नाम : प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्या वस्तूच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला व्याकरणात ‘नाम’ असे म्हणतात. उदा. : सचिन, सिता, नदी, पर्वत, अमृत, स्वर्ग, धैर्य, कीर्ती, आनंद
नामाचे प्रकार
- सामान्यनाम
- विशेषनाम
- भाववाचकनाम
- धातुसाधित नाम
1) सामान्यनाम :
एकाच जातीच्या पदार्थांना समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्यनाम
उदा. नदी, पर्वत, शहर, नदी ,गाव, इ.
2)विशेषनाम :
ज्या नामाने जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, क्स्तूचा बोध होतो त्यास विशेषनाम म्हणतात. उदा. गंगा, हिमालय, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सचिन,
3) भाववाचक नाम
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात.
उदा. पाटिलकी, गुलामगिरी, गोडवा,सौंदर्य
सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नामे ही एकमेकांचे कार्य करतात तसेच विशेषणे, अव्यये, धातूसाधिते यांचा वापर ही नामासारखा करण्यात येतो.
उदा. श्रीयशचे वागणे मोठे प्रेमळ असते.
4) धातूसाधित नाम :
वरील वाक्यामध्ये वागणे या शब्दाने नामाचे कार्य केले आहे वरील नाम हे ‘वाग’ मूळ धातूपासून झालेले आहे म्हणून त्यांना धातूसाधित नाम असे म्हणतात. धातूसाधित नामाची आणखी काही
उदाहरणे : पोहणे हा चांगला व्यायाम आहे.
त्याचे बोलणे मनाला लागून गेले.
नामाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी :
1) सामान्य नामाचे अनेकवचन होते पण विशेष नामाचे अनेकवचन होत नाही.
सामान्य नाम : मूल – मुले. झाड – झाडे, फूल – फुले
विशेष नाम : सूर्य – सूर्य, गौरव – गौरव, मीना – मीना
2) भाववाचक नामाचे सुद्धा अनेकवचन होत नाही.
उदा. सौंदर्य, श्रीमंती, पाटिलकी, भव्यता.
3) सामान्य नामे, विशेष नामे यांना प्रत्यय लागून आवश्यक नामे तयार होतात.
नवल – नवलाई, गुलाम – गुलामगिरी, सुंदर – सुंदरता, सौंदर्य, . गोड – गोडी, गोडवा
4) भाववाचक नामांचाही उपयोग विशेषनामांसारखा होतो. ती विशेषनामाचे कार्य करतात.
1) विश्वास हा माझा चांगला मित्र आहे.
Nice
Nice
Nice
Nice
Very nice
And all the best for result
Nice
Nice
मराठी व्याकरण वा नाम वा नामाचे प्रकार
Very nice and good
Ok
Nice very good