Tark va Anuman MCQs for Scholarship and Competitive Exams

तर्क व अनुमान

तर्क व अनुमान या घटकावर आधारित व्हिडिओ पहा आणि त्यावर आधारित सराव पेपर सोडवा.

सुनीता व अनिता यांच्या वयाची बेरीज 54 वर्षे आहे. सुनिता चे वय अनिताच्या वयाच्या दुप्पट आहे तर अनिताचे वय किती वर्षे?
(A) 36 वर्षे
(B) 18 वर्षे
(C) 24 वर्षे
(D) 22 वर्षे
सुनील चा जन्म 1978 चा व अनिलचा जन्म 1981 चा आहे. तर 2000 साली त्यांच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल?
(A) 12 वर्षे
(B) 14 वर्षे
(C) 19 वर्षे
(D) 3 वर्षे
अजय चे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/4 पेक्षा 4 ने जास्त आहे. वडिलांचे वय 48 वर्षे असेल तर अजयचे वय किती वर्षे?
(A) 12 वर्षे
(B) 16 वर्षे
(C) 19 वर्षे
(D) 14 वर्षे
सुलाबाई चे वय त्यांच्या चार नातवांच्या वयाच्या सरासरी एवढे आहे. जर सरासरी 64 वर्षं असेल तर चार नातवांच्या वयाची बेरीज किती वर्षे?
(A) 256 वर्षे
(B) 200 वर्षे
(C) 64 वर्षे
(D) यापैकी नाही
पिंकी व मिंकी यांच्या वयात सात वर्षांचे अंतर आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्षे असून मिंकी वयाने मोठी आहे तर पिंकी चे वय किती वर्षे?
(A) 17 वर्षे
(B) 20 वर्षे
(C) 10 वर्षे
(D) 14 वर्षे
राघवचे वय अनघाच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांची बेरीज 48 असल्यास राघव चे वय किती?
(A) 12 वर्षे
(B) 36 वर्षे
(C) 35 वर्षे
(D) 40 वर्षे
आई व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. त्यांच्या वयातील फरक 20 वर्षे आहे तर पाच वर्षांनंतर मुलाचे वय किती वर्ष असेल?
(A) 20 वर्षे
(B) 30 वर्षे
(C) 25 वर्षे
(D) 35 वर्षे
सहा वर्षांपूर्वी राधा व सुविधा यांच्या वयाची बेरीज 45 वर्षे होती. पाच वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे असेल?
(A) 45 वर्षे
(B) 50 वर्षे
(C) 55 वर्षे
(D) 40 वर्षे
आदित्य व विजय यांच्या वयाची बेरीज 31 वर्षे आहे. आदित्य विजय पेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे तर विजय चे वय किती वर्षे?
(A) 13 वर्षे
(B) 28 वर्षे
(C) 36 वर्षे
(D) यापैकी नाही
आजी व नातवाच्या वयात 52 वर्षांचे अंतर आहे. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 88 वर्षे असेल तर पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे?
(A) 78 वर्षे
(B) 42 वर्षे
(C) 60 वर्षे
(D) 83 वर्षे
सुमन, राधा व शर्मा यांच्या आजच्या वयाची बेरीज 36 आहे. त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:4:3 आहे तर राधा चे दहा वर्षानंतरचे वय किती?
(A) 20 वर्षे
(B) 12 वर्षे
(C) 9 वर्षे
(D) 22 वर्षे
आशा व लता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. लता व सुमन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. आशा व सुमन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. तर सुमन चे आजचे वय किती वर्षे आहे?
(A) 15 वर्षे
(B) 21 वर्षे
(C) 18 वर्षे
(D) 12 वर्षे
राघव माधव पेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. आणखी पाच वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज 70 वर्षे होईल तर माधव व राघव यांची आजची वये किती?
(A) 36 वर्षे, 24 वर्षे
(B) 30 वर्षे, 18 वर्षे
(C) 15 वर्षे, 22 वर्षे
(D) यापैकी नाही
अ चे वय क च्या वयाच्या दुप्पट पण ब च्या 3/2 पट आहे. त्यांच्या वयाची बेरीज 52 वर्षे असल्यास क आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर किती?
(A) 4 : 3
(B) 3 : 4
(C) 5 : 4
(D) 4 : 5
अजय चे वय रमेशच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी असून धोंडीबाच्या 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. जर धोंडीबा 70 वर्षांचा असेल तर तिघांच्या वयाची बेरीज किती?
(A) 122
(B) 128
(C) 142
(D) 132

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!