NMMS परीक्षा टेस्ट सिरीज इयत्ता 8वी, विषय -भूगोल, प्रकरण क्रमांक 3आर्द्रता व ढग
LEARNING WITH SMARTNESS
NMMS परीक्षा – टेस्ट सिरीज
इयत्ता : 8 वी
विषय : भूगोल
प्रकरण क्रमांक : 3 – आर्द्रता व ढग
(एकूण प्रश्न : 20 | प्रत्येक प्रश्न 2 गुण)
प्रश्नपत्रिका
1️⃣ ढग हवेत तरंगतात कारण…
(1) ते उंच असतात
(2) ढगातील जलकण, हिमकण जवळजवळ वजनरहित अवस्थेत असतात
(3) ढगातील जलकण खूप जड होतात
(4) ढगातील हिमकण खूप जड होतात
2️⃣ ……मुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात.
(1) बाष्पीभवन
(2) हवा
(3) तापमान
(4) सांद्रीभवन
3️⃣ कमी उंचीवरील ढग आकाराने ….. असतात तर जास्त उंचीवरील ढग आकाराने ….. असतात.
(1) मोठे, लहान
(2) लहान, मोठे
(3) सारखे, सारखे
(4) यापैकी नाही
4️⃣ चुकीचा पर्याय निवडा. ढगांची उंची व त्यांचे मुख्य प्रकार दिले आहेत.
(1) 7000 मीटर ते 14000 मीटर – अति उंचीवरील ढग
(2) 2000 मीटर ते 7000 मीटर – मध्यम उंचीचे ढग
(3) 2000 मीटर पेक्षा कमी उंची – कमी उंचीचे ढग
(4) 2000 मीटर पेक्षा कमी उंची – जास्त उंचीचे ढग
5️⃣ चुकीचा पर्याय निवडा.
(1) सिरस – तंतुमय
(2) सिरोक्युम्युलस – वळ्या पडलेल्या चादरीसारखे
(3) सिरोस्ट्रेटस – वळ्या पडलेल्या चादरीसारखे
(4) सिरोक्युम्युलस – लहान लहान लाटांच्या समुदायासारखे
6️⃣ १) अल्टोक्युम्युलस हे ढग पांढरा रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात.
२) अल्ट्रोस्ट्रेटस हे ढग कमी जाडीचे थर असतात यातून सूर्यदर्शन दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते.
(1) दोन्ही विधाने सत्य आहेत
(2) दोन्ही विधाने असत्य आहेत
(3) सांगता येत नाही
(4) यापैकी नाही
7️⃣ ……या प्रकारच्या ढगातून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो.
(1) स्ट्रॅटोक्युम्युलस
(2) स्ट्रेटस
(3) निम्बोस्ट्रेटस
(4) यापैकी नाही
8️⃣ ……ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात.
(1) स्ट्रेटस
(2) क्युम्युलस
(3) निंबोस्ट्रेटस
(4) यापैकी नाही
9️⃣ ……ढग हे वादळाचे निदर्शक असतात.
(1) स्ट्रेटस
(2) क्युम्युलस
(3) क्युम्युलोनिम्बस
(4) यापैकी नाही
🔟 भारतामध्ये…….. असलेल्या राज्यांमध्ये ढगफुटी अशा प्रकारचा पाऊस पडलेला आढळतो.
(1) हिमालयाच्या रांगात
(2) मध्यभाग
(3) कोरडा भाग
(4) यापैकी नाही
11️⃣ ……ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे.
(1) बाष्पीभवन
(2) गोठण
(3) विचलन
(4) यापैकी नाही
12️⃣ बाष्पीभवनाची प्रक्रिया खालील बाबींवर अवलंबून असते. चुकीचा पर्याय निवडा.
(1) शुष्कता
(2) तापमान
(3) वाऱ्याचा वेग
(4) गोठण
13️⃣ १) कोरडी व दमट हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो.
२) अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते.
(1) दोन्ही विधाने सत्य आहेत
(2) दोन्ही विधाने असत्य आहे
(3) फक्त विधान क्रमांक एक असत्य आहे
(4) फक्त विधान क्रमांक दोन असत्य आहे
14️⃣ हवेतील….. चे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते.
(1) ऑक्सिजन
(2) बाष्प
(3) नायट्रोजन
(4) आरगॉन
15️⃣ हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा …….. च्या प्रमाणावर अवलंबून असतो.
(1) ऑक्सिजन
(2) नायट्रोजन
(3) आर्द्रता
(4) यापैकी नाही
16️⃣ १) हवा जसजशी थंड होते, तसतशी तिची बाष्प धारण क्षमता कमी होते.
२) गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते.
(1) दोन्ही विधाने चूक आहेत
(2) दोन्ही विधाने बरोबर आहेत
(3) फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
(4) फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
17️⃣ एका विशिष्ट तापमानाला हवेची बाष्प धारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेच्या या स्थितीला…. स्थिती म्हणतात.
(1) समान
(2) असमान
(3) बाष्पसंपृक्त
(4) यापैकी नाही
18️⃣ १) एक घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते.
२) विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते.
(1) दोन्ही विधाने सत्य आहेत
(2) दोन्ही विधाने असत्य आहेत
(3) फक्त विधान क्रमांक एक सत्य आहे
(4) फक्त विधान क्रमांक दोन सत्य आहे
19️⃣ वातावरणातील वायूरूप बाष्पाचे जल रूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला……. म्हणतात.
(1) बाष्पीभवन
(2) घनीभवन
(3) निरपेक्ष आर्द्रता
(4) सांद्रीभवन
20️⃣ खाली सांद्रीभवनाची रुपे दिली आहेत. चुकीचा पर्याय निवडा.
(1) बाष्प
(2) दव व दहिवर
(3) धुके
(4) ढग