Chief Minister | My School | Sundar School | Phase 2


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२’

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२’

हे अभियान राबविणेबाबत.

  • १) स्कूल पोर्टल लॉगिन केल्यानंतर सर्वप्रथम मागील वर्षाची माहिती चेक करून घ्या.
  • २) ज्या माहती मधे बदल करावयाचा असेल त्याच चेकबॉक्स ला सिलेक्ट करा.
  • ३) बदल करावयाचे चेक बॉक्स सिलेक्ट झाल्यानंतर सबमिट बटणाला क्लिक करा.
  • ४) मुख्य पेज ओपन होईल.
  • ५) उजव्या कोपऱ्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बटणाला क्लिक करा
  • ६) माहिती चा फॉर्म ओपन होईल पहिली टॅब चा फोटो व माहिती भरा म्हणजे शाळेचे रजिस्टेशन झाले.

दिनांक:- २६ जुलै, २०२४

वाचा:- शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. मुमंअ-२०२३/प्र.क्र. ११४/एसडी-६, दि.३०.११.२०२३

प्रस्तावना :-

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.

या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला. अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यामध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैत्यन निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.

उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२४ – २५ देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

१. अभियानाची व्याप्ती -:

i) राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.

ii))या अभियानासाठी शाळांची विभागणी अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.

iii)सदर अभियान

अ) बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र

ब) वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच

क) उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल.

i) शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे.

ii) शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे.

iii) शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे.

i) दि. २९ जुलै ते दि.०४ ऑगस्ट, २०२४ हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त (शिक्षण) यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या कालावधीत करण्यात यावेत.

ii)

111)

iv)

दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल.

दि.०५ सप्टेंबर २०२४ ते दि. १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी.

त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल.

४. १ अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल.

अ) पायाभूत सुविधा – ३३ गुण

ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी – ७४ गुण

क) शैक्षणिक संपादणूक – ४३ गुण

अ) पायाभूत सुविधा – ३३ गुण

उपरोक्त अ,ब व क येथे नमूद उपक्रमांपैकी कोणते उपक्रम अभियान कालावधीत राबविणे आवश्यक आहे व कोणत्या उपक्रमांचे गूणांकन मागील शैक्षणिक वर्षाच्या कामकाजावर अवलंबून असेल याच्या सविस्तर सूचना आयुक्त (शिक्षण) यांच्या कार्यालयाकडून यथोचित वेळी निर्गमित करण्यात येतील

गट निश्चित करताना केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यक्षेत्रात त्यांना मुल्यांकन करता येणार नाही. थोडक्यात गट विकास अधिकाऱ्यांना केंद्र प्रमुखांना मुख्याध्यापकांना त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रांसाठी मुल्यांकनाची जबाबदारी द्यावी लागेल.

केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांचा गट त्यांना वाटप करण्यात आलेल्या क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना भेटी देऊन मूल्यांकनाचे कार्य करतील.

प्रत्येक केंद्रातून स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीतून प्रत्येकी एक शाळा स्वतंत्रपणे या गटाने निवडावयाची आहे.

केंद्र स्तरावर निवड झालेल्या शाळांमधून तालुका स्तरावरील दोन्ही वर्गवारीतून स्वतंत्रपणे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची शाळा निवडण्यासाठी खालीलप्रमाणे मुल्यांकन समिती असेल.

गट निश्चित करताना केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यक्षेत्रात त्यांना मुल्यांकन करता येणार नाही. थोडक्यात गट विकास अधिकाऱ्यांना केंद्र प्रमुखांना मुख्याध्यापकांना त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रांसाठी मुल्यांकनाची जबाबदारी द्यावी लागेल.

केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांचा गट त्यांना वाटप करण्यात आलेल्या क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना भेटी देऊन मूल्यांकनाचे कार्य करतील.

प्रत्येक केंद्रातून स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीतून प्रत्येकी एक शाळा स्वतंत्रपणे या गटाने निवडावयाची आहे.

केंद्र स्तरावर निवड झालेल्या शाळांमधून तालुका स्तरावरील दोन्ही वर्गवारीतून स्वतंत्रपणे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची शाळा निवडण्यासाठी खालीलप्रमाणे मुल्यांकन समिती असेल.

11 thoughts on “Chief Minister | My School | Sundar School | Phase 2

  1. शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!