NAS Question Paper Class 9th

राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) नमुना सराव पेपर 1 इयत्ता नववी


www.learningwithsmartness.in


प्र. 1-6) खालील संवाद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे दया.
वडील : चल पायल, आपण नदीकिनारी फिरायला जाऊ या.

पायल : हो बाबा, आज छान वारा सुटलाय.

वडील : तुला जमिनीवर पडलेली ही सर्व पाने दिसताहेत काय ? मी तुझ्या वयाचा होतो, तेव्हा छंद म्हणून पाने आणि फुले पुस्तकात ठेवत असे.

पायल : हा कसला छंद आहे ?

वडील : अगं, मी पाने आणि फुले जुन्या वर्तमानपत्रात काळजीपूर्वक पसरवून ठेवत असे.

पायल : पण तुम्ही ते कसे ठेवत होता ?

वडील : मी वर्तमानपत्रावर जड पुस्तके ठेवत असे. पाने दाबली गेल्यानंतर आणि सुकल्यानंतर मी ती रंगीत कागदावर चिकटवत असे.

पायल : बाबा! ते कागद अजूनही तुमच्याकडे आहेत काय ? मला ते बघायचे आहेत.

वडील : हो! आहेत ना! पण या सुटीत तू तुझी स्वतःची चिकटवही का नाही तयार करत ?

पायल : हं…! कल्पना चांगली आहे. मी आवडणारी फुले गोळा करेन आणि ज्यामध्ये ती ठेवेन, त्या प्रत्येक पानावर तारखेसह नाव लिहीन..

वडील : लक्षात ठेव. फुले आणि पाने गोळा करणे निरुपयोगी काम नाही. तुला वेगवेगळ्या झाडांविषयी बरेच काही शिकता येईल. तसेच या छंदामुळे तू निसर्गाच्या जवळही जाशील.

पायल : मला खात्री आहे, की निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मलाही खूप आनंद मिळेल.

प्र. 1) लहान असताना वडिलांना काय गोळा करण्याचा छंद होता ?
1) वर्तमानपत्र
2) पुस्तके
3) रंगीत कागद
4) पाने आणि फुले
प्र. 2 ) वडील वर्तमानपत्रावर जड पुस्तके का ठेवत होते ?
1) पाने-फुले चिकटविण्यासाठी
2) पाने व फुले दाबण्यासाठी
3) पाने व फुले सजविण्यासाठी
4) पाने व फुले चुरगळण्यासाठी
प्र. 3) वरील संवादानुसार वडिलांच्या मते चिकटवही म्हणजे काय ?
1) सुकलेली पाने आणि फुले चिकटवलेली वही
2) छायाचित्रे असलेली वही
3)चित्रे असलेली वही
4)टाकाऊ वस्तू असलेली वही
प्र. 4) चिकटवही बनविण्यासाठी सर्वांत आधी काय करायला हवे ?
1) पाने आणि फुले सुकवावी.
2) झाडांची नावे लिहावी.
3) पाने व फुले गोळा करावी.
4) पाने व फुले पसरवावी.
प्र. 5) खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही ?
1) पाने व फुले गोळा करणे उपयोगी काम आहे.
2) पाने व फुले लवकर दाबली जातात आणि सुकतात.
3) निसर्गाच्या सान्निध्यात आनंद मिळतो.
4) पाने, फुले गोळा करून झाडांबद्दल बरेच काही शिकता येते.
प्र. 6) वडिलांनी फिरायला जाताना पायलला काय दाखविले ?
1) खाली पडलेली फुले
2) खाली पडलेली पाने
3) जुनी वर्तमानपत्रे
4) हवेची झुळूक
प्र. 7-12) खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे दया.
जगभरात वाहतुकीच्या साधनांमध्ये सायकल किंवा बायसिकल सगळ्यात स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारे साधन आहे. ‘बायसिकल’ हा शब्द, इंग्रजीच्या ‘बाय’ म्हणजेच ‘दोन’ आणि ग्रीक शब्द ‘कुकलोस’ म्हणजे ‘चाक’ या शब्दांपासून बनलेला आहे.सर्वांत आधी सायकल लाकडापासून तयार करण्यात आली होती आणि त्यात पॅडल नव्हते. कालांतराने लोखंडी सायकली तयार झाल्या. त्यात चेन आणि टायर नव्हते. १८६० मध्ये दोन फ्रेंच अभियंत्यांनी पुढे मोठे चाक आणि पॅडल, त्याला मागे लहान चाक लावून दोन्ही चाके जोडली. उंच आसन आणि चाकांचे असमान वजन या त्रुटींमुळे या सायकली चालविणे त्रासदायक होते. पुढील चाकाचा व्यास कमी करून आणि सीट मागे करून या अडचणीवर तोडगा काढण्यात आला. आजच्या काळात मागील आणि पुढील चाके गिअरने जोडलेली असतात.आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली उपलब्ध आहेत. शर्यतीच्या सायकलींना अनेक गिअर असतात आणि त्या खूप महाग असतात. मनोरंजनासाठी देखील सायकली असतात. प्रामुख्याने त्या सर्कशीत वापरल्या जातात. व्यायामासाठी आणि डोंगराळ भागात चालविण्यासाठी वेगळ्या प्रकारच्याही सायकली असतात. सायकल चालविण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे प्रदूषणही होत नाही. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे इंधन लागत नाही. सायकल चालविण्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज नसते.भारतातील ग्रामीण भागात सायकल हे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन आहे कारण, शेतातून आणि जंगलातून सायकल सुलभतेने चालवता येते. शहरातही वाहनांची गर्दी टाळण्यासाठी बरेच जण सायकलीचा अधिक वापर करू लागले आहेत. आपणही कारच्या ऐवजी सायकल वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे. सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार केल्या जाव्यात आणि निःशुल्क सायकल स्टॅन्डची सोय असावी. सायकल खरेदीसाठी बँकांनी कमी व्याजदराने कर्ज दिले पाहिजे. म्हैसूरसारख्या शहरात सरकारने व्यापक प्रमाणात ‘शेअर्ड सायकल’ ही योजना सुरू केली आहे. यात काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी सायकल भाड्याने मिळते.

प्र. 7) खालीलपैकी सर्वांत जुनी सायकल कोणती ?
1) लोखंडी सायकल
2)लाकडी सायकल
3)व्यायामाची सायकल
4) डोंगराळ भागासाठी उपयुक्त सायकल
प्र. 8) दुसरा परिच्छेद कशाविषयी आहे ?
1) सायकलीचा इतिहास
2) सायकलीची रचना
3) सायकलींचे वितरण
4) सायकलीचे फायदे
प्र. 9) शर्यतीची सायकल ही साध्या सायकलीपेक्षा कशी वेगळी आहे ?
1)यात पॅडल नसतात.
2)खूप स्वस्त असते.
3)यात विशिष्ट प्रकारचे ‘गिअर’ असतात.
4)यात चाकांचा आकार वेगळा असतो.
प्र. 10) सायकल कारपेक्षा चांगली असते, कारण……..
1) चालविण्यासाठी परवान्याची गरज असते.
2) खूप महाग असते.
3) प्रदूषण होत नाही.
4) चालविण्यासाठी वेगळी मार्गिका असते.
प्र. 11 ) ग्रामीण आणि शहरी भागात सायकलीचा समान फायदा कोणता ?
1) जंगलात आणि शेतात चालवता येते.
2) सायकलीसाठी इंधनाची गरज नसते.
3) रहदारी टाळण्यासाठी उपयोग होतो.
4) सायकलीसाठी वेगळी मार्गिका असते.
प्र. 12) फ्रेंच अभियंत्यांनी तयार केलेल्या सायकलींमध्ये कोणती त्रुटी होती ?
1)पॅडल नव्हते.
2) चेन नव्हती.
3 ) वजन असमान होते.
4)टायर नव्हते.
प्र. 13-18) खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे दया.

आपले ऊर्जा स्रोत

पृथ्वीसाठी प्रमुख ऊर्जास्रोत सूर्य आहे. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचल्याने हवा, जमीन आणि समुद्राला उष्णता मिळते. दुसऱ्या शब्दात म्हटले तर सूर्यामुळे पृथ्वी तापते. परंतु ही उष्णता सगळीकडे समप्रमाणात नसते. पृथ्वीच्या विविध भागात सूर्यप्रकाश आणि त्याचा कालावधी वेगवेगळा असतो.पृथ्वीला संपूर्ण ऊर्जा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सूर्याकडून मिळते. ही ऊर्जा आपल्यापर्यंत प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपात पोहोचते. चंद्राकडून मिळणारा प्रकाश देखील सूर्याचाच असतो. चंद्र एका मोठ्या आरशासारखा असून तो सूर्याची किरणे पृथ्वीकडे परावर्तित करतो.आपल्याला विदयुत ऊर्जा देखील अप्रत्यक्षपणे सूर्याकडूनच मिळते. कशी ? आपण विदयुत ऊर्जा तयार करण्यासाठी खूप उंचावरून पडणाऱ्या जलशक्तीचा वापर करतो. हे पाणी पावसामुळे मिळते. आपल्याला माहिती आहे, की सूर्यामुळे जमिनीवरील पाणी तापते. हे पाणी वाफ होऊन वर जाते आणि पावसाच्या रूपात खाली पडते.कोळशामुळे आपल्याला मिळणारा प्रकाश आणि औष्णिक ऊर्जा अप्रत्यक्षपणे सूर्याकडूनच मिळते. आपल्याला माहिती आहे, की सर्व वनस्पती, झाडे सूर्यप्रकाशामुळे वाढतात. वनस्पती आणि वृक्ष खडकांखाली शेकडो वर्षांपर्यंत दाबले जाऊन कोळसा तयार होतो म्हणूनच सूर्याशिवाय पृथ्वीवर जीवन अशक्य आहे.

प्र. 13) पृथ्वीला सूर्याची ऊर्जा कशी मिळते ?
1) प्रत्यक्ष
2) अप्रत्यक्ष
3)प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष
4)प्रत्यक्ष नाही आणि अप्रत्यक्षही नाही
प्र. 14) आकाशात वाफ थंड होते, तेव्हा ती कशाच्या रूपात खाली पडते ?
1)पाऊस
2) वारा
3) सूर्यप्रकाश
4) ढग
प्र. 15) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही.
1) चंद्र सूर्याची किरणे पृथ्वीकडे परावर्तित करतो.
2) सूर्य आपल्याला प्रकाश आणि उष्णता देतो.
3)समुद्रातील पाणी सूर्यामुळे तापते.
4) पृथ्वीच्या सर्व भागात सारखी उष्णता मिळते.
प्र. 16) डोंगरावरून पडणाऱ्या जलशक्तीपासून आपल्याला काय मिळते ?
1) सौर ऊर्जा
2)जल ऊर्जा
3) विदयुत ऊर्जा
प्रकाश ऊर्जा
प्र. 17) उताऱ्यात म्हटल्याप्रमाणे, सूर्य नसल्यास काय होईल ?
1) चंद्र प्रकाश देईल.
2)जीवन अशक्य होईल.
3) कोळशाचा साठा घटेल
. 4) वनस्पतींची वाढ होईल.
प्र. 18) वनस्पती आणि वृक्ष शेकडो वर्षांपर्यंत खडकांखाली—————– ‘कोळसा तयार होतो ?
1) ठेवल्यामुळे
2) दडल्यामुळे
3) झाकल्यामुळे
4) दाबले गेल्यामुळे
प्र. 19-25) खालील जाहिरात वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे दया.

प्र. 19) ग्रीष्मोत्सव काय आहे ?
1) मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीतील उत्सव.
2) उन्हाळ्याच्या सुट्टीतील संगीतोत्सव.
3) 8 ते 16 वयोगटाच्या मुलांसाठी उत्सव.
4) उन्हाळ्याच्या सुट्टीतील सण साजरे करणे.
प्र. 20) खालीलपैकी कुणासाठी बसची सोय नाही ?
1) मुले
2) मुली
3) माता
4) पिता
प्र. 21 ) ग्रीष्मोत्सवात मुलांना काय करता येईल ?
1) संशोधनाचा आनंद घेता येईल.
2)मजा करता येईल आणि झोपता येईल.
3) कुतूहल शमविता येईल आणि चित्रपट पाहता येतील.
4) नव्या गोष्टींचा शोध घेता येईल आणि पाहता येईल.
प्र. 22 ) ग्रीष्मोत्सवात कोणाला भाग घेता येईल ?
1)1 ते 16 वयोगटातील मुले
1 ते 8 वयोगटातील मुले
3)1 ते 5 वयोगटातील मुले
4 ) 5 ते 16 वयोगटातील मुले
प्र. 23) ग्रीष्मोत्सवातील कोणता कार्यक्रम 5 ते 8 वयोगटातील मुलांसाठी खुला आहे ?
1) विणकाम
2) नाटक
3) फोटोग्राफी
4) तबलावादन
प्र. 24) सादरीकरणाची कला म्हणजे काय ?
2 points
1) संगीत, नृत्य आणि नाट्यकला
2)हस्तकला
3) क्रीडा स्पर्धांचे आयोजन
4) संगणकाद्वारे साकारलेली कला
प्र. 25) मिश्र कलांमध्ये कोणता प्रकार येतो ?
2 points
1) लोकनृत्य
2) तबला वादन
3) गायन
4) नाटक

राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) नमुना सराव पेपर 1 इयत्ता नववी

गणित
प्र. 26) खालीलपैकी कोणता कालावधी एक दिवसाइतका असेल ?

*
2 points
12 x 12 तास
2 ) 24 × 60 मिनिटे
3) 24 × 12 × 60 सेकंद
1/360वर्ष


Option 1
Option 2
Option 3
Option 4
प्र. 28) ABCD हा एक चौकोन आहे. याला PQRS हा एक अन्य चौकोन एकरूप आहे. ZP आणि Z S प्रत्येकी 80° असतील. तर,

खालीलपैकी कोणते विधान योग्य असेल ?


1) PQ= AB
2)८ Q काटकोन आहे.
3) PQRS च्या सर्व बाजू समान आहेत.
4) PQRS चे क्षेत्रफळ ABCD च्या क्षेत्रफळापेक्षा कमी आहे.
प्र. 29) रिता आणि रेणू एका वर्गात शिकतात. त्यांच्या तीन विषयांच्या परीक्षेचे गुण खालीलप्रमाणे आहेत :

त्यांच्या सरासरी गुणांविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?


1) रिताचे सरासरी गुण रेणूच्या गुणांपेक्षा अधिक आहेत.
2) रिताचे सरासरी गुण रेणूच्या गुणांपेक्षा कमी आहेत.
3) रिताचे सरासरी गुण रेणूच्या गुणांइतके आहेत.
4) रिता आणि रेणूच्या सरासरी गुणांची तुलना होऊ शकत नाही
खालील आलेखात विविध शाळांची विभागणी दर्शविली आहे: मुलांची शाळा, मुलींची शाळा, मुला मुलींची शाळा आणि रात्र शाळा. यावरून योग्य विधान निवडा.


मुला मुलींच्या शाळांची संख्या मुलांच्या शाळेपेक्षा अधिक आहे.
मुलांच्या शाळांची संख्या एकूण शाळांच्या संख्येच्या निम्म्याहून अधिक आहे.
रात्र शाळांची संख्या एकूण शाळांच्या एक तृतीयांश संख्येपेक्षा अधिक आहे.
मुलींच्या आणि मुला मुलींच्या शाळांची एकूण संख्या मुलांच्या शाळांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
पुढील आकृतीत ABCD हा समांतरभुज चौकोन आहे.
AB ची लांबी किती?


7 सेमी
9 सेमी
14सेमी
16 सेमी
एका आयताकार बागेच्या चारही बाजूंची एकूण लांबी 72 मीटर आहे. बागेची लांबी वीस मीटर असेल तर बागेचे क्षेत्रफळ किती?
2 points
140चौ.मी.
160 चौ. मी.
320 चौ.मी.
400 चौ. मी.
खालील संख्येला 9 ने पूर्ण भाग जात असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल?


6
7
8
9
एका वर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुण खालील तक्ते दिले आहेत. तर किती विद्यार्थ्यांना 6 पेक्षा अधिक गुण आहेत?


9
2
6
17
एक नवीन फुल बांधल्यानंतर बसणे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी लागणारा वेळ 50 मिनिटा वरून 40 मिनिटांवर आला, तर दोन शहरांमधील प्रवासासाठी लागणारा वेळ किती टक्क्यांनी घटला?
10%
20%
45%
50%
सोडवा.


Option 1
Option 2
Option 3
Option 4
खालील स्तंभालेखात वेगवेगळ्या महिन्यातील विजेचा वापर दर्शविला आहे. कोणत्या दोन महिन्यात विजेच्या वापरातील फरक 30 मेगा वॅट्स आहे?


मार्च आणि मे
फेब्रुवारी आणि मार्च
फेब्रुवारी आणि एप्रिल
एप्रिल आणि मे
एका चौरसाकृती फळाचे क्षेत्रफळ 7056 चौ.सेमी आहे. त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी किती?
2 points
86 सेमी
94 सेमी
84 सेमी
76 सेमी
खाली लहान ठोकळे जोडून मोठे ठोकळे बनवले आहेत. सर्व लहान ठोकळे एकाच मापाचे असल्यास खालीलपैकी कोणत्या मोठ्या ठोकळ्याचे घनफळ इतरांपेक्षा वेगळे असेल?


Option 1
Option 2
Option 3
Option 4
दिनाचे इंग्रजीच्या साप्ताहिक परीक्षेतील गुण 26, 18, 17, 23, 9, 7, 5 असतील तर या गुणांचा मध्यमान किती?
15
16
17
18


Option 1
Option 2
Option 3
Option 4
72 ला खालीलपैकी कोणत्या सर्वाधिक लहान संख्येने गुणल्यानंतर पूर्ण घन Cube संख्या येईल?
*
2 points
2
3
4
9
रवीच्या वडिलांचे वय रवीच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 वर्षांनी अधिक आहे. वडिलांचे वय 29 वर्षे असेल,
तर रवीचे वय किती?

*
2 points
6 वर्षे
7 वर्षे
8 वर्षे
9 वर्षे
पदावलीतील रिकामी जागा भरा.



-xy

2xy
xy
2xy
जर a + b = 2 आणि ab = – 8 असेल, तर खालील राशीचे मूल्य किती ?



1) 18
2) 20
3) 22
4) 24
एका वस्तूचा बाजारभाव ₹240 आहे. त्यावर 15% ची सूट दिल्यावर वस्तूची विक्री किंमत किती ?
2 points
1) ₹185
2) 200
3) ₹204
4) 205
₹4000 मुद्दलाची 2 वर्षांनी द.सा.द.शे. 10 टक्के चक्रवाढ दराने होणारी रास किती ?
1)₹4040
2)4080
3)4840
4)4048
एक काम 18 माणसे 18 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 12 जण किती दिवसात पूर्ण करतील?
2 points
12 दिवस
18 दिवस
24 दिवस
27 दिवस
एका चौकोनाचे तीन कोन 700, 80° आणि 100° आहेत, तर चौथा कोन किती अंशाचा असेल?
2 points
1) 90⁰
2) 100⁰
3) 110⁰
4) 120⁰
एका घनाकृतीमध्ये (polyedron) V, E आणि F अनुक्रमे शिरोबिंदू, कडा आणि पृष्ठांची संख्या दर्शविणारे आहेत, तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर असेल ?
2 points
V+E=F + 2
E-V=F+ 2
V-F=E+ 2
V+F=E + 2
चौकोनी जाळीतील छायांकित भागाचे क्षेत्रफळ कितीच्या सर्वात जवळ आहे?


7 वर्ग चौ. सेमी.
8 वर्ग चौ. सेमी
10 वर्ग चौ. सेमी
13 वर्ग चौ. सेमी
खालील आकृतीमध्ये AB||DC असेल तर चौकोन ABCD चे क्षेत्रफळ किती वर्ग चौ. सेमी असेल?


71
416
304
608
एका वृत्तचितीची त्रिज्या 12 सेमी आणि उंची 14 सेमी असेल तर त्या वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ किती ?
1056 चौ.सेमी.
352 चौ.सेमी.
528 चौ.सेमी
704 चौ.सेमी
एका खोक्यात 60 विद्युत दिवे आहेत त्यातील 18 विद्युत दिवे खराब आहेत खोक्यात न पाहता एक दिवा काढल्यास तो खराब असण्याची संभाव्यता किती?
3/10
7/10
3/5
4/9
सुजाताने एक वस्तू रु.225ला विकून 12.5% नफा मिळवला, तर वस्तूचे खरेदी मूल्य रुपये मध्ये किती असेल?


Option 1
Option 2
Option 3
Option 4
खालीलपैकी कोणती संख्या 11 ने विभाज्य आहे?
1) 17303
2) 13703
3) 13307
4) 13073
एका कारचा वेग 48 km/h आहे, तर 312 km अंतर कापण्यासाठी कारला किती वेळ लागेल ?
साडेपाच तास
आठ तास
सहा तास
साडेसहा तास
खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे?
1) 5209
2) 2606
3) 4301
4) 2704
सोडवा


पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
प्र. 60) समांतरभुज चौकोनासाठी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
1) कर्ण समान असतात.
2) कर्ण परस्पर लंब असतात.
3) संलग्न कोन समान असतात.
4) संमुख कोन एकरूप असतात.

2 thoughts on “NAS Question Paper Class 9th

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!