8th Class Science Chapter 2 | Health and disease

8th Science Chapter 2 Health and Diseases

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज 

1)एड्स हा रोग —————- या विषाणूमुळे मानवाला होतो.

  1. एच.आय.व्ही.
  2. मायकोबॅक्‍टेरिअम ट्युबरक्‍युली
  3. व्‍हिब्रियो कॉलरी
  4. सालमोनेला टायफी

2)जागतिक मधुमेह  दिन ———————– दिवशी असतो.

  1. 29 सप्टेंबर
  2. 7 एप्रिल
  3. 14 जून
  4. 14 नोव्हेंबर

3)एच. आय.व्ही . चा विषाणू पहिल्यांदा आफ्रिकन ———च्या प्रजातीत  सापडला.

  1. माकड
  2. वटवाघळ
  3. डुक्कर
  4. कुत्रा

4)स्वाईन फ्ल्यू या आजारचा प्रथम बाधित व्यक्ती 2009 साली——–या देशात सापडला गेला.    

  1. आफ्रिका
  2. चीन
  3. नोर्वे
  4. मेक्सिको

5)शरीरक्रियात्‍मक किंवा मानसशास्‍त्रीयरीत्‍या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्‍थिती म्‍हणजे ———- होय.

  1. आरोग्य
  2. वरीलपैकी नाही
  3. संसर्ग
  4. रोग

6)एच. आय.व्ही . चा विषाणू पहिल्यांदा ———-माकडाच्या प्रजातीत  सापडला.

  1. अमेरिकन
  2. वरीलपैकी नाही
  3. आशियन
  4. आफ्रिकन

7)————————  हा जीवाणूजन्य आजार आहे.

  1. कृष्टरोग
  2. डेंग्यू
  3. स्नायूची विकृती
  4. पोलिओ

8)रेबीज या आजारचे ———————-  हे मुख्य लक्षण आहे.

  1. ताप
  2. वाढलेली तहान
  3. छातीत वेदना
  4. जलद्‍वेष

9)खालीलपैकी कालावधीनुसार रोगाचा प्रकार कोणता?

  1. डाऊन संलक्षण
  2. डेंग्यू
  3. तीव्र रोग
  4. फ्लू

10)रेबीज या आजारचे विषाणू मेंदुमध्ये —————– मार्फत प्रवेश करतात.

  1. पाणी
  2. अन्न
  3. मज्जातंतू
  4. वरीलपैकी नाही

11)पुढीलपैकी कोणते जिवाणू पटकी या आजारास कारणीभूत आहेत ?

  1. मायकोबॅक्‍टेरिअम ट्युबरक्‍युली
  2. सालमोनेला टायफी
  3. व्‍हिब्रियो कॉलरी
  4. वरीलपैकी नाही

12)जागतिक आरोग्य दिन ———————– दिवशी असतो.

  1. 14 नोव्हेंबर
  2. 29 सप्टेंबर
  3. 14 जून
  4. 7 एप्रिल

13)खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य  रोग नाही?

  1. क्षयरोग
  2. कावीळ
  3. डाऊन संलक्षण
  4. पटकी

14)दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक (कीटक व प्राणी) याद्वारे पसरणारे रोग म्हणजे ————- होय.

  1. संसर्ग रोग
  2. तीव्र रोग
  3. असंसर्ग रोग
  4. वरीलपैकी नाही

15)खालीलपैकी कोणते लक्षण क्षयरोगचे नाही ?

  1. पातळ जुलाब
  2. श्वासोच्छवास प्रक्रियेत त्रास
  3. डोकेदुखी
  4. दीर्घ मुदतीचा खोकला

16)सांडपाण्यात —————प्रकारचे डास वाढतात.

  1. एडिस
  2. कुलेक्स
  3. अनोफीलस
  4. वरीलपैकी सर्व

17)खालीलपैकी संसर्गजन्य  रोग कोणता?

  1. मधुमेह
  2. डाऊन संलक्षण
  3. डेंग्यू
  4. तीव्र रोग

18)एच. आय.व्ही चे विस्तारीत रूप ——————- आहे.

  1. ह्यूमन इम्युनिटी डेफिश्यंसी व्हायरस
  2. ह्यूमन इम्युनो डेफिश्यंसी व्हायरस
  3. ह्यूमन इम्युनो डिकरीज व्हायरस
  4. वरीलपैकी नाही

19)स्वाईन फ्ल्यू  या आजाराच्या संसर्गसाठी  ————– हे विषाणू कारणीभूत आहे.

  1. एच 1एन 1.
  2. एच 1बी 1.
  3. एच 1एन 5
  4. वरीलपैकी नाही

20)जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण——— आढळतात.

  1. अमेरिका
  2. आफ्रिका
  3. इंग्लंड
  4. भारत

21)डेंग्यू या आजाराचे  सर्वांत महत्त्वाचे लक्षण  म्हणजे ————-दुखणे .

  1. हात
  2. मेंदू
  3. डोळ्यांच्या खोबणीत
  4. पाय

22)अतिसार/हगवण हा  आजार———– या जीवाणूमुळे होतो.

  1. सालमोनेला टायफी
  2. वरीलपैकी नाही
  3. बॅसीलस
  4. व्‍हिब्रियो कॉलरी

23)————————  हा वीषाणूजन्य आजार आहे .

  1. एड्स
  2. कृष्टरोग
  3. डेंग्यू
  4. हिवताप

24)पुढीलपैकी कोणता  आजार जीवाणूमुळे होत  नाही?

  1. प्लेग
  2. टी.बी.
  3. पटकी
  4. एड्स

25)खालीलपैकी कोणता रोगदुषीत पाणी व अन्नमार्फत पसरत  नाही?

  1. क्षयरोग
  2. अतिसार
  3. विषमज्वर
  4. पटकी

26)नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि ‘यू एन एड्स’ यांच्यानुसार भारतात —— टक्के संसर्ग असुरक्षित विषम लैंगि क संबंधातून पसरत आहेत.

  1. 80 ते 82
  2. 80 ते 85
  3. 80 ते 86
  4. 83 ते 87

27)जागतिक हृदय  दिन ———————– दिवशी असतो.

  1. 7 एप्रिल
  2. 29 सप्टेंबर
  3. 14 नोव्हेंबर
  4. 14 जून

28)एन.आय.व्ही . ही संस्था ————————- येथे स्थित  आहे.

  1. मुंबई
  2. दिल्ली
  3. पुणे
  4. नागपूर

29)—————— हा अनुवांशीक  आजार नाही.

  1. मधुमेह
  2. हिमोफिलिया
  3. विषमज्वर
  4. रंगांधळेपणा

30)अतिसार/हगवण या आजाराच्या रूग्णाला ————— हे औषध उपचार म्हणून देतात.

  1. ओ.आर.एस
  2. शीतपेय
  3. लिंबाचा रस
  4. वरीलपैकी नाही

31)जेनेरिक औषधांना ————- औषधे म्हणतात .

  1. आयुर्वेदिक
  2. ब्रँडडेड
  3. सामान्य
  4. वरीलपैकी नाही

32)खालीलपैकी अंनुवंशिक रोग कोणता?

  1. डाऊन संलक्षण
  2. तीव्र रोग
  3. डेंग्यू
  4. फ्लू

33)शारीरिक,मानसिक आणि सामाजिकरीत्‍या पूर्ण तः सुदृढ असण्याची स्‍थिती म्‍हणजे ———-

  1. आरोग्‍य
  2. संसर्ग
  3. वरीलपैकी नाही
  4. रोग

34)पुढीलपैकी कोणते लक्षण घशाच्या कर्करोगाचे नाही?

  1. दीर्घकालीन खोकला
  2. गिळताना त्रास होणे
  3. आवाज घोगरा होणे
  4. शर्करेची अंनियंत्रित पातळी

35)डेंग्यू हा आजार ——-प्रकारचा  डास चावल्यामुळे  पसरतो.

  1. कुलेक्स
  2. वरीलपैकी नाही
  3. एडिस इजिप्‍ती
  4. अनोफीलस

 36)खालीलपैकी कोणते लक्षण विषमज्वर या आजारचे आहे ?

  1. राखाडी विष्‍ठा
  2. पिवळी लघवी
  3. 104˚c पर्यन्त ताप येणे
  4. पोटदुखी

37)स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूंचा प्रसार रोग्याच्या —————- मधून होतो. होतो.

  1. घाम
  2. थुंकी
  3. शिंक
  4. रक्त

38)मलेरिया, हा आजार ——-प्रकारचा  डास चावल्यामुळे  होतो॰

  1. female culex
  2. मादी एडिस इजिप्‍ती
  3. मादी अनोफीलस
  4. वरीलपैकी नाही

39)पुढीलपैकी कोणते विषाणू कावीळ या आजारास कारणीभूत आहेत?

  1. एन्टामिबा
  2. जीवाणू, विषाणू
  3. हेपॅटीटीस A,B,C,D,E
  4. वरीलपैकी नाही

40)स्वाईन फ्ल्यू या आजारचा प्रथम बाधित व्यक्ती ————– या वर्षी नोंदविला गेला.

  1. 2010
  2. 2009
  3. 2007
  4. 2008

41)स्वाईन फ्ल्यू  या आजाराची लक्षणे ————–आहेत?

  1. घसा खवखवणे
  2. श्वसनाला अडथळा
  3. वरीलपैकी सर्व
  4. शरीर दुखणे

42)मधुमेह या आजारचे योग्य निदान कण्यासाठी ———- चाचणी वापरतात.

  1. CBC
  2. HbA1C
  3. BMP
  4. ELISA

43)खालीलपैकी असंसर्गजन्य  रोग कोणता?

  1. डाऊन संलक्षण
  2. डेंग्यू
  3. तीव्र रोग
  4. मधुमेह

44)जर इन्सूलिन या संप्रेरकाचा स्त्राव ——————— असेल तर मधुमेह हा आजार होतो.

  1. कमी
  2. वरीलपैकी नाही
  3. जास्त
  4. खुपजास्त

45)डेंग्यू या आजारामध्ये   रक्तातील ————यांचे प्रमाण कमी होते ,त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होतो.

  1. रक्तबिंबिका
  2. श्वेत रक्तपेशी
  3. तांबड्या रक्तपेशी
  4. प्लाझ्मा

46)कावीळ बी. हा आजार ———————- मार्फत संक्रमित होतो.

  1. कीटक चावणे
  2. रक्‍त पराधन
  3. अन्न
  4. वरीलपैकी सर्व

47)एड्स या रोगाचे नेमके निदान करण्यासाठी ———- ही रक्ताची चाचणी वापरली जाते.

  1. ELISA
  2. CBC
  3. BMP
  4. TSH

48)हत्तीरोग, हा आजार ——-प्रकारचा  डास चावल्यामुळे  होतो॰

  1. female anopheles
  2. मादी कुलेक्स
  3. मादी एडिस इजिप्‍ती
  4. वरीलपैकी नाही

49)जागतिक रक्तदान  दिन ———————– दिवशी असतो.

  1. 14 नोव्हेंबर
  2. 7 एप्रिल
  3. 29 सप्टेंबर
  4. 14 जून

50)पुढीलपैकी कोणता  उपचार  कर्करोगाचा नाही?

  1. किरणोपचार
  2. रसायनोपचार
  3. प्राणायाम
  4. शल्यचिकित्सा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!