School Uniform

विषय : राज्य शासनाच्या मोफत गणवेश बुट व पायमोजे योजनेचा लाभ देण्याबाबत.

संदर्भ : १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसए-१२१४/ प्र.क्र.५०/एस.डी.३ दि.०६ जुले, २०२३

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसए-१२१४/प्र.क्र.०४/एस.डी.३ दि.१६ जानेवारी, २०२४

३) अवर सचिव, एसडी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय,मुंबई यांचेकडील पत्र क्र. एसएसए-२०२४/प्र.क्र.०४/एसडी-३ दि.१०/०४/२०२४.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत देण्याची नवीन योजना शासनाने सुरु केली आहे.त्याअनुषंगाने दि.०६ जुलै, २०२३ रोजी शारान निर्णय निर्गगित केला आहे. प्ररतुत योजनेंतर्गत एक जोड़ी बुट व दोन जोडी पायगोजे याकरित्ता प्रति लाभाथी विद्यार्थी रु.१७०/असा दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच, सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे बुट एक समान दर्जाचे असण्याकरिता शासनाने दि.१६ जानेवारी, २०२४ रोजीच्या

परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर मार्गदर्डाक सूचनांनुसारशैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये बुट व पायमोजे यांचा लाभ शाळेच्या पहिल्याच दिवशीविद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार आव्यक ती पुढील कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होणे आवश्‍यक आहे.

याकरिता संदर्भाधिन शासन निर्णय दि.०६ जुलै, २०२३ व शासन परिपत्रक दि.१६जानेवारी, २०२४ नुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आव्यकती कार्यवाही होणे आवश्यक असल्याने शाळा व्यवस्थापन समितींना सूचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!