मराठी व्याकरण प्रयोग
वाक्यातील क्रियापद कर्त्याशी, कर्माशी कसे जोडलेले आहे, यावरून प्रयोग निश्चित होतो.
मराठी व्याकरणातील प्रयोगांचे प्रकार
कर्तरी प्रयोग
जेव्हा क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते.
येथे कर्ता हा वाक्याचा मुख्य करणारा असतो.
उदा.:
राम शाळेत गेला. (येथे “राम” कर्ता आहे, क्रियापद “गेला” कर्त्याशी जुळले आहे.)
मुले खेळत आहेत.
कर्मणी प्रयोग
जेव्हा क्रियापद कर्माच्या लिंग व वचनानुसार बदलते.
करणारा (कर्ता) गौण होतो व क्रियेवर लक्ष केंद्रित होते.
उदा.:
पुस्तक वाचले गेले.
पत्र लिहिले गेले.
भावे प्रयोग
जेव्हा वाक्यात कर्ता किंवा कर्म स्पष्टपणे नसतो.
क्रिया कोण करत आहे हे महत्त्वाचे नसून फक्त भावना / कृती घडली आहे हे दर्शविले जाते.
उदा.:
धावले जाते.
खाल्ले जाते.
कर्तरी प्रयोग → कर्त्यावर लक्ष
कर्मणी प्रयोग → कर्मावर लक्ष
भावे प्रयोग → कृती/भावावर लक्ष
मराठी व्याकरण प्रयोग MCQS प्रश्न
प्रश्न ज्यावेळेस कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते त्यास ———— म्हणतात.
(अ) कर्तरी प्रयोग
(ब) कर्मणी प्रयोग
(क) भावे प्रयोग
(ड) वरीलपैकी नाही
जर कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत असेल तर त्यास———- असे म्हणतात.
(अ) कर्तरी प्रयोग
(ब) कर्मणी प्रयोग
(क) भावे प्रयोग
(ड) यापैकी नाही
सुलभाने चिंच खाल्ली. (या वाक्याचा प्रयोग ओळखा.)
(अ) कर्तरी प्रयोग
(ब) कर्मणी प्रयोग
(क) भावे प्रयोग
(ड) यापैकी नाही
जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते अशा प्रकारच्या वाक्यरचनेस ———— असे म्हणतात.
(अ) कर्तरी प्रयोग
(ब) कर्मणी प्रयोग
(क) भावे प्रयोग
(ड) यापैकी नाही
आईने बाळास जेऊ घातले. ( प्रयोग ओळखा)
(अ) अकर्मक कर्तरी प्रयोग
(ब) सकर्मक कर्तरी प्रयोग
(क) अकर्मक भावे प्रयोग
(ड) सकर्मक भावे प्रयोग
पुढील पैकी सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
(अ) मुलांनी खरे बोलावे.
(ब) त्याने चोराला पकडले.
(क) तुषार आंबा खातो.
(ड) उंदीर जोरात पळाला.
गांधीजींच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले. ( प्रयोग ओळखा.)
(अ) सकर्मक भावे
(ब) कर्मणी प्रयोग
(क) अकर्मक कर्तरी प्रयोग
(ड) सकर्मक कर्तरी प्रयोग
रावण रामाकडून मारला जातो. ( या वाक्याचा प्रयोग ओळखा.)
(अ) कर्तरी प्रयोग
(ब) कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग
(क) भावे प्रयोग
(ड) यापैकी नाही
कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
(अ) त्याला घरी जाववते.
(ब) नयना पाणी पिते.
(क) विद्यार्थ्यांनी खाऊ खाल्ला.
(ड) ताईने बाळात भरवले.
वेल मांडवावर विस्तारली. ( या वाक्याचा प्रयोग ओळखा.)
(अ) सकर्मक भावे प्रयोग
(ब) कर्मणी प्रयोग
(क) अकर्मक कर्तरी प्रयोग
(ड) सकर्मक कर्तरी प्रयोग
चुकीचे विधान ओळखा.
(अ) कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या पुरुष, लिंग, वचनानुसार क्रियापद बदलते.
(ब) कर्तरी प्रयोगात कर्त्याची विभक्ती प्रथमा असते.
(क) कर्मा शिवाय कर्मणी प्रयोग होत नाही.
(ड) कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो.
सानिया चहा पिते. ( प्रयोग ओळखा.)
(अ) सकर्मक भावे प्रयोग
(ब) सकर्मक कर्तरी प्रयोग
(क) अकर्मक भावे प्रयोग
(ड) अकर्मक कर्तरी प्रयोग
कर्तरी प्रयोगात कर्त्याची विभक्ती ——- असावी लागते.
(अ) प्रथमा
(ब) तृतीया
(क) चतुर्थी
(ड) द्वितीया
ती आपल्या आजोळी गेली.
(अ) अकर्मक कर्तरी
(ब) कर्मणी
(क) अकर्मक भावे
(ड) सकर्मक कर्तरी
सिंहाकडून कोल्हा मारला गेला.
(अ) कर्मणी प्रयोग
(ब) कर्तरी प्रयोग
(क) भावे प्रयोग
(ड) यापैकी नाही
आईने कमलला साडी आणली.
(अ) कर्मणी प्रयोग
(ब) कर्तरी प्रयोग
(क) भावे प्रयोग
(ड) यापैकी नाही
मुलींनी कथांचे प्रकटवाचन केले.
(अ) सकर्मक कर्तरी
(ब) अकर्मक भावे
(क) कर्मणी
(ड) सकर्मक भावे
आजीने बाळास झोपविले.
(अ) कर्मणी प्रयोग
(ब) सकर्मक भावे प्रयोग
(क) अकर्मक कर्मणी प्रयोग
(ड) अकर्मक कर्तरी प्रयोग
साधना भाजीपाला आणते.
(अ) अकर्मक कर्मणी प्रयोग
(ब) अकर्मक कर्तरी
(क) सकर्मक कर्मणी
(ड) सकर्मक कर्तरी
तिला आज मळमळते.
(अ) सकर्मक कर्तरी
(ब) अकर्मक भावे
(क) अकर्मक कर्मणी
(ड) अकर्मक कर्तरी
ती हसते.
(अ) अकर्मक कर्मणी
(ब) अकर्मक कर्तरी
(क) अकर्मक भावे
(ड) सकर्मक भावे
खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते?
(अ) श्यामने पेरू खाल्ला.
(ब) श्यामने पेरूस खाल्ले.
(क) श्याम पेरू खातो.
(ड) श्रेयाने आता मैदानात उतरावे.
श्रेयाने आता मैदानात उतरावे. (या वाक्याचा प्रयोग ओळखा:)
(अ) अकर्मक भावे
(ब) अकर्मक कर्तरी
(क) कर्मणी
(ड) सकर्मक भावे
राजाने चोराला फटकारले.
(अ) भावे प्रयोग
(ब) कर्मणी प्रयोग
(क) कर्तरी प्रयोग
(ड) यापैकी नाही
सागरने सफरचंद खाल्ले. (प्रयोग ओळखा)
(अ) कर्तरी प्रयोग
(ब) कर्मणी प्रयोग
(क) भावे प्रयोग
(ड) यापैकी नाही
संजयने बैलाला बांधले. (या वाक्यातील प्रयोग ओळखा.)
(अ) कर्मणी प्रयोग
(ब) कर्तरी प्रयोग
(क) भावे प्रयोग
(ड) यापैकी नाही
श्रेयाने आता मैदानात उतरावे. ( वाक्याचा प्रयोग ओळखा)
(अ) अकर्मक भावे
(ब) सकर्मक भावे
(क) कर्मणी
(ड) अकर्मक कर्तरी
सर्कशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसविले. ( या वाक्याचा प्रयोग ओळखा.)
(अ) सकर्मक भावे
(ब) अकर्मक भावे
(क) अकर्मक कर्तरी
(ड) सकर्मक कर्मणी
वरील प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील पेपर सोडवा व view score पहा