-खाड्या
  • साडी-साड्या
  • नक्कल-नकला
  • थप्पड-थापडा
  • पक्कड-पकडी
  • चप्पल-चपला
  • किंमत-किंमती
  • गंमत-गंमती
  • रक्कम-रकमा
  • जीभ-जिभा
  • स्त्री-स्त्रीया
  • बी-बीया
  • वीट-विटा
  • शीर-शिरा
  • शीग-शिगा
  • चूक-चूका
  • बहीण-बहीणी
  • मिरवणूक-मिरावणूका
  • मैत्रीण-मैत्रिणी
  • निवडणूक-निवडणूका
  • विहीर-विहिरी
  • सून-सूना
  • तारीख-तारखा
  • खारीक-खारका

अंकारांत स्रीलिंगी नामांचे अनेकवचन ‘आ कारांत होते ‘य’ नंतर ई आल्यास उच्चारात ‘य’ चा लोप होतो

उदा. गाय-गायी- गाई

सोय-सोयी-सोई

4) ‘आ कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन सारखेच राहते

उदा. गंगा-गंगा 

शाळा-शाळा 

दिशा-दिशा

भाषा भाषा 

प्रार्थना -प्रार्थना 

प्रतिज्ञा -प्रतिज्ञा 

दिशा – दिशा 

5) ‘उकारांत स्त्रीलंगी नामाचे अनेकवचन ‘वा’कारांत होते.

उदा. पिसू-पिसवा जाऊ-जावा

ऊ-उवा

6) ईकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ‘या’कारांत होते.

उदा. सुतळी–सुतळ्या

साडी – साड्या 

7) ‘ए -ऐ कारांत स्त्रीलिंगी शब्दांची रूपे ‘आ-या कारांत होतात,

.उदा. आते-आता 

पै- पया

8)ओ कारांत स्त्रीलिंगी शब्दांचे अनेकवचन “आ कारांत होते.

बायको-बायका

9) नपुसकलंगी ‘अ कारांतची अनेकवचने ‘एं’कारांत होतात.

उदा. घर-घरे

फूल-फुले

साडी-साड्या

फळ – फळे

गाव- गावे 

मत – मते 

दार – दारे 

झाड-झाडे

गाव-गावे

घर-घरे

दार-दारे

मत-मते

फळ-फळे

गाणे-गाणी

तळे-तळी

खेडे-खेडी

मडके-मडकी

डोके-डोकी

खेळणे-खेळणी

पिल्लू-पिल्ले

लिंबू-लिंबे

वासरू-वासरे

पाखरू-पाखरे

लेकरू-लेकरे

छप्पर-छपरे

डुक्कर-डुकरे

हरिण-हरिणे

गळू-गळवे

लाकूड-लाकडे

देऊळ-देऊळे

शीत-शीते

मुल-मुले

सील-सीले

फुल-फुले

मूळ-मुळे

कोकरू-कोकरे

(अपवाद : पाणी, लोणी, दही, अस्थी सोड़न)उदा. मोती-मोत्ये मिरी-मिन्ये

वचनाविषयी विशेष गोष्टी :

10) ई कारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’कारांत होते. विकल्पाने ‘य’ हा आदेश होतो.

11) ‘उ-ऊ कारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’कारांत होते. क्वचित प्रसंगी ‘वें कारांत होते.

उदा. वासरू-वासरे, गळू-गळवे, लिंबू-लिंबे, पिलू -पिले

12) ‘एकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘ईकारांत होते. (अपवाद : सोने, रूपे, तांबे, शिसे)

13) उभयवचनी दोन्ही वचनात येणारे शब्द. उदा. वकील, इंजिनिअर

1) केव्हा केव्हा व्यक्ती एक असूनही त्याच्याबद्दल आदर दाखविण्यासाठी अनेकवचन वापरतात.

उदा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दक्षिणेतील मोहीम यशस्वी केली.

2)काही नामे नेहमी अनेकवचने असतात. 

उदा. डोहाळे, शहारे, हॉल, रोमान्स

डोहाळे, शहारे, हाल,उदा.

3) गटामध्ये अनेक वस्तू असतात. परंतु तो गट, समूह मानून एकवचनी मानतात.

उदा. ढीग, तुकडी, आठवडा

4) अधिक जवळीक दाखवयाची असेल तेव्हा मोठया व्यक्तीबाबत एकवचन वापरण्यात येते.

उदा. 1) दादा गावाहन आताच आला.

2) वहीनी उद्या येणार आहे.

5) विपुलता दाखविण्यासाठी काही शब्दांचे एकवचन वापरतात.

1) यंदा खूप आंबा पिकला.

2) यात्रेला लाख माणूस जमले होते.

Singular and Plural in Marathi

4 thoughts on “Singular and Plural in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!