भाग D: परिसर अभ्यास
१२१. ‘कमळाचे फूल सकाळी उमलते, तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते’ ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे?
(१) रसायन-अनुवर्तन
(२) वृद्धी असंलग्न
(३) जलानुवर्ती
(४) गुरुत्वानुवर्ती
१२२. कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वांत कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती ?
(१) थर्माकोल – लाकूड
(२) प्लॅस्टिक चामडी बूट
(३) थर्माकोल चामडी बूट
(४) प्लॅस्टिक – लाकूड
१२३. खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणते /कोणती ?
(अ) हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही.
(ब) हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे.
(१) फक्त अ
(२) फक्त ब
(३) फक्त अ आणि ब
(४) अ आणि ब दोन्हीही नाही.
१२४. शून्य अंश सेल्सिअस तापमानांच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायांपैकी कोणता परिणाम दिसून येतो?
(१) सुरुवातीला त्याची घनता वाढते; परंतु नंतर ती कमी होत जाते.
(२) सुरुवातीला त्याची घनता कमी होते; परंतु नंतर ती वाढत जाते.
(३) सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढत जाते.
(४) सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता कमी होत जाते.
१२५ ‘सामान्यतः अणू विद्युतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो’ याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालीलपैकी कोणता ?
(१) प्रोटॉन < इलेक्ट्रॉन (२) न्यूट्रॉन > इलेक्ट्रॉन
३) न्यूट्रॉन= इलेक्ट्रॉन
(४) प्रोटॉन = इलेक्ट्रॉन
१२६. वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे?
(१) रॅफाइडस्
(२) कॅल्शिअम ऑक्झलेट
(३) निलगिरी तेल
(४) करडई तेल
१२७. जीवजन्माच्या ‘जरायुज’ पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही?
(१) या प्राण्यांच्या अंगावर केस असतात.
(२) आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात.
(३) ते शीत रक्ताचे नसतात.
(४) ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही.
१२८. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्रसिंह यांच्याशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या ?
(अ) तरुण भारत संघ
(ब) पाणी पंचायत
(क) पेड़ बचाओ, पेड़ लगाओ पदयात्रा
(ड) चिपको आंदोलन
(१) फक्त अ आणि क
(२) फक्त ब आणि ड
(३) फक्त अ, ब आणि क
(४) फक्त ब, क आणि ड
१२९. ‘खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते.’ त्या वेळी खालील पर्यायांपैकी कोणती क्रिया घडते ?
(१) हायड्रोजन मुक्त होतो.
(२) ऑक्सिजन मुक्त होतो.
(३) अभिक्रियाकारकाचे ऑक्साइड तयार होते.
(४) अभिक्रियाकारके ऑक्सिजन प्राप्त करतात.
१३०. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते ?
(१) संप्रेरकाचे रक्तात मिसळणे, खोकणे या अनैच्छिक क्रिया आहेत.
(२) प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत.
( ३) एखाद्या गरम वस्तूला हात लावला की, तो लगेच मागे घेतला जातो ही अनैच्छिक क्रिया आहे.
(४) बोटाला सुई टोचली की, ‘आई ऽ ग’ हा उद्गार तोंडातून निघतो ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे.
१३१. विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते ?
(१) विद्युत दिव्यात ऑक्सिजन असल्यामुळे तो जळत राहतो आणि प्रकाश पडतो.
(२) नायट्रोजन व अरगॉन या वायूंमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते.
(३) विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रवणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते.
(४) विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते.
१३२. खालील ‘कारण’ आणि ‘परिणाम’ यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा.
कारण : (अ) सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे.
परिणाम : (ब) सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते.
(१) फक्त अ योग्य
(२) फक्त ब योग्य
(३) दोन्ही अ आणि ब योग्य
(४) अ आणि ब दोन्ही अयोग्य
१३३. उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता ?
(१) समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहणे.
(२) कंदिलाची वात तेवत राहणे.
(३) सूर्याची उष्णता पृथ्वी पर्यंत पोहोचणे.
(४) शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणे.
१३४. जन्माच्या वेळी मुलाच्या मेंदूचे वजन जवळपास किती असते ?
(१) ३५० ग्रॅम
(२) ४५० ग्रॅम
(३) ५०० ग्रॅम
(४) ७०० ग्रॅम
१३५. ‘विद्यार्थी साधनसामग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो’ हे खालील पर्यायांपैकी कशाचे उदाहरण आहे?
(१) विश्लेषणासंबंधीचा क्षमता विकास
(२) वर्गीकरणासंबंधीची अध्ययन निष्पत्ती
(३) निरीक्षण व त्याची मांडणी यासंबंधीचा अपेक्षित वर्तन बदल
(४) प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययनदर्शक
१३६. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील ‘प्रतिधर्म-सुधारणा’ चळवळ म्हणजे काय?
(१) कॅथॉलिक पंथाच्या अनुयायांनी धर्मगुरूंविरुद्ध केलेले बंड
(२) प्रोटेस्टंट पंथांच्या अनुयायांनी पोपविरुद्ध केलेले बंड
(३) पोपच्या प्रेरणेने कॅथॉलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य
(४) मार्टिन ल्युथरने प्रसिद्ध केलेला धर्मसुधारणा जाहीरनामा
१३७. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायांपैकी कोणती ?
(१) ‘दिग्दर्शन’ या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन
(२) वाचनालयाची चळवळ
(३) विधवा विवाहाचा पुरस्कार
(४) ‘लोकहितवादी’ या टोपणनावाने लेखन
१३८. संस्था/संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता ?
संस्था/संघटना
(अ) हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
(ब) आझाद हिंद सेना
(क) हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन
(ड) इंडिया हाऊस
१३८. संस्था/संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता ?
संस्था/संघटना | संस्थापक |
(अ) हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (ब) आझाद हिंद सेना (क) हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (ड) इंडिया हाऊस | (य) रासबिहारी बोस (र) सचिंद्रनाथ संन्याल (ल) सुभाषचंद्र बोस (व) चंद्रशेखर आझाद (श) श्यामजी कृष्ण वर्मा |
(१) अ-व, ब-ल, क-य, ड-र
(२) अ-र, ब-य, क-व, ड-श
(३) अ-व. ब-य, क-र, ड-श
(४) अ-श, ब-ल, क-र, ड-य
१३९. आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते ?
(१) पेटती मशाल
(२) चरख्याचे चित्र
(३) भरारी घेणारा फिनिक्स पक्षी
(४) झेप घेणारा वाघ
१४०. स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्याविरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती ?
(१) शायिस्ताखान फिरंगोजी नरसाळा
(२) दौलतखान मुरारबाजी
(३) बहलोलखान प्रतापराव गुजर
(४) सिद्दी मसऊद बाजीप्रभू देशपांडे
१४१. ‘दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
- राणी। भद्राकाली कोपली।।’ अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त याने कोणाचे वर्णन केले आहे?
(१) झाशीची राणी लक्ष्मीबाई
(२) अहिल्यादेवी होळकर
(३) चांदबिबी
(४) महाराणी ताराबाई
१४२. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता / कोणते प्राणी आहे/आहेत?
(अ) सिंह
(ब) घोडा
(क) बैल
(१) फक्त अ
(२) फक्त अ आणि ब
(३) फक्त अ आणि क
(४) तिन्ही अ, ब आणि क
१४३. ‘परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते,’ याचे प्रमुख कारण खालील पर्यायांपैकी कोणते?
(१) ही भारतीय संविधानातील तरतूद आहे.
(२) कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे.
(३) राज्याचे कायदेमंडळ गठित करण्यासंबंधीच्या नियमावलीत तशी तरतूद आहे.
(४) राज्यपालास महाभियोग पद्धतीने पदच्युत करता येते.
२. पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते ?
(१) गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात.
(२) ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी सरपंचाची असते.
(३) ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते.
(४) ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती.
१४५ . भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो ?
(१) कारवार
(२) कवरत्ती
(३) मच्छलीपट्टण
(४) मंगळूर
१४६. पर्वतरांगा व भारतातील सर्वांत उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती ?
(१) सातपुडा अस्तंभा
(२) पश्चिम घाट अनैमुडी
(३) अरवली गुरुशिखर
(४) हिमालय के-२
१४७. प्रमाणवेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवार रात्रीचे दहा वाजले असतील; तर त्याचवेळी भारतात किती वाजलेले असतील?
(१) सोमवार – संध्याकाळचे साडेचार
(३) सोमवार पहाटेचे साडेतीन
(२) मंगळवार पहाटेचे साडेतीन
(४) मंगळवार संध्याकाळचे साडेचार
१४८, सापुतारा : गुजरात :: पाल ?
(१) महाराष्ट्र
(२) मध्य प्रदेश
(३) आसाम
(४) हिमाचल प्रदेश
१४९, भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघुउद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे; यावरून चतुर्थक
व्यवसाय करणारे कोण?
(१) मनिषा
(२) मनाली
३) मिलिंद
(४) भूषण
१५०. राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता ?
(१) नागपूर ठाणे रायगड
(३) चंद्रपूर नागपूर गोंदिया
(२) गोंदिया गडचिरोली- रायगड
(४) गडचिरोली – ठाणे – चंद्रपूर