विरामचिन्हे
1) पूर्णविराम –
- 1) विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी पूर्ण विराम दिला जातो.
- (.)
- उदा. मी सहलीला जातो.
- 2) शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्य अक्षरामुळे टिंब दिले जाते.
- सादर नमस्कार / नमन
उदा. सा. न.
- दा. ले.
दामोदर लेले
2) अर्धविराम- दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययानी जोडलेली असतात.
(;)
उदा. गड आला; पण सिंह गेला.
3) स्वल्प विराम-
1) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात.
(,)
उदा. बागेत मोर, चिमणी, पोपट व कबुतर हे पक्षी होते.
2) संबोधन दर्शविताना
उदा. मुलांनो, इकडे लक्ष दया.
4) अपूर्णविराम- वाक्याच्या शेवटी तपशील दयावयाचा असल्यास-
(:)
उदा. चित्रकलेसाठी या गोष्टी लागतील : रंग, ब्रश, पेन्सिल, कागद, खोडरबर इ.
5) प्रश्नचिन्ह-
(?)
प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह वापरतात.
उदा. पुण्याला कधी जाणार?
6) उद्गारचिन्ह- उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह वापरतात.
(!) उदा. शी! शी! व्हा दूर. किती घाण केलं! नदी म्हणाली.
7) अवतरण चिन्ह :
1) दुहेरी अवतरण चिन्ह- बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता दुहेरी अवतरणचिन्ह वापरतात.
(” “) उदा. ते म्हणाले, “वर्षाला पन्नास हजार रुपये!”
2) एकेरी अवतरण चिन्ह – एखादया शब्दावर जोर दयावयाचा असला किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे
सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.
उदा. तिने ‘अभ्युदय’ या त्रैमासिकात प्रथमच लेखन केले.
8) संयोगचिन्हे- 1) दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर करतात.
(-) उदा. आई-वडील, मार्च-एप्रिलमध्ये
2) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्ह वापरतात.
उदा. आंतरराष्ट्रीय नाणे निधीमध्येही प्रतिनि-
धीत्व करण्याची संधी मिळाली.
9) अपसारण चिन्ह- 1) बोलता बोलता विचारमालिका ‘तुटल्यास डॅश वापरतात. (डॅश) (-)
उदा. मी खूप अभ्यास केला, पण
(डॅश) (-)
स्पष्टीकरण चिन्ह : 2) स्पष्टीकरण दयावयाचे असल्यास अपसारण चिन्ह वापरतात.
उदा. सुनिता विल्यमस्-जिने अंतराळभ्रमण केले-ती भारतीय आहे.
Punctuation Marks in Marathi