Punctuation Marks in Marathi

  विरामचिन्हे

1) पूर्णविराम –

  1. 1) विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी पूर्ण विराम दिला जातो.
  2. (.)
  3. उदा. मी सहलीला जातो.
  1. 2) शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्य अक्षरामुळे टिंब दिले जाते.
  2. सादर नमस्कार / नमन

उदा. सा. न.

  1. दा. ले.

दामोदर लेले

2) अर्धविराम- दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययानी जोडलेली असतात.

(;)

उदा. गड आला; पण सिंह गेला.

3) स्वल्प विराम- 

1) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात.

(,)

उदा. बागेत मोर, चिमणी, पोपट व कबुतर हे पक्षी होते.

2) संबोधन दर्शविताना

उदा. मुलांनो, इकडे लक्ष दया.

4) अपूर्णविराम- वाक्याच्या शेवटी तपशील दयावयाचा असल्यास-

(:)

उदा. चित्रकलेसाठी या गोष्टी लागतील : रंग, ब्रश, पेन्सिल, कागद, खोडरबर इ.

5) प्रश्नचिन्ह-

(?)

प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह वापरतात.

उदा. पुण्याला कधी जाणार?

6) उद्गारचिन्ह- उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह वापरतात.

(!) उदा. शी! शी! व्हा दूर. किती घाण केलं! नदी म्हणाली.

7) अवतरण चिन्ह :

1) दुहेरी अवतरण चिन्ह- बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता दुहेरी अवतरणचिन्ह वापरतात.

(” “) उदा. ते म्हणाले, “वर्षाला पन्नास हजार रुपये!”

2) एकेरी अवतरण चिन्ह – एखादया शब्दावर जोर दयावयाचा असला किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे

सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.

उदा. तिने ‘अभ्युदय’ या त्रैमासिकात प्रथमच लेखन केले.

8) संयोगचिन्हे- 1) दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर करतात.

(-) उदा. आई-वडील, मार्च-एप्रिलमध्ये

2) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्ह वापरतात.

उदा. आंतरराष्ट्रीय नाणे निधीमध्येही प्रतिनि-

धीत्व करण्याची संधी मिळाली.

9) अपसारण चिन्ह- 1) बोलता बोलता विचारमालिका ‘तुटल्यास डॅश वापरतात. (डॅश) (-)

उदा. मी खूप अभ्यास केला, पण

(डॅश) (-)

स्पष्टीकरण चिन्ह : 2) स्पष्टीकरण दयावयाचे असल्यास अपसारण चिन्ह वापरतात.

Punctuation Marks in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!