8th Class Civics | Chapter 2| Parliament of India

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज भारताची संसद इयत्ता आठवी

नागरिक शास्त्र

A) भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे. B) केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळात संसद म्हणतात. संसदेत राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश असतो.

  1. दोन्ही विधाने बरोबर आहेत.
  2. दोन्ही विधाने चूक आहेत
  3. फक्त विधान A चूक आहे
  4. फक्त विधान B चूक आहे

2)लोकसभा हे भारतीय संसदेचे ———- आणि प्रथम सभागृह आहे.

  1. कनिष्ठ
  2. वरिष्ठ
  3. उच्च
  4. यापैकी नाही

3)राज्यसभा हे भारतीय संसदेचे ———- आणि द्वितीय सभागृह आहे.

  1. कनिष्ठ
  2. वरिष्ठ
  3. यापैकी नाही

4)लोकसभेची मुदत ——– वर्षाची असते.

  1. पाच
  2. तीन
  3. दोन
  4. सात

5)A) भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरीत्या निवडून येणारे सभागृह आहे.

 B) राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे.

  1. फक्त विधान A चूक आहे
  2. दोन्ही विधाने चूक आहेत.
  3. दोन्ही विधाने बरोबर आहेत.
  4. फक्त विधान B चूक आहे.

6)राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. दर दोन वर्षांनी सहा वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले ——— सदस्य निवृत्त होतात.

  1. 1/5
  2. 1/3
  3. 2/3
  4. 1/7

7)लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना ——— म्हणतात.

  1. खासदार
  2. अध्यक्ष
  3. सभापती
  4. आमदार

8)A) लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. 

B) भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.

  1. फक्त विधान A चूक आहे
  2. फक्त विधान B चूक आहे.
  3. दोन्ही विधाने चूक आहेत.
  4. दोन्ही विधाने बरोबर आहेत.

9)कायद्याच्या कच्चा मसुद्याला ——— म्हटले जाते.

  1. विधेयक
  2. उदाहरण
  3. लेख
  4. यापैकी नाही

10)————- च्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते.

  1. पंतप्रधान
  2. खासदार
  3. अध्यक्ष
  4. राष्ट्रपती

11)संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके दोन प्रकारची  आहेत 1)——–2)———

  1. छोटे, मोठे
  2. साधे, संयुक्त
  3. अर्थविधेयक, साधारण विधेयक
  4. यापैकी नाही

12)भारताच्या संसदेत कोणाचा समावेश असतो?

  1. राष्ट्रपती
  2. लोकसभा
  3. राज्यसभा
  4. वरील सर्व

13)भारताच्या संसदेची राज्यसभा हे ————- निवडून येणारे सभागृह आहे.

  1. अप्रत्यक्षरित्या
  2. प्रत्यक्षरित्या
  3. निश्चित सांगता येत नाही.

14)राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?

  1. राष्ट्रपती
  2. उपराष्ट्रपती
  3. पंतप्रधान
  4. यापैकी नाही

15)राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक  साहित्य विज्ञान कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील व्यक्तीमधून होते ?

  1. 12
  2. 238
  3. 48
  4. 2

16)राज्यसभेच्या एकूण सदस्यात घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून किती सदस्य निवडले जातात?

  1. 12
  2. 238
  3. 48
  4. 552

17)राज्यसभेच्या काही सदस्यांची नेमणूक ————- साहित्य विज्ञान कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील व्यक्तीमधून करतात ?

  1. उपराष्ट्रपती
  2. पंतप्रधान
  3. लोकसभा सभापती
  4. राष्ट्रपती

18)विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी त्याचे ——— वेळा वाचन होते?

  1. 5
  2. 3
  3. 2
  4. 1

19)महाराष्ट्रात लोकसभेला ———-जागा आहेत?

  1. 50
  2. 78
  3. 238
  4. 48

20)पैशाबाबत किंवा धन विधेयक कोणत्या सभागृहात मांडली जातात?

  1. लोकसभा
  2. राज्यसभा
  3. संसद
  4. यापैकी नाही

21)राज्यसभा निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय किती हवे ?

  1. 21 वर्ष
  2. 18 वर्ष
  3. 30 वर्ष
  4. 25 वर्ष

22)खालीलपैकी कोणाच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते?

  1. पंतप्रधान
  2. राष्ट्रपती
  3. न्यायाधीश
  4. उपराष्ट्रपती

23)संसद सदस्य किंवा संबंधित खात्याचा मंत्री विधेयक सादर करतात आणि त्याचे स्वरूप स्पष्ट करतात. हे विधेयकाचे कोणते वाचन आहे?

  1. तिसरे
  2. पहिले
  3. दुसरे

24)विधेयकावर कलमवर चर्चा संसद सदस्य त्यात दुरुस्त्या सुचवू शकतात आणि त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते.हे विधेयकाचे कोणते वाचन आहे?

  1. तिसरे
  2. दुसरे
  3. पहिले

25)विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते.हे विधेयकाचे कोणते वाचन आहे?

  1. दुसरे
  2. पहिले
  3. तिसरे

26)लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ……आहे.

  1. 520 सदस्य
  2. 543 सदस्य
  3. 555 सदस्य
  4. 560 सदस्य

27)भारताच्या संविधानाने ———– शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे.

  1. संसदीय
  2. अध्यक्षीय
  3. राजेशाही
  4. यापैकी नाही

28)अँग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या किती प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात?

  1. 5
  2. 12
  3. 10
  4. 2

29)सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत?

  1. द्रौपदी मुर्मू
  2. रामनाथ कोविंद
  3. प्रतिभा पाटील
  4. प्रणव मुखर्जी

30)सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

  1. जगदीप धनखड
  2. द्रौपदी मुर्मू
  3. प्रतिभा पाटील
  4. हमीद अन्सारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!