Class 10|Geography|Chapter 3

इयत्ता दहावी भूगोल  प्राकृतिक रचना व  जल

प्राकृतिक रचना व जलप्रणाली

हिमालय l उत्तर भारतीय मैदान l द्वीपकल्प
l किनारपट्टीचा प्रदेश l द्वीपसमूह

प्राकृतिक रचना व जलप्रणाली Class 10|Geography|Chapter 3

हिमालय : हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे.
ताजकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे
पसरला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वतप्रणाली
आहे. भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत
हिमालय पसरला आहे.
हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक ही सर्वांतदक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वांत नवीन (अर्वाचीन) पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद् हिमालय (हिमाद्री) व हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन तेप्राचीन अशा आहेत.याच पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय (काश्मीर हिमालय), मध्य हिमालय (कुमाऊ हिमालय) व पूर्व हिमालय (आसाम हिमालय) असेही भाग केले जातात.
उत्तर भारतीय मैदान : हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या
उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान-पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरला आहे. हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे दोन विभाग केले जातात. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे.
भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांग्लादेश मिळून गंगा-ब्रम्हपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे.
हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखतात. हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. या मैदानाचीनिर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयनकार्यातून झालेली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.द्वीपकल्प : उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्यादक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यात अनेक लहान-मोठे पर्वत व पठारे आहेत. यांत उत्तरेकडील अरवलीहा सर्वांत प्राचीन वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्यभागातील विंध्य-सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत.

किनारपट्टीचा प्रदेश : भारताला सुमारे ७५०० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. द्वीपकल्पाच्यापूर्वेकडे व पश्चिमेकडेही किनारपट्टी आहे. या दोन्ही किनारपट्टींमध्ये बराच फरक आहे.पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्याशाखा या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. या किनारपट्टीचीरुंदीही कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्याअनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात, त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत.पूर्वकिनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्व वाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्वकिनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमीवेगाने वाहतात, त्यामुळेत्यांनी वाहून आणलेल्या गाळाचेसंचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते. या नद्यांच्यामुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. द्वीपसमूह : भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान-मोठी बेटे आहेत. त्यांचा समावेश किनारीबेटे या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांत प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटे असे संबोधतात, तर बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान-निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखली जातात.बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकणद्वीपे आहेत. ही विस्ताराने लहान असून त्यांची उंची कमी आहे. अंदमान समूहातील बेटेही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गतभागात उंच डोंगर आहे. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबारसमूहातही काही बेटे कंकणद्वीपाच्या स्वरूपात आहेत.ब्राझील :ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तरीतुमच्या लक्षात येईल, की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले व अतिउंच पर्वत नाहीत. उत्तरेकडील अॅमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्येविस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागातहीमैदाने विस्तीर्ण नाहीत. ब्राझीलचे प्राकृतिक भाग पुढीलप्रमाणे आहेत.l उच्चभूमी l अजस्र कडा l किनारी प्रदेशl मैदानी प्रदेश l द्वीपसमूहउच्चभूमी : दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठारानेव्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलचीउच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढालक्षेत्र अशा वेगवेगळ्यानावांनी केले जाते. ब्राझील व गियाना ढालक्षेत्रे एकत्रितरीत्यादक्षिण अमेरिका खंडातील गाभाक्षेत्रे मानली जातात. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेलीआहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराईमा, पारा आणि आमापा या राज्यांत विस्तारलेलीआहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग येतो, मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लीना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची३०१४ मी. आहे. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागांत उंची १००० मी. पेक्षा जास्त आहे. परंतु इतर भागात उंची५०० ते १००० मी. दरम्यान आहे. उच्चभूमीची उंचीउत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व या दिशेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. या उतारावरून वाहणाऱ्याअॅमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबेदिसून येतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरास मिळतात.उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना,उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढेत्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपात दिसून येतो.अजस्र कडा : हा प्राकृतिक भाग क्षेत्रविस्ताराच्यादृष्टीने सर्वांत लहान असला, तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यांमुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची७९० मी इतकी आहे. काही भागांत ही उंची टप्प्याटप्प्यानेकमी होते. सावो पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागात हीउंची सरळ एकाच उतारात संपते. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात, त्यामुळे अजस्र कड्याच्यापलीकडे (वातविन्मुख प्रदेश) पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असे केले जाते. किनारी प्रदेश : ब्राझीलला सुमारे ७४०० किमी लांबीचीकिनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्वअसे दोन विभाग केले जातात. उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तेपर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणता येईल, तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्वकिनारा म्हणता येईल. उत्तर किनाऱ्यावर अॅमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात, त्यामुळेहा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजाॅ बेट, माराजाॅ उपसागर व सावो मारकोस उपसागर आहेत. माराजाॅ हे मोठेकिनारी बेट आहे. ते अॅमेझॉन व टोकँटिन्स नद्यांच्या मुखांदरम्यान तयार झाले आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदीअटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणीदिसतात. काही भागांत या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळकट्टेआणि प्रवाळबेटे यांमुळेहोते. मैदानी प्रदेश : ब्राझीलमधील मैदानी प्रदेश दोन विभागात दिसून येतो. उत्तरेकडील अॅमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे-पॅराना नद्यांचा भाग. अॅमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वांत विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. अॅमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. अॅमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद (१३०० किमी) असून, दोन उच्चभूमी जेथे खूप जवळ येतात तेथेही रुंदी २४० किमी इतकी कमी होते. जसजशी अॅमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाचीरुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यांमुळेहा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. अॅमेझॉनच्या खोऱ्यातील वनेउष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे-पॅराना या नद्यांच्याउगमाकडील भाग. पॅराग्वेच्या उगमक्षेत्राचा उतार दक्षिणेकडेआहे, तर पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आहे.पॅँटानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमींपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्यानैऋत्य भागात पसरला आहे. पॅँटानल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सुल राज्यात आहे. पॅँटानलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातहीदिसून येतो.द्वीपसमूह : मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काहीबेटांचा समावेश होतो. त्यांचे वर्गीकरण किनारी बेट व सागरीबेट असे केले जाते. बहुतेक किनारी बेटेही संचयनातून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटेही मुख्य भूमीतून निर्माण झालेलीआहेत. सागरी बेटेही मुख्य भूमीपासून ३०० किमीपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागांतील बेटे प्रवाळबेटेअसून त्यांना कंकणद्वीप म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!