मराठी व्याकरण
भाग – A मराठी
खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नक्रमांक ३१ ते ३४ ची उत्तरे पर्यायातून निवडा.
आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारेही ते एक साधन मानले जाते. बर्दान्ड रसेलनाही असेच वाटते होते की, शिक्षणाने व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते. स्थितीशिलता ही तिची आदिप्रेरणा असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितीशिलतेला हादरा देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणिवा निर्माण करण्याचे साधन मानले.
शिक्षण हे माणसाला विचार देते. त्याच्या बुद्धीची जोपासना करते. त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉ. बाबासाहेब, तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जीवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो.
३१. आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते ?
(१) परिवर्तन
(२) स्थितीशीलता
(३) गतिमानता
(४) प्रारब्ध
३२. मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती ?
(१) बुद्धीची जोपासना
(२) अस्तित्वाची जाणीव
(३) शिक्षणाची जाणीव
(४) शरीरांचे पोषण
३३. शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही ?
(१) स्थितीशिलतेचे
(३) व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचे
(२) सामाजिक व आर्थिक विकासाचे
(४) सामाजिक जाणिवा निर्माण करण्याचे
३४. शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल ?
(१) प्रारब्धवादी
(२) अल्पायुषी
(३) परिवर्तनवादी
(४) दुसऱ्याचा गुलाम
३५. ‘ग्राह्य’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
(१) त्याज्य
(२) स्वीकारार्ह
(३) गृहित
(४) घेण्यास योग्य
३६. ‘माधव भित्रा नाही’, या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते ?
(१) माधव भित्रा आहे.
(३) माधव शूर नाही असे नाही.
(२) माधव शूर आहे.
(४) माधव भ्याड आहे.
३७. ‘पिसू’ या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते ?
(१) पिसूचा
(२) पिसे
(३) पिसवा
(४) पिसा
३८. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे?
(१) मी रस्त्यात पडलो.
(२) आरोही लाडू खाते.
(३) आज भाऊबीज आहे.
(४) सुनील उद्या येईल.
३९. ‘डोंगरएवढी हाव, तिळाएवढी धाव’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
(१) खूप हाव असणे.
(२) महत्त्वाकांक्षा असणे.
(३) महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे.
(४) डोंगर व तिळाची तुलना करणे.
४०. ‘कोणी कोणास हसू नये’ या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता ?
(१) प्रश्नार्थक
(२) दर्शक
(३) संबंधी
(४) अनिश्चित
४१. पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते ?
(१) सर्व मुली
(२) खूप लोक
(३) काळा कुत्रा
(४) दोन्ही भाऊ
४२. ‘सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली.’ या वाक्याचा काळ ओळखा.
(१) साधा भूतकाळ
(२) साधा वर्तमानकाळ
(३) पूर्ण भविष्यकाळ
(४) पूर्ण वर्तमानकाळ
४३. आई म्हणाली, ‘इच्छा असो-नसो, प्रपंच मांडला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो.’ या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत ?
(१) दोन
(२) तीन
(३) चार
(४) पाच
४४. पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा.
(१) उपहार
(२) अवजड
(३) प्रतिकार
(४) झुबकेदार
४५. ‘पती’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
(१) कांता
(२) भर्ता
(३) दारा
(४) जाया
पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ४६ ते ४९ ची उत्तरे पर्यायातून निवडा.
ओढाळ वासरू रानी आले फिरू कळपाचा घेरू सोडूनिया।
कानामध्ये वारे भरुनिया न्यारे फेर धरी फिरे रानोमाळ।
मोकाट मोकाट अफार अफाट वाटेल ती वाट धावू लागे।
विसरुनी भान भूक नि तहान पायाखाली रान घाली सारे।
थकूनिया खूप सरता हुरूप आतवे कळप तयालागी।
फिरू जाता मागे दूर जाऊ लागे
आणखीच भाग भटकत।
पडता अंधारू लागले हंबरू
माय ! तू लेकरू शोधू येई !
४६. वासरू केव्हा हंबरू लागले ?
(१) मोकाट धावताना
(२) भूक तहान लागल्यावर
(३) अंधार पडू लागल्यावर
(४) थकल्यानंतर
४७. वासरू कळपातून कुठे गेले?
(१) रानात
(२) भरकटत दूर
(३) गायीकडे
(४) गोठ्यात
४८. कवितेतील ‘ओढाळ’ शब्दाचा अर्थ काय ?
(१) बंदिस्त
(२) उनाड
(३) मोकळा
(४) उत्साही
४९. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली ?
(१) भुकेची
(२) तहानेची
(३) गायीची
(४) कळपाची
५०. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
(१) चालिरिति
(२) चालिरीती
(३) चालीरिती
(४) चालीरिति
५१. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा.
(१) घमेंड
(२) गर्व
(३) डौलदारपणा
(४) अहंता
५२. ‘कोणालाही कळू न देता’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?
(१) बिनतक्रार
(२) बिनबोभाट
(३) बिनधोक
(४) बिनधास्त
५३. ‘बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने
योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा.
(१) तोंडघशी पाडणे.
(२) तोंडात शेण घालणे.
(३) तोंड काळे करणे.
(४) तोंडचे पाणी पळणे.
५४. ‘तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या’, या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे?
(१) क्रियाविशेषण
(२) उभयान्वयी
(३) शब्दयोगी
(४) केवलप्रयोगी
५५. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल?
(१) चौकशीपत्र
(२) अभिनंदनपत्र
(३) कौटुंबिक पत्र
(४) तक्रार पत्र
५६. १९९८ साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या ७१ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
(१) द. मा. मिरासदार
(२) वि. द. घाटे
(३) मारुती चितमपल्ली
(४) ना. सं. इनामदार
५७. मराठी भाषेतील ‘आद्य चरित्रकार’ म्हणून कोण ओळखले जाते ?
(१) चक्रधर स्वामी
(२) म्हाइंभट
(३) नागदेवाचार्य
(४) आऊसा
५८. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
(१) ग्रंथ
(२) पोथी
(३) पुस्तक
(४) वही
५९. ‘केशवकुमार’ या टोपणनावाने लेखन करणाऱ्या लेखकांचे नाव काय ?
(१) प्र. के. अत्रे
(२) कृ. के. दामले
(३) रा. ग. गडकरी
(४) वि. वा. शिरवाडकर
६०. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे ?
(१) प्
(२) ब्
(३) भ्
(४) ध्