8th Class civics chapter 1|Introduction to the Parliamentary System

NMMSS परीक्षा टेस्ट सिरीज | संसदीय शासन पद्धतीची ओळख

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज Introduction to the Parliamentary System

8th Class civics chapter 1|Introduction to the Parliamentary System

आपण शासनसंस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घेऊ.यातील कायदेमंडळ कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते. कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्षअंमलबजावणी करते. न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्यकरते. या तीनही शाखांची कार्ये, त्यांचे अधिकारक्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा, तीनही शाखांचे परस्परांमधील संबंध संविधान ठरवते. हे संबंध कशा प्रकारचे असतात यावरून शासनसंस्थेचे स्वरूप ठरते.शासनपद्धतीचे प्रमुख दोन प्रकार यावरून निर्माण झालेले दिसतात.

(१) संसदीय शासनपद्धती (२) अध्यक्षीय शासनपद्धती.

संसदीय शासनपद्धती

संसदीय शासनपद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्येविकसित झाली. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेतांच्या आधारे चालतो. ‘पार्लमेंट’ ही अशीचतेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी (Parliamentary) शासनपद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. भारतात ही शासनपद्धती संसदीय शासनपद्धती म्हणून आपण स्वीकारलेली अाहे. अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासनपद्धती व भारतातील संसदीयशासनपद्धतीत व्यापक अर्थाने साम्य दिसते. परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे. भारतीय संसदीय शासन पद्धतीची पुढील वैशिष्ट्ये समजावून घेऊ.संसदीय शासनपद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्याकायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते.संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात. या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते.लोकसभेच्या निवडणुका ठरावीक मुदतीनंतर होतात. या निवडणुका सर्व राजकीय पक्षलढवतात. त्यात ज्या राजकीय पक्षालानिम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात, तो बहुमतातलापक्ष मानला जातो. बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो.काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्टबहुमत मिळत नाही, अशावेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांनासरकार स्थापन करता येते. यास आघाडी सरकार असे म्हणतात.अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्यापक्षाला आपले सरकार स्थापन करता येते.

या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिपदांसाठी निवड करतो. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासनपद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. संसदीय शासनपद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. (१) कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते. (२) ते कायदेमंडळाचेही सदस्य असतात म्हणून त्यांना कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्वकृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात. याचा अर्थ असा की, मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला ‘जबाबदार शासनपद्धती’ म्हणतात. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. एखाद्याखात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. ती प्रत्यक्षात कशी आणली जाते, हे सोदाहरण आपण पुढील दोन पाठांत पाहणार आहोत. संसदीय शासनपद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलबंून असते. याचाअर्थ जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळालापाठिंबा असतो अथवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. कायदेमंडळाला किंवा संसदेलाजर असे वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही तेव्हा संसद अविश्वासाचाठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे.संसदीय शासनपद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते. ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने व जनतेचासर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचादर्जा श्रेष्ठ असतो.संसदीय शासनपद्धती आपण का स्वीकारली? भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणे आहेत. ब्रिटिश राजवटीच्याकाळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. संसदीय शासनपद्धती हा सुद्धाभारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक आविष्कार आहे. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झालाहोता. संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली. संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीयपरिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले. संसदीय शासनपद्धतीत चर्चा, विचारविनिमयालामोठा वाव असतो. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते. या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनालासहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते. अध्यक्षीय शासनपद्धतीराज्यकारभाराची आणखी एक पद्धती म्हणून अध्यक्षीय शासनपद्धतीचा उल्लेख करता येईल. अशी शासनपद्धती अमेरिका या देशात आहे. ही पद्धती संसदीय शासनपद्धतीपेक्षा वेगळी आहे. कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख (राष्ट्राध्यक्ष) थेटजनतेकडून निवडला जातो, ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासनपद्धती होय. शासनसंस्थांच्या तीनही शाखा या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात. अध्यक्षीय शासनपद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला आहे. या शासनपद्धतीची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :अध्यक्षीय शासनपद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्यांच्याअंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात.अध्यक्षीय शासनपद्धतीतही अशा प्रकारची रचनाअसली तरी कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवते. परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो.संसदीय आणि अध्यक्षीय शासनपद्धतीं व्यतिरिक्त अन्य काही शासनपद्धती फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये अवलंबल्याजातात. विविध देश आपल्या परिस्थितीस अनुरूप अशा प्रकारच्या शासनपद्धतीचा अवलंब करतानादिसतात.पुढील पाठात आपण भारताच्या संसदेची रचना, कार्यपद्धती व भूमिका विचारात घेणार आहोत.

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज 

1)चुकीचा पर्याय निवडा.

  1. कायदेमंडळ- कायद्याची निर्मिती करणे
  2. कार्यकारी मंडळ -कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे
  3. न्याय मंडळ -न्याय देण्याचे कार्य करते
  4. न्यायमंडळ -कायदे करण्याचे कार्य करते

2)योग्य पर्याय निवडा.

A) संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते. 

B) संसद लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ असतो.

  1. फक्त विधान A बरोबर आहे.
  2. फक्त विधान B बरोबर आहे.
  3. दोन्ही विधाने बरोबर आहेत.
  4. दोन्ही विधाने चूक आहेत.

3)भारताने …     ही शासन पद्धती स्वीकारली आहे.

  1. अध्यक्ष शासन पद्धती
  2. संसदीय शासन पद्धती
  3. हुकूमशाही
  4. यापैकी नाही

4)योग्य पर्याय निवडा.

1) संसदीय शासन पद्धतित संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेट बनाने निवडले जातात.

2) या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते.

  1. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  2. दोन्ही विधाने चूक आहेत
  3. फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
  4. फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे

5)मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो म्हणून संसदीय शासन पद्धती …..ला म्हणतात.

  1. दुहेरी शासन पद्धती
  2. एकेरी शासन पद्धती
  3. अध्यक्ष शासन पद्धती
  4. जबाबदार शासन पद्धती

6)ज्या शासनपद्धतीत कार्यकारी प्रमुख थेट जनतेकडून निवडला जातो ही पद्धत म्हणजे…….. होय.

  1. अध्यक्षीय शासनपद्धती
  2. संसदीय शासनपद्धती
  3. हुकूमशाही
  4. यापैकी नाही

7)योग्य पर्याय निवडा 

१) अध्यक्षीय शासनपद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून असतात.

२) कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात.

  1. दोन्ही विधाने चूक आहेत
  2. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  3. फक्त विधान क्रमांक एक बरोबर आहे
  4. फक्त विधान क्रमांक दोन बरोबर आहे

8)भारताच्या केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला ‘संसद’ असे म्हटले जाते. …………..,लोकसभा व राज्यसभा  मिळून संसद तयार होते.

  1. पंतप्रधान
  2. न्यायाधीश
  3. जनता
  4. राष्ट्रपती

9)संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ ……च्या विश्वासावर अवलंबून असते.

  1. कायदेमंडळ
  2. न्यायमंडळ
  3. राष्ट्रपती
  4. यापैकी नाही

10)संसदीय शासन पद्धती संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते कारण…….

  1. ते खूप मोठे आहे
  2. ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने
  3. त्यामध्ये कायदेतज्ञ असतात
  4. यापैकी नाही

11)प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील…….. होय.

  1. कार्यकारी मंडळ
  2. कायदेमंडळ
  3. न्याय मंडळ
  4. यापैकी नाही

12)अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात ?

  1. राष्ट्राध्यक्ष
  2. लोकसभा अध्यक्ष
  3. राज्यपाल
  4. प्रधानमंत्री

13)कोणत्या देशाचे संविधान पूर्णत: लिखित नाही ?

  1. अमेरिका
  2. इंग्लंड
  3. रशिया

14)संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धत म्हणतात; कारण……….

  1. पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते.
  2. पंतप्रधान हे जबाबदारीने निर्णय घेतात.
  3. मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतींना जबाबदार असते.
  4. कार्यकारी मंडळ हे आपल्या इच्छेनुसार कार्य करते.

15)अमेरिकेतील मंत्रिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे; तसाच तो भारतातील मंत्र्यांनाही

असतो, हे विधान …………

  1. विधान संपूर्णपणे चूक
  2. विधान संपूर्णपणे बरोबर
  3. विधानाचा पहिला भाग चूक, दुसरा बरोबर
  4. विधानाचा पहिला भाग बरोबर, दुसरा बरोबर

 16)काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्ट बहुमत मिळत नाही. अशावेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते त्यास काय म्हणतात ?

  1. संयुक्त सरकार
  2. मित्र सरकार
  3. आघाडी सरकार
  4. मिश्र सरकार

17)राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा मिळून काय तयार होते ?

  1. मंत्रिमंडळ
  2. यापैकी नाही
  3. संसद
  4. विधान मंडळ

18)संसदीय शासन पद्धतीतील  कार्यकारी मंडळ म्हणजे काय ?

  1. राष्ट्रपती ,प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ
  2. लोकसभा आणि राज्यसभा
  3. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा
  4. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ

19)केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळात कोणाचा समावेश होतो ?

  1. राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा
  2. लोकसभा आणि राज्यसभा
  3. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ
  4. वरीलपैकी नाही

20)कायदेमंडळाला ___________ असेही म्हणतात.

  1. संसद
  2. लोकसभा
  3. विधान मंडळ
  4. राज्यसभा

21)खालीलपैकी कोणत्या देशात ‘संसदीय शासन

पद्धती’ प्रथम विकसित झाली.

  1. भारत
  2. इंग्लंड
  3. अमेरिका
  4. फ्रान्स

22)शासन संस्थेत कायदे निर्मितीचे कार्य कोण करते?

  1. न्याय मंडळ
  2. कायदेमंडळ
  3. कार्यकारी मंडळ
  4. राज्यसभा

23)शासन संस्थेत कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे कार्य कोण करते?

  1. कायदेमंडळ
  2. न्याय मंडळ
  3. कार्यकारी मंडळ
  4. राज्यसभा

24)प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणासाठी ————— ला जबाबदार असतात.

  1. कायदेमंडळ
  2. कार्यकारी मंडळ
  3. न्यायमंडळ
  4. यापैकी नाही

25)योग्य विधान निवडा

  1. कायदेमंडळ कायद्याच्या निर्मितीचे कार्य करते.
  2. कार्यकारी मंडळ कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते.
  3. न्याय मंडळ न्याय देण्याचे कार्य करते.
  4. वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

6 thoughts on “8th Class civics chapter 1|Introduction to the Parliamentary System

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!