NAS Question Paper Class 9th

National Achivement Survey Class 9th
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण इयत्ता नववी


खालील परिच्छेद वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
कडूनिंब हा छोटी चमकदार पाने असलेला एक उंच, सदाहरित वृक्ष आहे. याचे खोड सरळ उभे असते.
याची साल टणक, खरखरीत व खवलेदार असते. हे वृक्ष वसंत क्रतूत छोट्या पांढर्‍या फुलांनी फुलते. याची पूर्ण
पानगळती एकाच वेळी होत नसल्यामुळे हे झाड कधीही उघडे पडत नाही. संपूर्ण भारतभर हे झाड आढळते.
कडुनिंबाचे संस्कृत नाव ‘अरिष्ट’ असे आहे, ज्याचा अर्थ आजारातून मुक्‍त करणारा असा होतो. चमत्कारी वृक्ष”
या लोकप्रिय नावाने ते ओळखले जाते आहे. कडुनिंबाचा प्रत्येक भाग हा औषधांमध्ये उपयोगात आणला जातो.
कडुनिंबाच्या तेलाला मार्गोसा तेल असे म्हटले जाते, जे त्याच्या बियांपासून मिळवले जाते व कुष्ठरोग व
त्वचारोगांच्या उपचारात वापरले जाते. त्याची पाने कांजण्यांच्या उपचारांसाठी वापरली जातात. कडुनिंबाचा चहा
डोकेदुखी आणि तापापासून आराम मिळविण्यासाठी घेतला जातो. त्याच्या फुलाचा वापर आतड्याचे विकार बरे
करण्यासाठी होतो. कडुनिंबाची साल व डिंक सुद्धा मौल्यवान औषधी आहेत.भारतातील लोक कडुनिंबाच्या काड्यांचा वापर दात घासण्यासाठी करतात. कडुनिंबाच्या वाळलेल्या
पानाचा वापर कप्पे व कपाटात झुरळे व किड्यांना दूर ठेवण्यासाठी करतात. कडुनिंबाचा वापर भाज्या व ऊसासाठी खत म्हणून केला जातो.काही लोक कडुनिंबाला पवित्र मानतात आणि त्याच्या पानांचा घराच्या प्रवेशद्वाराला दुष्ट शक्तींना दूर ठेवण्यासाठी करतात. नवजात बालकांना आरोग्यासाठी व रोगांपासून दूर ठेवण्यासाठी कडुनिंबाच्या पानांवर झोपवतात. कडुनिंब हा जगभरातील लोकांसाठी अद्‌भुत वृक्ष आहे, यात काही संशय नाही.

कडूनिंबाची साल _ असते.
2 points
मऊ आणि खवलेदार
टणक आणि हिरवी
मऊ आणि हिरवी
खरखरीत आणि खवलेदार
कडूनिंबाची फुले
च्या उपचारात लाभदायक असतात.
2 points
त्वचारोग
आतड्याचे विकार
ज्वर
कांजण्या
वाळलेली पाने कपाटात _
साठी ठेवली जातात.
2 points
कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी
किड्यांना दूर ठेवण्यासाठी
पालींना व मुंग्यांना दूर ठेवण्यासाठी
कपाटाला स्वच्छ करण्यासाठी
काही लोक त्यांच्या घराच्या प्रवेश द्वारा ला कडुनिंबाची पाने बांधतात _

2 points
दुष्ट शक्तींना दूर ठेवण्यासाठी
किडीला दूर करण्यासाठी
त्यांची घरे सजविण्यासाठी
आजारातून बरे करण्यासाठी

कडुनिंबाला अद्भुत वृक्ष म्हणतात कारण:
2 points
त्याच्या काड्याचा वापर दात घासण्याचे होतो.
झाडाचा प्रत्येक भाग उपयोगी आहे.
हे उपयुक्त खत आहे.
नवजात शिशूचे रक्षण करते

खाली दिलेले भित्तीपत्रक वाचा आणि त्या प्रश्नाचे उत्तर द्या

खाली दिलेले भित्तीपत्रक वाचा आणि त्या प्रश्नाचे उत्तर द्या

या जाहिरातीचा मुख्य उद्देश _ आहे.
2 points
1) पाणी वाचविण्यास प्रोत्साहन देणे.
2) स्वच्छतेला प्रोत्साहन देणे.
3) गांधीजींबद्दल बोलणे.
4) लोकांकडून दंड गोळा करणे.

“जगात हवा असलेला बदल आधी आपल्यात घडवा! / या विधानाने आपल्याला काय बोध झाला.
2 points
1) जगात बदल घडवण्यासाठी कठोर मेहनत करा.
2) जगात’हवा असलेल्या बदलाचा आपल्यापासून प्रारंभ होत असतो.
3) जगाला बदलण्यापूर्वी ते पाहा.
4) जर आपण स्वत:कडे पाहिले तर जगही बदलते.

जर तुम्ही__ तर तुम्हाला दंड केला जाईल.
2 points
कचराकुंडी वापरली
‘पिकदाणी वापरली
रेल्वे परिसरात कचरा फेकला
नळ बंद केला

एका मुलीने तिच्या वडिलांना केळाची साले सीटखाली न फेकण्याविषयी सांगितले. या वाक्यालाजाहिरातीतील कोणते विधान लागू होते?
2 points
कचरा केवळ कचराकुंडीतच फेकावा.
पिकदाणी वापरली पाहिजे.
शौचालयाचा वापर करा.
पाणी वाचवा.

स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश काय आहे?
2 points
केवळ रेल्वेचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवणे.
गांधीजींच्या विचारांना लोकप्रिय करणे.
भारतभर शौचालये बांधणे.
भारताला स्वच्छ करणे.

गणित
एका दिवसाइतका कालावधी असणारा पर्याय खालीलपैकी कोणता ?
*
2 points
12 X 12
24 X 60 मिनिटे
24 X 12 X 60 सेकंद
1/360 वर्ष
सोडवा 2 points


1/4
5
3X
X/4
ABCD हा चौकोन आहे. दुसरा चौकोन PQRS हा त्याला एकरूप आहे. (ABCD या चौकोनाच्या आकाराएवढा) < P व < S= 80° मापाचे आहेत. तर कोणते विधान सत्य असू शकेल?
2 points



PQ = AB
< Q हा काटकोन आहे.
PQRS च्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत.
PQRS चे क्षेत्रफळ ABCD च्या क्षेत्रफळापेक्षा कमी आहे.
खालीलपैकी कोणते विधान त्यांच्या सरासरी गुणांबाबत योग्य आहे? 2 points


1) रिटाचे सरासरी गुण रेणूपेक्षा जास्त आहेत.
2) रिटाचे सरासरी गुण रेणूपेक्षा कमी आहेत.
3) रिटाचे व रेणू यांचे सरासरी गुण समान आहेत.
4) रिटा व रेणू यांच्या सरासरी गुणांची तुलना होऊ शकत नाही.
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?2 point


1) मुला-मुलींच्या एकत्र शाळा मुलांच्या शाळांपेक्षा जास्त आहेत.
2) एकूण शाळांच्या निम्म्यापेक्षा जास्त मुलांच्या शाळा आहेत.
3) एकूण शाळांच्या पेक्षा जास्त रात्रशाळा आहेत.
4) मुलींच्या शाळा व मुलामुलींच्या एकत्र शाळा यांची एकूण संख्या मुलांच्या शाळांच्या संख्येपेक्षा जास्त आहेत.
खालीलपैकी कोणत्या यादीमध्ये संख्या या मोठ्याकडून लहानाकडे या क्रमाने आहेत?2 points
0.444, 0.43, 0.4, 0.355
0.4, 0.43, 0.444, 0.355
0.355,. 0.4, 0.43, 0.444
0.43, 0.355, 0.444, 0.4


6/60
5/7
5/49
40/49
30 सेंमी लांब पातळ वायर पासून एक आयत बनविला. जर या आयाताची रुंदी 6 सेमी असेल. तर त्याची लांबी किती असेल? 2 points
6 सेमी
18 सेमी
9 सेमी
12 सेमी
जेव्हा नवीन पूल बांधला गेला तेव्हा बसला एका शहरापासून दुसऱ्या शहराकडे प्रवास करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ 50 मिनिटा पासून 40 मिनिटापर्यंत कमी झाला दोन शहरा दरम्यानच्या प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये शेकडा किती ने घट झाली?
2 points
50%
45 %
10 %
20%
एका चौरसाकृती बोर्डाचे क्षेत्रफळ 7056 चौरस सेमी आहे. बोर्डाची प्रत्येक बाजूची लांबी किती आहे ?2 गुण
84 सेमी
86 सेमी
76 सेनी
94 सेमी
खालील आकृत्यांमध्ये लहान घनाकृती ठोकळे एकत्र ठेवून मोठे ठोकळे बनवले आहेत.जर सर्व लहान ठोकळे समान आकाराचे असतील तर कोणत्या मोठ्या आकाराचे आकारमान (घनफळ ) इतरापेक्षा भिन्न असेल ?


पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
रवीच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 वर्षांनी जास्त त्याच्या वडिलांचे वय आहे. रवीचे वय x वर्षे आहे. तर त्याच्या वडिलांचे वय कसे मांडता येईल ? 2 points
3 ( x + 5 )
( x ÷ 3 ) – 5
(x- 5) ÷ 3
3x + 5
खाली दिलेल्या स्तंभालेखावरून कोणत्या दोन महिन्यात वीज वापरातील फरक 30 मेगावॅट असेल?


एप्रिल व मे
फेब्रुवारी व मार्च
मार्च व मे
फेब्रुवारी व एप्रिल
खालील संख्यारेषा पहा व कोणाची किंमत सर्वात जास्त असेल ते ओळखा.


q – p
q + p
q × p
q ÷ p


Option 1
Option 2
Option 3
Option 4
एक मोटार दोन तासात 60 किमी प्रवास करते तर तिचा ताशी वेग किती?
2 points
120 किमी
30 किमी
60 किमी
20 किमी
एका शेतकऱ्यास गुलाबाची शेती करायचे आहे त्यासाठी त्यांने पुनरुत्पादनाची कोणती पद्धत वापरावी ?
2 points
युग्मक
खंडीय
शाखीय
बीजाणू निर्मिती
शाळेच्या आवारात एक झाड आहे शरद ऋतूमध्ये त्याची पाने गळतात या पानाची विल्हेवाट लावण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता?
2 points
शाळा परिसराच्या बाहेर पाने जाळणे.
पाणी जवळच्या असलेल्या पाण्यामध्ये फेकणे.
कंपोस्ट खत बनवण्यासाठी पाने एका खड्ड्यामध्ये टाकणे.
शाळा परिसरात पाने पसरू देणे.
सोबतच्या आकृतीत दर्शविल्याप्रमाणे एक अपरावर्तित किरणाद्वारे प्रकाश किरण आरशावर पडला. तर त्याचा परावर्तित किरण खालीलपैकी कोणता असेल?


किरण D
किरण C
किरण A
किरण B
खाली दिलेल्या बलापैकी कोणते संपर्क बल आहे ?
2 points
चुंबकीय बल
गुरुत्वीय बल
घर्षण बल
स्थितिक विद्युत बल
सोबत दिलेल्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चेंडू विविध प्रकारच्या समांतर पृष्ठभागावरून जाण्याकरिता A बिंदूपासून सोडला. खालीलपैकी कोणत्या पृष्ठभागावरून तो चेंडू जास्तीत जास्त अंतर जाईल?


Captionless Image
चिखल
वीट
काच
सिमेंट
खालील तक्ता चार विविध शहरांमधील त्याच दिवसाचे तापमान व पर्जन्यमान दर्शवतो. कोणत्या शहरांमध्ये बर्फवृष्टी झाली असेल?


शहर A
शहर B
शहर C
शहर D
खालील विधानापैकी उदासीनीकरण अभिक्रिया चे उदाहरण कोणते आहे?
2 points
लिटमस द्रवामध्ये कॉस्टिक सोडा मिसळणे.
लिटमस द्रवामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल मिसळणे.
आम्लारीधर्मी मातीमध्ये चुनकळी मिसळणे.
मुंग्या चावल्या तर त्यावर खाण्याचा सोडा चोळणे.
आग्रा येथील ताजमहाल यांच्या परिसरामध्ये अनेक उद्योग उभे राहिले. उद्योगांच्या अस्तित्वामुळे उद्भवलेले खालीलपैकी कोणते कारण ताजमहालचे नुकसान करीत आहे?
2 points
आम्ल वर्षा
गालीचा विणकाम
ध्वनी पातळीचा परिणाम.
शहरातील गर्दी
रेश्माने आपला हात चुकून आगीच्या ज्योतीवर ठेवला लगेचच पाठिमागे घेतला तिला उष्णतेची जाणीव झाली हा जाणीवेचा संदेश कोणामार्फत वाहून नेला जातो?
2 points
त्वचा पेशी
चेतापेशी
रक्तपेशी
स्नायू पेशी
वारंवारिता ———–या एककात मोजली जाते.
2 points
न्यूटन
ज्युल
हर्ट्झ Hz
यापैकी नाही
एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात यालाच……. म्हणतात.
2 points
प्रकाशाचे परावर्तन
प्रकाशाचे अपवर्तन
यापैकी नाही
विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामाचा उपयोग खालील पैकी कोणत्या साधनात होतो?
2 points
विद्युत विलेपन (इलेक्ट्रोप्लेटिंग)
इस्त्री
विद्युत बल्ब
विद्युत घंटा ( बेल )
खालीलपैकी कोणता एक बदल परिवर्तनीय नाही ?
2 points
कोळशाचे ज्वलन
मेणाचे वितळणे.
पाण्यामध्ये मीठ विरघळणे.
पाण्यापासून वाफ तयार होणे.
वनस्पतीमध्ये श्वसन प्रक्रिया कधी होत असते?
2 points
फक्त दिवसा
फक्त रात्रीच्या वेळी
प्रकाश संश्लेषण होत नसते तेव्हाच.
सर्व वेळी
खालील आकृतीमध्ये अन्नसाखळी दर्शविली आहे अन्नसाखळीमध्ये प्राथमिक भक्षक व द्वितीय भक्षक आहेत. जे प्राणी व जीव खाल्ले जातात त्यांच्याकडून जे प्राणी त्यांना खातात त्यांच्या मध्ये बाण दर्शविला आहे.कोणते वाक्य सत्य आहे?


2 points
प्राथमिक भक्षक वनस्पती खातात.
घुबड प्राथमिक भक्षक आहे.
गाजर हे प्राथमिक भक्षक आहे.
प्राथमिक भक्षक प्राण्यांना खातात.
तुम्ही वर्गात असताना भूकंप झाला, अशावेळी स्वतःला वाचविण्यासाठी तुम्ही कोणती कृती त्वरित कराल?
*
2 points
शिक्षकांच्या सूचनांची वाट पाहणे.
इतरांना मदतीला बोलावणे.
जिथे असाल तिथे खाली बसणे.
डोक्याचे संरक्षण करण्यासाठी डोक्यावर आच्छादन घेणे.
इंग्रज राजवटीत भारतातील हस्तव्यवसाय उद्योगात घसरण होण्यास खालील पर्यायांपैकी कोणते कारण होते?
*
2 points
भारतीय लोकांवर पाश्चात्त्य जीवनशैलीचा प्रभाव पडला होता.
युरोपमध्ये भारतीय माल आयात करण्यासाठी जास्त कर लावला जात असे.
भारतातील कच्चामाल ब्रिटनमध्ये निर्यात करण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते.
ब्रिटनमधून आयात केलेल्या करमुक्त व स्वस्त मशीनद्वारे भारतात माल बनविला जात असे.
खाली दिलेल्या आकृतीमध्ये 10° उत्तर व 10° दक्षिण या अक्षांशादरम्यान कोणता हवामान विभाग दर्शविला आहे?
*
2 points
Captionless Image
ध्रुवीय
विषुवृत्तीय
समशीतोष्ण
मोसमी
इंग्रजी राजवटीमध्ये भारतात खालील कोणता पर्याय सामाजिक सुधारणेशी सहमत आहे?
*
2 points
टपाल व्यवस्थेची सुरुवात.
रेल्वे ची स्थापना
मतदानाचे वय 21 वरून 18 असे कमी करणे.
सती प्रथेचे उच्चाटन.
खाली दिलेल्या मातीच्या थरांचे आकृतीचे निरीक्षण करा. व पिकाच्या लागवडीसाठी मातीचा सर्वोत्तम थर कोणता ते ओळखा.
*
2 points
Captionless Image
A
B
C
D
खालीलपैकी कोणते कारण भारतीय सैनिकांना अठराशे सत्तावनचा उठाव करण्यासाठी कारणीभूत ठरले?
2 points

  • ब्रिटिश सैनिक व वरिष्ठांच्या तुलनेत भारतीय सैनिकांना मिळणारी अयोग्य वागणुक.
  • ब्रिटिश वरिष्ठांकडून भारतीय सैनिकांना त्यांच्या धार्मिक बाबीवरून रोजच मिळणारी अपमानास्पद वागणूक.
  • गाई व डुकराची चरबी असल्याचा संशय असलेल्या काडतुसांचा वापरास सुरुवात.
  • भारतीय सैनिकांना आपण ब्रिटिश सैनिकापेक्षा संख्येने कितीतरी अधिक आहोत अशी झालेली जाणीव.

रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर एक 10 वर्षाचा मुलगा काम करत आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या कोणत्या मूलभूत हक्काचे उल्लंघन या परिस्थितीमध्ये झाले आहे?

  • 2 points
  • शोषणाविरुद्धचा हक्क
  • स्वातंत्र्याचा हक्क
  • शिक्षणाचा हक्क
  • समानतेचा हक्क

5)राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. दर दोन वर्षांनी सहा वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले ——— सदस्य निवृत्त होतात.

  • 2 points
  • 2/3
  • 1/7
  • 1/3
  • 1/5

खालील पर्यायापैकी कोणती संस्था कायदे निर्मिती करण्याचे काम करते ?2 points

  • फक्त राज्यसभा
  • फक्त लोकसभा
  • सर्वोच्च न्यायालय
  • संसद

भारतामध्ये स्थानिक शासनाकडून स्वच्छता का पुरवली जाते?2 points

  • 1) भारतीय संविधानामध्ये असलेल्या जगण्याचा हक्काचा तो भाग आहे.
  • 2) स्थानिक शासनाला दुसरे कोणतेही काम नाही.
  • 3) भारतीय कायदा खाजगी क्षेत्राला हे काम करण्यास परवानगी देत नाही.
  • 4) लोकांना ही कृती स्वतःला करता येत नाही.

समजा तुमच्या जिल्ह्यातील लोकांना एक नवीन शाळा त्यांच्या भागात हवी आहे. परवानगी देण्यासाठी सक्षम प्राधिकारी कोण आहे?2 points

  • 1)उच्च न्यायालय
  • 2) फक्त केंद्र शासन
  • 3)फक्त राज्य शासन
  • 4)राज्य व केंद्र शासन दोन्हीही

खालीलपैकी कोणती सार्वजनिक सुविधा फक्त शासनाकडून पुरवली जाते?2 points

  • 1) रेल्वे
  • 2) शिक्षण
  • 3)बस सुविधा
  • 4)अन्न धान्य पुरवठा

खालील नकाशात अकबर व औरंगजेबाच्या शासन काळातील अशी स्थळे दर्शवितो ज्यांनी मुघल सत्तेचा काही भाग व्यापला होता नकाशाचे निरीक्षण करा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

चितोड व अंबर सध्याच्या कोणत्या भारतीय राज्यांमध्ये स्थित आहे?
2 points
राजस्थान
उत्तर प्रदेश
मध्य प्रदेश
गुजरात
भारताची प्रमाणवेळ 82°30′ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार का निश्चित केली आहे?
2 points
वरीलपैकी सर्व पर्याय अयोग्य
पूर्व रेखावृत्तावर ईल स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक फरक पडत नाही.
वरील दोन्ही पर्याय योग्य.
हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे.

One thought on “NAS Question Paper Class 9th

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!