NMMS Exam Test Series 8th Class Science | Force and Pressure | Marathi Medium

8th Class Science Force and Pressure Marathi Medium 

NMMS परीक्षा विज्ञान टेस्ट सिरीज बल आणि दाब

सूचना

  • .

उत्तरपत्रिका

1)पुढीलपैकी वेगळा घटक कोणता?

  1. वस्तुमान
  2. बल
  3. वजन
  4. घनता

2)—————– म्हणजे पदार्थांची घनता व पाण्याची घनता यांचे गुणोत्तर होय.

  1. विशिष्ट गुरुत्व
  2. वरीलपैकी नाही
  3. गुरुत्व
  4. त्वरण

3)वस्‍तू गतीच्‍या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्‍याच्‍या प्रवृत्‍तीला त्‍याचे ———– असे म्‍हणतात.

  1. परिणाम
  2. जडत्व
  3. त्वरण
  4. दिशा

4)एका  500 g वस्तूमानाच्या,प्लॅस्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान  350 cm³ एतके आहे तर खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती?

  1. 340g
  2. 3.50g
  3. 350 g
  4. 3.40g

5) 200 g वस्तुमान व  400 cm³  आकारमान असलेला ठोकळा पाण्यात तरंगेल का बुडेल?

  1. वस्तु पाण्यात बुडणार नाही
  2. वस्तु पाण्यावर तरंगणार नाही
  3. वस्तु पाण्यात बुडेल
  4. वस्तु पाण्यावर तरंगेल

6)बलाचे SI पद्धतीतील एकक —————– आहे.

  1. पास्कल
  2. न्यूटन
  3. डाइन
  4. ज्यूल

7)बल आणि वजन यांची एकके ————– असतात.

  1. समान
  2. स्थिर
  3. भिन्न
  4. वरीलपैकी नाही

8)जर पाण्याखाली प्लॅस्टिकचा ठोकळा सोडून दिला तर तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल?

  1. वस्तु पाण्यात बुडेल
  2. पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
  3. पाण्याच्या पृष्ठभागावर येईल
  4. वरीलपैकी नाही

9)एका धातूची घनता 10.8 X 10³ kg/m³ आहे तर त्या धातूची सापेक्ष घनता किती?

  1. 10.8
  2. 1.08
  3. 10.7
  4. 1.07

10)पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे,तसातसा वातावरणीय दाब ———— जातो.

  1. वाढत
  2. वरीलपैकी नाही
  3. कमी
  4. समान

11)पुढीलपैकी दुधाच्या नमुन्याची शुद्धता तपासण्यास वापरण्यात येणारे उपकरण कोणते?

  1. पाणबुडी
  2. व्होल्टमीटर
  3. दुग्धतामापी
  4. हायड्रोमीटर

12)पुढीलपैकी अदिश राशी कोणती?

  1. वेग
  2. घनता
  3. बल
  4. वजन

13)पुढीलपैकी संपर्क बलाचे उदाहरण कोणते आहे?

  1. केसांमध्ये घासलेल्या कंगव्याकडे टेबलवरील कागदाचे कपटे आकर्षित होतात.
  2. वरीलपैकी नाही
  3. नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत आहे.
  4. खेळणारा मुलगा पायाने चेंडूला टोलवत आहे.

14)आर्किमिडिजच्या तत्त्वानुसार वस्तूवर कार्यरत असणार्‍या प्लावक बलाचे परिणाम —————– असते.

  1. Vᵨm
  2. Vᵨ/g
  3. mᵨg
  4. Vᵨg

15)खालीलपैकी कशाचे  जडत्व अधिक आहे?

  1. रु.10 चे नाणे
  2. वरीलपैकी नाही
  3. पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
  4. रु.1 चे नाणे

 16)50 cm X 20 cm क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर 1000 N बल प्रयुक्त केले तर त्याच्या  तळाशी दाब किती असेल?

  1. 10³ N/m²
  2. वरीलपैकी नाही
  3. 10⁵ N/m²
  4. 10⁴ N/m²

17)एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत बदल घडवून आणणारी भौतिक राशी म्हणजे ——— होय.

  1. शक्ति
  2. बल
  3. ऊर्जा
  4. गती

18)जमिनीवर स्थिर असलेल्या चेंडूला लाथ मारल्यास तो गतिमान होतो, हे कोणत्या बलाचे उदाहरण आहे?

  1. घर्षण
  2. वरीलपैकी नाही
  3. संपर्क
  4. असंपर्क

19)हवामानशास्त्रात  दाब ————– या एककात व्यक्त करतात.

  1. अर्ग
  2. पास्कल
  3. bar
  4. वरीलपैकी नाही

20)पाण्यात किंवा अन्य द्रवात वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला———– बल म्हणतात.

  1. संपर्क
  2. वरीलपैकी नाही
  3. संतुलित
  4. प्लावक

21)आपल्या शरीरावर हवेचा दाब —————– दाबाइतका असतो.

  1. टेकडीवरील
  2. अंतराळातील
  3. समुद्राच्या तळावरील
  4. वातावरणीय

22)पुढीलपैकी कोणता घटक आर्किमिडिजच्या तत्त्वानुसार कार्य करतो?

  1. दुग्धतामापी
  2. व्होल्टमीटर
  3. गॅल्व्हानोमीटर
  4. अॅमीटर

23) 1 atmosphere=———–.

  1. 110 X 10²N/m
  2. 101 X 10²N/m²
  3. वरीलपैकी नाही
  4. 101 X 10³Pa

24)पुढीलपैकी द्रवाची घनता काढण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण कोणते?

  1. दुग्धतामापी
  2. पाणबुडी
  3. हायड्रोमीटर
  4. व्होल्टमीटर

25)पास्कल हे ———– चे एकक आहे.

  1. वस्तुमानाचे
  2. वेगाचे
  3. दाबाचे
  4. बलाचे

26)समुद्र्सपाटीला वातावरणीय दाब सुमारे  ———डाइन/सेमी² असतो.

  1. 10⁵
  2. 10³
  3. 10²
  4. 10⁶

27)घनतेचे SI पद्धतीतील एकक —————– आहे.

  1. pa/m²
  2. kg/m²
  3. kg/m³
  4. N/m²

28)वस्तूची सापेक्ष घनता 1 पेक्षा जास्त असल्यास ती पाण्यात तरंगेल का?

  1. पाण्यात बुडेल
  2. वस्तु पाण्यात बुडणार नाही
  3. पाण्यात तरंगेल
  4. पाण्यात तरंगणार नाही

29).पृष्टभागापासून h या खोलीवर द्रवाचा दाब =———– आहे

  1. hpg
  2. पास्कल
  3. phg
  4. mg

30)जेव्हा दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते तेव्हा त्या बलास ——- बल म्हणतात.

  1. संतुलित
  2. असंतुलित
  3. संपर्क
  4. असंपर्क

31) ———————- हा पदार्थ वाहू शकतो.

  1. वायु
  2. द्रव
  3. वरीलपैकी नाही
  4. स्थायू

32)असंतुलित बलामुळे वस्तुत ———— निर्माण होते.

  1. त्वरण
  2. गती
  3. वरीलपैकी नाही
  4. वेग

33)दाबाचे SI पद्धतीतील एकक —————– आहे.

  1. न्यूटन
  2. ज्यूल
  3. अर्ग
  4. पास्कल

34)वस्तूवर दोन किंवा अधिक बले क्रिया करीत असतील व त्यांचे परिणामी बल शून्य नसेल तर  त्या बलास ——— बल म्हणतात.

  1. संतुलित
  2. असंतुलित
  3. संपर्क
  4. असंपर्क

35)पाण्याची घनता  ——- g/cm³ आहे.

  1. 1
  2. 1000
  3. 10
  4. 100

36)पास्कल  हे कोणत्या राशीचे एकक आहे?

  1. बल
  2. वस्तुमान
  3. वेग
  4. दाब

37)प्लावक बल गुरुत्वीय ———-शी समानुपाती असते.

  1. त्वरण
  2. गती
  3. चाल
  4. वरीलपैकी नाही

38)पुढीलपैकी कोणता घटक आर्किमिडिजच्या तत्त्वानुसार कार्य करत नाही?

  1. व्होल्टमीटर
  2. हायड्रोमीटर
  3. दुग्धतामापी
  4. पाणबुडी

39)पदार्थाची शुद्धता ठरविण्यासाठी पदार्थांच्या ————— चा उपयोग होतो.

  1. घनता
  2. वस्तुमान
  3. वजन
  4. आकार

40)वस्तूवर एकाच सरल रेषेत समान परिमणांची पण परस्पर विरुद्ध दिशा असलेली दोन बले प्रयुक्त केली तर,त्या बलांना ——— बले म्हणतात.

  1. असंपर्क
  2. संतुलित
  3. असंतुलित
  4. संपर्क

41)एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळया ———— द्रवात प्लावक बल भिन्न असते.

  1. एकसारखे
  2. क्षेत्रफळ
  3. घनता
  4. भिन्न

42)1 बार  =——————-

  1. 10²N/m²
  2. 10⁵ N/m²
  3. 10⁵ N/m
  4. 10²N/m

43)वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तुमार्फत आलेल्या  संपर्कामुळे प्रयुक्त झालेल्या बलास———- बल म्हणतात.

  1. असंपर्क
  2. संतुलित
  3. असंतुलित
  4. संपर्क

44)पुढीलपैकी सदिश राशी कोणती?

  1. बल
  2. दाब
  3. वस्तुमान
  4. घनता

 45) —————– बल हे विद्युत चुंबकीय बल असते .

  1. संपर्क
  2. घर्षण
  3. असंपर्क
  4. गुरुत्वीय

46)स्थिर वस्‍तू वर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते. गतिमान वस्तू वर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते, हा ————–  गतीविषयक नियम आहे.

  1. न्यूटन्स गतीविषयक तिसरा नियम
  2. न्यूटन्स गतीविषयक पहिला नियम
  3. न्यूटन्स गतीविषयक दूसरा नियम
  4. वरीलपैकी नाही

47)पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे कोणत्या बलाचे उदाहरण आहे?

  1. संपर्क
  2. असंपर्क
  3. घर्षण
  4. वरीलपैकी नाही

48)दाबाचे SI पद्धतीतील एकक —————– आहे.

  1. N/m³
  2. kg/m³
  3. N/m²
  4. kg/m²

49)क्षेत्रफळ कायम ठेवून बल दुप्पट केल्यास दाब —————– होतो.

  1. दुप्पट होतो.
  2. चौपट होतो
  3. तेवढाच राहतो
  4. निम्मा होतो.

50)एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त असणार्‍या बलास  —————–म्हणतात.

  1. गती
  2. वेग
  3. परिणाम
  4. दाब

14 thoughts on “NMMS Exam Test Series 8th Class Science | Force and Pressure | Marathi Medium

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!