मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट- आलंकारिक शब्द
www.learningwithsmartness.in
Marathi Vyakaran Alankaarik shabd
1)खालील आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. कर्णाचा अवतार
1)अतिशय झोपाळू
2)खूप श्रीमंत
3)उदार मनुष्य
4)अतिशय तापट माणूस
खालील आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
कुंभकर्ण
- उदार मनुष्य
- अतिशय तापट माणूस
- खूप श्रीमंत
- अतिशय झोपाळू
खालील आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
अकरावा रूद्र
१.खूप श्रीमंत
२.अतिशय तापट माणूस
३.उदार मनुष्य
४.अतिशय झोपाळू
खालील आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
नवकोट नारायण
- अतिशय तापट माणूस
- अतिशय झोपाळू
- उदार मनुष्य
- खूप श्रीमंत
खालील अलंकारिक शब्दाचा अर्थ असणारा पर्याय ओळखा.
मेषपात्र
*
2 points
1)बेअकली
2) भित्रा
3)संकुचित वृत्तीचा
4)बावळट
खालील अलंकारिक शब्दाचा अर्थ असणारा पर्याय ओळखा.
शेंदाडशिपाई
1)बेअकली
2)भित्रा
3)संकुचित वृत्तीचा
4)बावळट
खालील अलंकारिक शब्दाचा अर्थ असणारा पर्याय ओळखा.
कूपमंडूक
2 points
1)बेअकली
2)भित्रा
3)संकुचित वृत्तीचा
4)बावळट
खालील अलंकारिक शब्दाचा अर्थ असणारा पर्याय ओळखा.
लंबकर्ण
2 points
1)बेअकली
2) भित्रा
3)संकुचित वृत्तीचा
4)बावळट
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
अकलेचा कांदा
1) मूर्ख
2)कळ लावणारा
3)चैनीखोर माणूस
4)अत्यंत मूर्ख माणूस
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
अकलेचा खंदक
2 points
1)चैनीखोर माणूस
2)कळ लावणारा
3)मूर्ख
4)अत्यंत मूर्ख माणूस
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
कळीचा नारद
2 points
1)चैनीखोर माणूस
2)कळ लावणारा
3)मूर्ख
4)अत्यंत मूर्ख माणूस
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
खुशाल चेंडू
2 points
1)कळ लावणारा
2)मूर्ख
3)अत्यंत मूर्ख माणूस
4)चैनीखोर माणूस
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
भगीरथ प्रयत्न
1)आटोकाट प्रयत्न
2)शत्रुत्व
3)बावळट
4)उशिरा उठणारा
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
कुंभकर्ण
*
2 points
आटोकाट प्रयत्न
अतिशय झोपाळू
अश्रू
यापैकी नाही
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
आळवावरचे पाणी
1)चिकाटी धरणारे
2)खूप टिकणारे
3)फार काळ न टिकणारे
4)उदार मनुष्य
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
चौदावे रत्न
रागीट
मार
प्रारंभ
शत्रुत्व
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
शकूनी मामा
2 points
चांगला मनुष्य
कपटी मनुष्य
बेअकली
दुष्ट स्री
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
बृहस्पती
2 points
बुद्धिमान
म्हातारा
मूर्ख मनुष्य
भित्रा
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
शेंदाड शिपाई
*
2 points
ढोंगी मनुष्य
खूप श्रीमंत
भित्रा
कतृत्व
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
जमदग्नीचा अवतार
*
2 points
दयाळू
कपटी मनुष्य
रागीट
प्रेमळ
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
मंथरा
*
2 points
प्रेमळ
दुष्ट स्री
लबाड
चांगली स्री
खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
नवकोट नारायण
*
2 points
अतिशय गरीब
खूप श्रीमंत
सज्जन माणूस
खूप बुद्धिमान
अलंकारिक शब्द आणि त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
*
8 points
नकार उशिरा उठणारा मार दुर्मिळ वस्तू
सूर्यवंशी
वाटाण्याच्या अक्षता
उंबराचे फूल
चौदावे रत्न
सूर्यवंशी
वाटाण्याच्या अक्षता
उंबराचे फूल
चौदावे रत्न
अत्यंत भोळा माणूस हा अर्थ असणारा अलंकारिक शब्द ओळखा.
1)सांबाचा अवतार
2)अकलेचा कांदा
3)शकुनी मामा
4)शेंदाळ शिपाई
तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. ( अधोरेखित नामाचा प्रकार कोणता)
2 points
1)सामान्य नाम
2)धातू साधित नाम
3)विशेष नाम
4)भाववाचक नाम
शिष्यवृत्ती परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अतिशय उपयुक्त अलंकारिक शब्दांची यादी
Marathi Vyakaran Alankaarik shabd
1 ओनामा सुरूवात प्रारंभ
2 अकरावा रूद्र अतिशय तापट माणूस
3 अरण्यरूदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
4 उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू
5 कळ्सूत्री बाहुले दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
6 काडीपहिलवान हडकुळा
7 खुशालचेंडू चैनखोर माणूस
8 गाजरपारखी कसलीही पारख नसलेला, मूर्ख
9 गुळाचा गणपती मंद बुध्दीचा
10 बिनभाड्याचे घर तुरूंग
11 भगिरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न
12 स्मशान वैराग्य तात्कालीक वैराग्य
13 शेंदाड शिपाई भित्रा
14 शकुनीमामा कपटी माणूस
15 वामनमूर्ती बुटका माणूस
16 मायेचा पूत पराक्रमी मणूष्य, मायाळू
17 भीष्म प्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा
18 पांढरा परीस लबाड
19 धोपट मार्ग नेहमीचा मार्ग,सरळ मार्ग
20 त्रिशंकू धड इकडे ना तिकडे
21 अरण्य पंडित मूर्ख मनुष्य
22 अकरावा रूद्र अतिशय तापट माणूस
23 अक्षरशत्रू निरक्षर माणूस
24 अंडी पिल्ली गुप्त गोष्टी
25 अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे
26 अष्टपैलू अनेक चांगले गुण असलेला
27 अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस
28 उंटावरचा शहाणा मूर्ख पणाचा सल्ला देणारा
29 एरंडाचे गुऱ्हाळ कंटाळवाणे बोलणे
30 कर्णाचा अवतार उदार मनुष्य
31 कुंभकर्ण अतिशय झोपाळू
32 कूपमंडूक संकुचित वृत्तीचा
33 कोल्हेकुई क्षुद्र लोकांची बडबड
34 खडाजंगी मोठे भांडण
35 खडाष्टक जोरदार भांडण
36 खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे
37 गप्पादास गप्पा मारणारा
38 गोगलगाय गरीब किंवा निरूपद्रवी मनुष्य
39 गर्भश्रीमंत जन्मापासून श्रीमंत असलेला
40 गुरूकिल्ली मर्म, रहस्य
41 गंडांतर संकट
42 गंगायमुना अश्रू
43 गळ्यातील ताईत अत्यंत प्रिय अशी व्यक्ति
44 गोमाजी कापसे कोणीतरी एक मनुष्य
45 गावमामा —– सर्वांना आपलासा वाटणारा
46 घरकोंबडा —- घरात बसणारा
47 चर्पटपंजरी वायफळ बडबड
48 चौदावे रत्न —- मार
49 छत्तीसचा आकडा —- शत्रुत्व
50 जमदग्नीचा अवतार रागीट मनुष्य
51 टोळभैरव —– नासाडी करीत फिरणारे
52 ताटाखालचे मांजर —- दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
53 थंडा फराळ उपवास
54 दगडावरची रेघ —- कधीही न बदलणारे
55 दुपारची सावली — अल्पकाळ टिकणारे सुख
56 देवमाणूस — साधाभोळा मनुष्य
57 द्राविडी प्राणायाम —- विनाकारण केलेला खाटाटोप
58 नवकोट नारायण —- खूप श्रीमंत
59 नंदी बैल — हो ला हो म्हणणारा
60 पर्वणी — अतिशय दुर्मिळ योग
61) पाताळयंत्री : कारस्थान करणारा.
62) पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू.
63) पिकले पान : म्हातारा, वृद्ध.
64) पोपटपंची : अर्थ न कळता पाठांतर करणारा.
65) बृहस्पती : बुद्धिमान मनुष्य.
66) बोकेसंन्यासी : ढोंगी मनुष्य.
67) बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचने.
68) बादरायण संबंध : ओढून ताणून दाखविलेला संबंध
69) भाकडकथा : बाष्कळ गोष्टी.
70) भीष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा.
71) मंथरा : दुष्ट स्त्री.
72 ) मारुतीचे शेपूट : वाढत जाणारे काम.
73) मृगजळ : केवळ आभास.
74) मेषपात्र : बावळट.
75) मुखस्तंभ : मुद्दाम न बोलता उभा राहणारा.
76) रामबाण औषध : अचूक गुणकारी.
77) लंकेची पार्वती : अत्यंत गरीब स्त्री.
78) लंबकर्ण : बेअकली
79) वाटाण्याच्या अक्षता : नकार
80) वाहती गंगा : आलेली संधी
81) शेजारधर्म : शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत
82) श्रीगणेशा : प्रारंभ
83) सांबाचा अवतार : अत्यंत भोळा माणूस
84) सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालणारे काम
85) सोन्याचे दिवस : चांगले दिवस
86) सूर्यवंशी: उशिरा उठणारा
87) संगणकसाक्षर : संगणकाचा वापर करण्याचे ज्ञान
88) शिकंदर नशिब : फार मोठे नशिब
89) सूर्यवंशी : उशिरा उठणारा
90) चालता काळ: वैभवाचा काळ
91) गाढव : बेअकली माणूस
92) कळीचा नारद : भांडण लावून देणारा
93) अंधेरी नगरी : अव्यवस्थित पणाचा कारभार
94) अक्षर शत्रू : निरक्षर माणूस
95) दळूबाई : भेकड माणूस