प्रश्न 1
संख्या वाचा आणि अक्षरातील संख्येचा योग्य पर्याय लिहा. 425002
a) चार हजार दोनशे बावन्न
b) बेचाळीस हजार पाचशे दोन
c) चार लक्ष पंचवीस हजार दोन
d) बेचाळीस हजार बावन्न
प्रश्न 2
संख्या वाचा व अंकातील योग्य पर्याय लिहा. सात लक्ष सात हजार साठ
a) 70760
b) 707060
c) 770060
d) 707006
प्रश्न 3
संख्या वाचा आणि अक्षरातील योग्य पर्याय लिहा. 7000070
a) सात लक्ष सत्तर
b) सत्तर हजार सत्तर
c) सत्तर लक्ष सात
d) सत्तर लक्ष सत्तर
प्रश्न 4
अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत ओळखा.
(दिलेल्या संख्येतील अधोरेखित अंक पाहून उत्तर द्या)
a) 50000
b) 500000
c) 5000000
d) 5000
प्रश्न 5
खालील संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक ओळखा.
a) 899600
b) 89608
c) 8960
d) 889600
प्रश्न 6
संख्येचे विस्तारित रूप दिले आहे त्यावरून संख्या ओळखा. 50000+300+20+7
a) 5327
b) 50327
c) 500327
d) 50237
प्रश्न 7
संख्यांचा लहान–मोठेपणा ठरवा व योग्य पर्याय निवडा.
(संख्या दिलेल्या चित्रानुसार)
a) <
b) >
c) =
प्रश्न 8
संख्यांचा लहान–मोठेपणा ठरवा व योग्य पर्याय निवडा.
(संख्या दिलेल्या चित्रानुसार)
a) <
b) >
c) =
प्रश्न 9
महालक्ष्मी महिला बचत गटाने 153418 पापड केले.
राजलक्ष्मी महिला बचत गटाने 135981 पापड केले.
गजलक्ष्मी महिला बचत गटाने 141950 पापड तयार केले.
तर कोणत्या बचत गटाने सर्वात जास्त पापड तयार केले?
a) गजलक्ष्मी
b) राजलक्ष्मी
c) महालक्ष्मी
d) कोणीही नाही
प्रश्न 10
एक कोटी या संख्येत शून्य किती वेळा आला?
a) सहा वेळा
b) सात वेळा
c) पाच वेळा
d) आठ वेळा
प्रश्न 11
7,00,00,00,000 चे वाचन योग्य कोणते?
a) सात कोटी
b) सातशे कोटी
c) सत्तर कोटी
d) सात बिलियन
प्रश्न 12
1 कोटी मध्ये किती लाख असतात?
a) 100
b) 10
c) 1000
d) 1
प्रश्न 13
90,45,32,678 या संख्येचे योग्य वाचन कोणते?
a) नव्वद कोटी पंचेचाळीस लाख बत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर
b) नऊ कोटी पंचेचाळीस लाख बत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर
c) नव्वद लाख पंचेचाळीस कोटी बत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर
d) नऊशे कोटी पंचेचाळीस लाख बत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर
प्रश्न 14
सात कोटी पाच लाख बत्तीस हजार चारशे एक अंकात लिहा.
a) 7,05,32,401
b) 7,53,20,401
c) 70,53,24,001
d) 7,05,23,401
प्रश्न 15
5,08,67,245 या संख्येचे वाचन योग्य कोणते?
a) पाच कोटी आठ लाख सदुसष्ट हजार दोनशे पंचेचाळीस
b) पन्नास कोटी आठ लाख साठसात हजार दोनशे पंचेचाळीस
c) पाच कोटी ऐंशी सहा लाख बहात्तर हजार चारशे पाच
d) पाच लाख आठ कोटी साठसात हजार दोनशे पंचेचाळीस
Learning With Smartness