Shivrajyabhishek Din General Knowledge Competition
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
1)सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये …….हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले.
- छत्रपती शिवाजी महाराज
- छत्रपती संभाजी महाराज
- राजर्षी शाहू महाराज
- यापैकी नाही
उत्तर छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे …..नाव ठेवले.
- राजगड
- प्रतापगड
- भुईकोट किल्ला
- यापैकी नाही
उत्तर राजगड
चुकीचा पर्याय निवडा.
- वीर माता जिजामाता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांची कन्या होत्या.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली तेव्हा ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती होती.
- निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीची सरदार झाले
- स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली
उत्तर स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली
छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेऊन जावळीच्या खोऱ्यात ..किल्ला बांधला.
- रायगड
- शिवनेरी
- प्रतापगड
- राजगड
उत्तर प्रतापगड
चुकीचा पर्याय निवडा.
- शिवाजी महाराजांचा जन्म____१९फेब्रु.१६३०
- शिवाजी महाराज व अफजलखान भेट_१० नोव्हे.१६५९
- सिद्दी जोहर स्वराज्यावर चालून आला ____इ.स.१६६०
- शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली इ.स.१६५६
- निजामशाहीचा पाडाव____ इ.स.१६३१
उत्तर निजामशाहीचा पाडाव____ इ.स.१६३१
विशाळ गडाकडे कूच करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला?
- जावळीचे मोरे
- अफजलखान
- पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे
- यापैकी नाही
उत्तर पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे
शिवरायांचा जन्म कधी व कोठे झाला?
- 19 फेब्रुवारी 1630 सिंहगड येथे
- 19 फेब्रुवारी 1627 शिवनेरी येथे
- 19 फेब्रुवारी 1625 शिवनेरी येथे
- 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी येथे
उत्तर 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी येथे
स्वराज्याची पहिली राजधानी ——— ही सजली.
- राजगड
- रायगड
- शिवनेरी
- प्रतापगड
उत्तर राजगड
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे …..नाव ठेवले.
- राजगड
- प्रतापगड
- भुईकोट किल्ला
- यापैकी नाही
उत्तर राजगड
शिवाजी महाराजांची राजमुद्रा ——– भाषेत होती
- संस्कृत
- मराठी
- प्राकृत
- हिंदी
उत्तर संस्कृत
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात ———— भागात केली.
- जावळी
- मावळ
- कोकण
- यापैकी नाही
उत्तर मावळ
आग्र्याहून सुटका करून घेताना शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना ——– येथे ठेवले.
- जोधपुर
- गोळकोंडा
- दिल्ली
- मथुरा
उत्तर मथुरा
युवराज संभाजीराजे यांनी आपल्या ——— या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले आहे.
- बुधभूषण
- लेखन संपदा
- सरस्वती महाल
- गड महाल
उत्तर बुधभूषण
चुकीचा पर्याय निवडा.
- वीर माता जिजामाता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांची कन्या होत्या.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली तेव्हा ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती होती.
- निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीची सरदार झाले
- स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली
उत्तर स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली
छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेऊन जावळीच्या खोऱ्यात ..किल्ला बांधला.
- रायगड
- शिवनेरी
- प्रतापगड
- राजगड
उत्तर प्रतापगड
विशाळ गडाकडे कूच करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला?
- जावळीचे मोरे
- अफजलखान
- पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे
- यापैकी नाही
उत्तर पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे
पन्हाळगडाच्या वेढ्या संदर्भात खालील वाक्यातील चुकीचा पर्याय निवडा.
- सिद्दीच्या सैन्यावर नेताजी पालकरने बाहेरून हल्ला केला.
- शिवा काशिद या बहादूर तरुणांच्या शिवरायांची वेषभूषा करून सिद्दी जोहरची दिशाभूल केली
- बाजीप्रभू देशपांडे यांनी घोड खिंड लढवली
- सिद्दी जोहरच्या सैनिकांनी शिवाजी महाराजांचा पाठलाग केला नाही.
उत्तर सिद्दी जोहरच्या सैनिकांनी शिवाजी महाराजांचा पाठलाग केला नाही.
पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी संघर्ष करण्यासाठी शिवाजी महाराजांनी …… च्या उभारणीकडे लक्ष दिले.
- घोडदळ
- पायदळ
- आरमार
- किल्ले
उत्तर आरमार
परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही शहाजीराजांची तीव्र आकांक्षा होती म्हणून त्यांना ‘स्वराज्यसंकल्पक’ म्हटले जाते या विधानासाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
- विधान बरोबर आहे.
- विधान चूक आहे.
- अर्थ लक्षात येत नाही.
- यापैकी नाही
उत्तर विधान बरोबर आहे.
चुकीचा पर्याय निवडा.
- जावळीचे__ मोरे
- मुधोळचे____ घोरपडे
- सावंतवाडीचे ___सावंत
- जावळीचे____ काळे
उत्तर जावळीचे____ काळे
६ जून १६७४ या दिवशी….. यांच्या हस्ते …..वर शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला.
- पंडित ,शिवनेरी
- विद्वान पंडित गागाभट्ट, रायगड
- भटजी ,पुरंदर
- यापैकी नाही
उत्तर विद्वान पंडित गागाभट्ट, रायगड
सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांनी ही …..कालगणना सुरू केली.
- राज्याभिषेक शक
- शालिवाहन शक
- दिनदर्शिका
- यापैकी नाही
उत्तर राज्याभिषेक शक
छत्रपती शिवाजी महाराजांनी…. व ……असे स्वराज्य स्थापन केले.
- मोठे व स्वच्छ
- स्वतंत्र व सार्वभौम
- आदर्श व मोठे
- यापैकी नाही
उत्तर स्वतंत्र व सार्वभौम
छत्रपती शिवाजी महाराजांवर ……या तमिळ कवीने काव्य केले.
- सुब्रमण्यम भारती
- लोकमान्य टिळक
- महात्मा गांधी
- यापैकी नाही
उत्तर सुब्रमण्यम भारती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे. ते मूल्य ……आहे.
- स्वातंत्र्याचे
- परकीय
- राजकीय
- यापैकी नाही
उत्तर स्वातंत्र्याचे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटके प्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे १)…….२)…….
- नेताजी पालकर, बाजीप्रभू
- तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे
- हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर
- यापैकी नाही
उत्तर हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर
…….यांनी’ शिवाजी ॲण्ड हीस टाइम्स’या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे.
- विश्वकवी रवींद्रनाथ टागोर
- महात्मा फुले
- लोकमान्य टिळक
- सर जदुनाथ सरकार
उत्तर सर जदुनाथ सरकार
चुकीचा पर्याय निवडा.
- बडा सय्यद यास ठार मारणारा__ जिवा महाला
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा__ शिवा काशीद द
- पुरंदरचा किल्ला लढवणारा __मुरारबाजी देशपांडे
- आग्र्याहून सुटका___ तानाजी मालुसरे
उत्तर. आग्र्याहून सुटका___ तानाजी मालुसरे
शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक …… यांनी लिहिले.
- लाला लजपत राय
- लोकमान्य टिळक
- रवींद्रनाथ टागोर
- महात्मा फुले
उत्तर लाला लजपत राय
१)छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते तर ते एका नव्या ,स्वतंत्र ,नीतीमान आणि सुसंस्कृत समाजाचे निर्मिती करणारे शिल्पकार होते. २)छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. त्यांना अनेक भाषा व लिपी अवगत होत्या.
- दोन्ही विधाने चूक आहे
- फक्त विधान क्रमांक एक बरोबर आहे
- फक्त विधान क्रमांक दोन बरोबर आहे.
- दोन्ही विधाने बरोबर आहेत.
उत्तर दोन्ही विधाने बरोबर आहेत.
It is a helpful app for study material and solutions
Nice quiz