Teacher’s Day General Knowledge Competition

शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय सामान्य प्रश्नमंजुषा

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेज मधून पदवीत्तर शिक्षण घेतले.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ – १९२१ दरम्यान काम केले. म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला.१९२१ – १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.राधाकृष्णन १९३१ – १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.कोलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉ. राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत.ऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे २० वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९३६ – १९५२) विद्यासन निर्माण केले.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दी मध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते १३ मे १९५२ – १२ मे १९६२ पर्यंत उपराष्ट्रपती राहिले. भारताने १९५४ साली त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देऊन त्यांना गौरविले.त्याचप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१३ मे १९६२ – १३ मे १९६७) होते.भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते.चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही.ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्टा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे.एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि एक शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता.संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपिअर, कोलारीज, ब्राउनिंग, वॊल्ट विटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखन शैलीचा त्यांनी अभ्यास केला. तसेच गटे, डानटे, होमर यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी अनुभवली. त्यामुळे एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव केला.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.

(१९५४) :’ भारतरत्‍न’ पुरस्काराने सन्मानित.

The Reign of Religion in Contemporary Philosophy (1920)Religion and Society (Kamala Lectures) (1947)Religion in a Changing World (1967)Religion in Transition (1937)The Religion of the Spirit and World’s Need: Fragments of a Confession (1952)The Religion We Need (1928)President Radhakrishnan’s Speeches and Writings 1962-1964 (1965)President Radhakrishnan’s Speeches and Writings 1964-1967 (1969)Towards a New World (1980)True Knowledge (1978)His brithday celebrate as techers day The Principal Upanishads (1953)

Teacher’s Day General Knowledge Competition

शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय सामान्य प्रश्नमंजुषा

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे ———- वे राष्ट्रपती होते?

 Dr. Sarvapalli Radhakrishnan was the _________ President of India.

2 points

  1. पहिले First
  2. चौथे Forth
  3. तिसरे Third
  4. दुसरे Second

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? 

In which year did Dr. Sarvapalli Radhakrishnan receive the Bharat Ratna?

2 points

  1. 1960
  2. 1962
  3. 1964
  4. 1954

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तिरुत्तनी येथे झाला . तिरुत्तनी हे गाव कोणत्या राज्यात आहे? 

Dr. Sarvapalli Radhakrishnan was born on 5th September 1888 at Tiruttani.  Tiruttani is a village in which state?

2 points

  1. केरळ Kerala
  2. None of these
  3. कर्नाटक Karnataka
  4. तामिळनाडू Tamil Nadu

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांच्यानंतर प्रथम कोण राष्ट्रपती झाले? 

After Dr.  Sarvapalli Radhakrishnan, who became the first President?

2 points

  1. झाकीर हुसेन Zakir Hussain
  2. मोहम्मद हिदायतुल्ला Mohammad Hidayatullah
  3. डॉ. राजेंद्र प्रसादप्रसाद Dr. Rajendra Prasad
  4. वराहगिरी वेंकट गिरी Varahagiri Venkata Giri

सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? 

Who is the current Vice President of India?

2 points

  1. रामनाथ कोविंद Ram Nath Kovind
  2. जगदीप धनखड Jagdeep Dhankhad
  3. व्यंकय्या नायडू Venkaiah Naidu
  4. मोहम्मद हमीद अन्सारी Mohmmad Hamid Ansari

भारतीय घटनेच्या कोणत्या कलमामध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद आहे? 

Which article of the Indian Constitution provides for a President of India?

2 points

  1. कलम 62 (  Article 62 )
  2. कलम 42 (  Article 42 )
  3. कलम 72 (  Article 72 )
  4. कलम 52 (  Article 52 )

राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? 

When is National Education Day celebrated?

2 points

  1. 11 नोव्हेंबर ( November )
  2. 5 सप्टेंबर ( September )
  3. 30 नोव्हेंबर ( November )
  4. 14 नोव्हेंबर ( November )

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते? 

Who was the first Education Minister of Independent India?

2 points

  1. मौलाना अबुल कलाम आझाद Maulana Abul Kalam Azad
  2. लालबहादूर शास्त्री Lal Bahadur Shastri
  3. लाल बहादूर शास्त्री Lal Bahadur Shastri
  4. सरदार वल्लभाई पटेल Sardar Vallabhai Patel

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते? 

Dr.  Sarvapalli Radhakrishnan was the _______ Vice President of India.

2 points

  1. पहिले First
  2. तिसरे The third
  3. दुसरे Second
  4. चौथे Forth

खालीलपैकी कोणाला प्रथम भारतरत्न पुरस्कार मिळाला? Who among the following received the first Bharat Ratna award?

2 points

  1. डॉ. भगवानदास Dr. Bhagwandas
  2. डॉ. धोंडो केशव कर्वे Dr.  Dhondo Keshav Karve
  3. पंडित जवाहरलाल नेहरू Pandit Jawaharlal Nehru
  4. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन Dr. Sarvepalli Radhakrishnan

स्पर्धेची अंतिम वेळ संपलेली आहे आपण फक्त खालील पेपर सराव म्हणून पुन्हा सोडवू शकता.

10 thoughts on “Teacher’s Day General Knowledge Competition

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!