NMMS परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट सिरीज
सूचना
उपधटक – 1.1 : नैस्गेक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णाक संख्या, परिमेय संख्या,अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या
नैसर्गिक संख्या : 1,2, 3, 4, 5, .या समूहातील संख्यांना मोजसंख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणतात.
पूर्ण संख्या : ০, 1, 2, 3, 4, 5, ………. या समूहातील संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात.
पूर्णाक संख्या :.,,-3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4,………. या समूहातील संख्यांना पूर्णाक संख्या म्हणतात.
परिमेय संख्या : a ही पूर्णाक संख्या व b ही शुन्येत्तर पूर्णाक संख्या असेल तर a/b या संख्येला परिमेय संख्या म्हणतात..
अपरिमेय संख्या : ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते, त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात.
√2 = 1.41421356…..
पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे अपरिमेय संख्या असतात.
वास्तव संख्या : परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हीचा मिळून जो संख्यासमूह तयार होतो, त्याला वास्तव संख्यांचा समूह म्हणतात.
प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते.
प्रत्येक अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते.
1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही.
0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही.
0 ही धन किंवा ऋण संख्या नाही.
-। ही सर्वात मोठी ऋण पूर्णाक संख्या आहे. सर्वात लहान ऋण पूर्णाक संख्या सांगता येत नाही.
NMMS & Scholarship परीक्षा टेस्ट सिरीज (परिमेय व अपरिमेय संख्या)
इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षा व NMMS परीक्षा टेस्ट सिरीज
पुढीलपैकी नैसर्गिक संख्या समूह कोणता आहे?
- -7/2, 8/-2, -2, 5, 31/5
- 1,2,3,4,———–
- 0,1,2,3,4,———–
- ——- -3,-2,-1,0,1,2,3,4,———–
पुढीलपैकी पूर्ण संख्या समूह कोणता आहे?
- -7/2, 8/-2, -2, 5, 31/5
- 0,1,2,3,4,———–
- ——- -3,-2,-1,0,1,2,3,4,———–
- 1,2,3,4,———–
पुढीलपैकी पूर्णांक संख्या समूह कोणता आहे?
- -7/2, 8/-2, -2, 5, 31/5
- 1,2,3,4,———–
- 0,1,2,3,4,———–
- ——- -3,-2,-1,0,1,2,3,4,———–
पुढीलपैकी परिमेय संख्या समूह कोणता आहे?
- ——- -3,-2,-1,0,1,2,3,4,———–
- 0,1,2,3,4,———–
- -7/2, 8/-2, -2, 5, 31/5
- 1,2,3,4,———–
जर m हा पूर्णांक आणि n ऋणोत्तर पूर्णांक असेल तर या स्वरूपातील संख्यांना ________ संख्या म्हणतात.
- नैसर्गिक
- अपरिमेय
- पूर्ण
- परिमेय
परिमेय नसणाऱ्या संख्यांना ________ संख्या म्हणतात.
- पूर्ण
- परिमेय
- अपरिमेय
- नैसर्गिक
दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान _______ परिमेय संख्या असतात.
- दोन
- तीन
- एक
- असंख्य
संख्या रेषेवरील संख्यांच्या प्रत्येक जोडीमध्ये डावीकडील संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा ______ असते.
- मोठी
- लहान
- समान
- यापैकी नाही
a/b आणि c/d या परिमेय संख्यामध्ये जर b आणि d धन असतील तर a× d < b ×c तर _____
- a/b < c/d
- a/b = c/d
- a/b > c/d
- यापैकी नाही
a/b आणि c/d या परिमेय संख्यामध्ये जर b आणि d धनु असतील तर a× d = b ×c तर _____
- a/b < c/d
- a/b = c/d
- a/b > c/d
- यापैकी नाही
a/b आणि c/d या परिमेय संख्यामध्ये जर b आणि d धनु असतील तर a× d > b ×c तर _____
- a/b < c/d
- a/b = c/d
- a/b > c/d
- यापैकी नाही
दोन ऋण संख्यांची तुलना करताना a,b या धन संख्या असून a < b तर ____
- a > b
- – a > b
- a > – b
- – a > – b
__________ ही संख्या अपरिमेय संख्याचे एक उदाहरण आहे.
- π ( पाय )
- 3.14
- 22/7
- यापैकी सर्व
परिमेय संख्यांचे दशांश रूप अखंड ________ असते
- आवर्ती
- अनावर्ती
- आवर्ती व अनावर्ती
- यापैकी नाही
अपरिमेय संख्यांचे दशांश रूप अखंड ________ असते
- आवर्ती
- अनावर्ती
- आवर्ती व अनावर्ती
- यापैकी नाही
पुढीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे?
- π
- √2
- 0.3
- √7
पुढीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे?
- √121
- √9
- 3.14
- √5
पुढीलपैकी कोणती संख्या ही नैसर्गिक संख्या आहे ?
- 2 1/3
- -7
- -2. 1/3
- 7
7/4 चे पुढीलपैकी दशांश रूप कोणते ?
- 1.70
- 1.72
- 1.75
- 1.76
– 29/5 या संख्येचे पुढीलपैकी दशांश रूप कोणते ?
- 5.8
- -5.8
- – 5.7
- 5.7
1,2,3,4,5,………..या संख्यांना ——– म्हणतात
- नैसर्गिक संख्या
- पूर्णांक संख्या
- पूर्ण संख्या
0,1,2,3,4,5,………..या संख्यांना ——– म्हणतात
- नैसर्गिक संख्या
- पूर्णांक संख्या
- पूर्ण संख्या
√21 ही परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे ?
- 20 व 21
- 20 व 22
- 4 व 5
- 5 व 6
—— -4,-3,-2,-1,0,1,2,3,4,5,………..या संख्यांना ——– म्हणतात
- नैसर्गिक संख्या
- पूर्णांक संख्या
- पूर्ण संख्या
योग्य विधान ओळखा
- a/b या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात.
- यात a व b या पूर्णांक संख्या आहेत.
- यात b ही संख्या शून्य नाही.
- वरील सर्व विधाने बरोबर आहे
संख्यारेषा वरील डावीकडील संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा ——- असते.
- मोठी
- लहान
- समान
- निश्चित सांगता येत नाही.
चुकीचे विधान ओळखा
- 5 या संख्येचा गुणाकार व्यस्त 1/5 आहे.
- 2 या संख्येचा गुणाकार व्यस्त 1/2 आहे.
- -1 या संख्येचा गुणाकार व्यस्त +1 आहे
- शून्य या संख्येचा गुणाकार व्यस्त सांगता येत नाही.
√ 11 ही परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे?
- 10 व 12
- 3 व 4
- 11 व 12
- 4 व 5
9/5 =1.8 यात बाकी शून्य येते . म्हणून अशा दशांश रूपाला ———- म्हणतात.
- खंडित दशांशरूप
- अखंड आवर्ती दशांशरुप
6/9 अशा दशांश रूपाला ———- म्हणतात.
- खंडित दशांशरूप
- अखंड आवर्ती दशांशरुप
Eyze
Hard
So easy
Text
so easy