नवोदय विद्यालय पेपर 2013 भाषा उताऱ्यावर आधारित प्रश्न
उतारा – 1
रस्त्यावरचे फेरीवाले हा शहरी जीवनाचा एक सर्वसाधारण घटक आहे आपला विक्रीचा माल डोक्यावर घेऊन फिरणारा दुकानदार अथवा किराणा, खेळणी आणि दैनंदिन उपयोगाच्या इतर वस्तू विकणारी हातगाड़ी. तो आपला माल विकण्याकरिता रस्तोरस्ती फिरत राहतो. फेरीवाल्याची आपला माल विकण्याची तऱ्हा लोभसवाणी असते. ते आपला माल वाहून नेतात आणि आकर्षक पद्धतीने रस्त्यातून ओरडत जातात. काही फेरीवाले घंटा बडवतात, तर दूसरे ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी बिचित्र आवाज काढतात. भाज्या व फळे विकत घेणाऱ्या गृहिणी आणि आइसक्रिम, मिठाया व खेळणी विकत घेणारी मुले ही फेरीवाल्यांची गि-हाईक. फेरीवाले आपल्या मालाची किंमत कधी निश्चित ठरवत नाहीत. म्हणून खरेदी करण्यापूर्वी लोक त्यांच्याशी घासाघीस करतात.
01.रस्त्यावरचा फेरीवाला म्हणजे असतो.
(A) मोठा व्यापारी
(B) फिरता व्यापारी
(C) प्रवासी विक्रेता
(D) फिरता दुकानदार
- फेरीवाल्याच्या माल विकण्याच्या तन्हेला ‘लोभसवाणी’ म्हटले आहे, कारण
(A) तो आपल्या सर्व ग्राहकांचे मनोरंजन करतो.
(C) तो आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेतो.
(B) तो आकर्षक पद्धतीने ओरडतो.
(D) तो सुखद रीतीने बातचीत करतो.
03.रस्त्यावरचा फेरीवाला आपल्या मालाची किंमत निश्चित ठरवत नाही, कारण
(A) तो खूप जास्त किंमत लावतो.
(C) गिन्हाईकांना त्याच्याशी घासाघीस करता येते.
(B) त्याला कितीही किंमत लावता येते.
(D) त्याला आपल्या मालाची किंमत निश्चित करणे परवडत नाही. - फेरीवाला दुकानाहून भिन्न असतो, कारण
(A) तो एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरत राहतो.
(C) तो किंमतीत घासाघीस करतो.
(B) तो आपला माल दुकानात ठेवतो.
(D) त्याची गि-हाइके सामान्यतः बायका असतात. - या उताऱ्यातील ‘घटक’ शब्दाचा अर्थ आहे
(A) एखाद्याच्या चेहऱ्याचा एक भाग.
(C) गि-हाइकांशी घासाघीस करणे.
(B) वर्तमान पत्रातील एक खास लेख.
(D) एखाद्या ठिकाणचा महत्त्वपूर्ण, रोचक गुणधर्म
उतारा – 2
एका चोराला फाशी देण्यापूर्वी त्याने विचारले की, तो राजाला भेटू शकतो का?, कारण त्याला काहीतरी महत्वाची गोष्ट राजाला सांगायची होती. जेव्हा त्याला राजाकडे नेण्यात आले, तेव्हा त्याने त्याला सांगितले की सोन्याची फळे देण्याऱ्या झाडांची लागवड कशी करायची, हे त्याला माहीत आहे. चोराने काय सांगितले ते खरे आहे का?, हे पाहण्याची उत्सुकता राजाच्या आणि दरबारातील मानकऱ्यांच्या मनात निर्माण झाली. चोराने राजाला सांगितले की, एखाद्या प्रामाणिक माणसाने रोप लावले तरच ते झाड वाढू शकते. म्हणून त्याने ते रोप राजाला लावण्यास सांगितले. राजा किंवा प्रधान किंवा दरबारातील मानकऱ्यांपैकी कोणीही ते रोप लावण्याइतका प्रामाणिक, नव्हता. यावरून असे दिसून आले की, ते देखील अप्रामाणिक होते. म्हणून राजाने चोराला माफ केले. - सोन्याचा फळ देणाऱ्या झाडाविषयी जाणून घेण्याचा उत्सुकता राजाच्या आणि दरबारातील मानकऱ्यांच्या मनात निर्माण झाली, कारण
(A) ते सगळे लोभी होते.
(C) चोर खरे बोलतो आहे का, हे त्यांना पाहायचे होते.
(B) त्यांना श्रीमंत बनायचे होते.
(D) त्यांना चोराला खोटे ठरवायचे होते. - चोराने राजाला सांगितले की असे झाड तेव्हाच वाढू शकेल…
(A) जेव्हा दरवारातील मानकरी ते लावतील
(C) जेव्हा स्वतः चोर ते लावेल.
(B) जेव्हा राजा ते लावेल.
(D) जेव्हा एखादा प्रामाणिक मनुष्य ते लावेल. - झाड लावायला कोणीच तयार नव्हता; कारण….
(A) कोणीच अप्रामाणिक नव्हते.
(C) राजा अप्रामाणिक होता.
(B) सगळेच अप्रामाणिक होते.
(D) चोर अप्रामाणिक होता. - म्हणून, राजाने चोराला माफ केले. येथे ‘माफ केले’ म्हणजे
(A) खटला भरला
(B) शिक्षा केली
(C) सोडून दिले
(D) निरोप दिला - या उताऱ्याला औचित्यपूर्ण शीर्षक होईल.
(A) चोर आणि राजा
(B) एका राजाची गोष्ट
(C) झाड
(D) सोन्याची फळे देणारे झाड
उतारा – 3
एखाद्या तळ्याबर हजारो हंसाचे आगमन विस्मयकारक असते. बदकांबरोबर हंसदेखील पाणपक्ष्यांच्या वर्गात मोडतात. हे पाणपक्षी पोहू शकतात, उडू शकतात आणि पाण्यात बुडी मारू शकतात. यांच्यापैकी बरेचसे हंस स्थलांतरण करणारे असल्याने, उन्हाळ्याचे महिने परदेशात अधिक थंड वातावरणात घालवतात आणि हिवाळा मध्य भारताच्या ऊबदार प्रदेशांत व्यतीत करतातः पाण्यात कौशल्याने वल्हवण्यास मदत करण्याऱ्या पडदा असलेल्या पायांकरिता ते जास्त प्रसिद्ध आहेत हे विस्मयकारक जीव वॉटरप्रुफ असतात. त्यांच्या शेपठ्यांमधील असणाऱ्या ग्रंथीतून स्रवणाऱ्या तेलाने ते आपले पंख माखतात आणि हे सुद्धा त्यांना थंड पाण्यापासून संरक्षण देते. - पाणपक्षी म्हणजे असे पक्षी, की जे
(A) मध्य भारतात स्थलांतरित होऊ शकत नाहीत.
(C) पोहू, उडू आणि पाण्यात बुडी मारू शकतात.
(B) पाण्यावर निरूद्देश तरंगू शकतात
(D) कोकलू शकतात.
- ‘सर्वांना माहीत असलेले’ या अर्थाचा उताऱ्यातील शब्द आहे –
(A) विस्मयकारक
(B) स्थलांतरित
(C) महत्त्वपूर्ण
(D) प्रसिद्ध - पाणपक्षी जास्त प्रसिद्ध कशासाठी आहेत ?
(A) ‘बॉटरप्रुफ’ असण्यासाठी
(B) ठिकठिकाणी स्थलांतर करण्यासाठी
(C) वल्हवण्यास मदत करणाऱ्या पडदा असलेल्या पायांसाठी
(D) थव्याने हिंडण्यासाठी - वरील उताऱ्यातील ‘स्थलांतर करणारे’ या शब्दाचा अर्थ आहे –
(A) निरूद्देश तरंगणारे
(B) हवामानातील बदलाबरोबर दुसऱ्या प्रदेशात गमन करणारे
(C) पाण्यात वल्हवणारे
(D) वॉटरप्रुफ - या उताऱ्यासाठी शोभणारे एक शीर्षक असेल
(A) हंसाचा थवा
(C) पडद्याच्या पायांचे पक्षी
(B) बॉटरप्रुफ जीव
(D) पाणपक्ष्यांचे विस्मयकारी जग
उतारा – 4
एका लक्षणीय अमेरिकन महिलेच्या ब्राँझच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच बॉशिंग्टन डी. सी. येथे यूएस कॅपिटल इमारतीत झाले. सन्मानित व्यक्ती हेलन केलर हिने अंध आणि बहिऱ्या लोकांना आदराने वागवण्यास जगाला शिकवले. अपंग लोकांच्या अधिकारांची ती प्रबळ पुरस्कर्ती होती. तो पुतळा हेलन केलरला हावभावांच्या द्वारे संभाषण करण्यात नुकत्याच शिकत असलेल्या एका सात वर्षाच्या मुलीच्या रूपात दाखवतो. १८८० मध्ये हेलन केलरचा जन्म जेथे झाला, त्या यूएस स्टेट ऑफ अलबामा ने हा देणगी दाखल दिलेला आहे. १९ महिन्यांची होईपर्यंत ती एक सर्वसाधारण बालक होती, आणि त्यानंतर तिला खूप ताप आला आणि त्यामुळे ती अंध आणि बहिरी झाली - हेलन केलरचा पुतळा बनवलेला आहे –
(A) सिरॅमिकचा
(B) प्लॅस्टिकचा
(C) काचेचा
(D) धातूचा - हेलन केलरला स्नमानित केले कारण तिने काम केले हक्कासाठी.
(A) केवळ मूकबधिरांच्या
(B) अपंग व्यक्तींच्या
(C) सामान्य लोकांच्या
(D) अंधांच्या - हेलन केलर पुतळ्यामध्ये दाखवलेली आहे –
(A) एक तरूणी
(B) एक वृध्दा
(C) लहान मुलगी
(D) मध्यमवयीन स्त्री - हेलन केलर अंध आणि बहिरी झाली –
(A) खूप ताप आल्यामुळे
(B) मलेरियामुळे
(C) एका आजारामुळे
(D) एका अपघातामुळे - ‘युएस स्टेट ऑफ अलबामा’ ने हा देणगी दाखल दिला आहे. येथे ‘हा’ म्हणजे –
(A) हेलन केलर
(B) पुतळा
(C) वॉशिंग्टन डी.सी.
(D) अपंगत्व