HSC EXAMINATION RESULT 2024 Maharashtra State | इयत्ता बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दिनांक 21 मार्च 2024 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
यावर्षी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान घेण्यात आली होती.
राज्यातील 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात विज्ञान शाखेतील सर्वात जास्त विद्यार्थी होते.

फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल जाहीर करणे बाबतच्या प्रकटनाची प्रत सोबत जोडली आहे.

सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.

विषय : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या निकालाबाबत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर,मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

http://mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

www.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

 www.tv9marathi.com

 http://results.targetpublications.org

वरील कोणत्याही वेबसाईटवरून आपण आपला निकाल पाहू शकता.

www.mahresult.nic.in

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्‍त संकेतस्थळांवरुन उपलब्धहोतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट ) घेता येईल. त्याचप्रमाणे digilocker app मध्ये digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडेऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://verification.mh-hsc.ac.in

स्वत: किंबा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक  २/०५/२०२४ ते बुधवार, दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क debit card/ credit card /UPI / net banking याद्वारे भरता येईल.

२) फेब्रुवारी-मार्च २०२४ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दृतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्ब विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५)श्रेणी/गुणसुधार class improvement scheme योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी ब श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक २७/०५/२०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीनेआवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

दिनांक: २०/०५/२०२४ 

सचिव

राज्य मंडळ, पुणे-०४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!