NMMS परीक्षा टेस्ट सिरीज Introduction to the Parliamentary System
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज
1)चुकीचा पर्याय निवडा.
- कायदेमंडळ- कायद्याची निर्मिती करणे
- कार्यकारी मंडळ -कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे
- न्याय मंडळ -न्याय देण्याचे कार्य करते
- न्यायमंडळ -कायदे करण्याचे कार्य करते
2)योग्य पर्याय निवडा.
A) संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते.
B) संसद लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ असतो.
- फक्त विधान A बरोबर आहे.
- फक्त विधान B बरोबर आहे.
- दोन्ही विधाने बरोबर आहेत.
- दोन्ही विधाने चूक आहेत.
3)भारताने … ही शासन पद्धती स्वीकारली आहे.
- अध्यक्ष शासन पद्धती
- संसदीय शासन पद्धती
- हुकूमशाही
- यापैकी नाही
4)योग्य पर्याय निवडा.
1) संसदीय शासन पद्धतित संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेट बनाने निवडले जातात.
2) या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते.
- दोन्ही विधाने बरोबर आहेत
- दोन्ही विधाने चूक आहेत
- फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
- फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
5)मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो म्हणून संसदीय शासन पद्धती …..ला म्हणतात.
- दुहेरी शासन पद्धती
- एकेरी शासन पद्धती
- अध्यक्ष शासन पद्धती
- जबाबदार शासन पद्धती
6)ज्या शासनपद्धतीत कार्यकारी प्रमुख थेट जनतेकडून निवडला जातो ही पद्धत म्हणजे…….. होय.
- अध्यक्षीय शासनपद्धती
- संसदीय शासनपद्धती
- हुकूमशाही
- यापैकी नाही
7)योग्य पर्याय निवडा
१) अध्यक्षीय शासनपद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून असतात.
२) कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात.
- दोन्ही विधाने चूक आहेत
- दोन्ही विधाने बरोबर आहेत
- फक्त विधान क्रमांक एक बरोबर आहे
- फक्त विधान क्रमांक दोन बरोबर आहे
8)भारताच्या केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला ‘संसद’ असे म्हटले जाते. …………..,लोकसभा व राज्यसभा मिळून संसद तयार होते.
- पंतप्रधान
- न्यायाधीश
- जनता
- राष्ट्रपती
9)संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ ……च्या विश्वासावर अवलंबून असते.
- कायदेमंडळ
- न्यायमंडळ
- राष्ट्रपती
- यापैकी नाही
10)संसदीय शासन पद्धती संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते कारण…….
- ते खूप मोठे आहे
- ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने
- त्यामध्ये कायदेतज्ञ असतात
- यापैकी नाही
11)प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील…….. होय.
- कार्यकारी मंडळ
- कायदेमंडळ
- न्याय मंडळ
- यापैकी नाही
12)अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात ?
- राष्ट्राध्यक्ष
- लोकसभा अध्यक्ष
- राज्यपाल
- प्रधानमंत्री
13)कोणत्या देशाचे संविधान पूर्णत: लिखित नाही ?
- अमेरिका
- इंग्लंड
- रशिया
14)संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धत म्हणतात; कारण……….
- पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते.
- पंतप्रधान हे जबाबदारीने निर्णय घेतात.
- मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतींना जबाबदार असते.
- कार्यकारी मंडळ हे आपल्या इच्छेनुसार कार्य करते.
15)अमेरिकेतील मंत्रिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे; तसाच तो भारतातील मंत्र्यांनाही
असतो, हे विधान …………
- विधान संपूर्णपणे चूक
- विधान संपूर्णपणे बरोबर
- विधानाचा पहिला भाग चूक, दुसरा बरोबर
- विधानाचा पहिला भाग बरोबर, दुसरा बरोबर
16)काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्ट बहुमत मिळत नाही. अशावेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते त्यास काय म्हणतात ?
- संयुक्त सरकार
- मित्र सरकार
- आघाडी सरकार
- मिश्र सरकार
17)राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा मिळून काय तयार होते ?
- मंत्रिमंडळ
- यापैकी नाही
- संसद
- विधान मंडळ
18)संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ म्हणजे काय ?
- राष्ट्रपती ,प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ
- लोकसभा आणि राज्यसभा
- राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा
- प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ
19)केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळात कोणाचा समावेश होतो ?
- राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा
- लोकसभा आणि राज्यसभा
- प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ
- वरीलपैकी नाही
20)कायदेमंडळाला ___________ असेही म्हणतात.
- संसद
- लोकसभा
- विधान मंडळ
- राज्यसभा
21)खालीलपैकी कोणत्या देशात ‘संसदीय शासन
पद्धती’ प्रथम विकसित झाली.
- भारत
- इंग्लंड
- अमेरिका
- फ्रान्स
22)शासन संस्थेत कायदे निर्मितीचे कार्य कोण करते?
- न्याय मंडळ
- कायदेमंडळ
- कार्यकारी मंडळ
- राज्यसभा
23)शासन संस्थेत कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे कार्य कोण करते?
- कायदेमंडळ
- न्याय मंडळ
- कार्यकारी मंडळ
- राज्यसभा
24)प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणासाठी ————— ला जबाबदार असतात.
- कायदेमंडळ
- कार्यकारी मंडळ
- न्यायमंडळ
- यापैकी नाही
25)योग्य विधान निवडा
- कायदेमंडळ कायद्याच्या निर्मितीचे कार्य करते.
- कार्यकारी मंडळ कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते.
- न्याय मंडळ न्याय देण्याचे कार्य करते.
- वरील सर्व विधाने बरोबर आहेत.