शेकडेवारी
शेकडेवारी
शेकडेवारीलाच गणितात शतमान प्रतिशेकडा टक्के या नावाने ओळखले जाते.
शेकडा म्हणजे 100
जेव्हा एखाद्या संख्येच्या छेदस्थानी शंभर असते तेव्हा ती संख्या टक्केवारी स्वरूपात लिहितात
उदा. 5/100
एखाद्या अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करताना अंश व छेद यांना सारख्या संख्येने गुणावे अथवा भागावे.
उदा. 7/25
जेव्हा एखाद्या उदाहरणांमध्ये संख्येचा शेकडा विचारतात तेव्हा चा म्हणजे गुणिले असा अर्थबोध होतो.
How to Solve Percentage Questions Fast | Math Tricks
शेकडेवारी प्रश्नपत्रिका
1) एका समाजसेवी संस्थेने एका जिल्ह्यातील 715 वस्तूंपैकी पाच टक्के वस्त्या सुधारण्यासाठी घेतल्या तर संस्थेने एकूण किती वस्त्या घेतल्या?
1. 103 वस्त्या
2. 113 वस्त्या
3. 143 वस्त्या
4. 123 वस्त्या
2) एका तालुक्यात पूर्व भागात 70 रस्ते व पश्चिम भागात 85 रस्ते तयार करण्याचे ठरवले आहे .सध्या पूर्व भागातील 42 रस्ते व पश्चिम भागातील 51 रस्ते पूर्ण झाले आहेत .तर पूर्व व पश्चिम भागाचे किती टक्के काम पूर्ण झाले आहे ? कोणत्या भागाचे काम जास्त झाले आहे?
1. दोन्ही भागांचे 60 टक्के काम पूर्ण झाले.
2. पूर्व भाग 60 टक्के ,पश्चिम भाग 50 टक्के
3. पूर्व भाग 50 टक्के ,पश्चिम भाग 40 टक्के
4. यापैकी नाही
3) पर्यावरण दिनी कन्या शाळेने आपल्या परिसरात 120 झाडे लावली पैकी 42 झाडे चांगली वाढली तर एकूण किती टक्के झाडांचे योग्य संवर्धन झाले?
1. 30%
2. 35%
3. 33 टक्के
4. 32%
4) सुजयला लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 90 मेसेज आले त्यापैकी 30 टक्के मेसेज लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा होत्या तर त्याला शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेज आले?
1. 65 मेसेजेस
2. 63 मेसेजेस
3. साठ मेसेजेस
4. 52 मेसेजेस
5) गावाच्या निवडणुकीत एका प्रभागात 1300 पैकी 910 लोकांनी मतदान केले तर दुसर्या प्रभागात 1200 पैकी 840 लोकांनी मतदान केले तर कोणत्या प्रभागात किती टक्के मतदान जास्त झाले?
1. समान मतदान झाले.
2. प्रभाग क्रमांक एक मध्ये तीस टक्क्याने मतदान जास्त झाले.
3. प्रभाग क्रमांक दोन मध्ये 40 टक्के मतदान जास्त झाले.
4. यापैकी नाही
6) नवनाथने 40 हजार चौरस मीटर चे जमिनीपैकी 93 टक्के जमिनीवर कापूस लागवड केली तर किती जमिनीवर कापूस लागवड झाली?
1. 30000 चौरस मीटर
2. बत्तीस हजार चौरस मीटर
3. 38 हजार चौरस मीटर
4. 37, 200 चौरस मीटर
7) चंदनाला एका परीक्षेत 1100 पैकी 853 गुण मिळाले तर चंदनाला किती टक्के गुण मिळाले?
1. 70 टक्के
2. 72 टक्के
3. 77.55 टक्के
4. 80 टक्के
8) एका निवडणुकीत एका गावात 2300 लोकसंख्येपैकी 1785 लोकांनी मतदान केले तर त्या गावात किती टक्के मतदान झाले?
1. 60 टक्के
2. 68%
3. 63%
4. 77.60 टक्के
9) एका गावाची लोकसंख्या 2900 असून 1500 पुरुष आहे व 1400 स्त्रिया आहेत .एकूण पुरुषांपैकी 1350 पुरुष व एकूण स्त्रियांपैकी 980 स्त्रिया साक्षर आहेत तर स्त्री-पुरुषात कोणाच्या साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे? किती टक्क्यांनी?
1. पुरुष साक्षरता 20 टक्क्यांनी जास्त
2. स्त्री साक्षरता 13 टक्क्यांनी जास्त
3. समान
4. यापैकी नाही
10) सुधा महाविद्यालयात शनिवारची उपस्थिती 93% होती .अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 49 होती तर महाविद्यालयाची एकूण किती विद्यार्थी संख्या आहे?
1. 800 विद्यार्थी
2. 690 विद्यार्थी
3. 449 विद्यार्थी
4. सातशे विद्यार्थी
11) साधनापूरची लोकसंख्या दरवर्षी 15 टक्क्यांनी वाढते या वर्षी साधनापुरची लोकसंख्या तीन हजार असल्यास पुढील दोन वर्षानंतर साधनापुरची लोकसंख्या किती असेल?
1. लोकसंख्या 3450
2. लोकसंख्या 4000
3. लोकसंख्या 4120
4. लोकसंख्या 3900
12) मागील वर्षी विद्यालयाची एकूण पटसंख्या 850 होती यावर्षी ती 990 झाली तर विद्यालयाची पटसंख्या किती टक्क्यांनी वाढली?
1. 12%
2. 14%
3. 16%
4. 18 टक्के
13) स्वराज ला आदित्य पेक्षा 25 टक्के मार्क कमी मिळाले. आदित्यला इतिहासामध्ये 80 पैकी 72 गुण मिळाले असतील तर स्वराज ला किती गुण मिळाले?
1. 52 गुण
2. 63 गुण
3. 68 गुण
4. 47 गुण
14) सागर ने आठ लाख पन्नास हजार रुपयांना एक ट्रॅक्टर खरेदी केला .या व्यवहारात त्याला दलालाला तीन टक्के दलाली द्यावी लागली तर सागरला तो ट्रॅक्टर घेण्यासाठी किती खर्च आला?
1. 865500 ₹
2. 853000 ₹
3. 888000 ₹
4. 875500 ₹
15) अंतिम परीक्षेमध्ये 1700 विद्यार्थ्यांपैकी आठशे पन्नास विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली तर अंतिम परीक्षेत किती मुलांना प्रथम श्रेणी मिळाली?
1. तीस टक्के
2. 60%
3. 50%
4. 40%