NAS Question Paper class 6th

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण इयत्ता सहावी
www.learningwithsmartness.in


खाली दिलेला उतारा वाचा. व योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक निवडा
एव्हरेस्टवर चढाई

आपल्या शरीराचा तोल सांभाळत तेनसिंह आणि हिलरी काळजीपूर्वक एव्हरेस्टच्या शिखराची चढाई करत होते. ते थकलेले होते. परंतु ते आशा न सोडता धैर्याने पुढे जात होते. बर्फात पाय ठेवण्यासाठी तेनसिंहने बर्फ किती खोलवर आहे हे शोधण्याकरिता खड्डा केला. चढाई करताना त्यांना 12 मीटर उंच सुळका दिसला.
अत्यंत कठिण परिस्थितीत, काळजीपूर्वक त्यांनी सुळका सर केला. अखेर त्यांचा संघर्ष संपला. ते एव्हरेस्टच्या शिखरावर होते. एव्हरेस्ट हे जगातील सर्वांत उंच शिखर आहे. तेनसिंह आणि हिलरीने उत्साहाने एकमेकांकडे पाहिले. त्यांची हृदये आनंदाने ओसंडत होती.
तेनसिंह आणि हिलरी एव्हरेस्ट चढू शकले कारण ते
*
2 points
आनंदी होते.
धैर्यवान होते.
काळजीत होते.
थकलेले होते.
एव्हरेस्ट पर्वताचे सगळ्यात मोठे विशेष काय आहे ?
*
2 points
हे जगातील सर्वात उंच शिखर आहे.
यावर उंच सुळके होते.
हा अतिशय धोकादायक पर्वत आहे.
हे पर्वत नेहमी बर्फाने आच्छादलेले असते.
तेनसिंह आणि हिलरी यांना पर्वतावर चढण्यास अडचण का येत होती ?
*
2 points
सुळक्यावर जंगली प्राणी होते.
सुळका एकदम उंच होता.
शिळेवर खूप खड्डे होते.
सुळक्यावरचे हिम वितळत होते.
तेनसिंह आणि हिलरी उत्साहित का झाले !
*
2 points
त्यांनी बर्फात खड्डे केले होते.
त्यांनी उंच सुळके पाहिले.
ते शिखरावर पोहोचले होते.
ते बर्फामध्ये सहज रित्या चालू शकत होते.
तेनसिंह आणि हिलरीचे मन __
भरून गेले होते.
*
2 points
वेदनेने
आनंदाने
थकव्याने
दुःखाने
खाली दिलेली ही गोष्ट वाचा. व प्रश्नांची उत्तरे द्या.
अजब युक्ती

खूप वर्षांपूर्वी एका व्यापाऱ्याच्या घरी चोरी झाली. व्यापारी राजा कृष्णदेवरायकडे गेला आणि त्याने चोरीबद्दल सांगितले. राजाने आपल्या सर्वांत बुद्धिमान मंत्री तेनालीरामला बोलावले व चोरीचा छडा लावण्यास सांगितले. तेनालीरामने व्यापाऱ्याच्या सर्व नोकरांना आणि मित्रांना बोलावले आणि सगळ्यांना एक एक काठी दिली. सगळ्या काठ्या सारख्याच लांबीच्या होत्या. तेनालीरामने त्यांना सांगितले, “या काठ्या तुम्ही सगळे आपापल्या घरी घेऊन जा आणि उदया सकाळी परत घेऊन या. या सगळ्या काठ्यांमध्ये एक विशेष आहे. ही चोराजवळ जाताच आपोआप तीची लांबी एक बोट
वाढते. जर तुम्ही चोरी केली नसेल तर तुमच्या काठीची लांबी न वाढेल न घटेल. अशा त-हेने मी खऱ्या चोराला ओळखू शकतो.” सगळेजण काठी घेऊन आपापल्या घरी गेले. त्यात चोरही होता. त्याने विचार केला, “जर उदया राजाच्या समोर माझी काठी एक
बोट लांब निघाली तर मी लगेच पकडला जाईन, मला माहीत नाही मला काय शिक्षा मिळेल.” या विचित्र काठीलाच एका बोटाइतके कमी केलं तर? चोराने काठी कापली,तिला मऊ व छान बनविले. काठी कापली आहे हे ओळखणे अवघड होते. सकाळी चोर आनंदाने राजाकडे गेला.
तेनालीरामने सर्व काठ्या तपासण्यास सुरुवात केली आणि त्यांनी चोराला सहज पकडले, कारण त्याच्याजवळील काठी एक बोट छोटी होती.

‘दुसऱ्या दिवशी सकाळी चोर आनंदाने राजाकडे गेला.’ या वाक्यात कोणता शब्द कृती दर्शवितो ?
2 points
राजा
गेला
चोर
सकाळी
गोष्टीच्या शेवटी काय घडले ?
2 points
आणखी चोरी झाली.
चोराला भीती वाटली.
चोर पकडला गेला.
काठ्यांची लांबी मोजली गेली
खाली दिलेली जाहिरात पहा. व प्रश्नांची उत्तरे द्या.

जाहिरात कशाबद्दल आहे ?
2 points
प्रकाशकांला लिहिणे
मित्रांना बोलावणे.
कवितांचे भित्तीपत्रक
पुस्तके भेट देणे.
कवितांचे भित्तीपत्रके मागविण्यासाठी तुम्ही काय कराल ?
2 points
कविता पाठवू
भेटवस्तू पाठवू
दूरध्वनी करु
व्यक्तीला पाठवू
कवितांचे एक भित्तीपत्रक खरेदी करण्यासाठी तुम्ही किती पैसे द्याल?
2 points
बारा रूपये
वीस रुपये
पन्नास रुपये
पंचवीस रुपये
जाहिरातीत कवितांच्या भित्तीपत्रकाबद्दल काय सांगितले आहे ?
2 points
तुम्ही स्वतः कवितांचे भित्तीपत्रक तयार करणे.
कवितांचे भित्तीपत्रक सुशोभित करणे.
कवितांचे भित्तीपत्रक मिळवणे.
कवितांचे भित्तीपत्रक मित्रांना भेट देणे.
खालील पैकी कोणता शब्द नाम आहे?
2 points
मित्र
मागवणे
बोलावणे
भेट देणे
अर्धवट खाल्लेल्या फळावर खूप मुंग्या आलेल्या तुम्हाला दिसतील . यावरून मुंग्यांचे कोणते वैशिष्ट्य दिसून येते?
2 points
मुंग्यामध्ये वास घेण्याची संवेदना तीव्र असते.
मुंग्या खूप लहान असतात.
मुंग्या रंगाने काळया असतात.
अन्न वाहून नेऊ शकतात.
खालीलपैकी कोणते कार्ड तुम्हाला केवळ वयाच्या अठरा वर्षानंतरच देता येते?
2 points
मतदार ओळखपत्र
जन्म दाखला
रेशन कार्ड
आधार कार्ड
X ,Y, किंवा Z पैकी कोणता बॉक्स सर्वात हलका आहे ?
2 points


X
Y
Z
सर्व समान आहेत.
खालील वस्तू ओल्या मैदानात पुरल्या. काही वर्षानंतर या वस्तू करून काढण्यात आल्या कोणत्या वस्तूत कमीत कमी बदल झालेला दिसेल?
*
2 points
कापडी पिशवी
कागदी प्लेट
संत्र्याची साल
प्लास्टिक कप
एक उकडलेले गरम अंडे कप भर थंड पाण्यात ठेवले. पाण्याच्या आणि अंड्यांच्या तापमानात काय बदल ह
*
2 points
पाणी गरम होईल व अंडे थंड होईल.
पाणी थंड होईल आणि अंडे गरम होईल.
पाणी आणि अंडे दोन्ही थंड होतील.
पाणी व अंडे दोन्ही गरम होतील.
वनस्पतींचे वर्गीकरण त्यांच्या वाढत्या उंचीनुसार औषधी वनस्पती, झुडपे आणि वृक्ष असे करता येते खालीलपैकी काय बरोबर आहे?
*
2 points
गवत वृक्ष आहे
पुदिना वनस्पती झुडूप आहे
गुलाब ही वनस्पती झुडूप आहे.
आंबा वनस्पती ही औषधी वनस्पती आहे.
तुमच्या निरीक्षणाच्या आधारे तुम्ही खालील पैकी कोणता निष्कर्ष काढाल?


2 points
Captionless Image
पाणी तेलापेक्षा जड असते.
तेल मातीपेक्षा जड असते.
पाणी माती पेक्षा जड असते.
तेल पाण्यापेक्षा जड असते.
गांडुळांना शेतकर्‍यांचा सर्वोत्कृष्ट मित्र का म्हटले जाते?
2 points
ते मातीला पोषक द्रव्याने समृद्ध बनवतात.
ते मातीतील इतर जंतूंना खातात.
ते कीटकांसाठी अंडी घालतात.
ते गाईचे खाद्य असतात.
खालील आलेखावरून सन 2016 या वर्षामध्ये किती घरांनी रॉकेलचा वापर केला ?


2 point
20
15
5
75
खालीलपैकी कोणते कार्य पोलिसांचे नाही ?
2 point

सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे.
कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे
कर्ज मंजूर करणे
गर्दीवर नियंत्रण ठेवणे.
जर मुलींना खेळ खेळण्याची परवानगी दिली नाही तर काय होईल?
*
2 points
त्यांना अधिक अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळेल.
त्यामुळे त्यांना मित्र-मैत्रिणी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
त्यांच्या शारीरिक विकासास अडथळा होईल.
यामुळे त्यांना टीव्ही पाहण्यास वेळ मिळेल.
5 वाजता घड्याळाच्या काट्या मध्ये किती अंश मापाचा कोन झाला आहे?
*
2 points
150°
120°
180°
40°
परीक्षा असल्यामुळे आई वडील तुम्हाला गावाला घेऊन गेले नाहीत तर तुम्ही काय कराल?
*
2 points
चिडचिड कराल
गावाला न जाता अभ्यास करत बसेल
खूप रडेल
परीक्षेला जाणार नाही
मैदानावर खेळता खेळता मित्रासोबत भांडण झाली अशा वेळी तुम्ही काय कराल?
*
2 points
मित्राशी बोलणार नाही
मित्राला दगड फेकून मारेन.
मित्राचा राग राग करेन
क्षुल्लक गोष्टीवरून भांडायचं नाही असे मनोमन ठरवेन.
पूरग्रस्तांना मदत करायची आहे अशावेळी तुम्ही काय कराल ?
2 points
पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करू.
पूरग्रस्तांना दोष देऊ
त्यांना मदत करण्यासाठी संस्था उभारू.
पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यावर टीका करू
वाळवंटातील निवडुंग ( कॅक्टस ) वनस्पतींना काटेरी पाणी असतात. काटे कशा प्रकारे उपयोगी असतात?
2 points
पाण्याची हानी कमी करण्यासाठी
सूर्यप्रकाश शोषून घेण्यासाठी
काट्यांमध्ये वाळूज जमविण्यासाठी.
पाणी शोषून घेण्यासाठी
तुमच्या घरापासून शाळा एक किलोमीटरवर आहे . दवाखाना 859 मीटरवर आहे. आणि बाजार 1010 मीटर अंतरावर आहे. सर्वात दूरचे ठिकाण कोणते?
2 points
बाजार
रुग्णालय
शाळा
तिन्ही सारख्याच अंतरावर आहेत
या घड्याळाकडे पहा. 1 तासापूर्वी घड्याळाने दाखवलेली वेळ काय होती?


2 points
दोन वाजून पाच मिनिटे
नऊ वाजून दहा मिनिटे
दहा वाजून दहा मिनिटे
दोन वाजून दहा मिनिटे
3 दोन चाकी सायकल आणि 2 तीन चाकी सायकली आहेत. दोन चाकी सायकलीना 2 चाके आणि तीन चाकी सायकलीना 3 चाके आहेत. तर एकूण किती चाके आहेत?
2 points


9
5
10
12
टोमॅटो आणि मराठे यांच्या दिलेल्या किंमतीनुसार अडीच किलो टोमॅटो आणि दीड किलो बटाट्याची एकूण किंमत किती असेल?
2 points


रु.64.50
रु.45.00
रु.59.60
रु.54.50
बागेमध्ये 100 झाडे आहेत. त्यापैकी 1/5 झाडे आंब्याची आहेत. तिथे इतर झाडे किती आहेत ?
2 points
80
40
20
100

2 points
500 मिली पेक्षा कमी
एक लीटर आणि दोन लीटर च्या दरम्यान
500 मिली आणि एक लीटर च्या दरम्यान
दोन लीटर पेक्षा अधिक
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा.
2 points


2
1
4
8
मी किती वेळ खेळतो ?
*
2 points


Captionless Image
7 तास 3 मिनिटे
7 तास 15 मिनिटे
1 तास 15 मिनिटे
1 तास 3 मिनिटे
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
2 point


आकृती 1 चे क्षेत्रफळ आकृती 2 पेक्षा अधिक आहे
आकृती 1 चे क्षेत्रफळ आकृती 2 पेक्षा कमी आहे
आकृती 1 चे क्षेत्रफळ आकृती 2 पेक्षा इतकेच आहे
दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळाची तुलना करता येणार नाही
9 नंतरची वर्ग संख्या कोणती आहे !
2 points


A
B
C
D
या चित्रालेखाकडे पहा आणि उत्तर द्या. खेळ 2 मध्ये किती गुण मिळाले ?
2 points


20
30
15
25
दिलेल्या आकृती मधील छायांकित भागाने कोणती दशांश संख्या दर्शवली आहे ?
2 points


0.3
0.03
0.7
0.07
शब्दकोशाच्या कोपऱ्यात कोणता कोन तयार झाला आहे ?
2 points


काटकोन
लघुकोन
रेशीय कोन
विशालकोन
एका मेजवानीसाठी 3 लीटर संत्र्याचा रस हवा आहे .एक दुकानदार संत्र्याचा रस केवळ 250 मिली च्या डब्यात विकतो. किती डबे विकत घ्यावे लागतील?
*
2 points
3
4
25
12
तुम्ही रुपये 1000 दुकानदार दिले . दुकानदार किती रुपये तुम्हाला परत देईल?
2 points


रु. 603
रु.403
रु.297
रु.397
एका दुकानदाराने 580 किलोग्रॅम500 ग्रॅम साखर पैकी 395 किलो 850 ग्रॅम साखर विकली तर त्याच्याकडे किती साखर शिल्लक राहिली?
*
2 points
184 किग्रॅ 650 ग्रॅम
184 किग्रॅ 350 ग्रॅम
183 किग्रॅ 750 ग्रॅम
183 किग्रॅ 550 ग्रॅम
एका शहराची लोकसंख्या 35,402 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 18,346 आहे . तर स्त्रियांची संख्या किती ?
*
2 points
17256
17056
16056
17156

3 thoughts on “NAS Question Paper class 6th

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!