यावर्षी इयत्ता चौथी पाचवी सातवी आठवी या चारही वर्षासाठी शिष्यवृत्ती परीक्षा
राज्यातील शिक्षक संघटनाची मागणी मंजूर
चौथी सातवी शिष्यवृत्ती परीक्षा बाबत येत्या आठ दिवसात शासन निर्णय काढणार
जिल्हा परिषद नगरपालिका शाळांना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये बहुतांश इयत्ता चौथी किंवा सातवी पर्यंतच वर्ग आहे. इयत्ता पाचवी व आठवी या वर्गांना शिष्यवृत्ती परीक्षा असल्याने या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहत होते.म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभाग घेता यावा यासाठी राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारी 2026 मध्ये पाचवी व आठवी या वर्गाबरोबरच इयत्ता चौथी आणि सातवी या वर्गांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे
महाराष्ट्र राज्यात 1956 त्यापासून इयत्ता चौथी व सातवी या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा यापूर्वी घेण्यात येत होती. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक आणि माध्यमिक वर्गामध्ये झालेल्या बदलामुळे 2016 पासून इयत्ता पाचवी व आठवी या वर्गांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येऊ लागली.
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व नगरपालिका बहुतांश शाळा या इयत्ता चौथी व सातवीपर्यंतच असल्याने या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहत होते. आणि आता स्वराज्य संस्थांच्या शाळेत शिष्यवृत्ती परीक्षा घेतली गेल्याने जिल्हा परिषद नगरपालिका शाळांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची पुन्हा संधी मिळणार.
.